Tuesday 19 September 2017

मला किशोर राजे निंबाळकर व्हायचे आहे ... !

किशोर राजे निंबाळकर
लेखाचे शिर्षक वाचून अनेकांना वाटेल, हे काय खूळ आहे. प्रत्येकाला कलेक्टर किशोर राजे निंबाळकर कसे होता येईल ? कलेक्टर होणे एवढे सोपे आहे का ? हे दोन्ही प्रश्न रास्त आहे. पण, स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होवून अमर्याद अधिकार असलेला कलेक्टर होणे फारसे अवघड सले तरी अधिकारांचे उच्च पदस्थ बुजगावणे व्हायचे की अधिकारांचा समाजासाठी वापर करीत माणूस व्हायचे याचा निर्णय प्रत्येकाला घेता येणे शक्य आहे. लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी म्हणून प्रचंड अधिकार प्राप्त असले तरी सामान्य माणसासाठी लोकसेवकाच्या मानसिकतेतून माणूस होणे फारच थोड्यांना साधते. तसे ते जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना साधले आहे. माणूस असलेला अधिकारी अशी ओळख राजे निंबाळकर यांनी निर्माण केली आहे.  

Friday 1 September 2017

स्थितप्रज्ञ नाथाभाऊ ...नाथाभाऊंचा आज वाढदिवस. जवळपास पाच दशकांचा राजकिय प्रवास नाथाभाऊ पूर्ण करीत आहेत. त्यातील किमान तीन दशके नाथाभाऊंना पत्रकाराच्या नजरेतून अनुभवतोय. राजकारण व समाजकारणाच्या व्यासपीठावर अनेक पद आणि प्रतिष्ठा स्वकर्तृत्वाने मिळून नाथाभाऊंचे व्यक्तिमत्त्व सद्गुण संपन्न झाले आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर समोर आलेल्या परिस्थितीत नाथाभाऊ कसे वागले, बोलले आणि गप्प सुद्धा राहिले याचा एक दृश्यात्मक आलेख समोर येतो. ज्ञानेश्वरीत सोप्या भाषेत स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे समजावली आहेत. नाथाभाऊंचे आजचे व्यक्तिमत्त्व हे स्थितप्रज्ञ अवस्थेतील आहे असे वाटते. ज्याची बुद्धी पूर्णतः स्थिर आहे, अशाच व्यक्तिला श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ म्हणतो ...