जळगाव शहराच्या सांस्कृतिक
इतिहासात मानाचे पान ठरलेली आणि मराठमोळ्या उत्सवाचा थरार अनुभवायला लावणारी
राजेशाही थाटाची मराठमोळी दहिहंडी मंगळवार, दि. १५ ऑगस्ट २०१७ रोजी स्व. बॅरिस्टर
निकम चौकात (सागरपार्क) रंगणार आहे. या दहिहंडीचे परंपरेनुसार आयोजन एल. के.
फाऊंडेशनचे प्रमुख उपमहापौर ललित कोल्हे यांनी केले आहे.
दहिदंडीचा कार्यक्रम
सांयकाळी ६ पासून सुरू होइल. तेथे सादर होणारे सर्व कार्यक्रम एखाद्या सांस्कृतिक
महोत्सवाप्रमाणे आहेत. दहिहंडी म्हणजे, कृष्णाच्या माखन चोरीच्या लिलांचा खेळ
असल्याचे सांगण्यात येते. अर्थात, हिच भावना ठेवून मात्र, माखन चोरीच्या ऐवजी
कन्हैय्या सोबत माखन खाण्यात सहभागाची समान संधी देणारा हा कार्यक्रम असणार आहे.
एल. के. फाऊंडेशनतर्फे सन
२०१२ पासून जळगावात दहिहंडीची परंपरा सुरू करण्यात आली. या उत्सवाला सांस्कृतिक
महोत्सवाचे स्वरुप देण्याचा प्रयत्न ललित कोल्हे यांनी केला. दहिहंडीच्या
मनोऱ्यांपेक्षा तेथे सादर होणाऱ्या विविधांगी कार्यक्रमांची चर्चा सुरू झाली. तेथे
सादर होणारा लेसर शो हा आकर्षण ठरु लागला. दरवर्षी त्यात नाविन्यपूर्ण
कार्यक्रमांची संख्या वाढली. त्यामुळे दहिहंडीसाठी थरावर थराचे आकर्षण न राहता,
तेथे दरवर्षी उत्सुकता असते की, आता काय नवा कार्यक्रम आहे.
येत्या मंगळवारी (दि.
१५) राजेशाही थाटाच्या मराठमेळ्या
दहिहंडीचा कार्यक्रम होणार आहे. यावर्षीच्या कार्यक्रमात नागरी स्वच्छता विषयावर
पथनाट्य, दहिहंडी विषयावर नृत्य आणि मैदानी खेळाशी संबंधित कवायत तथा मल्लखांबाचे
विविध प्रात्यक्षिक सादर होणार आहे. यासोबत नेहमीचा रंगतदार लेसर शो सुद्धा सादर
होणार आहे.
राजेशाही मराठमोळ्या
दहीहंडीचे वैशिष्ट्य हेच की, यावेळी स्थानिक कलावंतांना आपले सादरीकरण करता येणार
आहे. एम. जे. कालेजमधील विद्यार्थ्यांचे पथक पथनाट्य सादर करणार आहे. याची तयारी
विकास पाटील हे करुन घेत आहेत. जळगावमधील सुप्रसिद्ध ग्लॅडिएटर गृपचे पथक दहिहंडी
या विषयावर शानदार नृत्य सादर करतील. अखिल तिलकपूरे यांची तयारी करुन घेत आहेत.
वरणगाव येथील महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांचे पथक मलखांबावरील कवायतची
प्रात्यक्षिके व ढोल ताशे वाजविण्याचे सादरीकरण करणार आहेत. त्यानंतर मायटी
ब्रदर्सच्या सहकार्याने लेसर शो सादर केला जाईल. शा प्रकारे सायंकाळी ६ वाजता सुरू
होणारा कार्यक्रम तब्बल तीन ते साडेतीन तासांचा असेल.
या कार्यक्रमास प्रमुख
पाहुणे म्हणून राज्याचे जलसंपदामंत्री व वैद्यकिय शिक्षणमंत्री गिरीश महाजन, सहकार
राज्यमंत्री गुलाबराव पाटील, पद्मश्री विशेष सरकारी वकिल उज्ज्वल निकम, आमाजी
आमदार सुरेशदादा जैन, जिल्हाधिकारी किसोर राजे निंबाळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक
दत्तात्रय कराळे आमदार सर्वश्री चंदुलाल पटेल (जळगाव) चंद्रकांत सोनवणे (चोपडा),
सुरेश भोळे (जळगाव), महापौर नितीन लढ्ढा, जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष अशोक जैन व
खाविआचे गटनेते रमेश जैन असणार आहेत. याशिवाय इतरही विशेष आमंत्रित असून सर्व
नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
दरवर्षी या कार्यक्रमांचे
आयोजन केले जाते. एल. के. फाऊंडेशन स्व खर्चाने हा कार्यक्रम पार पाडत असते.
त्यामुळे जळगावकरांच्या मनांत या कार्यक्रमाविषयी उत्सुकता असते. यावर्षीही
गोविंदा ... गोविंदा ... हरे हरे गोपाला हा नाद सागरपार्कवर गुंजणार आहे. या
कार्यक्रमास प्रत्येक जळगावकराने उपस्थिती द्यायला हवी.
No comments:
Post a Comment