Thursday, 31 August 2017

प्लास्टीक तांदुळाचे थोतांड ते कुभांड ...

भारतात एका राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या घरातील गणपती दूध पीत असल्याची तद्दन फालतू बातमी टीव्ही माध्यमातून जगभरात दाखविली जाते. फोनच्या माध्यमातून ती अफवा देशभरात पोहचते. त्यानंतर घराघरातील तहानलेले गणपती गटागटा दूध प्यायला लागतात. टीव्ही आणि फोन माध्यमाद्वारे निर्माण झालेल्या या अफवेचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.  

Thursday, 24 August 2017

अब्दुल्ला के तलाक में बेगाने दिवाने ...

कौटुंबिक व्यवस्थेत मुस्लिम महिलांचे अस्तित्व आणि पत्नीत्व या स्थानाला स्थैर्य देणारा अंतरिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तोंडी (ट्रिपल) तलाक विरोधात भारतीय संसदेत कायदा बनवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. तोंडी तलाक संदर्भातील एका खटल्याची सुनावणी केल्यानंतर अंतरिम निकाल देताना न्यायालयाने हा आदेश दिला आहेनिकालावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाने तलाकतलाकतलाक हा प्रकार घटनाबाह्य ठरवला आहे. न्यायालयाने स्वतः पुढाकार घेत, तोंडी तलाक देण्याच्या पद्धतीवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे. मुस्लिम समाजातील कोणताही विवाहीत पुरूष पुढील सहा महिन्यांत पत्नीला तोंडी तलाक-तलाक-तलाक म्हणत घटस्फोट देवू शकणार नाही.

Thursday, 17 August 2017

एमआयडीसीसाठी भू संपादनाचे मे १९९५ चे परिपत्रक रद्द ...

रद्द केल्याचा सरकारचा एकनाथ खडसे यांना खुलासा

भोसरी (जि. पुणे) येथे औद्योगिक वसाहतीकरिता सन १९६७ आणि त्यानंतर १९७१ मध्ये भूसंपादनासाठी नोटीसा (अनुक्रमे ३२-२ आणि ३२-१) दिलेल्या भूखंडाचा कागदोपत्री ताबा अद्यापही एमआयडीसीकडे नाही. त्यामुळे विहीत कालमर्यादेत संपादन न झालेला हा भूखंड मे १९९५ व जानेवारी १९९६ च्या परिपत्रकानुसार मूळ जागा मालकाकडे परत गेला किंवा नाही ? असा प्रश्न विधीमंडळात तीन वेळा विचारणाऱ्या माजीमंत्री एकनाथराव खडसे यांना अखेर ऊर्जा, उद्योग व कामगार विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी दि. २ ऑगस्ट २०१७ ला उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दि. १८ मे १९९५ आणि दि. २३ जानेवारी १९९६ चे भू संपादन प्रक्रियेविषयीचे ते परिपत्रक अधिक्रमीत (बाजुला ठेवणे किंवा रद्द करणे) केले आहे. सत्ताधारी पक्षाचे माजीमंत्री व ज्येष्ठ आमदाराने एका परिपत्रकाविषयी विधीमंडळात तीनवेळा विचारलेल्या प्रश्नावर तब्बल सहा महिन्यांनी उत्तर देण्याची तत्परता विद्यमान राज्य सरकारने दाखविली आहे. याच प्रकरणाशी संबंधित चौकशी अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण करु असे आश्वासन विधीमंडळात देणाऱ्या राज्य सरकारने गेल्या सव्वा वर्षांत चौकशीचा अहवालही समोर आणलेला नाही. राज्य सरकारमधील हे वेळकाढू धोरण खान्देशातील जेष्ठनेते एकनाथराव खडसे यांचे राजकिय वर्चस्व संपविण्यासाठीच अवलंबिले जात असल्याची भावना आता जनतेत निर्माण होत आहे.

Saturday, 12 August 2017

१५ ऑगस्टला राजेशाही थाटात मराठमोळी दहीहंडी



एल. के. फाऊंडेशनतर्फे रंगारंग आयोजन
जळगाव शहराच्या सांस्कृतिक इतिहासात मानाचे पान ठरलेली आणि मराठमोळ्या उत्सवाचा थरार अनुभवायला लावणारी राजेशाही थाटाची मराठमोळी दहिहंडी मंगळवार, दि. १५ ऑगस्ट २०१७ रोजी स्व. बॅरिस्टर निकम चौकात (सागरपार्क) रंगणार आहे. या दहिहंडीचे परंपरेनुसार आयोजन एल. के. फाऊंडेशनचे प्रमुख उपमहापौर ललित कोल्हे यांनी केले आहे.

Saturday, 5 August 2017

माध्यम पंढरीची अभ्यासवारी ...!!

माचवि चे कुलगुरु प्रा.डॉ. कुठियाला यांच्याकडून भेट
भोपाल शहर. मध्यप्रदेशची राजधानी. तलावांचे शहर. अजून एक ओळख. भोपाल हे माध्यमांची पंढरी सुध्दा आहे. भारतातील पत्रकारिता क्षेत्रातील विविध माध्यमांचे शिक्षण देणारे माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विद्यापीठ (माचवि), माध्यमांच्या क्षेत्रातील देशातला सर्वांत मोठा डीबी कॉर्प समुह हा भोपालमध्येच आहे. आणखी एक विशेष उल्लेख, भारतातील वृत्तपत्रांचे एकमेव असे माधवराव सप्रे स्मृती संग्रहालय सुध्दा भोपाळमध्येच आहे. मध्यप्रदेश सरकारने माध्यम नावाची सरकारी ॲड सर्व्हिस एजन्सी निर्माण करुन सरकारी माध्यमांचाही एक वेगळा प्रवाह निर्माण केला आहे. अशा या माध्यमांच्या पंढरीत अभ्यासवारीची एक अनोखी संधी मिळाली. निमित्त होते, पत्रकारितेच्या क्षेत्रात नविन काय घडते आहे हे पाहण्याचे आणि पत्रकारितेचे शिक्षक म्हणून भविष्यात कसे अध्यापन करावे याचा अंदाज घेण्याचे. 

Wednesday, 2 August 2017

रामनाथ सोनवणेंचे लेडी डायनावर नाटक

जळगाव मनपाचे माजी आयुक्त, कुशल प्रशासक आणि नागपूरमधील स्मार्ट सीटी प्रोजेक्टचे सीईओ डॉ. रामनाथ सोनवणे यांनी ब्रिटनमधील राजघराण्याच्या संदर्भातील अनेक दंतकथांची नायिका ठरलेली लेडी डायना विषयी अत्यंत उत्कंठावर्धक आणि प्रत्ययकारी शब्दांत नाटक लिहीले आहे. इंग्रजी भाषेत रचलेला हा नाट्यसंवाद "लेडी डायना द क्विन ऑफ हार्टस्" या नावाने अवघ्या ९८ पानांचा आहे.