![]() |
पोलीस कोठडीत मनिष भंगाळे |
वर्षभरापूर्वी म्हणजे मे २०१६ मध्ये मनिष भंगाळे (रा. बडोदा, गुजरात. मुळचा राहणारा डांभुर्णी, जि. जळगाव) याने प्रसार माध्यमांसमोर काही कागदपत्रे सादर करुन पाकिस्तानातील कराची स्थित कुख्यात आंतराष्ट्रीय गुंड दाऊद इब्राहीम हा भारतातील ५ राजकीय व्यक्तिंशी पाकिस्तानातील लैण्डलाईन नंबर (021-35871639) वरुन मोबाईलवर संपर्कात आहे असा दावा केला होता. या ५ व्यक्तिंमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांचाही मोबाईल नंबर (9423073667) आहे असाही दावा मनिष भंगाळे करीत होता.
![]() |
एकनाथ खडसेंच्या मोबाईलचे बिल भरल्याचे दाखवताना प्रिती शर्मा मेमन |
जेव्हा की, पाकिस्तान स्थित दाऊदचा मुद्दा असूनही भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले होते. सीबीआयने सुध्दा या विषयावर फारसा रस दाखवला नव्हता. खडसे यांच्या विवादीत मोबाईल सीम क्रमांकावर एप्रिल-मे २०१५ अमध्ये कराचीतील कोणत्याही लैण्डलाईनवरुन कॉल आलेले नाहीत असा निर्वाळा सीम देणारी कंपनी आयडीयाने खुलासा केला होता. मात्र हा सर्व प्रकार खडसे स्वतः क्लिनचीट मिळवून घेण्यासाठी करीत असून यासाठी ते मंत्रीपदाचा प्रभाव वापरत आहेत असे विरोधकांचे म्हणणे होते.
खडसे यांच्या विरोधात तेव्हा कोण कोण होते ? तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कॉल फ्राम कराचीवर जास्त बोलत नव्हते. पण आम आदमी पार्टीच्या प्रिती शर्मा मेमन, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा विषय लावून धरला होता. दोघींचे म्हणणे होते, आम्ही खडसेंवर आरोप करीत नाही. पण मनिष भंगाळेने केलेल्या आरोपांची पारदर्शी चौकशी सरकारने करावी. या दोघींच्या सोबत काँग्रेसचे मुंबईतील नेते कृपाशंकर सिह, संजय निरुपम यांनीही मनिष भंगाळेला पाठिंबा दिला होता. याशिवाय दिल्लीतील राष्ट्रीय चैनल आजतक आणि इंडिया टुडे नेटवर्कचे राहुव कवँल व राजदीप सरदेसाई यांनी खडसे विरोधात ट्विटर व चैनलवर आघाडी उघडली होती. या पाठोपाठ काँग्रेसचे दिल्लीतील नेते दिग्विजय सिंह यांनीही अपुऱ्या माहितीवर बोलघेवडापणा केला होता.
वरील सर्व नावे जर लक्षात घेतली तर अमराठी माणसांनी खडसेंच्या विरोधात रचलेल्या कुभांडला प्रचारकी हवा देण्यासाठी साठेलोटे केलेले होते. खान्देशसह महाराष्ट्राच्या राजकारणात सुमारे ४० वर्षे भाजपवर निष्ठा ठेवून समाजकारण व राजकारण करणाऱ्या खडसेंना बदनाम करण्यासाठी खोटारड्या मनिष भंगाळेचा वापर केला गेला.
(मनिष भंगाळेच्या खोटारडेपणाला इंडिया टुडे नेटवर्क कशी प्रसिद्धी देत होते ते पाहा ...)
वास्तवात मनिष भंगाळे यानेही खडसेंच्या मोबाईल कॉलची चौकशी सीबीआयने करावी अशी मागणी करणारी याचिका मुंबई न्यायालयात केली होती. पण तेथेही न्यायालयाच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे मनिष भंगाळे देवू शकला नव्हता. अखेर न्यायालयाने या प्रकरणात मुंबई सायबर गुन्हे शाखेला चौकशीचे अधिकार दिले होते व मनिष भंगाळेची याचिका निकाली काढली होती. अर्थात, त्यानंतर मनिष भंगाळेने सायबर गुन्हे शाखेला मदत करणे टाळले होते. तो महाराष्ट्रभर खडसे विरोधात पत्रकार परिषदा घेत होता. दुबईत जावून आला. पण सायबर गुन्हे शाखेकडे चौकशीला सहकार्य करीत नव्हता.
दरम्यानच्या काळात मनिष भंगाळे हा कसा फेकर (खोटारडा) आहे ? याचा पंचनामा काही माध्यमांमधून होत होता. मनिष भंगाळेने रचलेले कुभांड उघड होत होते. त्याचवेळी पुण्यातील रवींद्र बऱ्हाटे यांनी मनिष भंगाळे याने बनावट दस्तावेज तयार करुन एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याची तक्रार मुंबई पोलिसात केली. त्यानंतर सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी मनिष भंगाळेच्या मुसक्या आवळल्या. तपासाच्या दरम्यान मनिष भंगाळे याने असाही दावा केला की, माझे पुरावे गहाळ झाले. मी तयार केलेला मेहजबिन शेख नावाचा ई मेल ॲड्रेस हैक झाला. गेल्या ३ महिन्यात न्यायालयाने सुध्दा त्याला जामीन दिलेला नाही. मनिष भंगाळेला जामीन देवू नये म्हणून तक्रारदार व सरकार पक्षाने १८ कारणे सादर केली आहे. त्यात मनिषभंगाळे हा फरार होण्याच्या भीतीसह तो बाहेर पडला तर पुन्हा उलट सुलट बदनामी करु शकतो या गोष्टी ठळक मांडल्या आहेत. न्यायालयाने त्या ग्राह्य मानल्या आहेत.
आता तपास यंत्रणेने मनिष भंगाळे विरोधात ७८८ पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. या संपूर्ण तपासाचा निष्कर्ष काढताना वरिष्ठ अधिकारी म्हणतात, खडसे यांची राजकीय व सामाजिक अप्रतिष्ठा करीत बदनामी करण्यासाठीच मनिष भंगाळेने कुभांड रचल्याचे सिद्ध झाले आहे. मी एकटा राष्ट्रभक्त असून देशासाठी लढणारा शिपई आहे हे भासवण्यासाठीच मनिष भंगाळेने हे कृत्य केले असेही मत तपास यंत्रणा व्यक्त करते.
![]() |
राहुल कंवल यांनी केलेले ट्विट |
वर्षभरापूर्वी म्हणजे मे २०१६ मध्ये मनिष भंगाळे (रा. बडोदा, गुजरात. मुळचा राहणारा डांभुर्णी, जि. जळगाव) याने प्रसार माध्यमांसमोर काही कागदपत्रे सादर करुन पाकिस्तानातील कराची स्थित कुख्यात आंतराष्ट्रीय गुंड दाऊद इब्राहीम हा भारतातील ५ राजकीय व्यक्तिंशी पाकिस्तानातील लैण्डलाईन नंबर (021-35871639) वरुन मोबाईलवर संपर्कात आहे असा दावा केला होता. या ५ व्यक्तिंमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांचाही मोबाईल नंबर (9423073667) आहे असाही दावा मनिष भंगाळे करीत होता.
खडसे यांच्यावर दाऊदच्या संपर्काचा दावा करीत असताना मनिष भंगाळेने दोन पुरावे सादर केले होते. पहिला पुरावा म्हणजे, दाऊदची पत्नी मेहजबिन शेख हिच्या नावाने स्वतः तयार केलेला बनावट मेल ॲड्रेस (mehjbeenshaikh918@gmail.com) आणि दुसरा पुरावा म्हणजे या मेल ॲड्रेसवर पाकिस्तान टेलिकम्युनिकेशन लिमीटेड (पीटीसीएल) (billing@ptcl.net.pk) कडून एप्रिल-मे २०१५ या महिन्यांची आलेली लैण्डलाईन नंबरची टेलिफोन कॉलची बीले. या बिलात खडसे यांचा मोबाईल क्रमांक होता. या दोन पुराव्यांची शहनिशा न करता मनिष भंगाळेच्या आरोपांना जवळपास सर्वच माध्यमे ठळक प्रसिद्धी देत होते.
जेव्हा की, पाकिस्तान स्थित दाऊदचा मुद्दा असूनही भारतीय राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले होते. सीबीआयने सुध्दा या विषयावर फारसा रस दाखवला नव्हता. खडसे यांच्या विवादीत मोबाईल सीम क्रमांकावर एप्रिल-मे २०१५ अमध्ये कराचीतील कोणत्याही लैण्डलाईनवरुन कॉल आलेले नाहीत असा निर्वाळा सीम देणारी कंपनी आयडीयाने खुलासा केला होता. मात्र हा सर्व प्रकार खडसे स्वतः क्लिनचीट मिळवून घेण्यासाठी करीत असून यासाठी ते मंत्रीपदाचा प्रभाव वापरत आहेत असे विरोधकांचे म्हणणे होते.
खडसे यांच्या विरोधात तेव्हा कोण कोण होते ? तर काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस कॉल फ्राम कराचीवर जास्त बोलत नव्हते. पण आम आदमी पार्टीच्या प्रिती शर्मा मेमन, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा विषय लावून धरला होता. दोघींचे म्हणणे होते, आम्ही खडसेंवर आरोप करीत नाही. पण मनिष भंगाळेने केलेल्या आरोपांची पारदर्शी चौकशी सरकारने करावी. या दोघींच्या सोबत काँग्रेसचे मुंबईतील नेते कृपाशंकर सिह, संजय निरुपम यांनीही मनिष भंगाळेला पाठिंबा दिला होता. याशिवाय दिल्लीतील राष्ट्रीय चैनल आजतक आणि इंडिया टुडे नेटवर्कचे राहुव कंवल व राजदीप सरदेसाई यांनी खडसे विरोधात ट्विटर व चैनलवर आघाडी उघडली होती. या पाठोपाठ काँग्रेसचे दिल्लीतील नेते दिग्विजय सिंह यांनीही अपुऱ्या माहितीवर बोलघेवडापणा केला होता.
वरील सर्व नावे जर लक्षात घेतली तर अमराठी माणसांनी खडसेंच्या विरोधात रचलेल्या कुभांडला प्रचारकी हवा देण्यासाठी साठेलोटे केलेले होते. खान्देशसह महाराष्ट्राच्या राजकारणात सुमारे ४० वर्षे भाजपवर निष्ठा ठेवून समाजकारण व राजकारण करणाऱ्या खडसेंना बदनाम करण्यासाठी खोटारड्या मनिष भंगाळेचा वापर केला गेला.
![]() |
जळगाव येथे पोलीस बंदोबस्तात आलेला मनिष भंगाळे |
दरम्यानच्या काळात मनिष भंगाळे हा कसा फेकर (खोटारडा) आहे ? याचा पंचनामा काही माध्यमांमधून होत होता. मनिष भंगाळेने रचलेले कुभांड उघड होत होते. त्याचवेळी पुण्यातील रवींद्र बऱ्हाटे यांनी मनिष भंगाळे याने बनावट दस्तावेज तयार करुन एकनाथ खडसे यांची बदनामी केल्याची तक्रार मुंबई पोलिसात केली. त्यानंतर सायबर गुन्हे शाखा पोलिसांनी मनिष भंगाळेच्या मुसक्या आवळल्या. तपासाच्या दरम्यान मनिष भंगाळे याने असाही दावा केला की, माझे पुरावे गहाळ झाले. मी तयार केलेला मेहजबिन शेख नावाचा ई मेल ॲड्रेस हैक झाला. गेल्या ३ महिन्यात न्यायालयाने सुध्दा त्याला जामीन दिलेला नाही. मनिष भंगाळेला जामीन देवू नये म्हणून तक्रारदार व सरकार पक्षाने १८ कारणे सादर केली आहे. त्यात मनिषभंगाळे हा फरार होण्याच्या भीतीसह तो बाहेर पडला तर पुन्हा उलट सुलट बदनामी करु शकतो या गोष्टी ठळक मांडल्या आहेत. न्यायालयाने त्या ग्राह्य मानल्या आहेत.
आता तपास यंत्रणेने मनिष भंगाळे विरोधात ७८८ पानांचे आरोपपत्र न्यायालयात सादर केले आहे. या संपूर्ण तपासाचा निष्कर्ष काढताना वरिष्ठ अधिकारी म्हणतात, खडसे यांची राजकीय व सामाजिक अप्रतिष्ठा करीत बदनामी करण्यासाठीच मनिष भंगाळेने कुभांड रचल्याचे सिद्ध झाले आहे. मी एकटा राष्ट्रभक्त असून देशासाठी लढणारा शिपई आहे हे भासवण्यासाठीच मनिष भंगाळेने हे कृत्य केले असेही मत तपास यंत्रणा व्यक्त करते. सायबर गुन्हे शाखेचे उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले की, मनिष भंगाळेचे कृत्य व त्यामागील हेतू लक्षात घेवून आम्ही त्याच्या विरोधात भारतीय दंडसंहितेतील कलमे ४१९ (गैर हेतूने फसवणूक), ४६५ (बनावट दस्तावेज तयार करणे), ४६९ (वाईट हेतूने अप्रतिष्ठा करण्यासाठी फसवणूक करणे), ५०० (मानहानी करणे) लावली आहेत. मनिष भंगाळे विरोधातील या तपासावर किंवा त्याच्या खोटारडेपणावर खडसे विरोधातील अमराठी मंडळींनी आज तरी वक्तव्ये केलेली नाही. ती सर्व मंडळी मूग गिळून गप्पच आहे. नुकसान मात्र खान्देशवासियांचे झाले आहे. खडसेंसारखा धडाडीचा राजकारणी मंत्रिमंडळाबाहेर बसला आहे ...
This page certainly has all the information and facts I wanted about this subject and didn't know who to ask. sign in hotmail
ReplyDelete