
Thursday, 25 May 2017
संगीत संशेवकल्लोळला हवा रसिकाश्रय !

Wednesday, 17 May 2017
वैचारिक दहशतवाद
सत्ता, संपत्ती, अधिकार आणि शोषण अशा चार प्रमुख गोष्टींच्या हव्यासापोटी दहशतवाद किंवा नक्षलवाद बळावतो. या चारही गोष्टी ज्यांना हव्यात ते समुह करुन एकत्र येतात. हे एकत्र येणे प्रथमतः धर्माच्या नावावर असते. त्यानंतर पंथ, वर्ण, समाज, जात, लिंग आणि कार्य अथवा विचारांच्या सामायिकतेतून लोकांना एकत्र आणले जाते. ज्या चार गोष्टींची मागणी करायची त्यासाठी अगोदर लक्षवेधी आक्रोश केला जातो. आक्रोशातून प्रस्थापित व्यवस्थेविरोधात आंदोलन उभे राहते. आंदोलनाचे मूलतः दोनच प्रकार असतात. पहिला अहिंसक व दुसरा हिंसक.
दहशतवादाला मूक विरोध ...

Saturday, 6 May 2017
बदल्यांच्या फडणिशीत फडणवीस नापास
राज्याच्या प्रशासनात एप्रिल
महिन्यापासून आयएएस व आयपीएस श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा माहौल आहे. यात
प्रामुख्याने चर्चेतल्या बदल्या या जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या असतात. महसूल मंत्रालय
जिल्हाधिकारी तर गृहमंत्रालय जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या बदल्यांमध्ये लक्ष घालते.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील असून गृहमंत्रालय खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्याकडे आहे. गेल्या महिनाभरात या दोन्ही मंत्रालयांनी केलेल्या जिल्हाधिकारी व
जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनेक घोळ झाल्याचे लक्षात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे घाऊक आदेश काढल्यानंतर त्यात वेगाने एकेकाची बदली रद्द करुन
नवी पदस्थापना दिल्याचा स्वतंत्र आदेश निघत आहे. अशा अनेक प्रकारांचा पंचनामा
माध्यमांमधून सुरू आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या अंतिमतः
मुख्यमंत्र्यांच्या संमतीने होतात. म्हणजेच, बदल्यांचा सारा घोळ हा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच सुरू आहे. सध्याच्या फडणवीसांचा कारभार
बदल्यांच्या फडणविशीत नापास ठरल्याचे दिसत आहे. बदल्यांमधील हा घोळ खरच पारदर्शक
आहे ? या विषयी मुख्यमंत्री किंवा त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते खुलेपणाने बोलतील का ?
Tuesday, 2 May 2017
खडसे पक्षाच्या नव्हे, तर प्रवृत्तींच्या विरोधात ...
सत्तेपासून सध्यातरी लांब
बसलेले माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना
आपल्या मनांतील खंत पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. खडसे म्हणाले, मी मुख्यमंत्री
होवू नये म्हणून अनेकांनी उद्योग केले. घाणेरडे राजकारण करीत बिनबुडाच्या
आरोपांच्या फैरीही माझ्यावर डागल्या. मात्र, मी मंत्रिपद त्यागल्यानंतर गेल्या
वर्षभरात एकही विरोधक माझ्यावर केलेला एकही आरोपल सिद्द करु शकलेला नाही.
खडसेंच्या या वक्तव्याची दखल आज जय महाराष्ट्र या चॅनेलवर घेण्यात आली. त्यामुळे
त्यांची चर्चा पुन्हा राज्यभर सुरू झाली. अशा वातावरणात खडसेंसारखा तावून सलाखून निघालेला माणूस आता योग्य वेळेची प्रतिक्षा करीत आहे. भविष्यात कोणती वेळ कोणता प्रश्न घेवून येईल यासाठी प्रतिक्षाच करणे योग्य राहील.
Monday, 1 May 2017
मुलांना शिव्या देता आल्या पाहिजेत !
सातवर्षे वयोगटातील मुला मुलींच्या शिबिरात जाण्याचा योग आला. शिबिरार्थींना
चित्रकलेचा साधा सोपा प्रकार समजून सांगितला. वेळ होता म्हणून त्यांच्याशी गप्पा
केल्या. मुला मुलींना थेट विचारले, तुम्हाला शिव्या देता येतात का ? हा असभ्य प्रश्न अचानक
विचारल्याने मुले भांबाळली. एकमेकाकडे पाहू लागली. शिव्या देता येतात का प्रश्नाचे
सरळ उत्तर नकाराचे होते. पण, तुम्हाला कोणत्या शिव्या माहित आहेत ? या प्रश्नावर मुले म्हणत होती, मूर्ख, नालायक, स्टुपीड, भैताड .... ! मला
गंमत वाटत होती. शिव्या म्हणजेच अपशब्द उच्चारणे हे मुलांना निषिद्ध वाटत होते मात्र त्यांच्याकडे ५/१० शिव्यांचा साठा नक्कीच होता.
Subscribe to:
Posts (Atom)