
डिजिटल ड्राईव्हर ही साधी
सोपी कल्पना आहे. कम्पुटर, मोबाईल, लॅपटॉप, टॅब अशा व्यक्तिगत वापराच्या उपकरणांचा
सहज आणि कुशलतेने वापर करण्यासाठी लागणारे कौशल्य मिळविणे म्हणजे, डिजिटल
ड्राईव्हर होणे. वाहन हाकण्यासाठी ज्याप्रमाणे वाहनांच्या गिअर हाताळण्याची सवय
हवी व रस्त्यावरील वाहतूक, तेथील नियम माहित असावे लागतात त्याचप्रमाणे डिजिटल
दुनियेत ड्राईव्ह (सफारी, फिरस्ती) करायची असेल तर डिजिटल ड्राईव्हर होणे आवश्यक असते.
डिजिटल वर्ल्ड म्हणजे, जे
जे काम हे कम्प्युटरशी संबंधित प्रणालीद्वारे (कम्प्युटर प्रोग्राम) होवू शकते
त्याला डिजिटल वर्क म्हणतात. हे काम ज्या डिजिटल स्पेसमध्ये केले जाते किंवा सेव्ह
केले जाते त्याला डिजिटल स्पेस किंवा सायबर स्पेस म्हणतात. तंत्रज्ञान लहान लहान
होत कम्प्युटरचे स्वरुप आता टॅबच्या अवस्थेत आहे. शिवाय, स्मार्टफोन प्रणालीतही
कम्प्युटरशी संबंधित अनेक प्रणाली (ऍप्लिकेशन) विकसित होत आहेत. म्हणजेच
कम्प्युटरचे नॅनो रुप हे स्मार्टफोनच्या रुपात आहे, असे ढोबळपणे म्हणता येईल.
अर्थात, कम्प्युटरची सर्वच कामे स्मार्टफोनवर होत नाहीत.
स्मार्ट फोनमुळे व्यक्तिगत
संपर्काची अनेक पर्याय खुले झाले आहेत. संवाद करण्याचे सर्व प्रकार या एकाच
उपकरणात उपलब्ध आहेत. स्वतःशी संवाद, दुसऱ्याशी संवाद, एकाचा अनेकांशी संवाद आणि
अनेकांचा अनेकांशी संवाद अशा संवाद व्यवस्था (कम्युनिकेशन मॅनेजमेंट) या एकाच
उपकरणाने निर्माण केली आहे. कम्प्युटर व स्मार्टफोन प्रणालीतील संवाद व्यवस्था ही
डिजिटल प्रणालीतच असते. जगातल्या सर्व प्रकारच्या संवादांची विभागणी याच प्रकारात
होते. मग, तो संवाद राजकिय असो, सामाजिक असो किंवा व्यापार-व्यवसाय-सेवा विषयी
असो. हा संवाद ग्राहक, श्रोता, प्रेक्षक, उपयोगकर्ता, वापरकर्ता, उपभोक्ता
यांच्याशीच करावा लागतो. या सर्वांशी सहज संपर्काचे डिजिटल मीडिया हे हमखास पर्याय
आहेत.
कम्प्युटर किंवा
स्मार्टफोनवर संवादाचे कोणतेही प्रोग्राम अथवा ऍप्लिकेशन वापरले तरी त्याच्यासाठी
डिजिटल लिटरेट किंवा डिजिटल ड्राईव्हर होणे आवश्यक आहे. येथे लिटरेट या शब्दाचा
अर्थ केवळ माहिती असणारा हाच आहे. ड्राईव्हर शब्दाचा अर्थ थेट वापर करणारा या
अनुषंगाने आहे. म्हणजे, वाहन चालवण्याची मला तोंडी माहिती आहे हा भाग लिटरसीचा आहे.
पण, मी गाडी कुशलतेने चालवू शकतो हा भाग ड्राईव्हर असण्याचा आहे.
डिजिटल ड्राईव्हींग हे
डिजिटल व सोशल मार्केटींगशी संबंधित आहे. ज्या डिजिटल माध्यमांचा वापर व्यक्तिगत
स्वरुपात करता येतो, त्याच माध्यमांचा वापर कौशल्याने स्वतःच्या सेवा, उत्पादन,
व्यवसाय, व्यापार, कौशल्ये व उद्योग यासाठीही उत्तमपणे करता येतो.
हाच वापर कसा करायचा ? याची माहिती देण्यासाठी तिघे जळगावकर हे जळगावकरांसाठी
एक आगळा वेगळा कार्यक्रम घेवून येत आहेत. हा कार्यक्रम आहे, गो डिजिटल सेमिनार.
रविवार, दि. १५ जानेवारी २०१७ ला जिल्हा पत्रकार संघाच्या पद्मश्री डॉ. भवरलालजी
जैन सभागृहात सकाळी १०.३० ते १२ वाजेपर्यंत अवघ्या दीड तासात होणार
आहे. या सेमिनारमध्ये सहभागाचे प्रति व्यक्ती शुल्क आहे अवघे १५० रुपये. आणि हो,
जागा आहेत केवळ १००. त्यावर एकही व्यक्ति वाढली तरी ऍडजेस्टमेंट अवघड आहे.
गो डिजिटल सेमिनारमध्ये
आपणास कोण कोण मार्गदर्शन करेल ? हेही जाणून घ्या. इंटरनेट
आणि त्याच्याशी संबंधित सर्व प्रकारच्या प्रणालीविषयी सहज व सोप्या भाषेत लिहीणारे
शेखर पाटील (संपादक जनशक्ति व टेकवार्ता पोर्टल, जळगाव). शेखर पाटील हे डिजिटल
टूल्स कोणते ? याविषयी माहिती देतील. दुसरे अनुभवी आहेत, डिजिटल माध्यमात समुह संवादासाठी
प्रभावीपणे काम करणारे गोकूळ चौधरी (क्रिएटीव्ह कम्प्युटर्सचे संचालक). गोकूळ
चौधरी हे व्यवसाय, व्यापार वाढ, विस्तारासाठी डिजिटल मीडियाचा वापर कसा करावा ? याविषयी माहिती देतील.
तिसरे अनुभवी आहेत पत्रकारिता क्षेत्रात २१ वर्षांपासून काम करणारे आणि संवादासाठी
नव्या डिजिटल माध्यमांचा वापर करणारे दिलीप तिवारी (सोशल मीडिया सोल्युशनचे
संचालक) दिलीप तिवारी हे डिजिटल मीडियात कॉन्टेन्ट (आशय) कसा असावा ? याविषयी माहिती देतील.
विषयाची केवळ ओळख करुन देणे
आणि काही प्रात्यक्षिके दाखविणे यासाठी हा सेमिनार उपयुक्त आहे. देशभरात नोटा
विरहीत व्यवहारांची चर्चा होत असताना त्यापुढची पायरी म्हणून डिजिटल टेक्नोसॅव्ही
होणे प्रत्येकाला गरजेचे आहे. म्हणूनच जळगाव शहरातील जास्तीत जास्त नागरिकांना
डिजिटल ड्राईव्हर करण्यासाठी हे एक गो डिजिटल मिशन आम्ही सुरू करीत आहोत. त्यामुळे
गो डिजिटल सेमिनामध्ये सहभागी व्हा आणि डिजिटल ड्राईव्हर होण्याकडे एक पाऊल टाका
....
No comments:
Post a Comment