Wednesday 18 January 2017

जळगावात एका नागरिकावर वर्षाला २७७ रुपये सफाई खर्च

जळगाव शहरातील सफाई संदर्भात मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांना सोशल मीडियातून जाहीरपणे ८ प्रश्न विचारले होते. आयुक्तांनी त्यांची दखल घेवून त्या प्रश्नांची अत्यंत सविस्तर लेखी उत्तरे दिली आहेत. पहिल्यांदा असे घडले की, सोशल मीडियात प्रश्न विचारले आणि वरिष्ठ अधिकाऱ्याने दखल घेतली. याबद्दल आयुक्त व आरोग्याधिकारी यांचे प्रथमतः अभिनंदन. प्रश्नांच्या उत्तरातून सफाई विभागावर होणारा वार्षिक खर्च समोर आला आहे. दरवर्षी शहरातील सफाईवर ठेकेदारी स्वरुपत जवळपास ६ कोटी ६५ लाख रुपये ५ लाख लोकसंख्येवर खर्च होतात. यात सफाई विभागातील कायम कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन नाही. ती रक्कम सफाई खर्चात एकत्र केली तर सफाई विभागावर होणारा वार्षिक खर्च हा १३ कोटी ८९ लाख ३१ हजार होतो. म्हणजेच, वर्षभरात एका नागरिकावर सफाईचा खर्च २७७ रुपये ८६ पैसे होतो. प्रश्न हाच आहे की, या खर्चाच्या तुलनेत नागरिकांना शहर स्वच्छ होत असल्याचे समाधान मिळते आहे का ?  

 सोशल मीडियाचा वापर करुन शहराच्या नागरी प्रश्नावर तोडगा काढण्याचा हा एक नवा प्रयोग आहे. व्हॉट्स ऍपवर नागरी प्रश्नांविषयी बाष्कळ गप्पा खुप होतात. मात्र, त्या मागील अर्थकारण आणि प्रत्यक्ष कृती यावर कोणीही पुढाकार घेवून काम करीत नाही. हाच मुद्दा घोवून सोशल मीडिया सोल्युशन या माध्यमातील संस्थेच्या व्यासपिठावरुन हा विषय मुद्दाम सोशल मीडियातच चर्चेला मांडला आहे. 

तक्ता अ
विषय सुरू झाला मनपाच्या अस्वच्छतेच्या तक्रारीविषयक ऍपने. मनपा आयुक्त हे वारंवार नागरिकांना सामुहिक सहभागाने स्वच्छता करण्याचे आवाहन करतात. पण, शहरात डोळ्यांना जाणवेल अशी स्वच्छता काही होत नाही. गेल्या १० वर्षांत जळगाव शहर हे कचरा, घाणीचे आगार बनले आहे. सर्व प्रकारच्या सार्वजनिक जागांवर कचऱ्याचे ढीगारे दिसतात. अशावेळी प्रश्न पडतो की, मनपाचा स्वच्छता विभाग, तेथील अधिकारी व कर्मचारी काय काम करतात ? दरवेळी लोकांनी सामुहिक स्वच्छता करावी असे आवाहन केले जाते, तर या विभागावर होणारा खर्च आणि त्याचा निष्कर्ष काय ?  याअनुषंगाने मनपा आयुक्ताना जाहीरपणे ८ प्रश्न विचारले होते. त्याची उत्तरे सुसंगतपणे वाचली तर वर्षभरात मनपाचा एका नागरिकामागे स्वच्छता खर्च २७७ रुपये होताना दिसतो. हा खर्च सफाई विभागातील सर्वांचे वेतन व सफाईचे खासगी ठेके यावर होणारा खर्च धरुन आहे. केवळ सफाईच्या ठेक्यांचा विचार केला तरी वर्षभरात एका नागरिकामागे सफाई खर्च हा १३३ रुपये आहे.

मनपाच्या सफाई विभागात १ आरोग्याधिकारी, १ शाखा अभियंता, ६ लिपिक, ४ स्वच्छता निरीक्षक, १० आरोग्य निरीक्षक, ३ कॉन्झर निरीक्षक, ८९ वाहनचालक, २ सफाई कामगार वाहनचालक, १ वॉर्डबॉय मोकादम, ५ स्वच्छक, १ पिंजरा कुली मोकादम, ४ वॉचमन, ५ शिपाई,  ३ युनिट प्रमुख, १७ मोकादम, ८ न्यायालयीन कामगार, २० सफाई कामागार मोकादम, ५१४ सफाई कामगार आहे.  या सर्वांची मिळून संख्या होते ६९४. (या आकडेवारीचा तक्ता अ सोबत जोडला आहे.) बहुधा एकाच विभागात पदांची एवढी विविध रचना कुठेही नसेल. या सर्वांचे मिळून वेतन व इतर खर्च होतो दरमहा ६० लाख २९ हजार ६५५ रुपये. याशिवाय, गरजेनुसार रोजंदारांवर दरमहा खर्च आहे ६६ हजार ७९७ रुपये.

हे कायम कर्मचारी कामावर रोज येतात का हे कसे तपासले जाते हे विचारले तर सांगितले जाते त्यांची हजेरी थंब इंप्रेशनवर नोंदली जाते. बऱ्याचवेळा मनपाची ही यंत्रणा ठप्प असते. त्यामुळे अर्ज, फाटे स्वीकारूनच हजेरी तपासून वेतन दिले जाते. मूळ सुधारणेची गरज या ठिकाणी आहे. मनपाच्या सेवेतील सफाई कामगार नेमून दिलेल्या प्रभागात दैनंदिन सफाई, कचारा संकलन, कचरा वाहतूक ही कामे करतात. त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी सर्व मोकादम, आरोग्य निरीक्षक, मुख्य स्वच्छता निरीक्षक व आरोग्याधिकारी आहेत. वरिष्ठ आरोग्याधिकारी दर आठवड्याला आढावा घेतात असे सांगण्यात येते. मात्र, शहराची स्वच्छता खरेखर होते आहे किंवा नाही ? हे तपासण्याची विश्वासार्ह यंत्रणा नाही. कारण बरेच नगरसेवक व अधिकारी हे सफाई कामगारांना मर्जीतील कामे करायला वापरतात. ठराविक लोकांच्या तक्रारी सोडवून लेखी चिठ्ठ्या घेतल्या जातात. मनपा आरोग्याकडून स्वच्छतेची होणारी पडताळणी म्हणजे हाच पुरावा. या व्यवस्थेतही सुधारणेला वाव आहे.  

तक्ता ब
मनपातील सफाई विभागातील ६९४ अधिकारी व कर्मचारी मिळून शहर स्वच्छ करु शकत नाहीत. त्यामुळे वॉर्डनिहाय सफाईसाठी एकमुक्त पद्धतीने ठेके दिले आहेत. ही एकमुक्त पद्धत म्हणजे काय, तर ठेकेदाराला वॉर्ड स्वच्छ करायची ठरावीक रक्कम दरमहा द्यायची. मात्र, तो किती कर्मचारी लावून वॉर्ड स्वच्छ करतोय ते त्याला विचारायचे नाही. तशी आकडेवारी मनपाकडे नाही. तसे लेखीही दिले आहे. म्हणजेच खासगी ठेकेदारीत भ्रष्ट व्यवहाराला भरपूर संधी आहे. याच पद्धतीच्या ठेकेदारीवर १८ बचतगटांच्या  नावावर दरमहा ५५ लाख ४८ हजार रुपये खर्च होतो आहे. एका वार्डासाठी दरमहा ३ लाख १० हजार रुपये दिले जातात. (सफाईचे ठेकेदार असलेले बचत गट, त्यांची नावे आणि ते दरमहा घेत असलेली रक्कम याचा तक्ता ब सोबत जोडला आहे) ही रक्कम बचत गटांच्या नावाने खरोखर कोणाच्या खिशात जाते ? सुधारणा आणि संशोधनाला येथेही जागा आहे.

आता मुख्य मुद्दा हाच की, मनपाचे ६९४ कर्मचारी आणि १८ बचत गटांचे काही शेकड्यातील कर्मचारी रोज शहराची सफाई करतात. मात्र, त्यांच्यावर लक्ष ठेवणारी यंत्रणा आहे कशी हेही लक्षात घ्यायला हवे. शहरात ४ प्रभाग आहेत. यासाठी ४ स्वच्छता निरीक्षक आहेत.

प्रभाग समिती १ चे मुख्य स्वच्छता निरीक्षक ए. एन. नेमाडे (मो. ९४०३६८६२०४) यांच्याकडे १,२,३,८,९,१०,११,१२,१३,१९ या वॉर्डांची जबाबदारी आहे. त्यांच्या सोबत आरोग्य निरीक्षक दिनेश नामदेव गोयर (मो. ९५९५९१२३६३) यांच्याकडे १,२,३, रमेश कांबळे (मो. ९४२०३८८७००) व व्ही. व्ही कंडारे (मो. ९५४५४२९७९४) यांच्याकडे ८,९,१०, आर. डी. पाटील (मो. ९१५८००७१६४) यांच्याकडे ११,१२,१३ आणि एस. के. खान (मो. ८६२५८७७०९९) यांच्याकडे १९,२९ वॉर्डांच्या सफाईची जबाबदारी आहे.

प्रभाग समिती २ चे मुख्य स्वच्छता निरीक्षक एस. बी. बडगुजर (मो. ९४०३६८६३७४) यांच्याकडे ४,५,६,७,२०,२१,२२,२३,२४,२५,२६ या वॉर्डांची जबाबदारी आहे. त्यांच्या सोबत आरोग्य निरीक्षक धीरज धनपाल गोडाले (मो. ९२२६२२२७८४) यांच्याकडे ६,७,२१, एन. एम. साळुंके (मो. ९४०३६८६३९०) यांच्याकडे २०,२२, जे. के. किरंगे (मो. ८०५५००३४५६) यांच्याकडे २४,२५,२६, एन. ई. लोखंडे (मो. ९४०३६८६२३२) यांच्याकडे ४,५,२३ या वॉर्डांच्या सफाईची जबाबदारी आहे.


प्रभाग समिती ३ चे मुख्य स्वच्छता निरीक्षक एच. एम. खान (मो. ९८२३५८६२२४) यांच्याकडे २९,३०,३१,३२,३३,३४,३५,३६ यांच्यासोबत आरोग्य निरीक्षक के. के. बडगुजर (मो. ९४०३६८६२०५) यांच्याकडे ३४, आनंद किसोर सोनवाल (मो. ८४२१३०३०७७) यांच्याकडे २९, ३६, एस. बी. भट (मो. ९४०३६८६२०८) व संजय हिरा ढंढोरे (मो. ९९२३७८२२२) यांच्याकडे ३०,३१,३२,३३,३५ या वॉर्डांच्या सफाईची जबाबदारी आहे.

प्रभाग समिती ४ चे मुख्य स्वच्छता निरीक्षक एस. पी. अत्तरदे (मो. ९४०३६८६२२६) यांच्याकडे १४,१५,१६,१७,१८,२८,३७ या वॉर्डांची जबाबदारी आहे. त्यांच्या सोबत आरोग्य निरीक्षक एस. पी. कुरकुरे (मो. ९४०३६८६२१४) यांच्याकडे १७,२८,३७, यु. आर. इंगळे (मो. ९४०३६८६२१२) यांच्याकडे १६,१८, एस. बी. धांडे (मो. ९४०३६८६२१३) यांच्याकडे १४,१५ या वॉर्डाच्या सफाईची जबाबदारी आहे. (संबंधितांच्या प्रभाग व वॉर्डांची सीमा दोखवणारा तक्ता क व ड सोबत जोडला आहे)
  

वरील प्रमाणे सर्व माहिती समोर आल्यानंतर जळगाव शहरातील स्वच्छता समाधानकारक होत नसल्याचे वास्तव स्पष्ट आहे. मनपाकडील मनुष्यबळ व त्यावर होणारा खर्च लक्षात घेवून मनपाच्या सफाई विभागाचे विश्वासार्ह व्यवस्थापन व फिडबॅक याचा ताळमेळ लोकलेखा पद्धतीने व्हायला हवा. समाजातील अनुभवी मंडळींनी यासाठी पुढाकार घ्यायला हवा. वॉर्डनिहाय नागरीकांमधील स्वच्छता निरीक्षक नेमून आयुक्त जीवन सोनवणे यांनी या विषयवार काम करायला हवे. जळगाव शहरातील अनुभवी, तज्ञ नागरिकांची एकत्र बैठक घेवून सपाई व्यवस्थापनात सुधारणे विषयी चर्चा व्हायला हवे.
तक्ता क

तक्ता ढ

No comments:

Post a Comment