Wednesday 18 January 2017

जळगावात एका नागरिकावर वर्षाला २७७ रुपये सफाई खर्च

जळगाव शहरातील सफाई संदर्भात मनपा आयुक्त जीवन सोनवणे यांना सोशल मीडियातून जाहीरपणे ८ प्रश्न विचारले होते. आयुक्तांनी त्यांची दखल घेवून त्या प्रश्नांची अत्यंत सविस्तर लेखी उत्तरे दिली आहेत. पहिल्यांदा असे घडले की, सोशल मीडियात प्रश्न विचारले आणि वरिष्ठ अधिकाऱ्याने दखल घेतली. याबद्दल आयुक्त व आरोग्याधिकारी यांचे प्रथमतः अभिनंदन. प्रश्नांच्या उत्तरातून सफाई विभागावर होणारा वार्षिक खर्च समोर आला आहे. दरवर्षी शहरातील सफाईवर ठेकेदारी स्वरुपत जवळपास ६ कोटी ६५ लाख रुपये ५ लाख लोकसंख्येवर खर्च होतात. यात सफाई विभागातील कायम कर्मचारी व अधिकारी यांचे वेतन नाही. ती रक्कम सफाई खर्चात एकत्र केली तर सफाई विभागावर होणारा वार्षिक खर्च हा १३ कोटी ८९ लाख ३१ हजार होतो. म्हणजेच, वर्षभरात एका नागरिकावर सफाईचा खर्च २७७ रुपये ८६ पैसे होतो. प्रश्न हाच आहे की, या खर्चाच्या तुलनेत नागरिकांना शहर स्वच्छ होत असल्याचे समाधान मिळते आहे का ?  

Monday 16 January 2017

सोशल मीडियातील अर्धवट शहाणे !!

सोशल मीडियातील फेसबुक आणि व्हाट्स ॲप या दोन ॲपचा वापर कम्प्युटर आणि मोबाईल अशा दोन्ही प्रकारे करता येतो. त्यामुळे बहुतांश मंडळी २४ तास या दोन्ही ॲपवर "लगे रहो" अवस्थेत असतात. काहींना तर दर ५ मिनिटात हे दोन्ही ॲप उघडून इतरांचे काय चालले आहे असा चाळा करायची सवय लागली आहे. हे लक्षण व्यसन किंवा मानसिक विकाराचे असते असे मानसोपचारतज्ज्ञ म्हणतात.

Thursday 12 January 2017

खंबीर कुटूंबप्रमुख राष्ट्रमाता जिजाऊ

सध्याच्या चौकोनी किंवा त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेत विवाहित पुरूष आणि महिलांना आपापल्या सासर किंवा माहेरातील नाते संबंध जपताना अथवा टीकवून ठेवताना अनेक प्रकारच्या समस्या किंवा अडचणींचा सामना करावा लागतो. बहुतांश कुटुंबात सासर आणि माहेरातील नाते संबंध हे लहान-मोठ्या कारणांमुळे किंवा समज-गैरसमजातून ताणलेले, अबोला धरलेले असतात. मोजक्या कुटुंबात नाते संबंधात टोकाचे वैमनस्य निर्माण होवून ते पिढीजात पुढेही झीरपत जातात. अशावेळी महिलांची अवस्था संभ्रित होते. त्यांच्या मानसिक अवस्थांची घालमेल होते. नाते संबंध सुधारण्यास मध्यस्थी करावी किंवा न करावी अशा द्विधा अवस्थेत महिला असतात. अशा कौटुंबिक संघर्षात अडकलेल्या महिलांना राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या चरित्रातील काही प्रसंग योग्य तो निर्णय घेण्याची प्रेरणा व दिशा देतात.

Monday 9 January 2017

चला डिजिटल ड्राईव्हर होवू या ...

माणसाचे आयुष्य सध्या ५ स्क्रिन भोवती फिरते आहे. पहिला सिनेमाचा स्क्रिन. तो आता मल्टिफ्लेक्समध्ये दिसतो. दुसरा टीव्हीचा स्क्रिन आहे. तो आता एलईडीच्या रुपात भिंतीवर लटकावलेला दिसतो. तिसरा स्क्रिन हा स्मार्ट फोनचा आहे. तो प्रत्येकाच्या हातात दिसतो. चौथा स्क्रिन कम्प्युटरचा आहे. तो कोणत्याही प्रकारच्या कामासाठी वापरला जातो. आता आपण निघालो आहोत पाचव्या स्क्रिनकडे. तो आहे आर्थिक देवाण-घेवाणच्या उपकरणांचा. उदाहरणार्थ, स्वॅपिंगमशीनचा स्क्रिन, ऑनलाईन व्यवहारांचा टच स्क्रिन किंवा पेटीएमसारखे ऍप. नोटा नसलेल्या व्यवहारांच्या सोबत आता डिजिटल व्यवहारातही कुशल होणे गरजेचे झाले आहे. कारण, जेथे जेथे इंटरनेट आहे किंवा वायरलेस डाटा देण्या-घेण्याची यंत्रणा आहे तेथे आता डिजिटल ड्राईव्हर होणे गरजेचे आहे.  

Thursday 5 January 2017

प्रवाहाच्या दिशेने पोहताना ... !!

आज दि. ६ जानेवारी २०१७. आद्य पत्रकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांची जयंती आणि पत्रकारदिन. यानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना पत्रकारदिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जळगाव जिल्हा पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी एक वर्षाची कारकिर्द पूर्ण झाली. या एक वर्षाच्या कालपर्वाला प्रवाह म्हटले तर माझी कारकिर्द ही त्या प्रवाहात पोहणाऱ्या व्यक्ती सारखी आहे. त्याचेच हे सिंहावलोकन.

Monday 2 January 2017

इ गव्हर्नन्समध्ये जिल्हा टॉपवर !

जळगाव जिल्ह्यातील प्रशासन व्यवस्थेच्या यंत्रणांचा मुख्य भाग असलेल्या जिल्हाधिकारी, जिल्हा परिषद व जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयांमध्ये इ गव्हर्नन्सचा प्रभावी व गतीमान वापर हा राज्यातील इतर जिल्ह्यांच्या तुलनेत किती तरी पुढे आहे. यापैकी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद प्रशासन यंत्रणेने इ गव्हर्नन्सच्या काही कार्यक्रमात देशाच्या पातळीवर अग्रस्थान पटकावून जळगाव जिल्ह्याची खास ओळख (युनिक आयडेंटी) तयार केली आहे. त्याविषयी ...