गुजरात विधानसभा चुनाव के नतिजे सामने आए है ।गुजरात पर २२ साल से सत्ता बनाये भाजपा को गुजरात के मतदाताओंने फिरसे ५ साल सत्ता चलाने का विकल्प चुना है । गुजरात के जीत के साथ देश के उपरी हिस्सेवाले हिमाचल प्रदेश की विधानसभा भाजपाने काँग्रेस के हाथों छीन ली है । गुजरात में भाजपाके अल्प संख्यात्मक विजय की चर्चा कई मुद्दे लेकर जैसे गर्मा रही है वैसे दुसरी ओर हिमाचल प्रदेश में काँग्रेस के पराजय की बात पर सभी राजकीय विश्लेषक मौन धारण कर बैठे है ।
Wednesday, 20 December 2017
Monday, 18 December 2017
दक्षिण गुजरात जिंकणारा सेनापती ...
![]() |
दक्षिण गुजरातमध्ये भाजपच्या २४ जागा जिंकून आणणारी कामगिरी करणारे प्रभारी डॉ. राजेंद्र फडके (मध्यभागी) यांचा सत्कार करताना मित्र मंडळी |
भारतासह संपूर्ण जगाचे लक्ष
लागलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. सन २०१२ मध्ये निवडणूक
झालेल्या व आताच्या मावळत्या विधानसभेत एकूण १८२ पैकी ११५ जागा भारतीय जनता पक्षाच्या
पारड्यात होत्या. आज निकाल लागताना एकूण १८२ पैकी जवळपास ९९ जागा जिंकून भाजपने
सत्ता आपल्याच हाती राखण्यात यश मिळविले आहे. साध्या बहुमतासाठी ९२ जागा जिंकणे
आवश्यक होते. भाजपने त्यापेक्षा ७ जागा जिंकल्या आहेत. (यात अंतिम निकालात
एखाद-दोन जागांचा फरक शक्य आहे) गुजरात राज्यात भाजपचा हा सलग सहावा विजय आहे. गेली
२२ वर्षे तेथे भाजप सत्तास्थानी आहे. या निवडणुकीत अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचे
अध्यक्षपद स्वीकारणारे राहुल गांधी, पटेल आरक्षणाचा मुद्दा मांडणारा हार्दिक, ओबीसींचा
नेता अल्पेश ठाकोर व दलित नेता जिग्नेश मेवानी यांनी गुजरातचे मूळ असलेल्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शहा यांना प्रचारात घाम
फोडला होता. गुजरातमध्ये परिवर्तन घडेल अशी हवा निर्माण केली होती. काही अंशी या
चौघांच्या युतीने भाजपची जवळपास १६ जागंवर पिछेहाट केली पण सत्तापरिवर्तन करण्याचे
यश त्यांना मिळाले नाही. मागील निवडणूक निकालाशी तुलना केल्यास भाजपने यावेळी
सत्ता कायम राखली असली तरी जवळपास १६ जागा कमी गमावल्या आहेत. दुसरीकडे
काँग्रेसच्या जागा मागील निकालाच्या तुलनेत १८ ने वाढल्या आहे. युद्धात आणि प्रेमात
विजय हा विजय असतो, या न्यायाने गुजरातची निवडणूक ही पुन्हा मोदी-शहा-भाजप या
त्रिकुटाने जिंकली आहे.
Saturday, 16 December 2017
संयमाचा महामेरु प्रदीपभाऊ !!
Thursday, 7 December 2017
लिमजीचे आनंददायी स्मरण ...
जैन उद्योग समुहाचा कर्मचारी लिमजी जलगाववाला हा सच्चा पर्यावरणवादी कार्यकर्ता होता. त्याच्या स्मृती ताज्या होण्याचे कारण म्हणजे, लिमजी जलगाववालाच्या नावाने जैन उद्योग समुहाने पुरस्कृत केलेल्या पर्यावरण क्षेत्रातील विविध कार्यासाठीच्या पुरस्कारांचे व सन्मानचे वितरण जळगाव येथे दि. ७ डिसेंबरला सुरु झालेल्या वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाले. लिमजीच्या निधनानंतर झालेल्या सभेत जैन उद्योग समुहाचे अध्यक्ष श्री. अशोक जैन यांनी अशा प्रकारचे पुरस्कार देण्याची इच्छा बोलून दाखविली होती. त्यानुसार वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन सत्रात लिमजीच्या नावाचे विविध पुरस्कार प्रदान करण्यात आले. हाच प्रसंग लिमजीच्या स्मृतींना उजाळा देणारा आणि आनंददायी होता. पुरस्कार प्रदान झाल्यानंतर श्री. अशोक जैन यांनी असेही घोषित केले की, लिमजीच्या नावाचे पुरस्कार भविष्यातही सुरु राहतील आणि त्यासाठी पर्यावरण क्षेत्रातील निवड करावयाच्या व्यक्ती, समुह याचा दर्जाही उंचावत नेला जाईल.
Monday, 27 November 2017
ना. गिरीषभाऊ ! टू राईट अॉर नॉट राईट ?

Wednesday, 22 November 2017
"दशक्रिया" ला विरोध कशासाठी ?
ब्राह्मण समाजातील पोट जातींमधील कर्मकांडाच्या वादावर आधारलेल्या दशक्रिया या चित्रपटाला ब्राह्मण समाजाकडून विरोधाचे वातावरण आहे. विषय ब्राह्मणांशी संबंधित असल्यामुळे इतर मंडळींनी दशक्रिया चित्रपट प्रदर्शनाची भूमिका घेतली आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत ब्राह्मण द्वेषाचे बी पेरणारी विचारधारा विस्तारते आहे. ज्यांचे राजकारण जात व समाजावर आधारलेले आहे अशी राजकीय मंडळी सतत अस्वस्थ आहे. समाज आधारित पक्षीय राजकारण आणि संघटीत झुंडशाही निर्धारित राजकारण असे दोन्ही कार्ड वापरुन सुध्दा गावपातळी पासून तर मंत्रालयापर्यंतची सत्ता मिळू शकत नाही अशा आगतिकतेतून ब्राह्मणांच्या द्वेषाच्या अनेक जागा शोधल्या जात आहेत. याच द्वेषाची किनार दशक्रिया चित्रपट सादर व्हावा या भूमिके मागे असावी ?
Thursday, 9 November 2017
मैत्रिच्या मण्यांमधील धागा ...

Friday, 3 November 2017
खिचडीची सुध्दा अफवा शिजली !

Monday, 30 October 2017
दोन मंत्र्याच्या ... दोन तऱ्हा ... !!
राज्याचे जलसंपदा आणि वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन सध्या द ग्रेट शो मैन ठरले आहेत. जळगाव, नाशिक, नंदुरबार येथे जिल्हास्तरावरील आरोग्य महा शिबिरे आयोजित करुन सर्व सामान्य घटकातील रुग्णांना रोगमुक्त करण्याचा एक अभिनव उपक्रम महाजन यांनी गेले वर्षभर सुरु ठेवला आहे. महाजन यांच्या सोबतच्या मंडळींचे सहकार्य घेवून राज्याच्या पुरवठामंत्री पंकजा पालवे-मुंडे यांनी सुध्दा बीड येथे जिल्हास्तरावरील महा शिबिर घेतले. आता तालुकास्तरांवरील शिबिरांना प्रारंभ झाला आहे.
Saturday, 28 October 2017
शरद पवार नेहमीच खरे बोलतात !
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले अभ्यासू, अनुभवी, लोकप्रिय आणि सुसंस्कृत मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांचे शिष्योत्तम असलेले आणि अलिकडे जाणता राजा म्हणून लौकिक लाभलेले शरश्चंद्र तथा शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना बालिश मुख्यमंत्री अशा शब्दांचा प्रयोग केला आहे. गेल्या तीन-साडेतीन वर्षांत महाराष्ट्रातील निवडणुकांच्या राजकारणात फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने पवार कुटुंबियांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसला वारंवार धोबीपछाड दिला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पवार यांच्या ताब्यातील अनेक गढ्या या फडणवीस यांच्या नेतृत्वातील भाजपने काबिज केल्या आहेत. अशा पार्श्वभूमीवर पवार यांनी कर्जमाफीच्या मुद्द्या आडून टीका करताना मुख्यमंत्री पदावरील व्यक्तिस बालिश म्हटले आहे.
Wednesday, 25 October 2017
राजकिय उलथा-पालथचे हत्यार - सोशल मीडिया
Wednesday, 11 October 2017
अमृत योजनेतील मक्तेदारीचा घोळ ...
जळगाव शहरातील सुमारे पाच लाखांवर जनतेच्या पाणीपुरवठ्यासाठी वर्षभरापासून मंजूर असलेल्या
अमृत योजनेच्या कामासाठी संतोष कन्सट्रक्शन ऍण्ड इन्फ्रा यांना मंजूर झालेली
निविदा प्रक्रिया मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपिठाने रद्दबातल ठरविली
आहे. हा आदेश देताना न्यायाधिशांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भोंगळ
कार्यशैलीवर कडक ताशेरे ओढले आहेत. विशिष्ट ठेकेदाराला काम देण्याचा दबाव मनपा
प्रशासनावरही झालेला आहे, असेही आता प्रथम दर्शनी दिसत आहे. खंडपिठाने अमृत
योजनेच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळा व योग्यता नसलेल्या मक्तेदारास काम देण्याचा
घाट घालणेसंबंधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला जबाबदार असल्याचा दोष लावला आहे.
Monday, 2 October 2017
गांधी मुखातून गांधीवाद ...!!!
जळगाव येथील गांधीतिर्थमध्ये युवकांसाठी आयोजित कार्यशाळेच्या प्रसंगी महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी यांची भेट झाली. जवळपास दोन तास सोबत होतो. त्यांनी युवकांशी साधलेला संवादही ऐकला होता. त्यामुळे महात्मा गांधीजींच्या सर्वसामान्य व सर्वमान्यपणाविषयी मी तुषारजींशी बोलत होतो. त्यांच्याशी झालेला हा संवाद माझ्यासाठी गांधी मुखातून गांधीवाद ऐकण्याएवढा आनंददायी होता.
Tuesday, 19 September 2017
मला किशोर राजे निंबाळकर व्हायचे आहे ... !
![]() |
किशोर राजे निंबाळकर |
लेखाचे शिर्षक वाचून अनेकांना वाटेल, हे काय खूळ आहे. प्रत्येकाला कलेक्टर किशोर राजे निंबाळकर
कसे होता येईल ? कलेक्टर होणे एवढे सोपे आहे का ? हे
दोन्ही प्रश्न रास्त आहे. पण, स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण होवून अमर्याद अधिकार
असलेला कलेक्टर होणे फारसे अवघड नसले तरी अधिकारांचे उच्च पदस्थ
बुजगावणे व्हायचे की अधिकारांचा समाजासाठी वापर करीत माणूस व्हायचे याचा निर्णय
प्रत्येकाला घेता येणे शक्य आहे. लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी म्हणून प्रचंड अधिकार प्राप्त असले तरी सामान्य माणसासाठी लोकसेवकाच्या मानसिकतेतून माणूस होणे फारच
थोड्यांना साधते. तसे ते जळगावचे जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांना साधले
आहे. “माणूस असलेला अधिकारी” अशी ओळख राजे निंबाळकर यांनी निर्माण केली आहे.
Friday, 1 September 2017
स्थितप्रज्ञ नाथाभाऊ ...
नाथाभाऊंचा आज वाढदिवस. जवळपास
पाच दशकांचा राजकिय प्रवास नाथाभाऊ पूर्ण करीत आहेत. त्यातील किमान तीन दशके
नाथाभाऊंना पत्रकाराच्या नजरेतून अनुभवतोय. राजकारण व समाजकारणाच्या व्यासपीठावर
अनेक पद आणि प्रतिष्ठा स्वकर्तृत्वाने मिळून नाथाभाऊंचे व्यक्तिमत्त्व सद्गुण संपन्न
झाले आहे. आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर समोर आलेल्या परिस्थितीत नाथाभाऊ कसे
वागले, बोलले आणि गप्प सुद्धा राहिले याचा एक दृश्यात्मक आलेख समोर येतो. ज्ञानेश्वरीत
सोप्या भाषेत स्थितप्रज्ञ माणसाची लक्षणे समजावली आहेत. नाथाभाऊंचे आजचे
व्यक्तिमत्त्व हे स्थितप्रज्ञ अवस्थेतील आहे असे वाटते. ज्याची बुद्धी पूर्णतः
स्थिर आहे, अशाच व्यक्तिला श्रीकृष्ण स्थितप्रज्ञ म्हणतो ...
Thursday, 31 August 2017
प्लास्टीक तांदुळाचे थोतांड ते कुभांड ...
भारतात एका राज्याच्या
मुख्यमंत्र्यांच्या घरातील गणपती दूध पीत असल्याची तद्दन फालतू बातमी टीव्ही
माध्यमातून जगभरात दाखविली जाते. फोनच्या माध्यमातून ती अफवा देशभरात पोहचते.
त्यानंतर घराघरातील तहानलेले गणपती गटागटा दूध प्यायला लागतात. टीव्ही आणि फोन
माध्यमाद्वारे निर्माण झालेल्या या अफवेचा अनुभव अनेकांनी घेतला आहे.
Thursday, 24 August 2017
अब्दुल्ला के तलाक में बेगाने दिवाने ...
कौटुंबिक व्यवस्थेत मुस्लिम महिलांचे अस्तित्व आणि पत्नीत्व या स्थानाला स्थैर्य देणारा अंतरिम निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. तोंडी (ट्रिपल) तलाक विरोधात भारतीय संसदेत कायदा बनवा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिले आहेत. तोंडी तलाक संदर्भातील एका खटल्याची सुनावणी केल्यानंतर अंतरिम निकाल देताना न्यायालयाने हा आदेश दिला आहे. निकालावर भाष्य करताना सर्वोच्च न्यायालयाने तलाक–तलाक–तलाक हा प्रकार घटनाबाह्य ठरवला आहे. न्यायालयाने स्वतः पुढाकार घेत, तोंडी तलाक देण्याच्या पद्धतीवर सहा महिन्यांची बंदी घातली आहे. मुस्लिम समाजातील कोणताही विवाहीत पुरूष पुढील सहा महिन्यांत पत्नीला तोंडी तलाक-तलाक-तलाक म्हणत घटस्फोट देवू शकणार नाही.
Thursday, 17 August 2017
एमआयडीसीसाठी भू संपादनाचे मे १९९५ चे परिपत्रक रद्द ...
रद्द केल्याचा सरकारचा एकनाथ खडसे यांना खुलासा
भोसरी (जि. पुणे) येथे औद्योगिक वसाहतीकरिता सन १९६७ आणि त्यानंतर १९७१ मध्ये भूसंपादनासाठी नोटीसा (अनुक्रमे ३२-२ आणि ३२-१) दिलेल्या भूखंडाचा कागदोपत्री ताबा अद्यापही एमआयडीसीकडे नाही. त्यामुळे विहीत कालमर्यादेत संपादन न झालेला हा भूखंड मे १९९५ व जानेवारी १९९६ च्या परिपत्रकानुसार मूळ जागा मालकाकडे परत गेला किंवा नाही ? असा प्रश्न विधीमंडळात तीन वेळा विचारणाऱ्या माजीमंत्री एकनाथराव खडसे यांना अखेर ऊर्जा, उद्योग व कामगार विभागाच्या कक्ष अधिकाऱ्यांनी दि. २ ऑगस्ट २०१७ ला उत्तर दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दि. १८ मे १९९५ आणि दि. २३ जानेवारी १९९६ चे भू संपादन प्रक्रियेविषयीचे ते परिपत्रक अधिक्रमीत (बाजुला ठेवणे किंवा रद्द करणे) केले आहे. सत्ताधारी पक्षाचे माजीमंत्री व ज्येष्ठ आमदाराने एका परिपत्रकाविषयी विधीमंडळात तीनवेळा विचारलेल्या प्रश्नावर तब्बल सहा महिन्यांनी उत्तर देण्याची तत्परता विद्यमान राज्य सरकारने दाखविली आहे. याच प्रकरणाशी संबंधित चौकशी अवघ्या तीन महिन्यांत पूर्ण करु असे आश्वासन विधीमंडळात देणाऱ्या राज्य सरकारने गेल्या सव्वा वर्षांत चौकशीचा अहवालही समोर आणलेला नाही. राज्य सरकारमधील हे वेळकाढू धोरण खान्देशातील जेष्ठनेते एकनाथराव खडसे यांचे राजकिय वर्चस्व संपविण्यासाठीच अवलंबिले जात असल्याची भावना आता जनतेत निर्माण होत आहे.
Saturday, 12 August 2017
१५ ऑगस्टला राजेशाही थाटात मराठमोळी दहीहंडी
जळगाव शहराच्या सांस्कृतिक
इतिहासात मानाचे पान ठरलेली आणि मराठमोळ्या उत्सवाचा थरार अनुभवायला लावणारी
राजेशाही थाटाची मराठमोळी दहिहंडी मंगळवार, दि. १५ ऑगस्ट २०१७ रोजी स्व. बॅरिस्टर
निकम चौकात (सागरपार्क) रंगणार आहे. या दहिहंडीचे परंपरेनुसार आयोजन एल. के.
फाऊंडेशनचे प्रमुख उपमहापौर ललित कोल्हे यांनी केले आहे.
Saturday, 5 August 2017
माध्यम पंढरीची अभ्यासवारी ...!!
माचवि चे कुलगुरु प्रा.डॉ. कुठियाला यांच्याकडून भेट |
भोपाल शहर. मध्यप्रदेशची राजधानी. तलावांचे शहर. अजून एक ओळख. भोपाल हे
माध्यमांची पंढरी सुध्दा आहे. भारतातील पत्रकारिता क्षेत्रातील विविध माध्यमांचे
शिक्षण देणारे माखनलाल चतुर्वेदी पत्रकारिता विद्यापीठ (माचवि), माध्यमांच्या
क्षेत्रांतील देशातला सर्वांत
मोठा डीबी कॉर्प समुह हा भोपालमध्येच आहे. आणखी एक विशेष उल्लेख, भारतातील
वृत्तपत्रांचे एकमेव असे माधवराव सप्रे स्मृती संग्रहालय सुध्दा भोपाळमध्येच आहे.
मध्यप्रदेश सरकारने माध्यम नावाची सरकारी ॲड सर्व्हिस एजन्सी निर्माण करुन सरकारी
माध्यमांचाही एक वेगळा प्रवाह निर्माण केला आहे. अशा या माध्यमांच्या पंढरीत अभ्यासवारीची एक अनोखी संधी मिळाली. निमित्त होते, पत्रकारितेच्या क्षेत्रात नविन काय घडते आहे हे
पाहण्याचे आणि पत्रकारितेचे शिक्षक म्हणून भविष्यात कसे अध्यापन करावे याचा अंदाज घेण्याचे.
Wednesday, 2 August 2017
रामनाथ सोनवणेंचे लेडी डायनावर नाटक
जळगाव मनपाचे माजी आयुक्त,
कुशल प्रशासक आणि नागपूरमधील स्मार्ट सीटी प्रोजेक्टचे सीईओ
डॉ. रामनाथ सोनवणे यांनी ब्रिटनमधील राजघराण्याच्या संदर्भातील अनेक दंतकथांची
नायिका ठरलेली लेडी डायना विषयी अत्यंत उत्कंठावर्धक आणि प्रत्ययकारी शब्दांत नाटक
लिहीले आहे. इंग्रजी भाषेत रचलेला हा नाट्यसंवाद "लेडी डायना द क्विन ऑफ हार्टस्" या नावाने अवघ्या ९८
पानांचा आहे.
Sunday, 16 July 2017
खडसेंच्या बदनामीचे सामुहिक अंधानुकरण !
राज्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या मालमत्तेविषयी चौकशी करण्याची जनहित
याचिका (क्र. ३/१७) मुंबईच्या उच्च न्यायालयात अंजली दमानिया यांच्यासह इतरांनी
दाखल केली आहे. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान न्यायालयात न झालेल्या चर्चेची चुकीची
माहिती देणाऱ्या बातम्या संबंधित न्यायाधिशांच्या नावाने राज्यभरातील तमाम आघाडीच्या
माध्यमे व दैनिकांमध्ये दि. १५ जुलै २०१७ ला ठळकपणे प्रसिद्ध झाल्या आहेत.
प्रसिद्ध बातम्यांमधील तपशील पूर्णतः काल्पनिक आणि दिशाभूल करणारा आहे. या
संदर्भात खडसे यांच्यावतिने याचिकेच्या संदर्भातील कागदपत्रे व्हायरल करण्यात आली
आहेत. याचिकेच्या आतापर्यंत झालेल्या सात दिवसांच्या सुनावणीत अवघ्या एकेका ओळीत
कामकाज नोंदले गेल्याचे स्पष्ट दिसत आहे. तरीही दि. १५ जुलै २०१७ च्या
बातम्यांमध्ये तपशील असा लिहला आहे जणू काही प्रत्यक्षदर्शीने न्यायालयात उपस्थित
राहून आणि सारे कामकाज पाहून, ऐकून बातमी लिहीली आहे. वाचकांचा असा समज होवू शकतो.
Wednesday, 12 July 2017
शिवसेनेतील डबल बडवे !
शिवसेना कार्याध्यक्ष उध्दव ठाकरे हे आज (दि. १२ जुलै) खान्देशच्या
दौऱ्यावर आहेत. त्यांना काही गोष्टी कळाव्यात म्हणून हा विशेष ब्लॉग लिहीला आहे. साधारणतः
महिनाभरापूर्वी धुळ्यात कार्यकर्त्यांसमोर बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले होते की, आगामी विधानसभा निवडणुकीत खान्देशातून शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून येतील आणि उद्धव ठाकरे हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होतील. अर्थात, राऊत
यांचे असे अनेक राजकिय अंदाज चुकतात. राऊत बोलघेवडे म्हणून प्रसिद्ध आहेत. ते स्वतः कोणतीही सार्वत्रिक निवडणूक लढवून विजयी
झालेले नाहीत. नियुक्तीच्या मार्गाने राज्यसभेत पोहचणाऱ्या व्यक्तीला निवडणूक
जिंकायला काय करावे लागते हे कसे समजणार ? असो, मात्र उद्धव ठाकरे यांचा हा दौरा मुख्यमंत्री होण्यासाठीची पाया भरणी
असेल तर आज त्यांनी शिवसेनेतील डबल बडवे (दोन्ही बाजुने बडवणारे या अर्थाने) ही
टीका समजून घ्यावी.
Sunday, 2 July 2017
आपण पत्रकार का व्हावे ?
प्रिंट, रेडीओ, टीव्ही आणि वेब अशा प्रकारच्या कोणत्याही वृत्त माध्यमांसाठीचा बातमी स्वरुपातील आशय हा शब्द, ध्वनी, चित्र आणि चलचित्र स्वरुपात असतो. या आशयाची निर्मिती करणारा घटक हा पत्रकार असतो. पत्रकारासोबत आशय संकलन, संपादन आणि सादरीकरण करणारी यंत्रणा असते. ही यंत्रणा यंत्र, तंत्र आणि विज्ञानाचा वापर करीत वाचक, श्रोता व प्रेक्षकाला समजेल अशा स्वरुपात आशय निर्मिती करते. लोकांना म्हणजेच जनतेला समजेल असा आशय निर्माण करुन तो सादर करणे यालाच जनसंवाद म्हणतात. उत्तम प्रकारे जनसंवाद करुन सर्वोत्तम प्रकारचा कृतिशील जनप्रतिसाद मिळवायचा असेल तर सर्व प्रकारची कौशल्ये आत्मसात असलेला आणि त्याचा वापर करु शकणारा पत्रकार हवा.
Friday, 23 June 2017
येसूबाई - प्रत्येक महिलेने वाचावी अशी चरित्रात्मक कादंबरी ... !
छत्रपती शिवाजी
महाराजांच्या चरित्रातील अनेक घटनांचे संदर्भ नव्याने लिहीण्याचे प्रयत्न होत आहेत.
जुने, नवे ऐतिहासिक दस्तावेज आणि त्यांच्या सत्यतेबाबतची खात्री करुन काही
विषयांची नव्याने मांडणी करण्यात येत आहे. पूर्वी लिहीलेल्या शिवचरित्रावर भाट,
शाहिर, कवी आणि लेखकांच्या जाती, धर्माचा शिक्का मारुन एकांगीपणे व विशिष्ट हेतूने
त्यांनी लेखन केल्याचा दावा केला जात आहे. शिवचरित्राचे पुनर्लेखन करण्याच्या
निमित्ताने इतिहास संशोधकांचे नवे चेहरे समोर येत आहेत.
Sunday, 18 June 2017
मनिष भंगाळेच्या कुभांडची ७८८ पाने
![]() |
पोलीस कोठडीत मनिष भंगाळे |
Saturday, 10 June 2017
फडणवीस पुन्हा नापासच !
संपूर्ण कर्जमाफीच्या मागणी वरुन महाराष्ट्रात धुम्मस सुरु आहे. दि. १ जून २०१७ पासून आठवडाभर शेतकरी संपाचे वातावरण आहे. आज या संपाचा फारसा परिणाम दिसत नाही. काही प्रमाणात दूध पुरवठा विस्कळीत झाला. भाज्यांच्या किमती कडाडल्या. दोन कारणांमुळे. पहिले म्हणजे लिलाव ठप्प झाले. दुसरे म्हणजे पावसाला सुरुवात झाली. जवळपास सर्व भाज्या ३० ते ४० रुपये किलोपर्यंत पोहचल्या.
Sunday, 4 June 2017
शेतकरी संघटना भाजपच्याच गळी !
शेतकरी संप मागे घेतल्याची घोषणा करुन संपात फूट पाडल्याचा आरोप करुन जयाजी सूर्यवंशीची संपूर्ण जातकुळी काढली जात आहे. गणोजी शिर्के किंवा सूर्याजी पिसाळ संबोधून त्याचा रावसाहेब दानवे केला जातोय. साला शब्द उच्चारुन दानवे अडचणीत आल्यानंतर त्यांच्यासाठी जी भाषा वापरली गेली तीच आता जयाजीसाठी आहे. दानवेंचीही जातकुळी काढली गेली होती. मराठा मूकमोर्चा संदर्भात संभ्रम निर्माण करणारी एक जाहिरात पुण्यातून प्रसारित झाली होती. हे सर्व संदर्भ पुन्हा ताजे झाले.
Thursday, 25 May 2017
संगीत संशेवकल्लोळला हवा रसिकाश्रय !

Wednesday, 17 May 2017
वैचारिक दहशतवाद
सत्ता, संपत्ती, अधिकार आणि शोषण अशा चार प्रमुख गोष्टींच्या हव्यासापोटी दहशतवाद किंवा नक्षलवाद बळावतो. या चारही गोष्टी ज्यांना हव्यात ते समुह करुन एकत्र येतात. हे एकत्र येणे प्रथमतः धर्माच्या नावावर असते. त्यानंतर पंथ, वर्ण, समाज, जात, लिंग आणि कार्य अथवा विचारांच्या सामायिकतेतून लोकांना एकत्र आणले जाते. ज्या चार गोष्टींची मागणी करायची त्यासाठी अगोदर लक्षवेधी आक्रोश केला जातो. आक्रोशातून प्रस्थापित व्यवस्थेविरोधात आंदोलन उभे राहते. आंदोलनाचे मूलतः दोनच प्रकार असतात. पहिला अहिंसक व दुसरा हिंसक.
दहशतवादाला मूक विरोध ...

Saturday, 6 May 2017
बदल्यांच्या फडणिशीत फडणवीस नापास
राज्याच्या प्रशासनात एप्रिल
महिन्यापासून आयएएस व आयपीएस श्रेणीतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा माहौल आहे. यात
प्रामुख्याने चर्चेतल्या बदल्या या जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या असतात. महसूल मंत्रालय
जिल्हाधिकारी तर गृहमंत्रालय जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या बदल्यांमध्ये लक्ष घालते.
महसूलमंत्री चंद्रकांत पाटील असून गृहमंत्रालय खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
यांच्याकडे आहे. गेल्या महिनाभरात या दोन्ही मंत्रालयांनी केलेल्या जिल्हाधिकारी व
जिल्हा पोलीस अधिक्षकांच्या बदल्यांमध्ये अनेक घोळ झाल्याचे लक्षात येत आहे.
अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे घाऊक आदेश काढल्यानंतर त्यात वेगाने एकेकाची बदली रद्द करुन
नवी पदस्थापना दिल्याचा स्वतंत्र आदेश निघत आहे. अशा अनेक प्रकारांचा पंचनामा
माध्यमांमधून सुरू आहे. जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या बदल्या अंतिमतः
मुख्यमंत्र्यांच्या संमतीने होतात. म्हणजेच, बदल्यांचा सारा घोळ हा मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांच्या संमतीनेच सुरू आहे. सध्याच्या फडणवीसांचा कारभार
बदल्यांच्या फडणविशीत नापास ठरल्याचे दिसत आहे. बदल्यांमधील हा घोळ खरच पारदर्शक
आहे ? या विषयी मुख्यमंत्री किंवा त्यांच्या पक्षाचे प्रवक्ते खुलेपणाने बोलतील का ?
Tuesday, 2 May 2017
खडसे पक्षाच्या नव्हे, तर प्रवृत्तींच्या विरोधात ...
सत्तेपासून सध्यातरी लांब
बसलेले माजीमंत्री एकनाथराव खडसे यांनी जळगाव जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना
आपल्या मनांतील खंत पुन्हा एकदा व्यक्त केली आहे. खडसे म्हणाले, मी मुख्यमंत्री
होवू नये म्हणून अनेकांनी उद्योग केले. घाणेरडे राजकारण करीत बिनबुडाच्या
आरोपांच्या फैरीही माझ्यावर डागल्या. मात्र, मी मंत्रिपद त्यागल्यानंतर गेल्या
वर्षभरात एकही विरोधक माझ्यावर केलेला एकही आरोपल सिद्द करु शकलेला नाही.
खडसेंच्या या वक्तव्याची दखल आज जय महाराष्ट्र या चॅनेलवर घेण्यात आली. त्यामुळे
त्यांची चर्चा पुन्हा राज्यभर सुरू झाली. अशा वातावरणात खडसेंसारखा तावून सलाखून निघालेला माणूस आता योग्य वेळेची प्रतिक्षा करीत आहे. भविष्यात कोणती वेळ कोणता प्रश्न घेवून येईल यासाठी प्रतिक्षाच करणे योग्य राहील.
Subscribe to:
Posts (Atom)