संग्रहित छायाचित्र |
Saturday, 31 December 2016
छोटा आनंद अनुभवण्याचा संकल्प !!
Friday, 23 December 2016
सोशल मीडियाचा जळगाव पॅटर्न
विविध प्रकारची गतीमान माध्यमे
वापराची सध्या वावटळ (बूम) आहे. पारंपरिक माध्यमे वृत्तपत्रे, टीव्ही आणि सिनेमा
यांच्यासमोर इंटरनेटद्वारा वापरल्या जाणाऱ्या सोशल मीडियाने अनेक आव्हाने उभा केली
आहेत. दिवस आणि रात्रीचे २४ तास सोशल मीडिया धावत असतो. त्यावरील लिखीत, चित्र,
व्हीडीओ स्वरुपातील संदेश निर्मिती व वहन सतत सुरू असते. अशा या सोशल मीडियाच्या
विधायक, सकारात्मक व कृतीशिल वापराची अनेक उदाहरणे जळगावकरांनी निर्माण केली आहेत.
सोशल मीडिया वापराचा युनिक पॅटर्न जळगावकरांनी जन्माला घातला आहे.
Wednesday, 21 December 2016
जि.प. निवडणुकांसाठी गिरीशभाऊंचा बुस्टर डोस ...
जळगाव जिल्ह्यात पालिकांच्यानंतर आता ग्रामीण राजकारणाची सत्ताकेंद्रे असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांच्या निवडणुकीचा ज्वर चढतो आहे. जिल्ह्यासह राज्यातील नगराध्यक्ष निवडणुकीत भाजपने सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक १ चा पक्ष म्हणून लौकिक मिळविला आहे. आता ग्रामीणच्या लढाईत पंचायत समित्या जिंकण्यासह जिल्हा परिषदही पुन्हा काबीज करण्याचे भाजपसमोर आव्हान आहे.
Friday, 16 December 2016
समांतर रस्त्यांच्या श्रेयासाठी झगडा !!!
जळगाव शहर, जिल्हा
लगतच्या परिसरातून रस्ते, राज्यमार्ग व महामार्ग विकासासाठी सुमारे १८ हजार कोटी
रुपयांची घोषणा केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दि. २५ जानेवारी
२०१६ ला जळगाव येथे केली होती. या रस्त्यांच्या विकासाचा प्रारंभही गडकरींच्या
हस्ते तेव्हा झाला होता. प्रारंभाच्या कामाची कोनशिला नंतर कुठे लावण्यात आली ती आजपर्यंत
पाहायला मिळालेली नाही किंवा जळगाव परिसरात रस्त्याच्या विकासाचे काम सुरू
झाल्याचे ऐकीवात नाही.
Thursday, 15 December 2016
मंत्री जानकरांची चूक आणि इतरांच्या घोडचुका ...
सत्तेत असलेला पक्ष आणि
विरोधकांच्या भूमिकेतील पक्ष आपापल्या राजकिय खेळीचे पत्ते काळ वेळ पाहून फेकत
असतात. अशावेळी राजकारणातील चूक आणि घोडचूक याची तुलना करीत न्याय मागण्याचा
मनभावीपणा केल्याचे विरोधी पक्ष दाखवत असतात. एखाद दुसऱ्याला मंत्री पदावरुन पाय
उतार करीत काहींना वाचविण्याचा प्रयत्न सत्ताधारी करीत असतात. कधी काळी आपणही
सत्तेत असताना आपल्या लोकांनी कोणत्या घोडचूका केल्या आणि त्याचे काय प्रायःश्चित्त
घेतले याचा सोयीने विसर विरोधकांना पडतो. काँग्रेसला सिमेंट घोटाळा, पीएचडी पदवी
घोटाळा, मुंबईवरील अतिरेकी हल्ला प्रकरणात हलगर्जीपणा, आदर्श इमारत घोटाळा अशा
अनेक गाजलेल्या प्रकरणात मुख्यमंत्री बदलावे लागले होते. कोहीनूर प्रकरणाच्या
आरोपानंतर शिवसेनेलाही मुख्यमंत्री खांदेपालट करावा लागला होता. राष्ट्रवादी
काँग्रेसनेही आरोपांमुळे उपमुख्यमंत्री बदलले. हा इतिहास सर्वांना माहित असताना आज
विरोधक म्हणून काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना मनभावीपणा करीत आहेत.
Monday, 12 December 2016
ब्रम्हाच्या सहवासातील ते प्रसंग ...
जैन उद्योग समुहाचे
संस्थापक अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक जाणिव असलेले विचारवंत पद्मश्री स्व. भवरलालजी
जैन तथा स्व. मोटेभाऊ यांचा आज जन्मदिवस. पहिलांदा असे घडले की, भाऊंचा जन्मदिवस
असूनही आज जैन हिल्सवर जाण्याची संधी नाही. गाभाऱ्यात परमेश्वराची प्रतिमा नसताना
तेथे जाणे टाळावे लागते. तद्वतच जैनहिल्सवर स्व. मोठेभाऊंची उपस्थिती नसणे या
दोन्ही भावना माझ्यासाठी आज तरी एकच आहेत.
Thursday, 8 December 2016
मृतप्राय जिल्हा काँग्रेसचा दोष कोणावर ?
काँग्रेस पक्षाच्या
स्थापनेनंतर अखिल भारतीय स्तरावर पहिले ग्रामीण अधिवेशन घेणाऱ्या जळगाव
जिल्ह्यात काँग्रेस पक्ष आज पूर्णतः मृतप्राय झाला आहे. जिल्हा व जळगाव शहरस्तरावर
मोजक्या मंडळींनी संघटनात्मक पदे अडकून ठेवल्यामुळे काँग्रेसमध्ये नव्या
कार्यकर्त्यांची प्रवेश प्रक्रिया थांबली आहे. या घडीला पक्षाचे जिल्हाध्यक्ष
किंवा जळगाव शहराध्यक्ष हे दोघेही पक्षांतर्गत क्रियाशिल कार्यकर्ते किती हा
आकडाही सांगू शकत नाहीत.
Monday, 5 December 2016
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मला काय दिले ?
सध्याच्या समाजाची विभागणी भक्त (Divoties), अनुयायी (followers), पंथीय (Stoic) आणि कार्यकर्ता (Workers) अशा चार प्रकारात केली जाते. या चारही शब्दांना विशिष्ट कृतीचा ठोस अर्थ आहे. प्रत्येक शब्दाशी निगडीत भाव, वर्तन व आचरण विभिन्न आहे. देवादिकांच्या कर्मकांड मार्गावर चालणारा भक्त, आदर्श व्यक्तीच्या विचारांनुसार आचरण किंवा अनुनय करणारा अनुयायी, जगण्याची विशिष्टशैली स्वीकारुन एकाच पथ वरुन चालत ओळख जपणारा पंथीय आणि व्यक्ति, समाज, पक्ष, संघटन यासाठी झेपेल व पडेल ते कार्य करणारा कार्यकर्ता अशा या ढोबळ व्याख्या आहेत.
Subscribe to:
Posts (Atom)