Wednesday 19 October 2016

हलक्या पायांची नेते मंडळी

जळगाव महानगर पालिकेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून २५ कोटींचा निधी दिल्याचा आनंदोत्सव साजरा करताना दिवाळीपूर्व मनपाची दिवाळी असे म्हणत सत्ताधारी मंडळींनी फटाके फोडले. दुसरीकडे, याच विषयावर शंकेखोरांचा शिमगा सुरू आहे. राज्यात नगरपालिकांच्या निवडणुका लागल्या आहेत. त्याची आचार संहिता आहे. मग, हा निधी मिळेल का ? रस्त्यांचे प्रस्ताव इतर योजनेत मंजूर आहेत. मग, मागील प्रस्तावांचे काय ? २५ कोटी खर्चाचा प्रस्ताव नव्याने द्यावा लागेल ? अशा या शंका आहेत. या संदर्भात सर्वांत महत्त्वाचा मुद्दा हाच की, जळगाव हे महानगरपालिका क्षेत्र आहे. इतर नगरपालिकांच्या निवडणुकांच्या आचारसंहितेचा येथे कोणत्याही कामकाजावर परिणाम शक्य नाही. यापूर्वी इतर निवडणुकांच्या कामकाजाविषयी न्यायालयाने तसे निकाल दिले आहेत. त्यामुळे शंकेखोर मंडळींनी फारशी चिंता न करता मनपाच्या पदाधिकाऱ्यांना त्यांचे काम करु द्यावे. 
खरेतर आज जळगाव शहरातील नागरिकांना हलक्या पायांच्या नेत्यांची माहिती देण्यासाठी हा लेखन प्रपंच आहे. गेल्या ७-८ वर्षांत जळगाव शहराची स्थिती नरकासारखी झाली आहे. त्याला जबाबदार मनपातील सत्ताधारी आघाडी आहे. हे शाश्वत व चिरंतन सत्य आहे. मात्र, जळगावची अवस्था आणखी वाईट करण्यासाठी काही हलक्या पायांची मंडळी प्रयत्न करीत असते, त्याचाही उहापोह कधीतरी जाहीरपणे करायला हवा.

आता हलके पाय म्हणजे काय ? हे सांगायची गरज नाही. विकास-विकास असे जनतेसमोर बोलणारी मंडळी जेव्हा पडद्याच्या पाठीमागे विकासाच्या आड येणारी कृत्ये करतात तेव्हा त्यांना हलक्या पायाचे राजकारणी म्हणतात. काही राजकारणी हलक्या कानाचे असतात. काही हलक्या चारित्र्याचेही असतात. आपण फक्त जळगाव शहर विकासाच्या विषयावर कोण हलक्या पायाचे आहेत ? यावर चर्चा करु या.

जळगाव शहरात सध्या मुख्य रस्त्यांवरील विक्रेत्यांचे अतिक्रमण हटविण्याचा विषय चर्चेत आहे. उच्च न्यायालयाने मनपाच्या बाजूने निकाल देवून अतिक्रमण हटविण्याचा मुद्दा योग्य ठरविला आहे. मनपा आयुक्तपदी संजय कापडणीस असताना बळीरामपेठ व सुभाषचौक हे अतिक्रमण मुक्त झाले होते. मात्र, आयुक्तपदी जीवन सोनवणे येताच अतिक्रमण करणाऱ्यांना पडद्या आडून हलक्या पायांच्या नेत्यांचे पाठबळ मिळाले आहे. अतिक्रमण करणाऱ्या मूठभर लोकांचा मतदार म्हणून हलका विचार करणारी मंडळी शहरातील इतर नागरिकांचा मतदार म्हणून विचार करीत नाही याचे आश्चर्य वाटते. पोलीस यंत्रणेच्या खांद्यावर बंदूक ठेवून मुख्य रस्त्यांवर पुन्हा अतिक्रमण जैसे थे करण्याचा घाट घातला जात आहे. त्यासाठी वेळेवर पोलीस बंदोबस्त न देणे, बंदोबस्तासाठी रक्कम मागणे असे प्रकार पोलीस दल करीत आहे. हे कोणाच्या पाठबळावर सुरू आहे, हे लोकांना समजत नाही का ? विक्रेत्याकडून रकमा गोळा करुन काही जणांशी व्यवहार झाल्याची सुद्धा चर्चा आहे.

अतिक्रमण करणाऱ्यांना पर्यायी जागा देण्याबाबत शहर मतदार संघाच्या पहिल्या नागरिकाची भूमिका असावी. तसे करायला कोणाचाही विरोध नाही. अतिक्रमण हटविलेल्यांनी पर्याय स्विकारायला हवा. पण, अगदीच हलके राजकारण करणारे हा विचार समजून घेवू शकत नाही. सार्वजनिक रस्ते हे रहदारीचे आहेत. त्याच्यावर कोणाचाही पिढीजात आणि हक्क म्हणून अतिक्रमणाचा अधिकार नाही. अशावेळी अतिक्रमण करणाऱ्यांना समजावून पर्यायी जागेवर जाण्यास भाग पाडले पाहिजे. पण, सहानुभूती किंवा मानवतेचा बुरखा घालून मतदार संघाचे प्रथम नागरिक हलक्या पायांचे राजकारण करीत आहेत. त्यांच्या या हलक्या राजकारणाचा जळगावकरांनाही वीट आला आहे. केवळ लाटेत निवडून येण्याची संधी मिळाली म्हणून मतदार संघाचे प्रथम नागरिक झाला आहात. तीन वर्षांनंतर कुठे असाल ? याचा सारासार विचार करायला हवा.

नशिबाच्या बळावर विधान परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी दुसऱ्या एका नागरिकाला (यांच्या खऱ्या नागरिकत्वाविषयी पूर्वी विवाद होता) मिळाली आहे. शिंक्याचे तुटले आणि बोक्याचे फावले अशा प्रकारात ही संधी आहे. पूर्वीही १० वर्षे हेच विधान परिषदेत प्रतिनिधित्व करीत होते. त्यांनी विकासाचे एखादे काम केले, असे ऐकिवात नाही. हो पण त्यांनी दलाल (येथे हा शब्द बिचौला किंवा दोन जणांच्या मध्ये व्यवहार घडवून आणणारा या अर्थाने आहे) म्हणूनच काम केल्याचे अनेक जण सांगतात. काहींच्या जागेच्या व्यवहारात, काही ठिकाणी स्वतः बांधकामात त्यांनी काम केले आहे. जळगाव एमआयडीसीत परस्पर जागा मिळण्यासाठी प्रयत्न केल्याचेही प्रकरण मागे चर्चेत होते.

अशा या नेत्याने शहरातील व्यापारी गाळ्यांच्या भाडे प्रकरणातही पैसे गोळा करण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याचे लोक सांगतात. कोर्टात जावू, सरकारकडे जावू, मंत्र्यांच्या मध्यस्थीने काम करू असे आश्वासन यांनी दिले होते. त्याचे पुढे काय झाले ? याचा थांगपत्ता नाही. व्यापाऱ्यांच्या डोक्यावर टांगती तलवार कायम आहे.

नियुक्तीच्या बळावर काम करणारी हलक्या पायांची मंडळी जास्त कुरापतीखोर असतात. मात्र, त्यांची वाणी नम्र असते. कपाळावर टीळा असतो. त्यांना ओळखायला जरा वेळ लागतो. विषय फिरून पुन्हा जळगाव शहराला मुख्यमंत्र्यांनी २५ कोटी रुपये दिल्याच्या मुद्द्यावर येतो. मुख्यमंत्री जेव्हा जळगाव विमानतळावर आले तेव्हा ते तेथील आरामकक्षात बसले होते. तेथे जळगावचे महापौर व उपमहापौर ही उपस्थित होते. अशा प्रसंगी हे नियुक्त केलेले हलक्या पायांचे प्रतिनिधी पोलीस अधीक्षकांना म्हणाले, फक्त आमच्या आमदार व खासदारांना येथे थांबवा. इतरांना बाहेर काढा. या प्रवृत्तीच्या माणसाला हलक्या पायांचाच नाही तर हलक्या बुद्धीचाही म्हणावे लागेल. जो शहराचा प्रथम नागरिक आहे, त्याला बाहेर काढण्यासाठी पोलिसांना कशाला वापरतो रे बाबा, तू स्वतःच सांग ना ? वाईटपणा त्या अधिकाऱ्यांच्या अंगाशी कशाला आणतो ?

शहराच्या राजकारणातील हलक्या पायांचे इतर अनेकही नेते आहेत. त्यांचाही समाचार योग्य वेळी घेवू या. येथे जळगावकरांसाठी एकच मुद्दा महत्त्वाचा आहे. तो म्हणजे, या शहरासाठी, येथील जनतेसाठी कोणी खुपच इमाने, ऐतबारे, विश्वासाने व प्रामाणिकपणे काम करीत आहे असे काही दिसत नाही. त्यामुळे हलक्या पायांच्या नेत्यांचे किस्से चर्चेत आले की, ते अधिकाधिक लोकापर्यंत पोहचवा. अशा नेत्यांची माहिती जळगावकरांना होवू द्या. अशा नेत्यांना खुलेपणाने प्रश्न विचारायचे धाडस करा. आपल्या मतांवर ही मंडळी निवडून येतात, याचे नेहमी भान ठेवा. नेते हलक्या पायांचे झाले म्हणून जनतेने आपले पाय रोवून उभे राहणे आवश्यक आहे. तीच पुढील काळात गरज आहे. दुसऱ्यांच्या भवशावर अच्छे दिन येत नाही, हे पुन्हासमजून सांगायला हवे का ??
संदर्भ –






ताजा कलम – जळगावच्या राजकारणात हलक्या पायांचे नेते हा शब्दप्रयोग कालपासून सुरू झाला आहे. जामनेर येथे मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला जायचे नाही असे ठरवूनही नंतर काही नेते मंडळी तेथे पोहचली. मुख्यमंत्र्यांचे भाषण सुरू असताना ही मंडळी व्यासपीठावर गेली. त्यांना काय म्हणावे ? असा प्रश्न काही वाचकांनी विचारला आहे.


अजून एक माहिती - २५ कोटींचा निधी कोणाच्या प्रयत्नामुळे मिळाले यावर आता चर्चा सुरू आहे. खाविआ नेते म्हणतात, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यामुळे निधी मिळाला. आमदार सुरेश भोळे म्हणतात, मी व एकनाथराव खडसे यांनी केलेल्या प्रयत्नामुळे हा निधी मिळाला. योगायोग असाही आहे की, दीपककुमार गुप्ता या आरटीआय कार्यकर्त्यानेही यासाठी पत्रापत्री केली होती. हा निधी घोषणा होवून १९ महिने उशीरा मिळाला याचा दोष कोणीही घेण्यास तयार नाही.

1 comment:

  1. अकसर लोग 12वीं क्लास पास करके महीना 6000 से 15000 रुपये तक ही
    कमाते है और पूरी जिंदगी एसे ही काम करते है पर उन लोगो को ये नही पता
    होता की india से बहार के लोग हमसे कई गुना आगे होते है और वो लोग
    पढाई के साथ साथ इंतना पैसे कमाते है जितनी एक CA का होता है इसकी
    एक ही बजह है की इंडिया के लोग networking में विश्वास नही करते और
    हम लोग सोचते है की बिना कुछ किये ही सब मिल जाये दोस्तों हर काम मे
    मेहनत करना पड़ता है बिना कुछ किये आपको कुछ हासिल नही होगा
    इंडिया का गरीबी का कारण भी ये ही है तो दोस्तों अब में आपको एक
    ऐसा platform के बारे में बातउंगा जिसमे बिना कोई पैसा लगाये आप लोग
    लाखो तक कमा सकते है उसके लिए आपके पास android मोबाइल होना
    बहुत जरुरी है अब आपको अपने android मोबाइल के अंदर एक play store app
    के अंदर जाना है और champ cash लिख के उस app को डाउनलोड करना है
    जब app डाउनलोड हो जायेगा आपको रजिस्टर करना है और sponsor
    code : 321260 लिख कर उस id को पूरा करना है जैसे ही id बनके तैयार हो
    जायेगी तो आपके सामने एक task होगा उसमे कुछ app दिए होंगे उन सभी
    app को एक एक करके डाउनलोड करना है और उन्हें 2 से 3 मिनट तक चलना है
    जैसे ही आप task पूरा कर लोगे तो आपको $1 dollar आपके champ cash
    wallet में मिल जायेगा ज्यादा पैसे कमाने के लिए आपको आपने friends
    को invite करना है जब आपके friends id बनाकर task पूरा कर लेंगे तो आपको
    $0.300-$600 dollar मिलेगा जब आपके फ्रेंड किसी और को invite करेंगे तो
    और उन्होंने टास्क पूरा कर लिया तो भी आपको पैसे मिलेगे और ऐसे 7 लेवल
    तक चलता रहेगा देर मत कीजिए जल्दी से champ cash डाउनलोड करे
    Sponsor code 321260 इस काम को कोई भी कर सकता है students,
    housewife, old man , etc For more information msg me Whats app
    Number 8806656508

    ReplyDelete