![]() |
सोशल मीडिया हैण्डलर सेवा |
प्रिंट आणि लाईव्ह
मीडियाच्या कव्हरेज व गतीपेक्षा जास्त वेगवान, सोपा आणि प्रत्येकाच्या हातात पोहच
असलेल्या “सोशल मीडिया” त तुम्हाला तुमचे विचार मांडण्याची आणि तुमच्या संस्था, सेवा, वस्तू, उत्पादनांचा प्रचार-प्रसार करण्याची संधी “सोशल मीडिया हैण्डलर” म्हणून आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. आज “गणेश चतुर्थी”च्या
मुहूर्तावर (दि. ५ सप्टेंबर २०१६) आम्ही या व्यावसायिक सेवेचा प्रारंभ करीत आहोत. अगदी
सोप्या भाषेत म्हणजे “विचार, प्रसिद्धी तुमची असेल परंतु
प्रभावी व नेटक्या शब्दांत, भाषेत त्याची मांडणी आणि ते लोकांपर्यंत पोहचविण्याची
भन्नाटसेवा आमची” असेल. तीच सेवा म्हणजेच “सोशल मीडिया हैण्डलर” सेवा होय.
जळगाव शहरात अलिकडे तीन उपक्रम झाले. पहिला “मीडिया ट्रायल” या विषयावरील “टॉक शो” (दि.
१८ ऑगस्ट) , दुसरा तनय मल्हारा यास “मोबाईलद्वारे
व्होटींग” चा (दि. २८ ऑगस्ट). त्यानंतरचा गणेश फेस्टीवल (दि. २ ते ५ सप्टेंबर). या तीनही उपक्रमात “सोशल मीडिया हैण्डलर” म्हणून आम्ही भूमिका बजावली. टॉक शोसाठी कांताई
सभागृहात श्रोत्यांची तुडूंब गर्दी "सोशल मीडिया"वरील कॅम्पेनमुळे झाली. तनयला मतदान
मिळावे म्हणून "सोशल मीडिया"तून कॅम्पेन करीत जळगाव शहरात सकारात्मक वातावरण निर्माण
करता आले. त्यानंतर गणेश फेस्टीवलमधील विविध स्टॉलच्या वैशिष्ट्यांसह नागरिकांना माहिती देण्यात आली. ही तीनही उदाहरणे "सोशल मीडिया"च्या प्रभावाची आहे. अर्थात, यासाठीच्या संदेशांतून
वापरलेल्या "शब्दांचे, मजकुराचे" महत्त्वही तेवढेच आहे. "सोशल मीडिया"तून
प्रचार-प्रसाराचे तंत्र किती गतिमान व लोकांपर्यंत थेट पोहचणारे आहे, याची ही
उदाहरणे.
"सोशल मीडिया"च्या
प्रभावाविषयी आता टीव्ही चॅनेलचे संपादकही अत्यंत गंभीरपणे बोलू लागले आहेत. जळगाव
येथे झालेल्या “मीडिया ट्रायल” टॉक शो मध्ये “आयबीएन लोकमत” चे
संपादक महेश म्हात्रे यांनी “भविष्यातील
माध्यम सोशल मीडिया असेल” हेच
सांगतले. तर “एबीपी माझा”चे मुख्य संपादक राजीव खांडेकर म्हणाले की, “इतर माध्यमांची मक्तेदारी मोडण्याचे काम सोशल
मीडियाने केले आहे.”
(मीडिया ट्रायल चर्चेत सोशल मीडिया विषयी चैनलचे संपादक काय म्हणतात याचा संपादीत व्हिडीओ )
कोणतीही व्यक्ती, संस्था,
सेवा, व्यापार, उद्योग, व्यवसाय, राजकिय पक्ष आदींना समाजाशी, ग्राहकांशी,
हितचिंतकांशी, मतदारांशी “संपर्काची,
लोकसंवादाची” गरज नेहमी असते. मात्र,
आपले विचार, म्हणणे हे नेमक्या शब्दांत, संदेशात अनेकांना व्यक्त करता येत नाहीत.
त्यामुळे त्यांना मनातील विचार किंवा मला असे वाटते असे अभिव्यक्त करता येत नाही.
अनेकजण अनुभवी असतात, आपापल्या क्षेत्रात “मास्टर
किंवा टॅक्यून” असतात पण त्यांचा विचारांद्वारे
सामाजिक संपर्क खूप कमी असतो. अशा सर्वच व्यक्ती, संस्था, संघटना, राजकिय पक्ष,
उद्योजक आदींसाठी “सोशल मीडिया हैण्डलर” ही एक सेवा आहे.
![]() |
दैनिकांनी बातम्या न देताही तुडुंब भरलेले कांताई सभागृह |
अनेक संस्था, संघटना,
व्यक्ती विविध प्रकारचे सामाजिक काम करतात. त्यांच्या कार्याची एखाद-दुसरी बातमी
दैनिकातून येते. मात्र, त्यांच्या कार्याविषयी नेमकी भूमिका मांडणारा प्रचार होत
नाही. अशावेळी "सोशल मीडिया"च्या गतिमान व कायम टीकून राहणाऱ्या आशयाचा वापर करता
येतो. असाच प्रकार एखाद्या व्यावसायिक, सेवा, वस्तूच्या प्रचार-प्रसार संबंधी आहे.
छापिल माध्यमातील जाहिरातीचे दर गगनाला भिडणारे आहेत. तो खर्च करुनही तुमच्याविषयी
वृत्तपत्रात चार चांगले शब्द छापून येतील याची शाश्वती नाही. अशा सेवा, व्यवसाय,
वस्तुंसाठी "सोशल मीडिया" हे प्रचाराचे साधन आहे.
वृत्तपत्रातील आशय
संपादनात गेल्या २७ वर्षांपासून आम्ही काम करीत आहोत. सामाजिक, राजकिय, उद्योग,
व्यवसाय, सेवा अशा विविध क्षेत्रांविषयी आणि जळगाव जिल्ह्यातील कोणताही विषय नेमक्यापणे
लेखनाचा आमचा अनुभव आहे. कोणत्याही विषयावर विचार व्यक्त करण्यासाठी आम्ही तुम्हाला
मदत व सहकार्य करू शकतो. अर्थात, हा केवळ दावा नाही. गेल्या सहा महिन्यांत जळगाव
शहरातील विविध क्षेत्रांतील टॉपच्या मान्यवरांसाठी आम्ही “सोशल मीडिया हैण्डलिंग”
सेवा देत आहोत. ती कोणासाठी, हे मात्र आम्ही “व्यावसायिक सिक्रेट”
म्हणून सांगत नाही. आता या सेवेचा विस्तार करण्यासाठी ही अधिकृत “अनाऊंसमेंट”
आम्ही करीत आहोत.
![]() |
तनयला मोबाईलवरून मतदान करताना एकनाथ खडसे |
आपला उद्योग, व्यवसाय,
संघटन, समाज, राजकारण, सहकारी संस्था, शिक्षण संस्था याच्याशी संबंधित संदेश,
विचार किंवा बिझीनेस प्रमोशनचे कॅम्पेन “सोशल
मीडिया”तील “फेसबुक, व्हाट्स ऍप, ट्विटर, यू ट्यूब” आदीवर पोहचविण्यासाठीचे सर्व तंत्र, व्यवस्था आमच्याकडे उपलब्ध
आहे. शब्द, चित्र, चित्रफित अशा तिनही प्रकारात आपणास लोकांपर्यंत पोहचविण्याची
हमी आमच्या “सोशल मीडिया हॅण्डलिंग” सेवेत आहे. हा विचार, संकल्पना व सेवा अनोखी व
नाविन्यपूर्ण आहे. असे काम करणारे आम्ही सध्यातरी “एकमेव” आहोत.
“सोशल मीडिया सोल्युशन” च्या नावाने आमची ही “सोशल मीडिया हॅण्लिंग” सेवा
दिली जाते. त्यात आपले “सोशल अकाऊंट” आम्ही हैण्डलिंग करतो. कोणत्याही प्रकारची “कायदेशीर”
अडचण न येता जास्तीत जास्त लोकांपर्यंत आम्ही आपणास पोहचवितो. नेमक्या शब्दांत,
भाषेत मांडणी असल्यामुळे आपणास प्रतिसादाची हमीही आम्ही घेतो.
![]() |
गणेश फेस्टीवलमधील जळगावकरांची गर्दी |
दिलीप तिवारी ... ९५५२५८५०८८
सोबतच्या लिंकवरील फॉर्म भरा ... (गुगल अकाऊंटवरुन भरता येईल)
अर्ज भरण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
https://goo.gl/forms/QPnBkdhQ3eaxka1j1
https://goo.gl/forms/QPnBkdhQ3eaxka1j1
It's really very good concept !
ReplyDeleteIt's really very good concept !
ReplyDeleteThis is life achievement... Nice concept...
ReplyDelete