गणोशत्सवानिमित्त अभिनव
कल्पना घेवून सुरू केलेला “श्री
गणेश उत्सव शॉपिंग फेस्टिवल २०१६” ला “खान्देश सेंट्रल मॉल”मध्ये प्रारंभ झाला आहे. त्याचे विधीवत उद्घाटन राज्याचे
(नागपूर) माहिती आयुक्त व्ही. डी. पाटील यांच्या हस्ते झाले. महापौर नितीन लढ्ढा,
गणेश महामंडळाचे अध्यक्ष सचिन नारळे व इतर मान्यवर प्रमुख पाहुणे होते.
रस्त्यावर होणारी गणेश
खरेदी व त्यातून होणारी मूर्तींचा विटंबना थांबविण्यासाठी एका छताखाली कलात्मक व
शाडुच्या माती पासून तयार केलेल्या मूर्तींची विक्री, कपडे, मिठाई, गृपयोगी वस्तू,
कलाविष्कार ते थेट वाहन खरेदी अशी संकल्पना घेवून हा फेस्टीवल २०१६ सुरू झालेला
आहे. जळगावकरांना खरेदीची शिस्त लावण्याचा प्रयत्न यातून आहे. प्रमोद बऱ्हाटे,
विजय वाणी, ऍड. जमील देशपांडे यांची ही
संकल्पना आहे.
या फेस्टीव्हलमध्ये जवळपास
१५० स्टॉल आहेत. त्यात “वायर आर्ट” हा अनोखा प्रकार आहे. विविध प्रकारच्या टाकाऊ
वस्तूंपासून टीकाऊ गणेशांच्या मूर्तींचे प्रदर्शन आहे. संगीता घोडगावकर, विकास
मलारा यांच्या गणेश मूर्ती आहेत. नेक्सा, मारुती, महेंद्रा आदी कंपन्याची नवी
वाहने आहेत. अनेक
नव्या फिचर्सचे मोबाईलही आहेत. जॉनप्लेयरचे कपडे आहेत. टायटनची विविधांगी घड्याळे
आहेत. कलकत्ता, विशाखापटणम, हैद्राबाद येथील कपडे आहेत. सागाचे देव्हारे आहेत.
घरगुती वापराच्या जवळपास सर्वच वस्तू आहेत. फेस्टीवलचा आनंद घेताना विविध
प्रकारच्या खाद्य पदार्थांचा अस्वाद घेण्याची सोयआहे.
हा फेस्टीवल दि. २ ते ५
सप्टेंबर असा ५ दिवस सुरू राहिल. रोज सकाळी ९ ते रात्री १० पर्यंत वेळ आहे. फेस्टीवलच्या
ठिकाणी विविध सांस्कृतिक कार्यक्रम होत आहेत.
“नेक्सा” ची आकर्षक वाहने
गणेश फेस्टीवल मध्ये सर्वच
स्टॉलवर विक्रेत्यांची गजबज वाढली आहे. गणेश मूर्तीपासून गृहपयोगी वस्तू ते
चारचाकी वाहन अशा सर्वच रेंज मधील खरेदी येथे एकाच छताखाली करता येत आहे. या
फेस्टीवलमधील सर्व दालने वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांची आहे. काही विक्रेते आणि
उत्पादक पहिलांदा यानिमित्ताने जळगावात आले आहेत. महिलांसाठी नियमित वापराचे,
फॅन्सी व पार्टी विअर ड्रेस मटेरिअल असंख्य प्रकारात उपलब्ध आहेत.
या फेस्टीवलचे वैशिष्ट्य
म्हणजे, मारुती सुझुकीने “नेक्सा” या वाहन श्रृंखलेतील वाहनांचा स्वतंत्र स्टॉल
लावला आहे. “बलेनो” आणि “एस-क्रॉस” या दोन लक्झरी कार या ठिकाणी उपलब्ध आहेत. या
दोन्ही वहनांची वैशिष्टे ग्राहकांना समजून दिली जातात. पूर्णतः ऑटोमॅटीक
कार्यप्रणाली असलेली ही वाहने सध्या ग्राहकांच्या पसंतील उतरत आहेत. नेहमीच्या लूक
पेक्षा “भिन्न लूक” असलेल्या या दोन्ही कारचे प्रकार फोरव्हिलर घेण्याची अपेक्षा
बाळगणाऱ्या ग्राहकांनी एकदा पाहण्या सारखे आहे.
“सातपुडा ऑटोमोबाईल्स”
ची दोन वाहने
सातपुडा ऑटोमोबाईल्सची “उनव्हो स्पोर्ट” आणि “केसुव्ही
१ ओओ” ही दोन वाहने उपलब्ध आहेत.
यादोन्ही गाड्या महिंद्राच्या आहेत. स्पोर्ट कारही लख्जरी गाडी असून “रफ ऍण्ड टफ”
आहे. १ ओओ ही गाडी लाईट व्हिकल प्रकारातील असून सर्व आधुनिक फिचर्स त्यात आहेत.
महिलांसाठी “डिझाईनर कपडे”
गणेश फेस्टीवलमध्ये
महिलांच्या कपड्यांची अनेकोत्तम व्हरायटी उपलब्ध आहेत. कलकत्ता, हैद्राबाद,
विशाखापट्टणम येथील प्युअर कॉटन, डिझाईन, पार्टी विअर, डेली विअर कपड्यांचा समावेश
आहे. यातील अनेक विक्रेत्या महिला पहिल्यांदा जळगावात आल्या आहे. अवघ्या २००
रुपयांपासून त्यापुढील रेंजमध्ये व्हरायटी पाहता येतात.
तहा कलेक्शन (कोलकता) -
यांचे कॉटनचे सूट आणि कुर्ती उपलब्ध आहेत. त्यावरील नक्षीकाम हे लक्षवेधी असून तसे
पॅटर्न इतर ठिकाणी उपलब्ध होत नाहीत.
मिडास फॅब (जयपूर) - यांचे
चिकनकरी एम्ब्रॉयडरी कुर्ती, जयपुरी डिजिटल प्रिंटेड कुर्ती, लखनवी डिझायनर
कुर्ती, सेल्फ प्रिंटेड कुर्ती, लेगी अण्ड प्लाझो यासह डेली विअरचे कपडे उपलब्ध
आहेत.
होमेक्स (कोलकाता) - यांचे
बेडशिट्स, उशी क्वहर, लोड कव्हर, टेबल मॅट, कार्पेट आदी एक्सेसरीस उपलब्ध आहेत.
याशिवाय वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरीही पाहायला मिळतात.
किर्ती क्रिएशन
(जळगाव)- यांचाही डिझाईनर साडी, बेड
सिट्स, बॅग्ज, कुर्ती आदींचा स्टॉल आहे. या स्टॉलवर डेकोरेटीव्ह आयटमही आहेत.
“वायर आर्ट” एक अनोखी कला
केवळ एक तार किंवा वायरला
केवळ बोटांनी वळण देवून शोभेच्या वस्तू तयार करणारे सुप्रसिद्ध कलाकार हरिशकुमार
भानुशाली (कच्छ) हे सध्या गणेश फेस्टीवल मध्ये आले आहेत. एकाच तारेचा किंवा वायरचा वापर
करुन रिक्षा, मोटारसायकल, सायकल, गाडी आदी तयार करणारे भानुशाली हे कारागीर आहेत.
त्यांच्या हस्तकलेचे २६० प्रकार उपलब्ध आहेत. आपापल्या नावाचे किचेन तयार करण्याचेही
काम भानुशाली करतात.
पोटपुजेचे ठिकाण –
बुस्टर्स
जळगावमधील अभियंता,
मार्केटींग शिकणारी मुले एकत्र येवून त्यांनी गणेश फेस्टीवलमध्ये “बुस्टर”
हा स्टॉल लावला आहे. हे ठिकाण चटपटा खाण्याचा कॉर्नर आहे. पुण्याच्या सारस बागेत
मिळणारी “मटकी भेळ” या मुलांनी येथे उपलब्ध केली आहे. नेहमीच्या भेळ पेक्षा हा
स्वाद वेगळाच आहे. याशिवाय “सिग्नेचर” ही नवी डिश मुलांनी तयार केली आहे. “चिज पास्ता भेळ” असे या खमंग पदार्थाचे स्वरुप आहे.
“निर्वाना”चाही अनोखा स्टॉल
जळगाव येथील “छोरिया”
गृपच्या निर्वाणा इन्स्टंट फूड मिक्सचा स्टॉल खुपच अनोखा आहे. या ठिकाणी जलेबी,
खमण, भजी, इडली, पोहा, शिरा, उपमा व थालीपीठची मिक्स पॅकेट उपलब्ध आहेत. अवघ्या
दोन मिनिटात म्हणजे मॅगीच्या बरोबरीने खाद्य पदार्थ कसे तयार करता येतात हे येथे
पाहता येते.
सागाचे देव्हारे
वास्तुशास्त्राच्या
नियमानुसार तयार केलेले “सागवानी
व फोल्डींगचे देव्हारे” या फेस्टीवलमध्ये उपलब्ध
आहेत. जळगावच्या कुशल एन्टर प्राईजेसचे हे देव्हारे आहेत. या देवघरांचे लाकूड
ओलसरपणामुले वाकत नाही. त्याला वाळवी लागत नाही. घरातील जागा व बजेटनुसार देव्हारे
तयार करुन दिले जातात.
सात्विक गणेश मूर्ती
जळगाव येथील “गणेश कला केंद्र” च्या सात्विक व शास्त्र शुद्ध गणेश मूर्ती प्रदर्शनात उपलब्ध
आहेत. या मूर्ती शाडुच्या मातीच्या असून त्या मूर्तीशास्त्र व अध्यात्माचा विचार
केला आहे. महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन मंत्रालयाने या मूर्तींचा गौरव इको फेरंडली
गमेश म्हणून केला आहे. सनातन या संस्तेच्या निकषानुसार या मूर्तींची वैशिष्ट्ये
असतात.
No comments:
Post a Comment