![]() |
तनय मल्हारा |
जळगावचा तनय आनंद मल्हारा (वय
१४ वर्षे, ९ वी, सेंट तेरेसा कॉन्व्हेंट) हा स्टार चॅनलवरून प्रसारित होत असलेल्या
“डान्स प्लस २” या लाईव्ह परफॉर्मन्स स्पर्धेत शेवटच्या ८
स्पर्धकात पोहचला आहे. दि. २८, रविवार रोजी त्याचे महत्त्वाच्या फेरीतील नृत्य
आहे. अंतिम चौघात जाण्यासाठी त्याला दर्शकांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. रविवारी
रात्री ८ ते १० च्या दरम्यान प्रेक्षक, दर्शकांना मतदान करता येणार आहे. तनयचा “टोल फ्री”
नंबर १८००८३३३३५१ असा आहे. त्या दोन तासातच त्यावर फोन अथवा मोबाईलद्वारे मीस कॉल
करुन मतदान करता येईल. एका फोन व मोबाईलवरून एकच कॉल करीत एकच मत नोंदविता येईल.
यासाठी जळगाव शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रातील दर्शक, प्रेक्षक व रसिकांनी तनयसाठी
कॉल करुन मतदान करणे आवश्यक आहे. हरहुन्नरी, मेहनती, चपळ, लवचिक तनयचा या निमित्त
थोडक्यात परिचय
गेल्या चार वर्षांपासून
तनय टीव्ही वरील वेगवेगळ्या चॅनेलवर सादर होणाऱ्या नृत्याच्या लाईव्ह
कार्यक्रमातून चमकत आहे. त्याने दाखविलेले नृत्याचे कौशल्य अनेक मान्यवरांची वाहवा
मिळवून गेले आहे. त्यात चित्रपट अभिनेता मिथुन चक्रवर्ती, कमल हसन, शाहरुख खान, अभिषेक बच्चन, शाहिद कपूर, अजय देवगण, करीना कपूर, विद्या बालन, राणी मुखर्जी यांचा समावेश आहे.
यांच्यापैकी काही जणांसोबत त्याने नृत्यही केले आहे.
![]() |
करीना कपूर आणि तनय |
कोणत्याही दृश्य कलेत
करिअर करण्यासाठी सर्वसामान्य पालक पाल्यास परवानी देत नाहीत. याला अपवाद ठरले
आहेत तनयचे पालक. त्याचे वडील आनंद मल्हारा जळगाव येथे जाहिरात एजन्सी चालवतात. आई
डॉ. नलिनी आहेत. या दोघांनी तनयला नृत्यात करिअर करायला प्रोत्साहन दिले आहे.
एवढेच नव्हे तर गेल्या चार वर्षांपासून त्याची आई त्याच्या सोबत नृत्याच्या
स्पर्धा, कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. नाचून काय मिळते ? असे प्रश्न करणाऱ्या पालकांसाठी आनंद-नलिनी हे उदाहरण आहेत.
तनयच्या प्रवासाविषयी त्याची आई नलिनी म्हणतात, “तनय लहान असल्यापासून त्याला नृत्याची आवड होती. चारवर्षांचा
असल्यापासून तो नृत्यात रस घेवू लागला. त्याचा शालेय अभ्यासही उत्तम आहे. तो आज ९
वीत असून त्याला नियमितपणे ८९ ते ९० गुण मिळतात. आम्ही त्याला १०० का मिळाले नाही
असे कधी विचारले नाही. पण, त्याने नृत्यात रुची दाखवताच आम्ही त्याला
प्रशिक्षणासाठी परवानगी दिली.”
![]() |
सोनाक्षी सिन्हा सोबत तनय |
मल्हारा दाम्पत्य मुळचे
राजस्थानातील. आनंद व नलिनी हे दोघेही कनोड (राजस्थान) येथील आहेत. त्याच्या आईचे
शिक्षण राजस्थान मध्ये झाली आहे. त्या
स्वतः उत्तम नृत्य करतात. तनयला लहानपणापासून नृत्याच्या आवड सोबत पोहणे, मल्लखांब
खेळणे, टेबलटेनिस, बुद्धीबळ यातही रस होता. या सर्व गोष्टी त्याला नृत्यातील
चपळता, गती व लवचिकता देण्यास पूरक ठरल्या. आईकडून नृत्याविष्काराची गुण घेवून आलेला तनय मातृप्रभावी आहे.
तनय जळगावच्या “ग्लडिएटर”
डान्स क्लासचा विद्यार्थी. त्याचे प्रशिक्षक अखिल टिलकपुरे आहेत. त्यांच्या
मार्गदर्शनाखाली तनय मुक्त प्रकारात (कन्टेम्पप्ररी) नृत्य करतो. एकल नृत्यात
त्याची खासियत आहे. मात्र, युगल किंवा समुह नृत्यातही तो सरस आहे. त्याच्या
प्रशिक्षकांनी त्याला नृत्याचे उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिले. तनयचा आत्मविश्वास
वाढल्यानंतर त्याला सर्व प्रथम “झी
चॅनेल” वरील “डान्स इंडिया डान्सच्या लिटील मास्टर २” मध्ये सहभागीची संधी मिळाली. ऑडीशन राऊंड पूर्ण करीत अखेरच्या
७ स्पर्धकांमध्ये तनयने धडक मारली होती.
याच कार्यक्रमात त्याच्या “वॉटर ऍक्ट”ला “डान्स ऑफसिझन” हा अवॉर्ड मिळाला होता.
नंतर मात्र दर्शक व प्रेक्षकांचा पुरेसा कौल न
मिळाल्यामुळे तो स्पर्धेबाहेर झाला. तनय खऱ्या अर्थाने येथून सेलिब्रिटी झाला. यानंतर
त्याने “डान्स का टशन” आणि “डान्स
के सुपर किड्स” यासह अन्य
कार्यक्रमांतदेखील सहभाग नोंदविला होता.
![]() |
डान्सगुरु रेमो आणि तनय |
यानंतरच्या काळात तनयने
योगासनांचा कठोर सराव सुरू केला. त्याच्या
नृत्याविष्कारासाठी योगा उपयुक्त ठरले. योगा प्रशिक्षक डॉ. अनिता पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली तो पाण्यातील योगा व पाण्यातील नृत्य सादर करणे शिकला. योगामुळे
तनयचे शरीर अधिक लवचिक झाले. सततच्या सरावामुळे त्याच्या शरीरातील हाडांचा कठोर व
कठीपणा हालचालीतून कमी झाला. त्यामुळे तनयच्या मुक्त नृत्याला लय आणि नजाकत
मिळाली. योगासनातील कौशल्ये आत्मसात केल्यामुळे तनय डॉ. अनिता पाटील यांच्या
मार्गदर्शनाखाली “रिदमिक योगा”ची राष्ट्रीय स्पर्धा जिंकून आता व्हिएतनाममध्ये
होणाऱ्या रिदमिक योगाच्या “एशियन
कॉम्पिटिशन” मध्येही भारतातर्फे
सहभागी होणार आहे.
तनयने चीनमधील बीजींग येथे
नृत्याचा जलवा दाखविला. चीनमधील प्रसिध्द टीव्ही चॅनेल “सीसीटीव्ही” व “बीजींग म्युनिसीपल कॉर्पोरेशन” यांच्यातर्फे आयोजित “इंटरनॅशनल युथ फेस्टीव्हल” मध्ये तनय व त्याच्या सहकाऱ्यांनी “एअर बलून” व “वॉटर ऍक्ट”
असा संयुक्त कलाविष्कार सादर केला. पाण्यातील योगाचा सराव असल्यामुळे तनयचे ते
नृत्य दिलखेचक ठरले. तेथील तज्ञांनी त्याची प्रसंशा केली. अप्रतिम कौशल्य आणि
पदन्यासामुळे तनय भारतातच नव्हे तर जगातही प्रसिध्द झाला. जवळपास ४२ देशांमध्ये
तनयने स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यानंतर “डीआयडी सुपर मॉम”मध्ये
देखील तनय थिरकला. तेथे त्याला आई नलिनी यांनी साथ केली.
![]() |
बिपाशा बसू आणि तनय |
अलिकडे “डान्स प्लस २” च्या सिझनची जाहिरात सुरू होताच प्रशिक्षक टिलकपुरे यांनी तनयकडून
कसून सराव सुरू केला. तनय सोबत देवाशिश मोटवाणी, शिवम वानखेडे हेही प्रयत्न करायला लागले. प्रत्यक्ष
ऑडीशनच्यावेळी तनय टीव्ही राऊंड पर्यंत पोहोचला. फायनल सिलेक्शनच्या टॉप ३० मधून
टॉप १२ मध्ये तनय आला. तेथून तो आता प्रसिद्ध नृत्य प्रशिक्षक धरमेशच्या टीममध्ये
आहे. सध्या त्याचा महत्त्वपूर्ण फेरीतून अंतिम ४ मध्ये जाण्यासाठी रोज १० तास सराव
सुरू आहे. तनयने या स्पर्धेत आतापर्यंत सोलो (एकल) व ड्युएट (युगल) नृत्य सादर
केले आहे.
दि. २ जुलैपासून “स्टार प्लस”वर
“डान्स प्लस सिझन २” सुरू झाले आहे. आतापर्यंतच्या सर्वच भागात तनयने
नृत्याविष्कार उंचावत नेला आहे. डान्सचे गॉडफादर म्हणून ओळखले असलेल्या रेमो
डिसुझा यांनी त्याचे अनेकवेळा कौतुक केले. मेन्टॉर असलेल्या पुनीत, शक्ती व धर्मेश यांनी त्याची वाहवा केली आहे. तनयच्या
नृत्याबद्दल रेमो डिसुजा म्हणाले की, “तुझ्या
नृत्याच्या स्टेप्स चांगल्या आहेत. चेहऱ्यावरील हावभाव व एकंदरित उत्तम आहेत. हालचाली,
हरकती योग्य असून शरीरात चापल्य आहे.” “डान्स प्लस २” मध्ये तनयने सादर केलेल्या प्रत्येक नृत्याला १०० टक्के गुण
मिळाले आहेत. त्याला “कन्टेम्प्ररी डान्सर ऑफ
सिझन २” हा सन्मानही मिळाला आहे.
आता तनयसाठी “व्होटींग लाईन” दि. २८, रविवारी रात्री ८ ते ०१० खुली होणार आहे. आपला तनय
जिकांवा असे वाटत असलेल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन माणसाने, आई-वडीलांनी, मुलीने,
भाऊ-बहिणीने, आजी-आजोबांनी, नातेवाईक-शेजाऱ्यांनी, मित्र-सहकाऱ्यांनी तनयला फोन,
मोबाईल कॉल करून मतदान करायला हवे. शिवाय राज्यातील, राज्याबाहेरील व इतर देशातील
परिचितांना विनंती करून तनयसाठी मतदान मागायला हवे. तरच तनय जिंकेल .... आणि
आपल्याला तनय जिंकायला हवाच ... !!!
No comments:
Post a Comment