कोपर्डी येथील घटनेचा
निषेध करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाचे एकत्रिकरण होवून मूकमोर्चाच्या
रुपात निषेधाचे हत्यार उपसण्यात आले आहे. औरंगाबाद येथे पहिल्यांदा शिस्तबध्द
मूकमोर्चा निघाला. त्याचे वैशिष्ट्य होते की, तो मोर्चा प्रस्थापित पुढारी
किंवा संघटनांच्या शिलेदारांनी आयोजित केलेला नव्हता. समाजातील काही संवेदनशिल
युवकांनी एकत्र येवून मूकमोर्चाचा नवा पॅटर्न तयार केला. सर्वांत पुढे लेकीबाळी, माता
भगिनी, त्या पाठोपाठ युवक, नंतर समाजातील प्रतिष्ठित बुजूर्ग
आणि शेवटी प्रस्थापित पुढारी, संघटना आदींचे नेते. असा हा लाखोंचा मोर्चा जेव्हा
शांतपणे निघाला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या.
Saturday 27 August 2016
तनय अंतिम फेरीत जायलाच हवा !!!
![]() |
तनय मल्हारा |
जळगावचा तनय आनंद मल्हारा (वय
१४ वर्षे, ९ वी, सेंट तेरेसा कॉन्व्हेंट) हा स्टार चॅनलवरून प्रसारित होत असलेल्या
“डान्स प्लस २” या लाईव्ह परफॉर्मन्स स्पर्धेत शेवटच्या ८
स्पर्धकात पोहचला आहे. दि. २८, रविवार रोजी त्याचे महत्त्वाच्या फेरीतील नृत्य
आहे. अंतिम चौघात जाण्यासाठी त्याला दर्शकांचा कौल महत्त्वाचा ठरणार आहे. रविवारी
रात्री ८ ते १० च्या दरम्यान प्रेक्षक, दर्शकांना मतदान करता येणार आहे. तनयचा “टोल फ्री”
नंबर १८००८३३३३५१ असा आहे. त्या दोन तासातच त्यावर फोन अथवा मोबाईलद्वारे मीस कॉल
करुन मतदान करता येईल. एका फोन व मोबाईलवरून एकच कॉल करीत एकच मत नोंदविता येईल.
यासाठी जळगाव शहर, जिल्हा आणि महाराष्ट्रातील दर्शक, प्रेक्षक व रसिकांनी तनयसाठी
कॉल करुन मतदान करणे आवश्यक आहे. हरहुन्नरी, मेहनती, चपळ, लवचिक तनयचा या निमित्त
थोडक्यात परिचय
Friday 26 August 2016
दृश्य कलेचे शिवधनुष्य – अभिवाचन
जळगावात आज (दि. २७)
परिवर्तन अभिवाचन महोत्सव सुरू होतो आहे. अलिकडच्या काळात अभिवाचन या दृश्य कलेचा
बऱ्यापैकी प्रचार-प्रसार होतो आहे. प्रसंग, संवाद, अभिनय, नेपथ्य आदींची रंगमंचीय
अनुभुती देत मंचिय नाट्य व संवादीक अभिनयाचा सुवर्णमध्य साधणारी दृश्य कला म्हणजेच
अभिवाचन होय. कलावंतांसाठी अभिवाचन हे शिवधनुष्य उचलण्याचे आव्हान आहे.
Thursday 25 August 2016
आमदार राजूमामा, “देर आए दुरुस्त आए ...”
नागरी सुविधांच्या बाबतीत
एखाद्या खेड्यापेक्षा वाईट अवस्थेत जळगाव महानगर आहे. शहरातील कोणत्याही
रस्त्यातील खड्ड्यांमधून ठेचाळत वाहन नेणारा चालक हा मनपा पदाधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणाचा उध्दार करतो. सार्वजनिक ठिकाणी
असलेले घाणीचे व दुर्गंधीचे आगार पाहून नगरसेवक आणि मनपा प्रशासनाला सामान्य माणूस
शिव्या घालतो. असे म्हणतात की, जिवंतपणी वाईट कार्य करणाऱ्याला मृत्यूनंतर नरकवास मिळतो. तेथे
अनेक प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात. तसे खरेच असेल तर, “जळगावमधील आजचे जिणे हे नरकापेक्षा कमी आहे का ??” असा प्रश्न पडतो.
Friday 19 August 2016
मीडिया ट्रायलचे महागुरू आचार्य अत्रे
आचार्य अत्रे |
वृत्तपत्रे आणि राजकारण यांचे नाते नेहमी आवळे-जावळे असते. ते कधी एकमेकांवर रुसणारे तर कधी कवटाळणारे असते. वृत्तपत्रे राजकारण वाढवते तसे संपवते. वृत्तपत्राने महाराष्ट्रातील मुख्यमंत्र्यांचे राजकारण संपविल्याचा जुना इतिहास आहे. तेव्हा मीडिया ट्रायल हा शब्द नव्हता पण वृत्तांकन मीडिया ट्रायलचेच होते.
Tuesday 16 August 2016
संवाद सेतू “शाकम कनेक्ट २०१६”
![]() |
बाळासाहेब डुबे, मी, मुकुंद ठिगळे, शेख मुख्तार |
बहुप्रतिक्षीत शाकम कनेक्ट
२०१६ हा “संवाद सोहळा” दि. १४ ऑगस्टला नेहमीच्या जल्लोषात साजरा झाला.
यावर्षीही मी हजेरी लावली. यावेळच्या कार्यक्रमाचे नियोजन उत्तमपणे करण्यात आले
होते. “थीमबेस” दोन कार्यक्रम झाले. आता हळूहळू शाकम कनेक्टला निश्चित अशी दिशा
मिळू लागली आहे. हा चांगला बदल आहे. आयोजकांपैकी बाळू देशपांडे, नरेश लहाने,
खत्री, चौरसीया, प्रणिता आदींना धन्यवाद. काहींची नावे घेतलेली नाही. पण,
इतरांनीही खुप मेहनत घेतली.
Friday 12 August 2016
अनिलभाई कांकरीया म्हणजे बुस्टरभाई ...
कांकरीया परिवार आणि
नवजीवनचे नाते पिढीजात आहे. आतापर्यंतच्या ५२ वर्षांच्या प्रवासातील काही आठवणी मोकळेपणाने
अनिलभाई झेप या ब्लॉगवरून सांगत आहेत. नवजीवनच्या
गौरवशाली प्रवासाविषयी अनेक बाबी अनेकांना माहित आहेत किंवा पुढेही होतील.
पण, अनिलभाई कांकरीया हे उत्तम कौन्सिलर आहेत हे अनेकांना बहुधा माहित नसावे. मी
त्याचा अनुभव गेल्या २० – २२ वर्षांत अनेकदा घेतला आहे. म्हणून मी अनिलभाईंना
बुस्टरभाई म्हणतो.
Monday 8 August 2016
जगायचंय मुक्तपणे ... !!!
मागील महिन्याचा प्रसंग. ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्याचे लक्षात आले. मित्राने पकडून आरटीओ अॉफिसला नेले. लायसन्स रिन्युअल केले. ते अवघ्या १३ महिन्यांच्या मुदतीचे होते. तेथील अधिकाऱ्यांना विचारले, "रिन्युअल ५ वर्षांसाठी होते ना ?" ते म्हणाले, "वयाची पन्नाशी पूर्ण होत असेल तर तेवढ्याच काळासाठी मिळते. त्यानंतर तुम्ही फिजिकली फिटचा दाखला दिल्यानंतर ५ वर्षांसाठी मिळेल. पुढच्या महिन्यात तुम्ही पन्नाशीच्या उंबरठ्यावर आहात." त्यांचे ते वाक्य ऐकून मी आनंदून गेलो. आयुष्याचे "अर्धशतक" गाठतोय म्हटल्यावर माझा स्वतःविषयीचा दृष्टीकोन तेथेच बदलला.
Saturday 6 August 2016
जीवन जगण्याचा संस्कार “गोचरी दया”
![]() |
संग्रहित छायाचित्र - लेखातील नावांशी संबंध नाही (गोचरी घेताना साध्वी) |
परंतु, जैन धर्मियात साधू, संत, साध्वी
आदींच्या रोजच्या उदरनिर्वाहाची रचनाच
रोजच्या शिधा मागणीवर केली आहे. त्याला “गोचरी दया” म्हणतात. साधू-संत-साध्वी हे स्थानकात निवास करतात. त्या स्थानकाच्या
परिसरातील कुटुंबांच्या घरी रोजची गोचरी घेण्यासाठी त्यांना जावे लागते. समाजाची
घरे कमी असतील तर इतरांकडे जाता येते. मात्र, ते कुटुंब शुद्ध शाकाहारी असल्याची
खात्री हवी. दिवसभरातल्या दोन वेळच्या जेवणासाठी दोन्ही वेळा साधू-संत-साध्वींना
परिसरातील लोकांच्या घरी गोचरी मागायला जावे लागते. एका वेळच्या जेवणासाठी जेवढी पुरेशी
होईल तेवढीच गोचरी स्वीकारावी लागते. यातही नियम अत्यंत कडक आहेत. पाऊस,
कर्फ्यूसारखी स्थिती असेल तर गोचरी दयेसाठी जाता येत नाही. अशा प्रसंगी
साधू-संत-साध्वींना काही दिवसांचा उपवास घडतो. असेही नाही की समाजातील मंडळींनी
स्वतःहून शिधा आणून दिला आणि ते साधू-संत-साध्वीनां स्वीकारला.
Subscribe to:
Posts (Atom)