Thursday, 28 July 2016

फॅन्सी नंबरप्लेट विरोधात लोकाभियान !

जळगाव शहरातील वाहनांच्या फॅन्सी नंबरप्लेट विरोधात पोलिसांनी अभियान सुरू करावे अशी सूचना माध्यमांच्या प्रतिनिधींनी थेट एसपी डॉ. जालिंदर सुपेकर यांना केली आहे. त्यानुसार एक – दोन दिवसांत फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांचे चालक अथवा मालक एखाद्या चौकात वाहतूक पोलिसांशी हुज्जत घालताना दिसतील. असे प्रकार टाळायचे असतील तर संबंधितांनी वेळीच आपापल्या वाहनांच्या नंबर प्लेट या नियमानुसार तयार करुन घेणे उचित ठरणार आहे.

Tuesday, 26 July 2016

मैत्री ... दोस्ती ... यारी !!!

डाविकडून नंदु जोगळेकर, मी, डॉ. चंद्रकांत वाघमारे, नितीन देशमुख
विदर्भातील वऱ्हाड प्रांताचा आणि माझा संबंध तीन वर्षांचा. सन २००३ ते २००६ दरम्यान मी अकोला येथे दैनिक सकाळच्या विभागीय कार्यालयात मुख्य उपसंपादक म्हणून काम केले. अकोलासह बुलडाणा व वाशीम ही विभागीय कार्यालये सुद्धा माझ्या कार्यक्षेत्रात होती. अकोल्यात सुहास कुळकर्णी, रत्नाकर जोशी, नंदु जोगळेकर, विशाल राजे, मनिष जोशी, विनोद इंगोले, गिरीश देशमुख, जीवन सोनटक्के, संजय सोनार, गजानन लोणकर, मनोज वाकोडे आदी माझे सहकारी होते. बुलडाण्यात अरुण जैन व वाशीममध्ये नंदकुमार शिंदे हे सहकारी होते. अकोला सोडून मी जळगाव येथे दैनिक सकाळसाठी सहयोगी संपादक म्हणून आलो. अकोल्यातील मित्र परिवार दुरावला. 

Monday, 25 July 2016

मोझरी ते सेवाग्राम व्हाया दीक्षाभूमि

विदर्भाची भूमि ही संतांची आणि राष्ट्रपुरुषांची आहे. महात्मा गांधी हे साबरमती आश्रम सोडून वर्धाजवळ सेवाग्राम येथे काही काळ विसावले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नागपुरात बौद्ध धर्मांची दीक्षा घेतली. त्यामुळे नागपुरला  दीक्षाभूमि चे पावित्र्य मिळाले. सामाजिक प्रश्नांवर सोप्या भाषेत गाणी, ओव्या गावून किंवा किर्तन करून भाष्य करणाऱ्या तथा खंजिरीवादक राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या गुरूकुंजमुळे मोझरीला देशभरात ओळख मिळाली. या तिनही व्यक्ती आणि स्थान महात्म्यचा माझ्यावर प्रभाव आहे. यापूर्वी मोझरी, दीक्षाभूमि व सेवाग्रामला मी दोनवेळा भेट दिली आहे. तेथे घालवलेला एक-एक क्षण मला नेहमी आठवतो आणि काही तरी वेगळे करण्याची प्रेरणा देतो.  

Monday, 18 July 2016

... तरीही जळगाव आमच्या आवडीचे !!!

दीप प्रज्ज्वलन करताना मान्यवर वक्ते
जळगाव शहरात विचारांची सकारात्मकता सुरू करणारा एक चांगला कार्यक्रम दि. १७ जुलैला झाला. माय सीटी ... माय ड्रिम या उपक्रमांतर्गत जळगावच्या विकासात गुरुंची आवश्यकता या विषयावर शहरातील ८ मान्यवर आणि मान्यवर अध्यक्ष अशा ९ जणांनी विचार मांडले. तब्बल सव्वा तीन तास चालेल्या या कार्यक्रमास श्रोता म्हणून किमान ५०० वर नागरीक उपस्थित होते. कार्यक्रम लांबला असे मुद्दाम म्हणणार नाही. कारण, ८ विषयांवर ८ वक्ते किमान १५ मिनिटे बोलले तरी दोन तास वेळ लागणार हे नक्की होते. या सोबत इतर बाबींसाठीही वेळ द्यावा लागतो. म्हणजेच ३ तास आपल्याला कांताई सभागृहात बसावे लागेल हा हेतू निश्चित करून बहुतांश श्रोते आले होते. लक्षवेधी बाब म्हणजे, युवकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.  

Saturday, 16 July 2016

समांतर रस्तेही लोकसहभागातून शक्य

जळगाव शहरातून जाणारा महामार्ग एएच ४६ हा नेहमी होणाऱ्या अपघातांमुळे पादचारी तथा वाहनचालकांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. जळगाव शहर व लगतच्या परिसरात वर्षभरात साधारणपणे ३५० ते ४०० अपघात होतात. त्यात १३० ते १५० लोकांचा बळी जातो. लागोपाठ अपघातांची मालिका घडली की, वृत्तपत्रांमध्ये दोन-तीन दिवस वृत्तमालिका सुरू असते. नंतर पुन्हा विषय थंडावतो पुढच्या अपघातापर्यंत. 


Wednesday, 13 July 2016

भाजपच्या गोटात काय चालले आहे ?


मंत्री गिरीश महाजन आणि भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ
व्हाट्स ऍपच्या विविध गृपमध्ये आज दुपारी चोपडा येथील पीआय किसन नजनपाटील यांच्या बदलीचे वृत्त फिरत होते. अवघ्या दोन महिन्यांत किसन नजनपाटील यांची बदली होत असल्याचे सांगण्यात येते. थेट बदलीऐवजी सक्तीच्या रजेवर पाठविणार असे सांगण्यात येत आहे. या विषयावर एसपी डॉ. जालींदर सुपेकर यांच्याशी संपर्क केला. मात्र, त्यांनी चुप्पी साधली. कोणताही खुलासा केला नाही. दरम्यान, चोपडा येथील भाजपच्या समर्थकांचा पीआय किसन नजनपाटील यांच्या कार्यपद्धतीवर आक्षेप असून पोलीस ठाण्यात आणि परिसरात अवैध धंदे चालतात असे त्यांचे म्हणणे आहे. पीआय किसन नजनपाटील यांच्या बदलीचे प्रकरण भाजपसाठी त्रासाचेच दिसत आहे. पक्षातर्फे कोणतही बाजू सध्यातरी समोर आलेली नाही. 

Tuesday, 12 July 2016

राजकिय नेत्यांच्या वादग्रस्त फोटोंचे पुराण !

गुलाबराव पाटील - सुरेशदादा जैन भेट
(कृपया मजकूर कॉपी पेस्ट करू नये. इतरांना ब्लॉगची लिंक पाठवावी.)

मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील हे पहिल्यांदा जळगावात येवून गेले. त्यानंतर दोन दिवसांनी राज्यमंत्री पाटील आणि घरकूल घोटाळ्याच्या आरोपांतर्गत कारागृहात असलेले सुरेशदादा जैन यांच्या भेटीचे एक छायाचित्र सोशल मीडियात व्हायरल झाले. या छायाचित्राने अनेक प्रश्न निर्माण केले. पाटील हे मंत्री झाल्यानंतरची ही भेट आहे का ? कुठे भेट झाली ? न्यायालयात की कारागृहाच्या बाहेर ? राज्यमंत्र्याने आरोपावरून कारागृहात असलेल्या व्यक्तिस भेटणे योग्य की अयोग्य ? असे विषय यातून निर्माण झाले.  

Saturday, 9 July 2016

आग बुझानेवाले यहाँ बहुत है ...!!!

सर्व धर्मिय प्रतिनिधींच्या उपस्थितीत ईद मिलन सोहळा

जळगावचा नवा सामाजिक पॅटर्न

जळगाव शहरात रमजानचे रोजे सुरू असताना व्हाट्स ऍपच्या माध्यमातून महंमद पैगंबर यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल झाल्यामुळे सामाजिक तणाव निर्माण होण्याचा प्रकार घडला. पोलिसांनी वेळीच कावाई करून संबंधित आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करीत परप्रांतातील संशयित आरोपींना अटक करून जळगावात आणले. वातावरण तंग असताना मुस्लिम समाजातील काही मंडळींनी युवकांचे माथे भडकावल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेणे आणि नंतर गोलाणी संकुलात हिंसाचाराचा व दहशतीचा प्रकार घडला.

Friday, 8 July 2016

“मंत्री गुलाबभू” जरा जपूनच !!

मंत्री गुलाबराव पाटील यांना शुभेच्छा देताना मुख्यमंत्री फडणवीस
(मजकूर कॉपी पेस्ट करू नका ... वाटले तर लिंक फॉर्वर्ड करा ... लेखातील संदर्भ वापरले तर तसे लिहा...)


 निवडणुकीत तीन विजय आणि एक पराभव पचून आजही लढवय्या नेते अशी प्रतिमा असलेल्या शिवसेनेच्या गुलाबराव पाटील यांना अखेर राज्याच्या युतीच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपद मिळाले आहे. ज्या परिस्थितीत गुलाबभू मंत्री झाले ती फारशी अनुकूल नाही. परिस्थिती कशी प्रतिकूल आहे हे शांतपणे समजून घेतले तरच राज्यमंत्रीपदाचा जिल्हा, मतदारसंघ व कार्यकर्त्यांसाठी उपयोग करून घेता येईल. परिस्थिती समजून घेणे जेवढे गुलाबभू यांना गरजेचे आहे तेवढेच ते त्यांच्या भोवतीच्या कार्यकर्त्यांसाठीही आवश्यक आहे. 

Saturday, 2 July 2016

जळगाव मनपात विकासपर्व सुरू व्हावे !

कोणत्याही स्थानिक स्वराज्य संस्थेत लोकनियुक्त प्रतिनिधी आणि सरकार नियुक्त अधिकारी यांच्यात समन्वय असावा लागतो. याशिवाय, मंत्रालय आणि जिल्हा प्रशासनाचेही संबंधितांवर अप्रत्यक्ष नियंत्रण असते. या चारही संबंधात दुरावा निर्माण झाला की नागरी विकास योजनांचा बट्याबोळ होतो. सुमारे पाच लाख जळगावकर गेले काही वर्षे हेच अनुभवत आहेत. आता १६ दिवसांच्या अंतराने नव्याने नियुक्त दुसऱ्या आयुक्तांनी सकारात्मक पाऊले उचलत लोकप्रतिनिधींसोबत काम करण्याची भूमिका घ्यायला हवी. जिल्हाधिकाऱ्यांनीही महानगर पालिकेला निधी मिळवून देण्याचा निर्धार केला आहे. सरकारकडून काही अडचणी येणार नाहीत, असे दिसते. जळगाव मनपात विकासपर्व सुरू होण्यास प्रारंभ झाला असे आज तरी दिसत आहे,