("घाशीराम कोतवाल" च्या पध्दतीचा फार्स. जिवंत वा मृत अशा कोणत्याही व्यक्तिंशी संबंध नाही. तसे वाटले तर योगायोग समजावा.)
(रिकाम्या दरबाराच्या सिंहासनावर महाराज पेंगुळलेले आहेत. तोंड उघडे करुन घोरताही आहेत. मुकूट एका बाजूला घसरला आहे. मोबाईल, लॕपटॉप बाजूला आहे. कानात हेडफोन तसाच आहे. अधुन मधून एक दोन चिलटांचा त्रास असल्याने महाराज नाकासमोर हात झटकून चिलटांना हाकलून लावत आहेत. तेवढ्यात प्रधानजी धापा टाकात महाराजांच्या जवळ येतात. एका हाता औषधाच्या गोळ्या आणि दुसऱ्या हातात पाण्याची बाटली.)
प्रधानजी - (महाराजांना गदागदा हलवत) राजे ... अहो राजे उठा ... भर दुपारी काय डुलकी मारता आहात ? चला उठा बीपी, शुगरच्या गोळ्या घ्यायची वेळ झाली ...
(महाराज चुळबूळ करून करवट बदलतात. तेव्हाच प्रधानजींचा मोबाईल वाजतो. प्रधानजी कॉल आलेल्याचे नाव वाचतात...)
प्रधानजी - (आयला काकूचा कॉल ... झटकन स्वीप करुन घेतो) नमस्कार काकू ... मी राजेंच्या जवळ आहे. त्यांना गोळ्या द्यायला उठवतोच आहे.
काकू - (पलिकडून) - उठवतो आहे ?? ... म्हणजे पडले की काय ? काय झाले ?
प्रधानजी -(जिभ चावत) - अं .. अं तसे नाही काकू ... राजे सिंहासनावर झोपले आहेत ... त्यांना उठवून दुपारच्या गोळ्या देतोय ... बोला काकू आपले काय काम आहे ...
(पलिकडून काकू बोलतात. प्रधानजी उत्तरे देतात ...हो काकू ... मोबाईल बंद असेल ... पाहतो काकू ... करतो काकू बोलतो काकू ... मागवून घेतो काकू ... हो तीन सांगितले होते ... आता चार सांगू का ?? ... हो हो होईल ... नाही राणी महालातच पाठवतो ... संभाषण आटोपत घेत ...)
प्रधानजी - हो हो काकू उठवतो ... गोळ्या देतो ... राजे आता दरबारातच आहे ... उठवल्यानंतर महिला सशक्तीकरणावर चर्चा आहे ... हो रिकाम्या जागा भरायचे आज ठरवतो ... हो हो (करीत कॉल बंद करतो, बंद झाल्याची खात्री करतो.)
प्रधानजी - (महाराजांना गदागदा हलवत) अहो राजे उठा ...उठा भर दुपारी काय झोपता ... राज्य अशांत आहे आणि तुम्ही झोपा काढता ... (अखेर पोटाला चिमटी काढतो)
महाराज - (ओरडतात) - ओ प्रधानजी कशाला चिमटा काढता ? झोपू देत नाही. (डोळे चोळत उठून बसत) काय झाले कशाला झोप मोडली. (मुकूट सरळ करतात. मोबाईल पाहतात. काकूचे १५ मीस कॉल पाहून परेशान होतात. स्वतःला सावरतात)
प्रधानजी - (चार एक गोळ्या देत) ... राजे दुपारचा डोस घ्या ... उशीर झालाय ... काकूचे मीस कॉल आहेत तुमच्या मोबाईलवर ...
महाराज - (गोळ्या घेत गटागटा पाणी पितात. गालावरून ओघळलेले पाणी डाव्या हाताच्या बाहीने पुसत...) प्रधानजी आमचे उत्तर आयुष्य या गोळ्यांच्या सोबतच आहे. एक तर तुमच्या काकूबाई नाहीतर तुम्ही गोळ्या घेवून उभेच ... (भरपूर पाणी पिल्याने महाराजांना ढेकर येतो ... ओय ओय ... करीत निवांत ढेकर देत म्हणतात) बोला आजचे कामकाज काय आहे ?
(महाराज सावरल्याचे पाहून प्रधानजी बेरकीपणाने त्यांच्या कानाजवळ जात म्हणतात... काकूसाहेबांचा निरोप आहे. कानात सांगतो ... महाराज नाव ऐकून अधिक सावध होतात ... प्रधानजी कानाला लागतात ... महाराज नुसतीच मान हलवतात ... दोन एक वेळा मोबाईल पाहून मीस कॉल चेक करतात ... अखेर प्रधानजी आवरते घेतात. कानापासून बाजूला होत म्हणतात ... मी काकूसाहेबांना हो बोललोय ... ते करावेच लागेल)
महाराज (डोक्यावरचा मुकूट खाली ठेवत) - म्हणजे काय करावे म्हणता प्रधानजी तुम्ही ?? मला नीट समजून सांगा !!
प्रधानजी - (घसा खाकरून विश्वासात घेतल्याच्या आवाजात बोलतो) महाराज काकूसाहेब म्हणतात आपल्या राज्यात महिला सशक्तीकरण इतर राज्यांपेक्षा जास्त झाले आहे. त्यामुळे आपण आपल्या दरबारात आंतराष्ट्रीय महिला मेळावा घ्यावा ...
महाराज - (संभ्रमाच्या आवाजात) - प्रधानजी तुमचे आणि तुमच्या काकूसाहेबांचे बोलणे नेहमी कोड्यात घालणारे. मला नीट सांगा. मी जे बोलतो ते करतो. जे बोलत नाही ते पण करतो. आणि जे जे न सांगता करतो ते नंतर पेपरवाल्यांना सांगतोच ... तर मला समजेल अस बोला !! (आवाज थोडा वाढलेला असतो)
प्रधानजी - (थोडे पुढे झुकून) महाराज, काकूसाहेब म्हणतात, त्या आता राज्य संघाच्या चेअरवुमेन झाल्या. त्यामुळे महिला मेळावा झाला पाहिजे. जसा आपण खान्देशी साहित्यिक मेळावा घेतला, आता नाटकवाल्यांचाही प्रोग्राम करतोय तसा महिलांचा समारंभ घ्यायचा ...
महाराज - (सर्व समजल्याच्या अविर्भावात) अरे प्रधानजी मग थेट सांगा की आपण सशक्त केलेल्या महिलांचा मेळावा घ्यायचा ...
प्रधानजी - (गोंधळून) - हो ... हो ... अं ... तसे नाही ... बहुधा तसेच ...
महाराज - (कपाळाजवळ बोटाने वर्तुळ फिरवत) प्रधानजी किती गोंधळ करता तुम्ही ... अहो या राज्यातून आम्ही पुरुषांना हद्दपार करणार आहोत. हद्दपारीचा इतिहासच लिहायचा आहे. काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने कधी महिलांचा एवढा सन्मान केला का ?? बघा कलेक्टर महिला, जि. प. अध्यक्ष महिला, खासदार महिला, विधान परिषदेवर महिला, बँकेत महिला, दूध संघात महिला, राज्य दूध संघात महिला, पक्षाच्या प्रदेश कार्यकारिणीत एकमेव महिला, बेटी बचाव अभियानात महिला ... अहो ही तर काल परवा पक्षात आली ...पण फोटोत बघा ती नेहमी पुढेच असते ....
प्रधानजी - (यादी वाढवत) जामनगरला गावप्रमुख महिला, गुरूकुलच्या सिनेटवर महिला ....
महाराज - (कपाळवर खाजवत) ... हो हो आहेत त्यापण महिलाच आहेत ... पण जनता म्हणते ती घराणेशाही आहे ... आपण तसे केले नाही ... जनतेने निवडले आणि संचालकांनी स्वीकारले ... काय प्रधानजी बरोबर ना !
प्रधानजी - (कसनुस हासत) - हो हो महाराज तुम्ही म्हणता तेच खरे ... पण ... या महिला राजमध्ये आपले बरेच कार्यकर्ते हद्दपार होताहेत महाराज ...
महाराज - (उपरोधाने हसत) प्रधानजी काय घेवून बसलात कार्यकर्ते ?? आता कोण कार्यकर्ता शिल्लक आहे ? जिल्हा प्रमुख तोच, शहर कारभारी तोच ... उरले सुरले तालुका समित्यात घेतले ... आता राहिले कोण ???
प्रधानजी - (मुंडी हलवत) नाही महाराज कोणीच राहिले नाही ... पण एक महिला बळकट व्हायची राहिली आहे .... ??
महाराज - (दचकून) कोण राहीली ... कोण राहिली ... थांबा ... दोन चार महिन्यांत एमएलसी लागेल ... तेव्हा करु राहिलेल्या महिलेस बळकट ...
प्रधानजी - (आदबीने, नरम आवाजात) ... नाही महाराज तसे नाही ... मी आमच्या घरातील महिलेचे बळकटीकरण सांगतोय ...
महाराज - (दिलखुलास हसत) - अरेव्वा प्रधानजी आता तुम्हीही दरबारसोडून घरात लक्ष घालायला लागले तर ... महिलांना सशक्त करा ... बळकट करा असे आपण भाषणात म्हणतो ... पण घराकडे लक्ष देत नाही ... समाजात अच्छेदिन हवे असतील तर आपल्या घरापासून प्रारंभ हवा ... सांगा कुठे बळकट करायची तुमची महिला ....(शब्दांत गोंधळून) ...अं ... कोणत्या पदावर डोळा आहे तुमचा ... सांगा तेथे बसवू ...
प्रधानजी - तालुका, जिल्हा अशी कोणतीही समिती चालेल महाराज ... पण बसवा तिला एकदाचे ती काकूंशी तुलना करते आजकाल ...
महाराज - (चपळतेने विषय बदलत) ... ठिक आहे बघू नंतर ... राज्याची इतर खबर बात काय ?
प्रधानजी - (खिशातून कागदांचे भेंडोळे काढत) - काही नाही महाराज राज्य सुरळीत चालू आहे ... वाळू वाहतूक सुरु आहे ... केबलची निविदा निघाली ... शांतता पुरस्कार दिले ... भुसावळचे लागोपाठ खून वगळता, दोन पाच भांडणे वगळता ... राज्यात शांतता आहे ...
महाराज - (नाराजीने) ... प्रधानजी शिळ्या बातम्या नका सांगू ... त्या ग्रामपालिकेचे काय चालू आहे ... तेथे आपली सत्ता नाही ... आम्ही राज्याचे राजे आणि ग्रामपालिकेत दुसरेच राजे ... प्रधानजी हे आम्ही सहन करू शकत नाही ... त्यांची काय खबर बात ??
प्रधानजी - (खर्जाच्या आवाजात) ... महाराज ग्रामपालिकेलाला सरकारी खजाना मिळणार नाही अशी तजविज केली आहे ... २५ कोटी काठीच्या टोकावर बांधून ती आडवी मामांजीच्या खांद्यावर ठेवली आहे. रक्कम घ्यायला मामांजी जसे पुढे जातात तसेच काठीबरोबर २५ कोटी पुढे जातात ....(हे ऐकून महाराजांची कळी खुलते. सावरून बसत ... उत्साहाने विचारतात .... पुढे काय .. पुढे काय ???)
प्रधानजी - (टिंगलच्या आवाजात) - महाराज ग्रामपालिकेला मिळालेले ९ कोटी पण कापून घेतले. ठेंगा दाखवलाय ... पण एक अडचण झाली आहे ... डीआरटी लवादाने ग्रामपालिकेला दिलासा दिलाय ....
महाराज - (अधीरतेने) ... म्हणजे काय ??
प्रधानजी - (गंभीर होत) ... डीआरटी कोर्टाच्या न्यायाधिशाने जाताजात जप्ती रद्द केली महाराज आपले गणित चुकले ... मार्केट लिलावाचे गणित जमणार नाही ... बहुधा वन टाईम सेटलमेंट होवून जाईल ... मला चिंता आहे ...
महाराज - (हसत) ... प्रधानजी तुम्ही अगदीच हे आहात ... कशाला चिंता करता ... त्या चावडीच्या कोतवालाला सांगा ... ३/४ प्रकरणे आहेत ... त्यातील गोल मार्केटवर चौकशी लावा म्हणावे ... मग पाहा ग्रामपालिकेच्या तंबुत घबराट होईल ...(तेवढ्यात महाराजांचा मोबाईल वाजतो ... काकू कॉलिंग पाहून महाराज प्रधानजींना इशारा करतात .... दूर जा .... प्रधानजी समजून घेत माघारी वळतात ... महाराजांचा फक्त ... हो ... हो असा आवाज येतो)
* छायाचित्र सांकेतिक ... मजकुराशी संबंध नाही

No comments:
Post a Comment