Thursday 28 April 2016

संत मुक्ताई सहकारी सुतगिरणीतहाय क्वालिटी धाग्याचे उत्पादन

राज्यात दुष्काळीस्थितीमुळे बहुतांश सुतगिरण्या बंद आहेत. बाजारात कापूस नसल्यामुळे खान्देशातील मोठ्या संख्येतील जिनिंग प्रेसिंग उद्योग अडचणीत आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील आदिशक्ती संत मुक्ताई सहकारी सुतगिरणीने अशाही वातावरणात अवघ्या साडेतीन महिन्यात उच्च प्रतिचा ३४ काऊंट धागा निर्मिती करुन गुणवत्तेचा उच्चांक गाठला आहे. याशिवाय जळगाव जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातून कापूस गाठी मागवून तीन शिफ्टमध्ये सुतगिरणी सुरू आहे. ही माहिती सुतगिरणीच्या अध्यक्षा तथा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या चेअरमन सौ. रोहिणी खडसे – खेवलकर यांनी महान्यूजला दिली.

Sunday 24 April 2016

जळगाव मनपात मोठी भरती ...तातडीने हवेत ज्योतिष, तांत्रिक

जळगाव महानगर पालिकेवर सध्या असलेल्या विविध गंडांतरामुळे सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासन यांच्यासह जनताही परेशान आहे. मनपाला आर्थिक आणि प्रशासकीय अशा प्रत्येक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी योग्य निर्णय व त्यानुसार कृतीची गरज आहे. तशी पाऊले महापौर व आयुक्त टाकत आहेत. पण मध्यंतरी एक बातमी प्रसिध्द झाली आहे की, मनपा कशामुळे अडचणीत आहे याचा शोध घेण्यासाठी काही पदाधिकाऱ्यांनी ज्योतिष्याचा सल्ला घेतला. त्यानंतर चर्चा सुरू झाली की, मनपाच्या वास्तूत दोष आहे आणि मनपाचा लोगो बदलायला हवा. अर्थात, यावर पदाधिकारी किंवा प्रशासनाचे अधिकृत कोणतेही भाष्य नाही. मात्र, लोगो बदलून आणि वास्तू दोष काढून कोणतीही स्थिती बदलली असती तर जगात सारे काही आनंदी राहीले असते.

Friday 22 April 2016

जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळांची डिजिटल भरारी

जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने संपूर्ण राज्यभरात प्राथमिक शाळांचे डिजिटलीकरण, संगणकीकरण, मोबाइल डिजिटलीकरण आणि "आयएसओ" करण अशा विविध उपक्रमात भरारी घेतली आहे. जळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाची ही कार्यशैली सध्या राज्यभरात "जळगाव पॅटर्न" म्हणून नावलौकिक मिळवून आहे. या पॅटर्नचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्राथमिक शिक्षणाशी संबंधित अनेक सोयी-सुविधा निर्माण करण्यासाठी स्थानिक शाळा व्यवस्थापन समित्यांनी लोकवर्गणीच्या माध्यमातून जवळपास एक कोटी रुपये निधी उभारला आहे.

Thursday 21 April 2016

"अपूर्णांक" चे २५ वे वर्तुळ पूर्ण !!!

हेमलकसा येथे डॉ. प्रकाश आमटेंसोबत अपूर्णांकची टीम
माझे प्रिय मित्र शंभुअण्णा पाटील आणि मैत्रिण सौ. मंजुषा भीडे आणि इतर तीन तसे नविन मात्र, कसलेला अभिनय करणारे युवा कलावंत राहूल निंबाळकर, मोना तडवी, प्रतिक्षा जंगम यांच्या "अपूर्णांक" या नाटकाचा २५ वा प्रयोग शनिवारी बालगंधर्व खुले नाट्यगृहात रंगणार आहे. परिवर्तन संस्थेतर्फे निर्मित या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन "पीपीआरएल" या गृहनिर्माण क्षेत्रातील संस्थेने केले आहे. जळगावच्या एखाद्या नाटकाचा सलग २५ वा प्रयोग म्हणजे यशाचे नवे वर्तुळच !

Wednesday 20 April 2016

”मेपल” च्या गृह घोटाळ्यामुळे सरकारसह दैनिकांची बेअब्रूच !!!

सवर्सामान्य कुटुंबाला पुण्यात अवघ्या पाच लाख रुपयांत 'वन रुन किचन' घर देण्याचे स्वप्न दाखविणाऱ्या भल्यामोठ्या दोन पानी जाहिराती गेल्या १४ व १५ एप्रिल २०१६ ला महाराष्ट्रातील आघाडीच्या काही दैनिकांमध्ये प्रसिद्ध झाल्या. या जाहिरातीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांचे फोटो प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय, पंतप्रधान जन आवास योजनेचा लोगो वापरला आहे. घराच्या बुकिंगचे आर्थिक व्यवहार करण्यासाठी एक मात्र बँक म्हणून 'बँक आफ महाराष्ट्र'* चा उल्लेख आहे. प्रकल्पास 'पीएमआरडीए' तर्फे मान्यताप्राप्त असा उल्लेख आहे. पाच लाखातील घरे कुठे देणार त्या जागा म्हणजे पुण्यालगतची गावे चाकण-तळेगाव, वाघोली अनेक्स, सणसवाडी, रांजणगाव, वाई, शिरवळ, शिक्रापूर, ऊरळी कांचन, कोंढवा-अनेक्स-बोपगाव, तळेगाव ढमढेरे आणि शिक्रापूर-कोंढापुरी आहेत. जाहिरातीत घरांच्या किंमतीची आकडेमोड प्रधानमंत्री आवास योजनांतर्गत आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या निकषात न बसणाऱ्यांसाठी अशा दोन प्रकारात आहे.

Saturday 16 April 2016

रेल्वेने पाणीपुरवठा "सेवा" की "इव्हेंट"

१९८६ मध्ये राजकोटसाठी पाणी नेणारे टॅन्कर सेवा म्हणून भरताना रेल्वेचे अधिकारी
लातूर शहरासाठी रेल्वे टॅन्करद्वारे पाणीपुरवठा सध्या होत आहे. राज्य सरकारचा हा निर्णय विरोधकांसाठी टीकेचा तर सत्ताधारी तथा आपदग्रस्तांसाठी आनंदाचा आहे. महाराष्ट्रात सर्वप्रथम "जलरेल्वे" धावल्याचा दावा केला जात आहे. हा दावा तसा एकतर्फी आहे. रेल्वेच्या व्यवस्थापनाला दरवर्षी उन्हाळ्यात इतर रेल्वे स्थानकांवर टॅन्करने पाणीपुरवठा करावा लागतो. भुसावळ येथून मनमाड, अकोला स्थानकांसाठी पाणी पाठवावे लागते. यासाठी हतनूर धरणात रेल्वेसाठी पाण्याचे खास आरक्षण असते. रेल्वेने पाणी वाहून नेणे हा विषय तसा नवा नाही.

Friday 15 April 2016

इंद्रमहाराज आणि हाजी अली एकत्र येणार !!!

स्त्री बलेच्या संकटावर नारदांची शिष्टाई

(दुपारची वेळ. ४६ डिग्री तापमान डबल एसीच्या गारवा घेत इंद्रमहाराज पेंगुळलेले आहेत. त्यांच्या घोरण्याचा आवाज द्वारपालाला येतोय. घड्याळाचा सेकंद काटा कासवगतीने टीक टीक करतोय. तेवढ्यात इंद्रमहाराजांच्या शयनकक्षाजवळ गलबाला ऐकू येतो. काळ्याशार पेहरावात शिंगणापूरचे शनिमहाराज, लाल भडक कुंकू लावलेली कोल्हापूरची लक्ष्मीबाई, अर्धपंचा घातलेले त्र्यंबकेश्वरचे महादेवभाई, लाल-पांढरे कपडे घातलेली शबरीमाला मावशी तावातावाने द्वारपालशी भांडाताहेत.)

Wednesday 13 April 2016

राजकीय तळीरामांची "बार मिटींग" !!!

(सध्या राजकीय पक्षांच्या प्रदेश कार्यकारिणी जाहीर करण्याचा हंगाम आहे. भाजपची प्रदेश कार्यकारिणी ३१ मार्चला जाहिर झाली. तीत प्रदेश चिटणीसपदी एकमेव महिला आमदार आहेत. १२ एप्रिलला काँग्रेसची प्रदेश कार्यकारिणी जाहिर झाली. तीत बंडखोरी करणारे माजी खासदार, पराभूत आमदार, अमळनेरच्या महिला नेत्या आणि धरणगावचे जुने पदाधिकारी आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यकारिणी वर्षभरापूर्वीची आहे. त्यात जळगाव जिल्ह्याचे कोणीही नाही. शिवसेनेत पूर्वी उपनेते असलेल्यांना आता तो दर्जा असल्याची माहिती नाही. प्रदेश कार्यकारिणींचा हा विषय सर्वच राजकीय पक्षाच्या दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये चर्चेत आहे. सत्तेचीपदे कुटुंबात वाटली जात असताना पक्षसंघटनेतही स्थान नसलेली मंडळी रात्री स्टेशन रोड जवळच्या प्लाझामध्ये आपले दुःख ग्लासात बुडवताना गप्पा मारत होती. त्याची अन सेन्सर्ड अॉडीओ कैसेट हाती आली. १००% टक्के वास्तव असलेला संवाद नावे बदलून दिला आहे.)

Monday 11 April 2016

अजातशत्रू ... नितीनभाऊ लढ्ढा !!!

जळगाव शहराचे महापौर नितीनभाऊ लढ्ढा यांचा आज (१२ एप्रिल) वाढदिवस. वयाची ५३ वर्षे पूर्ण करून भाऊ ५४ व्या वर्षात पदार्पण करीत आहेत. नितीनभाऊ राजकारणी नंतर असून सहृदयी माणूस प्रथम आहेत. "खाविआ" च्या "मुरलेल्या लोणच्यातील" ही "कैरीफोड" अजूनही "मसाला लागलेली" नाही. आजही नितीनभाऊ सामान्य मित्राप्रमाणेच इतरांशी वागत असतात, बोलत असतात.

Sunday 10 April 2016

जळगावच्या गवळणी मुक्ताईच्या बाजाराला..!!

खडी गंमत किंवा तमाशातील "गवळण" सादर करणारे कलावंत (संग्रहीत छायाचित्र)
(सकाळचे नऊ वाजलेत. जळगावच्या काही गवळणी लगबगीने मुक्ताईच्या बाजाराला निघालेल्या. थोराड मावशी सर्वांत पुढे चालत गुणगुणते आहे, "मुगडी माझी सांडली गं ... जाता मुक्ताईला गं ... जाता मुक्ताईला." मागे चालणाऱ्या आठ, दहा गवळणींमध्ये दोन, तीन तरुणी आपापसात गुलूगुलू बोलून फिदीफिदी हसताहेत.)

Friday 8 April 2016

राजे हो, १०० टक्के महिला बळकटीकरण झाले ... !!!

("घाशीराम कोतवाल" च्या पध्दतीचा फार्स. जिवंत वा मृत अशा कोणत्याही व्यक्तिंशी संबंध नाही. तसे वाटले तर योगायोग समजावा.)

(रिकाम्या दरबाराच्या सिंहासनावर महाराज पेंगुळलेले आहेत. तोंड उघडे करुन घोरताही आहेत. मुकूट एका बाजूला घसरला आहे. मोबाईल, लॕपटॉप बाजूला आहे. कानात हेडफोन तसाच आहे. अधुन मधून एक दोन चिलटांचा त्रास असल्याने महाराज नाकासमोर हात झटकून चिलटांना हाकलून लावत आहेत. तेवढ्यात प्रधानजी धापा टाकात महाराजांच्या जवळ येतात. एका हाता औषधाच्या गोळ्या आणि दुसऱ्या हातात पाण्याची बाटली.)

Thursday 7 April 2016

"पेन"मधील "शाई" त बदल !!

मित्राहो नमस्कार.

आज दि. ८ एप्रिल २०१६. चैत्र शुद्ध प्रतिपदा किंवा वर्षप्रतिपदा. मराठी वर्षारंभ तसेच शक शालिवाहन सुरू होण्याचा पहिला दिवस. नव्या शकाचा प्रारंभ. साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त.  गुढी ही आनंदाप्रीत्यर्थ उभारतात. गुढी उभारणे म्हणजे आनंद व्यक्त करणे, प्रसिद्धी पावणे, कीर्तिवंत होणे, नावलौकिक करणे, सत्ता प्रस्थापित करणे, हक्क सांगणे वगैरे. एखादा संकल्प केला की आपण संकल्पाची गुढी उभारली किंवा संकल्पाचे तोरण लावले असे म्हणतो. म्हणून पाडव्याला नवीन वर्षाचा संकल्प केला जातो. मी सुध्दा आजच्या मुहूर्तावर नवा संकल्प जाहीर करतो आहे. आयुष्यात "नव्या वाटेवर" चालण्याचा हा संकल्प आहे.

"पंच" रुपातील मंदाताई खडसे !

दुपारी टीव्हीवर "सिया के राम" ही रामायणावरची मालिका पाहत होतो. रामाला वनवासातून परत नेण्यासाठी भरत आणि "रघुवंश"परिवार चित्रकूट पर्वतावर आलेला असतो. कैकयी रामाला वचनमुक्त करायचे म्हणते. भरत रामाला राजधर्मची आठवण करून देत परत अयोध्देला यायचा आग्रह धरतो. राम मात्र पितृ वचनाचे पालन करण्याच्या निर्णयावर दृढ असतो. अखेर राजर्षि राजा जनकच्या अध्यक्षतेखाली धर्मसभा बसते. भरत युक्तिवाद करतो आणि म्हणतो, रामाने राजधर्म पाळावा. अयोध्देच्या जनतेचे कल्याण करावे. रघुवंश कुटुंबाला आधार द्यावा. जे वचन अधर्मी आहेत, ते रामाने पाळू नये. राम युक्तिवाद करतो आणि म्हणतो, मुलांना पितृऋणातून मुक्त होणे हाच खरा धर्म आहे. मी वनवास हा लोककल्याणासाठी स्वीकारला आहे. माझ्या हातून संपूर्ण वसंधुरेची सेवा होणार आहे. असे म्हणत राम युक्तिवाद पूर्ण करतो. आता निर्णय द्यायची वेळ जनकाची. जावाई राम, प्रिय कन्या सीता वनवासात आलेले. सहृदयी बाप आणि नीतिवान राजा जनक काय निर्णय देणार ? सारे तणावात. जनक म्हणतो, राजधर्माचे पालन करायचे तर भरत म्हणतो ते खरे आहे. पण, पितृऋणातून मुक्त होणे हे मुलासाठी सर्वांत मोठे कर्तव्य असते. रामाने वनवास पूर्ण करावा हा माझा निर्णय आहे. त्यानंतर भरत रामाच्या पादुका घेवून अयोध्देचा कारभार करायला परततो.

Tuesday 5 April 2016

राष्ट्रप्रेम और राष्ट्रभक्तीका अन्वयार्थ !

समुचे हिंदुस्तानमें ताजा और गरमागर्मीका विषय "भारत माताकी जय" इस घोषणाको लेकर चर्चामें है l विचार, संस्कार और वर्तनमें धर्मानुसार विभाजन होनेके कारण धरतीको माताका संबोधन, कहना, मानना, प्रणाम करना और उसके जयकी घोषणा करना इस कृतीसंबंधी मतभिन्नता है l इस विषयपर गंभिरतासे चिंतन करे तो राष्ट्रप्रेम और राष्ट्रभक्ती इन संकल्पनाओंमेभी विचारानुरुप मतांतरे स्पष्ट होती है l किसीभी सजीवको जन्म देनेवाली धरती तथा सजीवके निवासकी भूमि हिंदू विचारधारानुसार "मातृभूमि" है l

Sunday 3 April 2016

जामन्याचा आदिवासी होलिकोत्सव

आदिवासी नृत्य पथकातील बावा, बुध्या
सातपुडा पर्वताच्या रांगेत महाराष्ट्रासह गुजरात आणि मध्यप्रदेशात आदिवासी संस्कृती विस्तारली आहे. बोली भाषा, प्रांत आणि पोषाख भिन्न असले तरी या सर्व आदिवासींची पारंपारिक होळी साजरी करण्याचा रितिरिवाज आजही कायम आहे. आदिवासींमध्ये बांबूच्या होळीचा उत्सव मोठ्या श्रध्देने साजरा होतो. यानिमित्त संपूर्ण आदिवासी समाज नृत्य, वादन, गायन आणि वस्त्र-प्रावरणे-दागिने याचे प्रदर्शन करतो. जळगाव जिल्ह्यात यावल तालुक्यात जामन्या येथे बांबूच्या होलिकोत्सवाला लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या पुढाकाराने दि. २६ मार्च २०१६ ला प्रारंभ झाला. ही नोंद आदिवासींच्या व जळगाव जिल्ह्याच्या सांस्कृतिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी झाली आहे. या होलिकोत्सवाची रंजक कहाणी ...
यावल अभयारण्याचा अति अंतर्गत भाग असलेल्या जामन्या पाड्यावर लोकसंघर्ष मोर्चातर्फे गेल्या २६ मार्चला आदिवासी होलिकोत्सवाचा प्रारंभ अत्यंत उत्साहात झाला. या उत्सवाच्या प्रारंभाची नोंद लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभाताई शिंदे यांच्या पुढाकाराने झाली. राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, रावेरच्या खासदार रक्षाताई खडसे, आमदार हरिभाऊ जावळे, जामनेरच्या नगराध्यक्ष साधनाताई महाजन यांच्यासह जळगाव शहरातील सुमारे २०० वर मान्यवरांनी या होलिकोत्सवाला हजेरी लावली. एक नवा सांस्कृतिक इतिहास लिहीला जात असताना त्या उत्सवाचे साक्षीदार होण्याचे भाग्य या मंडळींना लाभले.

Friday 1 April 2016

भैरुदादाकी जय हो !!!

भालचंद्र तथा भैरुदादा पाटील
जळगाव पीपल्स सहकारी बँकेच्या १४ संचालकांची निवड बिनविरोध झाली. गेल्या ८२ वर्षांपासून म्हणजे बँकेच्या स्थापनेपासून संचालकांची बिनविरोध निवड करण्याची परंपरा कायम राखली गेली. बँकेचे विद्यमान अध्यक्ष भालचंद्र पाटील तथा भैरुदादा यांच्यावर बँकेच्या १४ हजारांवर सभासदांनी दाखविलेला हा विश्वास आहे. याबरोबरच पाटील कुटुंबावर असलेला सभासदांचा पिढीजात विश्वासही कायम असल्याचेच हे प्रतिक आहे.