Tuesday, 9 February 2016

डिलिट केलेला डाटा कसा रिकव्हर कराल...?

आठ फेब्रुवारी २०१६ चा सोमवार माझ्यासाठी मनःस्ताप घेवून आला होता. सकाळी ११ ला कार्यालयात संगणकावर काम करताना संगणकाच्या सी ड्राईव्हवर सेव्ह असलेल्या माझ्या पर्सनल व महत्त्वाच्या डाटा फाईल्स अनावधानाने डिलिट झाल्या. अर्थात, तसे झाल्याचे मला लगेच लक्षात आले. मी रिसायकलबीनमध्ये डाटा तपासला. तो तेथे गेला नव्हता. असा प्रकार पूर्वी कधीही झालेला नसल्याने फाईल्स गमावल्याचे टेंशन मला आलो. जुने लेख, फोटो, व्हीडीओ क्लिप्स, युनीकोडमधील आणि ईन डिझाईनमधील अशा जवळपास ३ हजारावर फाईल्स डिलिट झाल्या होत्या. माझा मनःस्ताप सुरू झाला.आमचे अकौंटंट संग्राम शर्माजी म्हणाले, डिलिट फाईल रिकव्हर करता येतात. माझ्याही काही फाईल्स डिलिट झाल्या होत्या. त्या परत रिस्टोअर केल्या. त्यासाठी दीपक चौधरी यांनी सहकार्य केले होते. हे सांगत त्यांनी मला दिलासा दिला. दीपक चौधराला मोबाईलवर संपर्क केला. त्याने गुगलवरून फ्री डाऊनलोड करता येईल असे आयकेअर सॉफ्टवेअर सांगितले. त्याच्या सूचनेप्रमाणे ते सॉफ्टवेअर डाऊनलोड केले. मात्र, डाटा रिकव्हर संदर्भातील प्रणालीची भाषा समजत नसल्याने स्क्रिनवर रिकव्हर होणारा डाटा दिसत असूनही तो ओपन करून सेव्ह करणे शक्य होत नव्हते.

संगणकावरील कामाचे माझे पहिले गुरु आणि मित्र सुनील लोंढे यांना संपर्क केला. त्यांनी पुन्हा दिलासा दिला. ते म्हणाले, १००% डाटा परत मिळतो. पण, आजच प्रयत्न कर. एखाद्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला बोलावून घे, त्याला भले शुल्क दे मात्र आजच डाटा रिकव्हर कर. माझा लहान भाऊ शैलेश तिवारी अमेरिकेत कॉन्गिझंट सोल्युशनमध्ये प्रोजेक्ट मैनेजर आहे. तो सध्या महिनाभरासाठी भारतात परतला असून भडगावला थांबला आहे. त्यालाही विचारले, तो म्हणाला, सॉफ्टवेअर इंजिनिअरला बोलावून घे. तुला सर्व डाटा परत मिळेल. अखेर आमचे मित्र पवनीकर यांच्याशी बोललो. ते म्हणाले, उद्या सकाळी नक्की प्रयत्न करू. या चर्चेनंतर काम थांबवले. मनोमनी डाटा गेला असाच विचार केला.
त्यानंतर अॉफीसचे नियमित काम करीत असताना वारंवार डाटा रिकव्हर सॉफ्टवेअर पुन्हा पुन्हा सुरू करून फाईल्स रिकव्हरी करणे सुरूच होते. दिसतील त्या फोल्डरवर क्लिक करणे सुरू होते. स्क्रिनवर काहीही हालचाल होत नसे. फोल्डर एमटी असा संदेश येई. कामाच्या गडबडीत कुठेतरी क्लिक करून डाटा रिकव्हर प्रोग्राम विंडो मिनीमाईज केली. दैनंदिन कामाचा पहिला टप्पा संपल्यावर इतर विंडो बंद केल्या. शेवटची विंडो डाटा रिकव्हरची होती. ती आपसुक समोर आली आणि अहो आश्चर्यम् डिलिट झालेल्या सर्व फाईल्सचे थेट फोल्डर समोर दिसू लागले. नंतर एक एक फोल्डर हळूवारपणे ओपन करून डाटा सेव्ह करणे सुरू केले. सायंकाळपर्यंत सर्व फाईल्स रिकव्हर झाल्या. माझा मनःस्ताप संपला.

हा प्रकार मी सविस्तर शेअर करण्याचे कारण हेच की, मी गेलो त्या मानसिकतेतून अनेक जण जातात. हताश होतात. संगणकीय प्रणालीत आपण अक्षरशत्रू असतो. त्यामुळे त्याचे कोड, शॉर्टनेम आपल्या लक्षात येत नाही. पण, सावधपणे काम केले तर अडचणीतून बाहेर पडू शकतो. एक धोका असतो तो म्हणजे संगणकाच्या हार्ड डिस्कमधला डेटा चुकीच्या कमांडमुळे कायमचा नष्ट होवू शकतो. मात्र यावरचा उपाय म्हणजे, प्रत्येक कृती नंतर संगणकाच्या पडद्यावर दिसणारी सूचना नीट वाचायची आणि पुढे जायचे. माणसाच्या चुकांची जशी दुरूस्ती करता येते अगदी तशीच प्रामाणिक रिकव्हरी संगणकही करतो हे मला लक्षात आले. आता इतरांना सोपे मार्गदर्शन करण्यासाठी फ्री डाटा रिकव्हर सॉफ्टवेअर (FDRC) कसे वापरावे हे मी सोप्या भाषेत सांगतो.

यापध्दतीचे मूळ ४ टप्पे आहेत. १) सॉफ्टवेअर डाऊनलोड आणि रन २) संगणकातील सर्व डाटा स्कॕन ३) आपणास हवी ती फाईल निवडणे ४) ती फाईल सेव्ह करणे. आता सविस्तर कार्यपध्दती अशी ः

१) गुगलवर जावून Free Data recover software down load टाईप करून शोध घ्या. त्यांनतर वेब डिरेक्टरीत अनेक पर्याय समोर येतील.
२) त्यातून  7 datarecovery.com याची निवड करा. या सॉफ्टवेअरचा वापर करून deleted file, photo, video,
document from hard disk, memory card, pendrive,  Android फोनमधील अथवा SD Memory Card मधील डाटा रिकव्हर करता येतो.

३) वेब डिरेक्टरीत अनेक पर्याय आहेत. त्यातून 7 datarecovery.com चीच निवड का करायची तर हे सॉफ्टवेअर मोफत आहे. याचा वापर करून 1GB पर्यंत डाटा मोफत परत मिळवता येतो. Free trail साठी इतर सॉफ्टवेअर केवळ 500 MB डाटासाठीच वापरता येतो.

४) 7datarecovery.com वर जावून सॉप्टवेअर डाऊनलोड करा. ५ ते ७ मिनिटे लागतात. शक्यतो आपण नेहमी ज्या ड्राईव्हला प्रोग्राम फाईल ठेवतो तेथे डाऊनलोड करा.

५) या सॉफ्टवेअरची वैशिष्ट्ये अशी -
File recovery : कोणत्याही प्रकारचा डाटा परत मिळविणे. Free Data Recovery Software can return back users' files and folders that were deleted definitely or temporarily from the hard drive. It can recover any type of files and in a matter of minutes.

Preserving original characteristics : डाटा हा मूळ स्वरूपात परत मिळवणे. म्हणजे ज्या प्रोग्राममध्ये तयार केला त्याच अवस्थेत (जसे - इनडिझाईन, वर्डस) The program is keeping folder structure as possible. This program can retrieve images, documents, videos and other data. Indeed, Free Data Recovery Software is first of all scanning all partitions on the hard drive.

६) सॉफ्टवेअर डाऊनलोड झाल्यानंतर त्यावरील अट स्वीकारून म्हणजे terms and conditions ला agreed म्हणून सॉफ्टवेअर संगणकात रन करायचे.

७) त्यानंतर आपल्या समोर डाटा कुठून रिकव्हर करायचा याचे संगणकातील पर्याय जसे ड्राईव्ह (जसे C किंवा D) Data storage cd/memry card/mobile memory आदी येतात. यातही दोन प्रकार आहे. चुकून डिलिट झालेला डाटा लगेच मिळतो. मात्र खूप जुन्या फाईल्स हव्या असतील तर deep scan करावे लागते. यासाठी किमान ४५ मिनिटे वेळ लागतो.

८) रिकव्हर झालेल्या फाईल्स या  supports recovery froms म्हणजे NTFS, FAT32 or FAT partitions मध्ये दिसतात. त्या किमान 40GB त असतात.

९) २४ तासांच्या आत रिकव्हरी करीत असली तर recyclbin वर क्लिक केल्यातर तेथील सर्व डिलिट फाईल्स समोर येतात. अन्यथा NTFS स्वरुपात दिसणाऱ्या फोल्डरवर क्लिक करीत आपल्याला हव्या त्या फाईल्स शोधाव्या लागतात.

आपण मोफत सॉफ्टवेअर आणि केवळ 1 GB चा वापर करीत असल्याने फाईल टाईप, डेट किंवा Name नुसार फाईलचा शोध घेवू शकत नाही. पण सॉफ्टवेअरचा वापर अनलिमीट असेल तर या प्रकारेही फाईल शोधता येतात.

१०) आपल्याला हवे ते फोल्डर किंवा फाईल दिसली तर त्यावर क्लिकषकरून ती हव्या त्या ड्राईव्हला सेव्ह करावी. फाईल 1GB च्या आत असतील तर एकाच झटक्यात मूळ फॉर्मेटमध्ये सेव्ह होतात.

११) 1 GB पेक्षा जादा फाईल्स असतील तर इतर सॉफ्टवेअरही तात्पुरते डाऊनलोड करून डाटा रिकव्हर करावा. जवळपास सर्व सॉफ्टवेअर हिताळणी सारखीच आहे.

2 comments:

  1. अतिशय महत्वाची माहिती तिवारी सर।

    ReplyDelete
  2. उपयुक्त. धन्यवाद !

    ReplyDelete