गुजरातमधील
एका व्यापार्याने
मुलाच्या विवाहात नवदाम्पत्यास आशीर्वाद
देण्यासाठी तब्बल १८ हजार
विधवांना मुख्य अतिथी म्हणून
निमंत्रण दिल्याचे वृत्त वाचनात
आले. खुप दिवसांनी
हात आणि डोक्यातील
विचारचक्र थांबविणारा अनुभव हे
वृत्त वाचून आला.
लहानपणापासून पाहिलेल्या विधवांच्या निवास,
वर्तणूक आणि मर्यादांचे
एक चित्र पुन्हा
पुन्हा डोळ्यांसमोर समोर येवू
लागले.
भारतामध्ये
आजही कुटुंबातील शुभकार्यात
विधवा महिलांची उपस्थिती
अशुभ मानली जाते.
काही सण-उत्सव,
रिती-रिवाज केवळ
सवाष्णींच्या हातानेच केली जातात.
अशी परंपरा मोडून
काढण्यासाठीच गुजरातमधील एका व्यापार्याने विधायक
पुढाकार घेत विधवांना
लग्न कार्यात आमंत्रित
केले. सर्व विधवांना
प्रत्येकी एक घोंगडे,
एक रोप आणि
महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी एक
दुभती गायही भेट
दिली. हे सारे
वाचताना मनातील विचारांचा गुंता
विधवा आणि त्यांचे
सामाजिक स्थान यातच गुरफटून
गेला.
पती व पत्नीचे
नाते दोघांपैकी एकाच्या
निधनानंतर संपुष्टात येते. पती
निधनानंतर पत्नीची ओळख विधवा
म्हणून उरते. पत्नीचे निधन
झाले तर पती
विधूर ठरतो. पतीच्या
विधूर होण्याला सामाजिक
व कौटुंबिक मर्यादा
फार नाहीत. मात्र,
विधवेच्या जगण्याला कुटुंब आणि
समाजाच्या अनेक मर्यादा
आहेत. या मर्यादा
दृश्य स्वरुपातील पोषाख,
राहणीमान आणि वर्तन
अशा तीन प्रकारात
आहेत. हिंदू, ख्रिस्ती,
इस्लाम धर्मियांमध्ये
तसेच प्राचीन ईजिप्त,
चीन सारख्या देशांमध्येही
वैधव्य ही कौटुंबिक
आपत्ती मानली जाते.
ईजिप्त, जर्मनी या देशांमध्ये
प्राचीन काळी विधवेला
मृत पतीसोबत पुरले
जायचे. भारतातही मृत पतीच्या
चितेवर विधवेला सती जावे
लागे. प्राचिन धर्मशास्त्रे,
नीतिनियमानुसार पती निधनाचा
दोष महिलेस लागून
तिला पापी, अमंगल
समजत. सर्व शुभ
किंवा धार्मिक कार्यात
विधवेचा सहभाग निषीध्द असे.
वैधव्य काळात तिने कोणते वस्त्र
परिधान करावे, तिने घराबाहेर
पडावे की नाही,
तिने कोणाशी
बोलावे, कोणते अन्न किती
वेळा ग्रहण करावे
असे नियम लादलेले
होते. पती निधनाच्या
पातकाचे प्रायश्चित म्हणून ही
बंधने तिने पाळलीच
पाहिजेत असा समाजाचा
आणि कुटुंबाचा दंडक
होता.
प्राचीन ग्रीक व रोमन
संस्कृतीने विधवा विवाहांना अनैतिक
किंवा व्यभिचारी मानले.
भारतीय कर्म संस्कृतीतही
विधवा विवाह व्यर्ज
होते. पण, संतानहिन
विवाहिता किंवा विधवेला संतती
प्राप्तीसाठी पर पुरुषाशी
समागमाचा अधिकार दिलेला होता.
यात उदाहरण द्यायचे
असेल तर जसे
एखादी विधवा संततीप्राप्तीसाठी
दीर अथवा जेठ
यांच्याशी शरीर संबंध
निर्माण करू शकत
असे. मात्र, हे
संबंध अपत्यप्राप्ती पुरतेच
असत. याची काही
ऐतिहासिक उदाहरणे पुढील प्रमाणे
आहेत.
हस्तिनापूरचे
महाराज शांतनू आणि सत्यवती
यांना चित्रांगद आणि
विचित्रविर्य हे पूत्र
होते. सत्यवतीला नियोग
संबंधातून महर्षी पराशर यांच्या
पासून महर्षी व्यास
हेही पूत्र झाले
होते. विचित्रविर्य
याच्या अकाली निधनानंतर हस्तिनापूरच्या
वारसाचा प्रश्न आला. तेव्हा
सत्यवतीने महर्षी व्यास यांना
बोलावून विधवा सुना अंबिका
आणि अंबालिका यांच्यापासून
अनुक्रमे धृतराष्ट्र व पांडू
यांचा जन्म नियोग
संबंधातून घडवला. दुसर्या संबंधासाठी
अंबिका स्वतः महर्षी व्यासांकडे
गेली नाही. तिने
दासीला पाठविले. त्या संबंधातून
विदुरचा जन्म झाला.
पुढे हिच नियोग
पध्दत पांडु पत्नी
कुंतीने वापरून सूर्यापासून कर्ण,
धर्मापासून युधिष्ठीर, वायूपासून भीम,
इंद्रापासून अर्जून यांना जन्म
दिला. याच क्रीयेतून
कुंतीची सवत माद्रीने
अश्विनीकुमार यांच्याशी नियोग संबंधातून
नकुल व सहदेव
यांना जन्म दिला.
महर्षी दुर्वासांनी कुंतीला इच्छित
व्यक्तीपासून पूत्र प्राप्तीचा मंत्र
दिला होता.रामायणातही
राजा दशरथाने पूत्रकामेष्टी
यज्ञ करून अपत्यप्राप्ती
केल्याचा उल्लेख वाल्मिकी रामायणात
आहे.
रामायण आणि महाभारताचे
वाचन करताना एक
विषय अस्वस्थ करतो,
तो म्हणजे रामाच्या
वियोगातून दशरथाचा मृत्यू होतो.
पण, तेव्हा कौसल्या,
कैकयी व सुमित्रा
सती गेल्याचा उल्लेख
नाही. रावणासोबत मंदोदरीने
सती जाण्याची इच्छा
प्रकट केल्याचा उल्लेख
काही लिखाणात आहे.
मात्र, नंतर मंदोदरीनेही
दीर आणि श्रीलंकेचा
राजा झालेल्या बिभिषणशी
विवाह केला आहे.
हा विधवा विवाहच
मानायला हवा. रामायणतच
विधवा विवाहाचा दुसराही
संदर्भ आहे. तो
म्हणजे, रामाने वानरराज बालीचा
वध केल्यानंतर किषिकंधाचा
राजा झालेल्या सुग्रीवासोबत
बालीच्या विधवा ताराने विवाह
केला होता.
महाभारतात विधवांनी नियोग क्रियेतून
पुत्र प्राप्ती केली
मात्र, विधवा सती गेल्याचा
उल्लेख कुठेही नाही. असे
असताना सती प्रथा
कधीपासून भारतीय समाजात आली?
हा प्रश्न
पडतो.
साधारणपणे बाराव्या शतकाच्या सुमारास
बाल किंवा तरुण
विधवांना कुरुपपण प्रदान करण्याची
क्रूर प्रथा निर्माण
झाली. प्राच्यविद्यापंडित अ.
स. अळतेकर यांच्या
मते स्कंद पुराणात
तसे संदर्भ आहेत.
विधवेच्या डोक्यावर जेवढे केस
तेवढी वर्षे मृत
पतीला नरकवास घडतो,
असा अघोरी समज
कर्मकांडातून होता. मग त्यातून
केसवपन सुरु झाले.
विधवेच्या दिसण्यात कुरुपपण ठसठशित
व्हावे म्हणून पांढरी वस्त्रे
परिधान करणे आले.
इतर शृंगार व्यर्ज
झाला. आणि त्तातूनच
सुरू झाली असावी
सती प्रथा.
भारतीय पुराणादीक ग्रंथात मृत
पतीच्या मागे मागे
जाणारी स्त्री म्हणून केवळ
सावित्रीचा उल्लेख आहे. मात्र,
ती सती गेली
नाही. तर, पतीचे
प्राण हरण करून
नेणार्या यमाशी
बुद्धी वाद करीत
त्याच्या सोबत गेली.
अखेर यमाने सुद्धा
सावित्रीच्या पतीचे प्राण परत
केले. याशिवाय, पतीच्या
मागे जाणार्या
किंवा सती जाणार्या कोणत्याही
महिलेचा उल्लेख कुठेही नाही.
सम्राट अकबराने १५८२ मध्ये
‘दिन ए ईलाही’ हा धर्म स्थापन
केला होता. त्यासोबत
त्याने विधवांना
पुनर्विवाह करण्याची परवानगी कायद्याने
दिली. इच्छा नसेल
तर विधवेस सती
जाण्याची सक्ती करू नये
असा कायदा पारित
केला.
छत्रपती शिवरायांनी सैनिकांच्या विधवांचा
विचार केल्याचा संदर्भ
राजव्यवहार कोशात मिळतो. राजे
सैनिक, सरदारांचा सन्मान करीत,
त्यांना वतने-ईनाम
देत. यात शहिद
सैनिकांच्या वारसांना किंवा विधवांना
निम्मा हिस्सा असे.
शिवरायांच्या
नंतर अहिल्यादेवी होळकर
यांचा संदर्भ सापडतो.
अहिल्यादेवींचे प्रशासन हे राजकेंद्री
नव्हे समाजकेंद्री होते.
समाजातील सर्व घटकांना
समान न्याय हे
त्यांचे वैशिष्ट्य होते. निपुत्रीक
विधवांची संपत्ती जप्त करण्याचा
परंपरागत कायदा त्यांनी रद्द
तर केलाच पण
विधवांना दत्तक पुत्र घेता
येईल असे कायदे
बनवले. ही एक
सामाजिक क्रांती होती.
छत्रपती शाहु महाराजांनी
विधवांची दारूण परिस्थिती लक्षात
घेवून पुनर्विवाह नोंदणीसंबंधी
कायदा केला. त्यामुळे
विधवांच्या परिस्थितीत बराच फरक
पडला. त्यांना कायद्याने
पुनर्विवाह करता येवू
लागला
भारताच्या स्वातंत्र्यपूर्व काळात सती प्रथेविरुद्ध
राजा राममोहन राय
यांनी लढा सुरु
केला. तेव्हा पती
निधनानंतर जिवंत असणार्या
विधवांचे वेगळेच प्रश्न समोर
होते. त्यांचे जगणे
हे नरकासारखेच होते.
पांढरी साडी, भोंडे कपाळ,
रिकामा गळा, सुने
मनगट आणि शुभ
कार्यात सहभाग नाही अशी
अवस्था होती. बहुतांश ठिकाणी
विधवा म्हणजे अतिरिक्त
लैंगिक सुख भागविण्याची
पर्यायी व्यवस्था होती. हा
प्रकार सती जाण्यापेक्षा
भयंकर होता.
लॉर्ड बेटिंकने १८२१ मध्ये
सती प्रथा
बंद करण्यासाठी कायदा
केला. त्यानंतर विधवा
पुनर्विवाह कायदा १८५६ मध्ये
केला गेला. १८८९
मध्ये पंडिता रमाबाई
यांनी रमाबाई असोसिएशन
तर्फे मुंबई व
पुणे येथे विधवांसाठी
शारदासदन नावाची संस्था सुरू
केली. १८९० मध्ये
विधवाविवाहोत्तजक मंडळी स्थापन करण्यात
आले. धोंडो केशव
कर्वे यांनी १८९३
मध्ये बालविधवेशी विवाह
केला व सनातनी
लोकांचा रोष ओढवून
घेतला. १८९५
मध्ये विधवाविवाहोत्तजक मंडळीचे
नाव विधवाविवाह प्रतिबंध
निवारक मंडळी झाले. या
मंडळीचे अध्यक्ष रा. गो.
भांडारकर होते. विधवा विवाहाबरोबरच
स्त्रीशिक्षणास समाजात प्राधान्य मिळावे,
यासाठी लोकजागृतीचे प्रयत्न महर्षी
कर्वे व महात्मा
ज्योतिबा फुले यांनी
केले. १९०० मध्ये
महर्षी कर्वे यांनी हिंगणे
येथे विधवांसाठी आश्रम
स्थापन केला. हिंदू विवाह
कायदा १९५५ मध्ये
अस्तित्वात आला. त्यात
अनेक कलमे विवाहिता
आणि विधवा यांच्या
मालमत्तेविषयक हक्काविषयी आहेत. हिंदू
उत्तराधिकारी कायदा १९५६, विवाहित
स्त्रियांचा संपत्तीचा कायदा १९५९
आणि हिंदू वारसा हक्कात
मालमत्तेत समान वाटप
कायदा २००५ नंतर
आले. याशिवाय, कुटुंबात
राहणार्या विधवांना
कौटुंबिक हिंसाचार
प्रतिबंधक कायदा २००५ तसेच
लैंगिक छळापसून महिलांचे संरक्षण
विधेयक २०१० हेही
तयार झाले. यातून
विधवांना काही प्रमाणात
संरक्षण मिळाले.
आज भारतीय दंड संहितेत
किंवा महिलांसाठी स्वतंत्र
कायदे, अधिकार प्रदान केले
असले तरी वारसा
आणि संपत्तीविषयक हक्कांसाठी
बहुतांश विविधांची फरपटच होत
असते हा सार्वत्रिक
अनुभव आहे. अशावेळी
प्रश्न पडतो की
जगभरात विधवांची संख्या किती
असावी ?
संयुक्त राष्ट्राने एका अशासकीय
संस्थेकडून (एनजीओ) विधवांच्या स्थितीवर
एक सर्वेक्षण केले. त्यात असे आढळून
आले की, संपूर्ण
जगात २४ कोटी
५० लाख विधवा
असाव्यात. भारतात एकूण ५०
कोटी महिलांमध्ये विधवांची
संख्या ४ कोटी
८० लाख असावी.
अर्थात, यात ५०
पेक्षा जास्त वर्षे वय
असलेल्या विधवा ५० टक्के
आहेत. याचाच अर्थ
पतीच्या वृध्दावस्थेतील निधनामुळे वैधव्य आलेल्या
जास्त आहेत.
भारतात आज वृंदावन,
वाराणसी या धर्मस्थळी
निवासाला जाणार्या विधवांची
संख्या जास्त आहे. ज्येष्ठ
चित्रपट निर्माती मिरा नायर
यांचा वॉटर हा
चित्रपट वाराणसीतील विधवांच्या जिवनावर
आधारित होता. आजही काही
आश्रमात दिवसभर भजन-कीर्तन
केल्यानंतरच या विधवांना
दोनवेळ जेवणासाठी डाळ-भात
दिला जातो. वाराणसीतील
विधवांचे हाल पाहून
एनजीओ सुलभ इंटरनॅशनलचे
संस्थापक बिंदेश्वर पाठक यांनी
विधवांसाठी पेन्शन आणि वैद्यकीय
कल्याण योजनेची सुरूवात केली
आहे.
विधवांच्या
राहणीमान आणि सामाजिक
सहजीवनात आज अनेक
सकारात्मक बदल होत
आहेत. विधवा विवाहासाठी
जवळपास सर्वच जातीधर्मात पुढाकार
दिसतो. अर्थात, या मागे
मुलींची घटलेली संख्या हे
मूळ कारण नाकारता
येणार नाही.
विधवांना जवळपास सर्वच शुभ
कार्यात सहभागी करून मान-सन्मान दिला जात
आहे. अंजनगाव सूर्जी
येथे शेतकर्यांच्या
विधवांना मुलीच्या वाढदिवशी साडीचोळी
दिली गेली. कोल्हापुरात
मराठा समाज संघटनेने
विधवांचा मेळावा घेवून हळदी-
कुंकवाला सन्मानाने बोलावण्याचा ठराव
केला. विधवांना शिक्षण,
नोकरी, व्यवसाय उपलब्ध करून
देण्यासाठी प्रयत्न करणे तसेच
ज्यांचे वय लग्नायोग्य
आहे त्यांच्या पुनर्विवाहासाठी
प्रयत्न करणे असेही
ठराव केले.
यवतमाळ येथे नवरात्रीत
श्री बालाजी मंडळाने
शेतकरी आत्महत्याग्रस्त २५ विधवांना
उपजिविकेचे साधन म्हणून
शिलाई मशीनचे वाटप
केले.
कधीतरी तरूण विधवेशी
दीराने लग्न केले
किंवा एखाद्या युवकाने
लग्न केले अशा
बातम्या येतात. विधवांच्या पुनर्वसनाची
सकारात्मक पाऊले निश्चित आहेत.
अहमदाबादचे अठरा हजार
विधवांना लग्नाचे मानकरी ठरविणे
हेही त्या पुढील
पाऊल निश्चित आहे.
पण, विधवांचे प्रश्न
केवळ पुनर्विवाहपुरता नाहीत.
वयाच्या ५० नंतरच्या
विधवांचे प्रश्न सामाजिक प्रतिष्ठा,
कौटुंबिक हक्क, सार्वत्रिक सन्मानासाठीचे
आहेत. आज या
दिशेने काम करण्याची
खरी गरज आहे.
असाच एक विधायक
उपक्रम सांगलीत झाला. तेथील
मैत्रिण संघटनेने सौभाग्याचे लेणे
म्हणून विधवा महिलांना कुंकू
लावून गळ्यात मणीमंगळसूत्र
बांधले.
भारतामध्ये
आजघडीला ४ कोटी
८० लाख विधवा
आहेत. त्यांच्या समस्या
निवारणासाठी वेगळ्या आयोगाची गरज
असल्याची भूमिका ब्रिटनमधील भारतवंशीय
समुहाने व्यक्त केली आहे.
हा प्रस्ताव लुंबा
फाउंडेशन या विधवांच्या
हक्कासंबंधी काम करणार्या संस्थेने
मांडला आहे.
विधवांचे गाव
वैधव्य आणि त्याची
बहुतांश कारणे घातपात, अपघात
किंवा आजार हेच
असतात. मात्र, अपघातांमुळे संपूर्ण
गावातील महिलांनाच वैधव्य आले
असे उदाहरण बहुतेक
एकच असावे. तेलंगणा
राज्यात पेद्दाकुंता गाव आहे.
तेथे फक्त विधवाच
राहतात. या गावात
पहिल्यापासून विधवा राहतात असे
नाही. त्यांना गावाजवळच्या
हायवेमुळे विधवा व्हावे लागले.
गावाजवळून हायवे क्रमांक ४४
जातो. सन २००६
पासून आजपर्यंत या
हायवेवर गावातील ८० पुरूष
अपघातात ठार झाले.
गावात १८ ते
३६ वर्षे वयाच्या
तरूण महिलाच राहिल्या.
गावात एकूण ४०
परिवार होते. आता पुरूष
म्हणून या गावात
फक्त सहा वर्षांचा
मुलगा आहे.
वृंदावनमधील
विधवांचे वास्तव
वृंदावनमध्ये
आश्रयाला असणार्या हजारो
विधवांचे जीणे किती
दयनिय आहे हे
सांगणार्या
एका अहवालातील नोंदी अशा
ः १) एक
विधवा जेव्हा ७
ते ८ तास
भजन म्हणते, तेव्हा
तिला दिवसाला फक्त
१८ रुपये मिळतात,
२) सध्या अंदाजे
५ ते १०
हजार विधवा मथुरा
आणि वृंदावन या
शहरांत भिकारी अवस्थेत राहत
आहेत, ३) या
विधवांचे मोठ्या प्रमाणात लैंगिक
शोषण होत आहे,
४) ८० टक्के विधवा या
निरक्षर आहेत, ५) यातल्या
१,००० विधवांची
मुलाखत घेतली असता, त्यांना
मुलांनी टाकून दिल्याचे समजले.
No comments:
Post a Comment