Friday, 26 February 2016

सामुदायिक स्वच्छतेचा आग्रह हवा !

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २ अॉक्टोंबर २०१४ पासून स्वच्छ भारत अभियानाचा प्रारंभ केला आहे. महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीला म्हणजे २ अॉक्टोंबर २०१९ पर्यंत संपूर्ण भारत स्वच्छ करण्याचा हेतू पंतप्रधान मोदींनी डोळ्यांसमोर ठेवला आहे. या आभियानाची अंमलबजावणी लोकसहभागातून व्यक्तिगत आणि सामुदायिक स्वरुपात व्हावी अशी अपेक्षा आहे. त्याच्या पूर्तीसाठी सरकारी पातळीवर संकल्पित लोकसहभागाचे मॉडेल पूर्णतः फसलेले आहे. हा गेल्या दीडवर्षातला अनुभव आहे.

Thursday, 25 February 2016

परमेश्वराने हिरावला केंद्रबिंदू

जैन उद्योग समुहाचे संस्थापक अध्यक्ष तथा खान्देशचे मोठेभाऊ आदरणिय पद्मश्री डॉ. भवरलाल जैन यांना आज २५ फेब्रुवारी २०१६ रोजी परमेश्वराने आपल्यातून हिरावून घेतले. यशस्वी उद्योजक अशी ओळख असलेल्या मोठ्याभाऊंची अलिकडची ओळख तत्वचिंतक म्हणून होती. मोठेभाऊंच्या व्यक्तिमत्वाचे अनोखे पदर अनेक अंगाने लिहीता येतील. एखादा हिरा जसा सहा बाजुंनी अंगावर चकचकीत पैलू घेवून इतरांना प्रकाशमान करीत असतो तसे मोठेभाऊ होते. पत्रकार असल्यामुळे २७ वर्षांत अनेकवेळा मुलाखत, भेट, भाषणे अशा माध्यमातून मोठेभाऊंना अनुभवण्याची आणि मायेच्या सावलीत जाण्याची संधी मिळाली. स्वसुखाचा केंद्रबिंदू दुसऱ्याला देवू नको, असा सल्ला देणाऱ्या मोठेभाऊंना आज परमेश्वरानेच आपल्यातून हिरावले आहे.

Saturday, 13 February 2016

विधवा सन्मानाचे पर्व!

गुजरातमधील एका व्यापार्याने मुलाच्या विवाहात नवदाम्पत्यास आशीर्वाद देण्यासाठी तब्बल १८ हजार विधवांना मुख्य अतिथी म्हणून निमंत्रण दिल्याचे वृत्त वाचनात आले. खुप दिवसांनी हात आणि डोक्यातील विचारचक्र थांबविणारा अनुभव हे वृत्त वाचून आला. लहानपणापासून पाहिलेल्या विधवांच्या निवास, वर्तणूक आणि मर्यादांचे एक चित्र पुन्हा पुन्हा डोळ्यांसमोर समोर येवू लागले.

रोमॅन्टीक वसंत पंचमी

व्हाट्सप गृपमधील त्याच त्या शिळोप्याच्या गप्पांना फाटा देत, वसंत पंचमीच्या मुहूर्तावर आयुष्यातील प्रणयाराधनेचे काही प्रसंग जळगावमधील मान्यवरांनी एकमेकांना शेअर केले. वसंत पंचमी उत्सवाचा हर्षोल्हास काही मिनिटे, सेकंदासाठी सर्व सदस्यांनी अनुभवला. प्रत्येकाच्या मनात पत्नी विषयी असलेले हवळेपण आणि हिरवेपण शब्दांच्या मांडणीतून जाणवले. एक वसंत पंचमी रोमॅन्टीक करणारी ही २४ पात्रांची कहाणी...
Tuesday, 9 February 2016

डिलिट केलेला डाटा कसा रिकव्हर कराल...?

आठ फेब्रुवारी २०१६ चा सोमवार माझ्यासाठी मनःस्ताप घेवून आला होता. सकाळी ११ ला कार्यालयात संगणकावर काम करताना संगणकाच्या सी ड्राईव्हवर सेव्ह असलेल्या माझ्या पर्सनल व महत्त्वाच्या डाटा फाईल्स अनावधानाने डिलिट झाल्या. अर्थात, तसे झाल्याचे मला लगेच लक्षात आले. मी रिसायकलबीनमध्ये डाटा तपासला. तो तेथे गेला नव्हता. असा प्रकार पूर्वी कधीही झालेला नसल्याने फाईल्स गमावल्याचे टेंशन मला आलो. जुने लेख, फोटो, व्हीडीओ क्लिप्स, युनीकोडमधील आणि ईन डिझाईनमधील अशा जवळपास ३ हजारावर फाईल्स डिलिट झाल्या होत्या. माझा मनःस्ताप सुरू झाला.


Sunday, 7 February 2016

दोन ग्रहांची दोन टोके

(शनिशिंगणापूरचा स्त्री द्वेष्टा शनी आणि अमळनेरचा स्त्री उध्दारक मंगळ ***)
विश्वस्त मंडळाच्या परंपरा पालनाच्या वृत्तीला चिटकून राहण्याच्या वृत्तीमुळे शनिशिंगणापूर (जि. अहमदनगर) च्या शनिग्रहाची कूप्रसिध्दी होते आहे. शनिशिळेच्या चौथऱ्यावर महिलांना प्रवेशाचा अधिकार नाकारल्यामुळे शनिची अप्रतिष्ठा होते आहे. दुसरीकडे अमळनेर (जि. जळगाव) येथील मंगळग्रह मंदिरात स्रीयांच्या थेट सहभागातून विविध उपक्रम मंदिराचे विश्वस्त मंडळ राबविते आहे. या मंडळाने भव्य प्रसादालय उभारणीसाठी भूमिपूजन आणि गणेशाच्यापितळी प्रतिमेची स्थापना करण्याचा छोटेखानी उपक्रम नुकताच घेतला. कोपीष्ट ग्रहांच्या दोन देवस्थानांच्या विश्वस्त मंडळाच्या कार्यपध्दतीत हा फरक आहे.

Saturday, 6 February 2016

मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचे स्वप्न साकारणार!

भारतातला पहिला आणि गुजरात राज्यासाठी महत्त्वाकांक्षी असलेला मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्प मार्गी लागला आहे. भारत आणि जपानच्या सहकार्यातून हा प्रकल्प उभारला जाईल. यासाठी सुमारे एक लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. प्रत्यक्ष काम पुढील वर्षी सुरु होवून सन २०२३ मध्ये बुलेट ट्रेन धावू लागेल. प्रकल्पाचा ८० टक्के खर्च जपान सरकारची कंपनी करणार असून कर्ज स्वरुपात केलेल्या खर्चावर केवळ एक टक्के व्याज द्यावे लागणार आहे. बुलेट ट्रेनमुळे गुजरातचे मुंबईशी जवळकी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. 

वसंत पंचमीचे महत्त्व!

फेब्रुवारी महिना सुरु झाला की, ‘व्हेलंटाईन डेचे कवित्व सुरु होते. आपल्या प्रिय व्यक्तीस, ‘तू माझ्या प्रेमात आहेस का?’ हे विचारण्याचे धाडस काळजात गोळा करण्याची तरी सुरु होते. प्रिय व्यक्तीस छान संदेश, शुभेच्छा पत्र अथवा सुंदरशी भेट देता येईल का? याचा शोध सुरू होतो. ‘व्हेलंटाईन डेच्या आकर्षक भेटवस्तुंनी दुकानांचे शोकेस, डिस्प्ले अथवा गॅलरी सजतात. पाश्चात्त्य संस्कृतीच्या अनुक
रणातून हे सारे घडते.