जळगाव शहर सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकियदृष्ट्या संपन्न आहे. या तीनही परिघातील घटकांना जोडून ठेवणार्या नागरी सुविधांच्या पुनर्बांधणीत मात्र, मोठा अनुशेष आहे. ‘जळगाव चांगल्या माणसांचे आहे मात्र, पुरेशा सुविधांचे नाही’ असे आज निराशेने म्हणावे लागते. सार्वजनिक वापराच्या सोया-सुविधा सरकार किंवा मनपानेच कराव्यात असा समज जळगावकरांचा आहे. त्याच्या पलिकडे जावून नागरी सुविधा विकासात आता ‘लोकसहभाग, लोकगुंतवणूक आणि लोकजागर’ असा त्रिसूत्री वसा घेवून ‘आम्ही जळगावकर’ ही नवी चळवळ सुरू करण्याची आवश्यकता दिसत आहे.
जळगाव शहर सामाजिक कार्य करणार्या व्यक्ती, संस्थांच्या पुढाकार व सक्रिय सहभागामुळे संपन्न आहे. शहरातील दुर्बल, गरजू घटकांच्या रोजगार, आरोग्य, शिक्षण आणि आर्थिक विषयक गरजा काहीना काही प्रमाणात पूर्ण करण्याचा प्रयत्न अनेकांच्या प्रयत्नातून सुरू असतो. सामाजिक संस्थांच्या विस्ताराचा परिघ असा मर्यादीत आहे.
जळगावचे सांस्कृतिक वैभव विविध कलाकार आणि त्यांच्या कलाविष्कारांच्या सादरीकरणातून विस्तारले आहे. नाट्य, अभिनय, नृत्य, गायन, वादन, संगीत, वक्तृत्व आणि साहित्याचा प्रांत अशा सर्वच क्षेत्रात जळगावकरांनी वसा आणि ठसा उमटवलेला आहे. सांस्कृतिक परिघ मोठा असला तरी तो अनेकांच्या व्यक्तिगत वलयापुरताही मर्यादीतच आहे.
महानगरातील राजकारण हेही पक्ष-आघाडी, नेते आणि लाभ अशा तीन प्रकारात विभागलेले आहे. राजकियदृष्ट्या नेते, कार्यकर्ते समार्थ्यवान निश्चित आहेत पण, त्यांच्याकडील पदांचा किंवा सत्तेचा वापर हा समान्य नागरीकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी होतो असा अनुभव सध्यातरी नाही. राजकिय इच्छा किंवा महत्त्वाकांक्षा थिजलेल्या अवस्थेत आहे. सत्तेची ऊब मिळाली की, काही करून दाखविण्याची इच्छा, महात्त्वाकांक्षा राजकिय नेत्यांच्या मनात निर्माण होते. त्यातून विकासाचे काही ना काही काम उभे राहते. अशा स्थितीत राजकिय नेत्यांच्या विचार आणि कार्याचे परिघ सुद्धा संकुचित झालेले दिसतात.
कोणत्याही गाव, नगराचे व्यवस्थापन करणारी प्रशासन यंत्रणा ही सुद्धा कार्यक्षम असावी लागते. जळगाव महानगरासाठी अशी यंत्रणा महानगर पालिका म्हणून अस्तित्वात आहे. पण, आज हिच यंत्रणा आर्थिकदृष्ट्या पंगू असल्यामुळे तेथील प्रशासन अस्तित्व हीन झालेले आहे. प्रशासनाचा चेहरा हरविलेला आहे. नागरीकांसाठी करावयाच्या कोणत्याही कार्याचा परिघ या प्रशासनाकडे नाही.
जळगावच्या समाज रचनेतील वरील चारही घटक लक्षात घेतले तर सामाजिक क्षेत्राचा स्वतंत्र परिघ, सांस्कृतिक क्षेत्राचा स्वतंत्र परिघ, राजकिय क्षेत्राचे अनेक परिघ आणि प्रशासन व्यवस्थेचा कोणताही परिघ नाही असे ‘चिंताजनक’ चित्र दिसते. सांस्कृतिक आणि सामाजिक परिघात उद्योग, व्यापार, व्यवसाय या क्षेत्रातील दानशूर मंडळींचा सहभाग आहे.
समाजाचे वास्तव चित्र मांडण्याची आणि त्यात लोकसंवाद, लोकआवाहन आणि लोकसहभागातून अपेक्षित बदल घडविण्याची भूमिका माध्यमांचीही असते. जळगावमधील माध्यमांचा विस्तार प्रिंट, लाईव्ह, नेट अशा सर्वच प्रकारात आहे. माध्यमांच्या प्रभावाचा परिघही आपापल्या वाचक, श्रोता आणि वापरकर्त्यांपर्यंत आहे. पण, त्यातून उमटणारे संदेशांचे चित्र सकारात्मक नाही. सामाजिक रचनेतील त्रृटी, दोष, चुका, भेद, दुर्लक्ष, प्रश्न, समस्या, अडचणी, प्रवृत्ती यावर नेमकेपणाने बोट ठेवताना नकारात्मक चर्चाच जास्त होताना दिसते. माध्यमांनी सामाजिक प्रश्न जरूर मांडावेत, त्यासोबत संभाव्य पर्यायांचाही उहापोह करावा अशी अपेक्षा लोकांची आहे. जळगावाचे प्रश्न, समस्या व अडचणी मांडणारे तज्ञ पिढीजात भेटू शकतात मात्र, प्रशांची उकल किंवा सोडवणूक करण्यासाठी कृती, कार्यवाही करतानाचे उदाहरण विरळच म्हणावे लागेल. अशा वातावरणात माध्यमांच्या प्रभावलयासही मर्यादांचा परिघ संकुचित करून टाकतो.
जळगाव शहरात सर्व दैनिकांना एकत्र आणण्याचे काम जाहिरात व प्रसिद्धी माध्यमातील संस्था ‘मल्टी मीडिया फिचर्स प्रायव्हेट लिमीटेड’ या संस्थेने केले. दैनिकांच्या संपादकांना एकत्र बसवून जळगाव शहर विकासावर भूमिका मांडण्याची संधी दिली. नाविन्यपूर्ण कल्पना म्हणून हा कार्यक्रम उत्तमच झाला. मात्र, चर्चा फारशी वास्तव झाली नाही. संपादकांचे विचारही ठराविक विषयांच्या परिघाभोवतीच घोटाळत राहिले. याच विषयावर याच पद्धतीने राजकिय नेत्यांना बोलते केले असते तरी सुद्धा चर्चेचा सूर हा तसाच राहिला असता. फारसे काही हाती न लागणारा.
जळगावचा विकास होत का नाही? असा प्रश्न जेव्हा जेव्हा चर्चेला येतो तेव्हा तेव्हा मनपा, सरकार, सत्ताधारी, विरोधक, प्रशासन यांच्याशी संबंधित मुद्दे मांडून कोणताही निष्कर्ष न काढता चर्चेला पूर्णविराम द्यावा लागतो. हे वारंवार अनुभवले आहे. पुन्हा पुन्हा घडते आहे. आता गरज आहे ती विषयाच्या पलिकडे जाण्याची. विकासाशी संबंधित मनपा, प्रशासन, सत्ताधारी, विरोधक व सरकार हे मुद्दे वगळून नागरिक, विद्वान माणसे, दानशूर, तंत्रज्ञ यांनी एकत्र बसून ‘आम्ही जळगावकर’ अशी काहीतरी चळवळ सुरू करण्याची.
शहराचे सारेच प्रश्न मनपा, सरकार आणि त्यांत्याकडील तिजोरीतील पैशांतून मुळीच सुटणार नाहीत. हे शाश्वत सत्य आहे. अशावेळी समस्या, प्रश्न, अडचणी याच्याशी झूंजणार्या समाजाला आपणच आपले उत्तर शोधावे लागणार आहे. भारतातील अनेक शहरांमध्ये नागरी चळवळीतून विकासाच्या परिभाषा बदलण्याचे अनेक उपक्रम सुरू असल्याचे चर्चिले जाते. उदाहरण म्हणून सांगायचे तर, बंगळुरू सारख्या शहरात चौकांच्या सुशोभिकरणासाठी लोक एकत्र आले आणि गलिच्छ, बकाल चौकांचे रुपांतरण प्रसन्न, चकाचक जागांमध्ये झाले. हे सध्या सोशल मीडियातही वारंवार चर्चेत येणारे उदाहरण आहे.
या ठिकाणी विशिष्ट लोकांचे एका विचाराने एकत्र येणे, कल्पक लोकांनी कल्पना मांडणे, श्रमदान करू शकणार्यांनी काम पूर्ण करणे, सधन मंडळींनी खर्चाची तरतुद करणे, प्रशासनाने कागदोपत्री काम पूर्ण करणे आणि उरलेल्या जनतेने बघ्याची भूमिका न घेता जो बदल झाला त्याचे संरक्षण करणे किंवा त्यासाठीच्या सवयी अंगवळणी घेणे अशी लोकसहभागीची चळवळ उभी राहिल्याचे दिसून येते. असाच काहीचा प्रयत्न नाशिकमध्येही अलिकडे झाला. जळगावातही लोकसहभाग, लोकगुंतवणूक आणि लोकजागर अपेक्षित आहे ते या पद्धतीने. अनेकांच्या परिघासाठीचे ‘कंपास’ एकत्र जोडले गेले तरच नागरी विकासाचा मोठा परिघ तयार करता येणार आहे. वेगवेगळ्या ‘कंपास’ ला एकत्र जोडणारा सेतू हा ‘आम्ही जळगावकर’ या चळवळीतून उभा राहू शकतो.
‘आम्ही जळगावकर’ चे उद्दिष्ट, हेतू हे सुध्दा नागरी सेवा, सुविधांशी संबंधित छोट्या छोट्या समस्या, प्रश्न सोडविणे यांच्याशी असेच असतील. जसे स्वच्छतागृह बांधणे, शौचालय बांधणे, रस्ते दुभाजक टाकणे, चौकात पांढरे पट्ट टाकणे, कचरा कुंड्या देणे, चौकांचे-उद्यानांचे सुशोभिकरण. यातील एक-एक विषय हाती घेवून तो सोडविण्यापुरते श्रम, निधी संकलन आणि पूर्तता असे काम करता येईल. ‘आम्ही जळगावकर’ चळवळ ही प्रत्येक प्रभाग, वॉर्ड यातून सुरू करावी लागेल. यात मनपा, सरकार काही करेल, निधी देईल वगैरे विषय चर्चेला असणार नाही. जे काही करायचे ते लोकसहभागातून हाच एकमेव ‘नारा’ असेल. जळगावच्या नागरी विकासासाठी असा काहीसा वेगळा विचार करण्याची आज गरज आहे हे निश्चित!!
‘आम्ही जळगावकर’
जळगावकरांच्या दैनंदिन आणि सामुहिक वर्तनाच्या मनोवृत्तीचे तीन प्रतिक आहेत. पहिले बजरंगपूला खालची मनोवृत्ती, दुसरी पिंप्राळा किंवा दूध संघ रेल्वेगेटजवळची मनोवृत्ती आणि तिसरी फुले मार्केटमध्ये किंवा सागरपार्कवर अतिक्रमण करण्याची मनोवृत्ती.
बजरंग पुलाखालून केवळ पादचारी आणि दुचाकी वाहने जावू शकतात. जाणे-येणेसाठी पोल लावून बोगद्याची विभागणी केली आहे. तरीसुध्दा घाई करीत दुचाकी दामटणारे येथे रोज दिसतात. पादचारींना जावू द्यावे हा विचार कोणीही करीत नाही. अगदी काही सेकंदासाठी सुध्दा शिस्त न पाळणारी अशी मंडळी.
रेल्वेगेटजवळ नेहमी मनस्तापाची स्थिती असते. गेट बंद असताना दोन्ही बाजूने संपूर्ण रस्ताभर वाहने उभी असतात. गेट उघडल्यानंतर रस्ता ब्लॉक होणे हे ठरलेले. समोरच्यासाठी जागा सोडण्याची ईच्छा कोणाचीही नसते.
फुले मार्केट आणि सागरपार्कची जागा म्हणजे मुठभर मंडळींनी सार्वजनिक जागा मनमानी पध्दतीने वापरण्याचा मिळालेला परवाना आहे. शहरातील पाच लाख लोकांच्या गैरसोयीचा विचार न करता संघटना, झुंडशाही किंवा राजकीय पोळी शेकण्याच्या या हमखास जागा. या मनोवृत्तीत परिश्रमाने बदल करण्यासाठी हवी ‘आम्ही जळगावकर’चळवळ...

No comments:
Post a Comment