Saturday, 12 December 2015

पीक फेरपालटाची गरज

ळगाव जिल्ह्यात वर्षभरात कृषिचे तीन हंगाम शेतकरी घेतात. वारंवार एकाच पद्धतीचा पीक पॅटर्न राबविल्यामुळे जवळपास सर्वच शेतजमिनीत नत्र, स्फूरद, जस्त आणि लोहाचे प्रमाण खुपच कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी पीक पद्धतीत ‘फेरपालट’ करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.शासनाने सध्या शेतकर्‍यांसाठी शेत जमिनीतील मृदा पृथ्थकरणाचे प्रमाणपत्र मोफत देणे सुरू केले आहे. जळगाव जिल्ह्यात पहिल्यावर्षी ४० हजार मृदा नमुने तपासणीचे उद्दिष्ट आहे. त्यातुलनेत सध्या ११८ हजार नमुने तपासून प्रमाणपत्र संबंधीत शेतकर्‍यांना वाटप केले गेले आहे. मोफत नमुने पृथ्थकरणाचा कार्यक्रम तीन वर्षांचा आहे.
जिल्ह्यात जवळपास ४ लाख १० हजारच्या आसपास शेतकरी असून शेतजमिनीचे जवळपास १ लाख २१ हजार नुमने तपासावे लागणार आहेत. म्हणून राज्य सरकारने टप्प्या टप्प्याने तीन वर्षांचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे.

शेतकर्‍यांना सध्या दिलेल्या १८ हजार नमुने पृथ्थकरणाचा समायिक ढोबळ निष्कर्ष हेच सांगतो की, जिल्ह्यात खरीप, रब्बी व उन्हाळी हंगामात एकच पीक पॅटर्न शेतकरी दरवर्षी राबवित आहेत. त्यामुळे जमिनीतील मूलद्रव्ये व घटकद्रव्ये सातत्याने कमी होत असून मृदाचा पोत बिघडलेला आहे. मृदातील नत्र, स्फूरद जस्त व लोह कमी झाले आहे. यासोबतच पालाश, मंगळ आणि तांबेचे प्रमाण खुप वाढले आहे. त्याचा थेट परिणाम शेतमाल उत्पन्नावर होत आहे.

जास्त उत्पन्न काढण्यासाठी शेतकरी रासायनिक खतांचा भडीमार करीत आहे. हेही एक कारण जमिनीचा पोत बिघडण्याचे आहे. पीक पद्धतीत फेरपालट म्हणजे, नेहमीची पिके सोडून इतर पिकांचे उत्पन्न घेणे. तसे केल्याने जमिनीतील मूलद्रव्ये नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅश यासह सुक्ष्मद्रव्ये तांबे, मंगळ, जस्त आणि लोह याचे प्रमाण नियंत्रणात आणता येते.

पीक पद्धतीत फेरफार म्हणजे जास्त दिवसांचे पीक सलग घेण्याऐवजी मध्यंतरात कमी दिवसांते पीकही घेतले पाहिजे. यात तेलबिया, कडधान्ये किंवा डाळवर्गीय पिकांचा समावेश होतो. हे करीत असताना मातीचा पोत पूर्ववत स्थापित करण्यासाठी शेणखत, सेंद्रीयखत किंवा गांडूळ खताचा वापर करणे आवश्यक झाले आहे.

चार प्रकारे तपासणी
जळगाव येथे ममुराबाद येथे माती परिक्षण तपासण्याची कृषि विभागाची सरकारी प्रयोगशाळा आहे. तेथे ४ प्रकारची तपासणी होते सी माहिती जिल्हा मृदा सर्वेक्षण व मृदा चाचणी अधिकारी सचिन बर्‍हाटे यांनी दिली. ते म्हणाले, साधा नमुना तपासणी (३५ रुपये), विशेष नुमना तपासणी (२७५ रुपये), सुक्ष्म नमुना तपासणी (२०० रुपये) आणि पाणी नमुना तपासणी (५० रुपये) याप्रमाणे आहे. त्यात शेतातील मृदात कोणते घटक असतात व त्याचे परमाण काय याची माहिती मिळते.

मातीत कोणते घटक?
शेताच्या मृदात प्रमुख्याने ११ प्रकारचे घटक आढळतात.  कंसात त्यांचे अपेक्षित सर्वसाधारण प्रमाण. सामु (पीएच) (०.५ ते ७.५), क्षार (ईसी) (० ते १), सेंद्रीय कर्ब (ओसी) (०.४० ते ०.६०), स्फूरद (पी) (१४ ते २१), पालाश (के) (१५० ते २००), सोडियम (एनए) (५ ते १५), चूना (साएसीओथ्री)(२.५ ते ५.०), जस्त (झेडएन) (०.६१), लोह (एफई) (४.५), मंगल (एमएन) (२.०), तांबे (सीयू) (०.२)

No comments:

Post a Comment