Saturday, 26 December 2015

‘स’कार पर्वाचा प्रारंभ हवा!

एकनाथराव खडसे .....गुलाबराव पाटील
जिल्ह्याच्या राजकीय पटावर सहकार, सहाकार्य, सहमती, समन्वय,  सहयोग, सहभाग अशा ‘स’ कारात्मक पर्वाचा उदय व्हावा अशी अपेक्षा सर्वसामान्य लोकांपासून समाजातील विविध घटकांतील मान्यवरांकडून व्यक्त होत आहे. जळगाव जिल्ह्यातून विधीमंडळ आणि संसदेपर्यंत पोहचणारे राजकारण सध्या कॉंग्रेसमुक्त आहे. सत्तास्थाने भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या ताब्यात आहेत. अशा वातावरणात विकासाचे नवे माफदंड उभे करण्याचा प्रयत्न करण्याची जबाबदारी दोन्ही पक्षांच्या नेत्यांची आहे.Saturday, 19 December 2015

मॅरेथॉनचा ‘सेलेब्रिटी शिलेदार’

गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि अवघड मॅरेथॉनचे २१ किलोमीटरचे अंतर पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करण्याचे यश जळगावचे युवा आयकॉन तथा उद्योगपती किरण बच्छाव यांनी निश्‍चयाने साधले आहे. धावण्याच्या जगात जळगावचा पहिला ‘सेलेब्रिटी शिलेदार’ म्हणून त्यांची नोंद झाली आहे. यापुढे शक्य त्या मॅरेथॉनमध्ये धावायचे असे त्यांनी ठरविले आहे. साहसी खेळाच्या प्रकारात समावेश असलेल्या मॅरेथॉनच्या नव्या क्षेत्राकडे किरण बच्छाव यांनी इतरांचेही लक्ष वेधले आहे...
Saturday, 12 December 2015

गुलाबराव पाटीलको गुस्सा क्यों आता है ?

ळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या बहराचा काळ असताना गुलाबराव पाटील यांचे नतृत्व पुढे आले. रस्त्यावरचा आणि सतत लढाऊबाण्याने काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची बराचकाळ ओळख होती. लागोपाठ दोनवेळा आमदारकी मिळाली. मुंबईवार्‍या करणार्‍या गुलाबरावांनी मतदार संघातील विकास कामांसाठी मंत्रालयात कधी पाठपुरावा केला असे आढळले नाही. नंतर व्हायच्या त्या परिणामातून आमदारकी गेली. पाचवर्षे गुलाबराव राजकिय वनवासात होते. आता पुन्हा नशिबाने साथ दिली म्हणून गुलाबराव आमदार आहेत. राज्यातील सत्तेच्या सारीपाटात मंत्रिपदाची खूर्ची मिळण्याची संधी त्यांना दिसते आहे. पण, टोकाचा विरोध करून आणि हलके मुद्दे घेवून गुलाबरावांना साध्य काय करायचे आहे? हा खरा प्रश्‍न आहे. वारंवार बोलघेवडेपणा करून आपल्याच व्यक्तिमत्वाला खुजे ठरविणार्‍या गुलाबरावांना प्रश्‍न विचारावासा वाटतो, ‘गुलाबरावको गुस्सा क्यों आता है?’

पीक फेरपालटाची गरज

ळगाव जिल्ह्यात वर्षभरात कृषिचे तीन हंगाम शेतकरी घेतात. वारंवार एकाच पद्धतीचा पीक पॅटर्न राबविल्यामुळे जवळपास सर्वच शेतजमिनीत नत्र, स्फूरद, जस्त आणि लोहाचे प्रमाण खुपच कमी झाल्याचे निदर्शनास येत आहे. यावर मात करण्यासाठी शेतकर्‍यांनी पीक पद्धतीत ‘फेरपालट’ करण्याची नितांत गरज निर्माण झाली आहे.