Saturday, 26 September 2015

टगेगिरीला ‘टॅग’

राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिसर्‍या क्रमांकाचे पॉवरफूल्ल नेते अजित पवार सध्या अडचणीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात  विविध सरकारी-सहकारी संस्थांमध्ये काम करणार्‍या आजी-माजी पदाधिकार्‍यांनी केलेले आर्थिक अनियमीततेचे काही प्रकार समोर आले आहेत. ‘महानंद’ प्रकरणी दुग्ध विकासमंत्री एकनाथराव खडसे, सिंचन प्रकरणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि राज्य शिखर बँक प्रकरणी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चौकशीचे सत्र सुरू केले आहे. या चौकशांमध्ये अजित पवार यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नंतर दिसून येईल. तूर्त आरोपांच्या जंत्रीला म्हणजे, राजकारणातील ‘टगेगिरी’ला कायद्यांचा ‘टॅग’ लावण्याचा प्रकार सरकारने सुरू केला आहे.

Saturday, 19 September 2015

कृषि, सहकारातील अनेक बदलांचे संकेत

पीक वीमा योजनेत अनेक अडचणी होत्या. त्या विषयी सरकारकडेही अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सरकार लवकरच ‘सर्वंकश पीक वीमा’ योजना आणणार आहे. त्यात पिकाचा १२ महिन्यांचा विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे महसूल-कृषि, दुग्ध आणि मत्स्योत्पादन विकासमंत्री एकनाथराव खडसे यांना आज जळगाव येथे दिली. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ९९ व्या वार्षिक सभेत खडसे हे बँकेचे संचालक म्हणून सहभागी झाले. या सभेत विविध प्रश्‍नांची उत्तरे देताना आणि समारोपाचे भाषण करताना त्यांनी मोकळेपणाने अनेक विषय मांडले. त्यात सरकारच्या काही नव्या धोरणांचे सूतोवाच त्यांनी केले. काहीत बदल घडविण्याचाही उल्लेख केला.

काँग्रेसमुक्त जिल्हा !

चर्चा करताना दिलीप तिवारी (डाविकडे) भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ (उजविकडे)
धीकाळी सत्तेचा सुवर्णकाळ पाहणारी काँग्रेस (आय) आज जिल्ह्यात ‘गलीतगात्र’ झाली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘देशाला काँग्रेसमुक्त करा’ असे आवाहन भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांनी केले होते. ते आवाहन जळगाव जिल्ह्यातील मतदारांनी शब्दशः खरे करून दाखविले आहे. लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार अशा बहुतांश सत्ताकेंद्रातून काँग्रेस हद्दपार झाली आहे. याचे एकहाती श्रेय महसूल-कृषिमंत्री एकनाथराव खडसे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह सध्याचे भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांना जाते. जळगाव जिल्हा सध्यातरी काँग्रेसमुक्त असून स्व. प्रमोद महाजन यांनी दिलेल्या ‘शत प्रती शत भाजप’ घोषणेचा अनुभव येत आहे.