जळगाव महानगर पालिका, जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हा महसूल प्रशासन यांच्या कार्यपद्धतीवर काही प्रश्न निर्माण करणारी स्थिती सध्या आहे. पदावर व्यक्ती कोण आहेत? हा विषय महत्त्वाचा नाही. ‘लोकशाही चेहरा’ असलेल्या या तीनही प्रशासनातील ‘अवयव’ व्यवस्थित काम करीत नसल्याचे अनुभवाला येत आहे. म्हणूनच लोकशाहीच्या ‘दुसर्या प्रशासन’ या स्तंभाला ‘चौथ्या माध्यम’ या स्तंभाने हेे अनावृत्त पत्र लिहीले आहे...
मा. श्री. जळगाव मनपा आयुक्त,
मा. श्री. जळगाव पोलीस अधीक्षक
मा. श्री. जळगाव जिल्हाधिकारी
रामराम.
जळगावच्या माणसाचा नमस्कार म्हणजे रामराम. त्याचे उच्चारण थोडे मोठ्या आवाजात असते. भाषा सुद्धा ‘रफ’ वाटू शकते. अगदी अमेरिकेत रामराम म्हणणारा खान्देशी कोणीही ओळखू शकतो. म्हणजे, स्टोअरमधला सेल्समन सुद्धा, ‘आर यू फ्राम इंडिया?’ न म्हणता, ‘यू आर जळगावकर!’ म्हणतो. असो, विषयांतर नको.
पत्रातून काही विषय मांडण्यापूर्वी दासबोधातील ‘निस्पृहपणा’ या लक्षणातील २२ आणि २३ व्या क्रमांकांच्या लक्षणांचा येथे उल्लेख करतो. समर्थ रामदास म्हणतात, ‘अधिकाराप्रमाणे लोकांच्या हातून कार्ये होत असतात. अधिकार अंगी नसला तर ते कार्य व्यर्थ जाते. हे लक्षात आणून मनुष्याचे अधिकार-योग्यता आणि कर्तृत्व याची पारख करावी. अधिकार पाहून कार्य सांगावे. उद्योग किंवा व्याप पाहून विश्वास धरावा. आपले महत्त्व राखून कार्य करून घ्यावे.’
दासबोधातील निस्पृहता हे लक्षण कोणत्याही लोकप्रशासनाची मूळ कार्यपद्धती आहे, हे लक्षात घेवून काही दिवसांपासून आपणास पत्र लिहावे असे मनात घोळत होते. आज शनिवारी निवांत वेळ होता. वृत्तपत्रे वाचून आणि टीव्हीवरील बातम्या पाहून झाल्या आणि पत्र लेखन केले. आज काल पेपरमध्येही काहीही नसते. त्याच तुंबलेल्या गटारी, तेच खराब रस्ते आणि नागरिकांच्या त्याच तक्रारी. कुठेतरी लाच घेणारा अटकेत. कुठेतरी प्रशासन विरोधात आंदोलने. अलिकडे चोरीच्या घटनांच्या बातम्या वाचनाही सवय जडली आहे. अधुन-मधून वाळू माफियांच्या फूटकळ बातम्या असतात.एक मात्र, चांगली बातमी सुद्धा वाचली. जळगावची ‘गुड्डा-गुड्डी’ दिल्लीवारी करून आली. एकूणच जिल्ह्यात सारे ‘ऑल इज वेल’ आहे असे न बोलता-लिहता समजणारी ही स्थिती.
जळगाव मनपाचा आणि सामन्य नागरिकाचा रोज संबंध येत नाही. आयुक्त होण आहे? हे माहित नसले तरी सामान्य माणसाचे काहीही अडत नाही. सामान्य माणूस वर्षांतून एकदा सर्व प्रकारची करपट्टी भरतो. वर्षभर पुरेसे पाणी मिळेल, रस्ता स्वच्छ आणि प्रसंगी दुरूस्त होईल. कच्च्या गटारी किमान वाहत राहतील. रात्री घराजवळ अंधार असणार नाही. शहर स्वच्छ दिसले अशी माफक अपेक्षा सामान्य माणसाची असते. जळगावकर तर या पेक्षाही कमी अपेक्षा ठेवतात.
मात्र, गेल्या दोनवर्षांत जळगाव मनपा सामान्य माणसाला कोणत्याही मूलभूत सुविधा देवू शकलेली नाही. हे सूर्यप्रकाशाएवढे स्वच्छ आहे. आमची व्यापारी संकुले, चौक घाणींचे आगार झाले आहेत. खड्डे असेलेले रस्ते सर्वत्र आहेत. गटारी तुंबल्या आहेत. काजव्यांप्रमाणे पथदिवे आहेत. नळातून आले तर पाणी पुरवठा, पाईप फुटले तर पाणी टंचाई अशी स्थिती आहे. सारे ‘भगवान भरोसे!’
अर्थात, हा दोष एकट्या प्रशासनाचा नाही. तो तेथील राज्यकर्त्यांचाही आहे. तसे असले तरी मनपाशी संबंधित नियम-कायदे हे आयुक्तांना कर्तव्यपूर्तीसाठी विशेषाधिकार देतात. प्रशासन हे आयुक्तांच्या अधिनस्त काम करते. जेव्हा हे प्रशासन काम करीत नाही तेव्हा सामान्य माणूस कोण आयुक्त आहे? असा प्रश्न विचारतो. आज जळगावात हेच होते आहे. शहर आणि नागरिक वेठीस धरले गेले आहेत. राज्यकर्ते त्यांच्या धुंदीत असल्यामुळे आता लोकांचा संताप प्रशासनाच्याप्रती व्यक्त होत आहे.
प्रशासनाचीही दुसरी बाजू नक्कीच आहे. पण, जेव्हा प्रशासनातील अर्धा घटक वेतनाभावी ‘उपाशी’ आणि अर्धा घटक नियमित वेतनाच्या ‘तुपाशी’ असेल तर प्रशासनातही दोन गट पडतात. दुभंगलेले प्रशासन हे इतर कोणाशीही प्रामाणिक नसते. ते केवळ स्वार्थ आणि फक्त स्वार्थावर चालते. जळगाव मनपातील प्रशासनाची हिच स्थिती आहे. जळगाव मनपातही आता प्रशासनाचे तीन गट आहेत. एक आयुक्तांच्या बाजूने, दुसरा आयुक्तांच्या विरोधात आणि तिसरा लोकप्रतिनिधींच्या बाजूने. याला म्हणतात, ‘तिंगीस तिंगा’
या परिस्थितीतही आयुक्तांना धमकावण्याचा प्रकार होतो. हे एकून डोके चक्रावून जाते. या धमकीची चौकशी करण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क होते. दोन-दिवस सवाल-जबाब आणि चौकशीचा फार्स रंगतो आणि धमकी कोणी दिली, का दिली? हा प्रश्न अनुत्तरित राहतो. आरोपीच्या पिंजर्यात आयुक्तांसह जिल्हा पोलीस प्रशासनही उभे राहते.
पोलीस प्रशासनाचेही मनपा सारखेच चालले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक रूजू झाले तेव्हा त्यांना चोरट्यांच्या कारवायांनी सलामी दिली होती. अलिकडे तेच प्रसंग पुन्ही उद्भवले आहेत. मध्यंतरी सोनसाखळी चोरीचे प्रकार वाढले. गाड्यांच्या काचा फुटल्या. मारामार्या वाढल्या. काही मोहल्ल्यांमध्ये तणाव वाढले. गेल्या तीन महिन्यांत खुनाच्या घटना वाढल्या. भुसावळमध्ये तीन जणांचे खून झाले. गेल्या पंधरवड्यात रोज चोरी-दरोडखोरीच्या बातम्या आहेत. चाळीसगावला दरोडेखोरांनी एकाचा खून केला. हे सारे प्रकार ‘ऑल इज नाट वेल’ म्हणणारे आहेत. ‘पोलिसींग’ हा शब्द सध्या पोलिसांच्या कारवाईला वापरला जातो. ते कुठेच दिसत नाही.
जळगाव मनपाचे प्रशासन जसे दुभंगलेले आहे तद्वतच जिल्हा प्रशासन दुभंगलेले आहे. त्याच्या कहाण्या माध्यमांमधून प्रसिद्ध झाल्या आहेत. एक अधिकारी वरिष्ठ अधिकार्यावर अब्रू नुकसानीचा खटला करतो, कोणीतरी खंडणी मागितल्याची किंवा वरिष्ठांनी मिठाई दिल्याची ऑडीओ क्लिप सोशल मीडियात टाकतो, अधिकार्यांच्या पार्ट्या रंगल्याची चर्चा होते. हे सारे अस्वस्थ प्रशासनाचे प्रतिक आहे.
पोलीस प्रशासनात थोडे उलटे आहे. मनपाचा आयुक्त कोण? याच्या उत्तराने जसा सामान्य माणसाला फरक पडत नाही तसा पोलीस अधीक्षक कोण? या प्रश्नाच्या उत्तरामुळे मात्र, सामान्य माणसाला फरक पडतो. कारण, पोलीस अधीक्षकाच्या प्रतिमेवर पोलीसांची प्रतिमा ठरते. ती प्रतिमा म्हणजे ‘पोलिसींग’ असते.
क्राईम डिटेक्शनमध्ये अपयशी असलेले पोलीस प्रशासन क्राईम प्रिव्हेन्शनमध्ये चांगले काम करू शकते. कठोर व्यक्तिमत्व असलेल्या अधिकार्याचा दबदबा असला तरी लोकसंपर्क आणि अघळपघळ कार्यशैली असलेला अधिकारीही कामाचा ठसा उमटवू शकतो. आज या दोनपैकी कोणत्या पर्यायात पोलीस प्रशासनाला मोजावे हा प्रश्न आहे?
पत्राच्या प्रारंभी ‘लोकशाही चेहरा’ असा उल्लेख केला आहे. लोकशाही म्हणजे सर्व प्रकारच्या प्रशासनांचे मिळून तयार झालेले व्यक्तिमत्व. व्यक्तिमत्व चेहर्याने ओळखले जाते म्हणून लोकशाही चेहरा. जिल्ह्यातील लोकशाही चेहर्याचे अवयव जसे मनपा प्रशासन आणि पोलीस प्रशासन आहे, तसे ते जिल्हा प्रशासन सुद्धा आहे.
चेहर्याचे घटक नाक, कान, डोळे, मूख, दात, ओठ, जिव्हा असे सारेच आले. सर्वांत वरचा घटक म्हणजे मेंदू. प्रशासनाचा सर्वांत वरचा घटक म्हणजे जिल्हा प्रशासन. थेट वर्चस्व नसले तरी जिल्हा प्रशासन इतर प्रशासनांचे अप्रत्यक्ष नियंत्रण करीत असते. चेहर्याशी संबंधित कोणताही अवयव दुखावला की मेंदूला त्रास होतो. प्रशासनातही तसेच आहे. इतरांचा प्रभाव नसेल तर जिल्हा प्रशासनही ओळख हरवून बसते.
जळगाव जिल्हा प्रशासनाचेही तसेच होत आहे. महसूल अधिकार्यांच्यातही गटबाजी आहे. ती बेमालूम आहे. गेल्या सहा महिन्यांत महसूलशी संबंधित अनेक जण लाच घेताना सापळ्यात अडकले. माळू माफियांचे किस्से गाजले. कार्यालयात बिर्याणी पार्टी चर्चेत आली. सरकार म्हणते, ‘विनापरवाना वाळू वाहणार्यांवर कारवाई करू, त्यांचे वाहन जप्त करू.’ जळगाव जिल्ह्यात अशी कारवाई कुठे झाली आहे? वर्षभरापूर्वी जळगावचे तहसीलदारच वाळू वाहतुकीत भागिदार होते, अशी चर्चा होती. त्यांचा पार्टनर असलेल्या तलाठ्याचे नंतर निलंबनही झाले होते. मतदार यांद्यामधील घोळांचा मुद्दा मनपा निवडणूक, लोकसभा आणि त्यानंतर विधानसभा निवडणुकीत गाजला.
जिल्हा प्रशासनाने जळगाव शहरातील मूलभूत तक्रारींच्या विषयी मनपा प्रशासनाला खडसावले, जिल्हा पोलीस प्रशासनाला प्रतिबंधात्मक कारवाईसाठी सक्ती केली असे अजून तरी दिसलेले नाही.
नाही म्हणायला जलशिवार योजनेत महसूल विभागाने घेतलेला पुढाकार निश्चित कौतुकास्पद आहे. पण, त्याचवेळी जळगावच्या ‘गुड्डा-गुड्डी’ या एक साध्या फलकाचा प्रशासनाकडून केला जाणारा गाजावाजा, गवगवा निरर्थक वाटतो. एक साधा डिजिटल फलक मुलींची साक्षरता वाढविण्यासाठी कसा उपसुक्त आहे? हे कुठेतरी जिल्हा प्रशासन प्रमुखांनी समजून सांगावे. त्यातून कसे लोकप्रबोधन होते आहे? त्याचे रिझल्ट काय? यावर मूल्यांकन करावे.
खरेतर हे पत्र तीनही प्रशासनांवर टीका-टापणी करण्यासाठी लिहीलेले नाही. मुख्य कारण हेच की, लोकशाहीच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाची ओळख चेहर्याशी संबंधित घटक राज्यकर्ते आणि प्रशासन याद्वारे होते. उरलेले दोन घटक न्यायालय आणि माध्यम हे डावे-उजवे हात आहेत. चेहरा बिघडला की हात हरकत करतात. त्याचा प्रहार दुसर्यावर होतो किंवा कधीकधी स्वतःवरही आघात करावा लागतो. आज या पत्राची भूमिका कडक लक्ष्मीसारखी स्वतःवर आसूड ओढून घेण्याची आहे.
प्रशासन कसे असावे? हा सल्लाही या पत्रातून द्यायचा नाही. मात्र, संत तुकडोजी महाराज यांनी ग्रामगितेत ‘आचार प्राबल्य’ प्रकरणात लोकप्रतिनिधी व प्रशासनासाठी काही सूचना केल्या आहेत. त्या तेवढ्या मांडतो आणि पत्रही संपवतो.
धन्यवाद !
न्यायदेवता सिंहासनी बसवली, तीच अन्याय करून गेली
मग कैची सुव्यवस्था आली? सांगा सांगा
सत्संगतीसि पंडित बोलाविला, त्यानेच गावी कलह केला
शहाणा म्हणावा तोच निघाला, महामूर्ख जैसा
प्रसन्नतेकरिता ठेविले गायन, तेथे ऐकावे लागले रूदन
आपल्या पोटाची सोय व्हावी म्हणून, अडे ओरडे
घोडे शिकवाया आणला स्वार, तोचि पडला मोडोनि कंबर
कैसे बसतील मग इतर, घोड्यावरि
इमानदार म्हणोनि पाहिला धनी, त्यानेच केली बेईमानी
आता विश्वास ठेवावा कोणी, कोणावरि
मुले शिकविण्या ठेविला मास्तर, त्यानेच केला दुर्व्यवहार
शिक्षकासीच शिक्षणाची जरूर, ऐसे झाले
औषधि द्याया आणिला डॉक्टर, त्याने रोग्यासि दिले जहर
आता कोणी करावा उपचार? सांगा सांगा
ऐसे झाले आमुच्या गावी, सांगा काय व्यवस्था करावी?
कोणास हाक मारूनि घ्यावी, विश्वासाने.
(टीप ः कोणाचेही नाव समोर ठेवून हे पत्र लिहीलेले नाही. त्यामुळे ते कोणालाही टपालातून पाठविलेले नाही.)

No comments:
Post a Comment