(पत्रकाराच्या प्रामाणिकपणावर शंका नको)
गेले ३ दिवस अॅड.. उज्ज्वल निकम यांनी स्व. गोपिनाथ मुंडे यांच्याविषयी आदरातून केलेले आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्याशी संबंधित वक्तव्य "गोपिनाथ मुंडे यांच्यामुळे तरलो" हे सोशल मीडियात गाजते आहे. स्व. मुंडेंविषयी आदर व्यक्त करताना निकम यांनी स्व. बाळासाहेब ठाकरेंविषयी आक्षेप घेता येईल असे विधान केले आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातून वादग्रस्त अभिनेता संजय दत्तला बाहेर काढण्यासाठी स्व. ठाकरेंनी थेट माझ्यावर दबाव आणला आणि मी तसे करायला नकार दिल्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशींनी मला खटल्यातून काढायचे आदेश दिले. मात्र तेव्हा युती सरकारमध्ये गृहखाते सांभाळणारे स्व. मुंडेंनी मला तारले, असे निकम यांचे एकूण म्हणणे पोस्टमध्ये तपशिलाने प्रसिध्द झाले आहे.
आज स्व. बाळासाहेब किंवा स्व. मुंडे यावर भाष्य करू शकत नाहीत. पण निकमसाहेबांच्या वक्तव्यामुळे स्व. बाळासाहेब यांच्याकडे दोषाचे एक बोट जाते. अर्थात, याचा काय खुलासा करायचा तो ठाकरे कुटुंबिय मुखपत्र "सामनातून"करतील. परंतु स्व. बाळासाहेब आणि स्व. सुनिल दत्त यांचे राजकारणापलिकडे मैत्रिचे नाते होते. ते स्व. बाळासाहेबांनी आणि स्व. सुनिल दत्त यांनी उघडपणे स्वीकारले होते हे संपूर्ण देशवासियांना माहित आहे. स्व. दत्त यांच्या पश्चात स्व. बाळासाहेबांनी संजूबाबाला क्लिनचिट दिली होती आणि तशी वक्तव्ये माध्यमातून आली होती, हेही मुंबईकरांना माहित आहे. मात्र, अशा प्रकारच्या संबंधातून स्व. बाळासाहेब यांनी निकमांना मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातून बाजूला काढण्याचा आदेश दिला असेल हे मनाला पटत नाही. स्व. बाळासाहेब काही बोलले असतील इतपत समजू शकते. यावर ठाकरे कुटुंबाच्या खुलाशाची प्रतिक्षा आहे.
निकमसाहेब यांच्या वक्तव्याची पोस्ट २ दिवस व्हाट्स अॅप, ब्लॉग वरून फिरली. त्यावर काही प्रतिकूल प्रतिक्रीया आल्या. नंतर मुंबईचे टीव्ही माध्यमाशी संबंधित सिनिअर पत्रकार रफिक मुल्ला यांनी निकमांची बाजू घेत निकमांचा हवाला देवून खुलासा केला की, सोशल मीडियावरील त्यांच्या नावाच्या लिखाणाशी (स्व. मुंडे आणि स्व. बाळासाहेब संबंधी) निकम यांचा संबंध नाही; ते खोटे लिखाण आहे!! ठिकाणी विश्वासार्हता निकम आणि मुल्ला यांची पणाला लागत नाही. ती लागते ती वाद निर्माण करणारी पोस्ट लेखन करणाऱ्या पत्रकाराची. म्हणून त्या पत्रकाराची व त्याच्या लेखनाची माहिती घेतली तर लक्षात आले की तो पत्रकार प्रामाणिक आहे, निकमांचा मित्र आहे आणि निकमांच्या मुलाखतीची अॉडिओ असल्याचे तो सांगतो. येथे मी पत्रकाराच्या बाजूने उभा राहतो. कारण, प्रिंट मीडिया आणि तेथील पत्रकार उथळ नाही हे माझे ठाम मत आहे.
आता त्या पत्रकाराची थोडी माहिती घेवू. ती पोस्ट पुण्याचे पत्रकार घनश्याम पाटील (मो. 7057292092) यांची आहे. निकम साहेब मागिल महिन्यात ( मे २०१५) पुण्यात ४ दिवस होते. पाटील हे "साहित्य चपराक" हे अॉनलाईन मासिक प्रसिध्द करतात. त्यांच्याशी संपर्क केल्यावर ते म्हणाले, निकमसाहेब जे बोलले तेच छापले आहे. ते अजून काही इतरांविषयी बोलले ते नाही छापले. निकमसाहेब माझे मित्र आहेत. ते पुण्यात आमच्या पुस्तक प्रकाशनाला आले होते. ४ दिवस आम्ही सोबत होतो. तेव्हा सविस्तर मुलाखत घेतली आहे.
निकमसाहेब यांनी केलेल्या वक्तव्याची पोस्ट सर्वप्रथम दि. ३१ मेला सायं. ७.५३ ला दखलपात्र या स्वतःच्या ब्लॉगवर घनश्याम पाटील यांनी टाकली. ती पोस्ट २ दिवसात पसरली. नंतर पाटील यांनी हिच पोस्ट दि. १ जूनच्या चपराक या अॉनलाईन अंकाच्या पान २ वर प्रसिध्द केली. दै. लोकमतच्या अॉनलाईन अंकावरही ही पोस्ट दि. २ जूनला होती. त्यावर लोकांच्या प्रतिक्रियांचा अंदाज घेत निकमसाहेब दि. १ व दि. २ ला मोबाइलवर नॉट रिचेबल झाले. पाटील यांचे साहित्य चपराक हे मासिकही आहे. मेहनत घेवून दर्जेदार अंक अॉनलाईन ते प्रसिध्द करतात. आता मुद्दा असा की, पोस्टमधील मजकूर निकमांच्या वक्तव्यांचा आहे की पत्रकाराने कपोलकल्पित दिला आहे. यातील सत्य केवळ दोघांना म्हणजे निकमसाहेब व घनश्याम पाटील यांनाच माहित. मी काल दि. १ पासून निकमसाहेबांना खुलासा विचारायला १०/१२ कॉल केले. ते नॉट रिचेबल आहेत. मात्र, घनश्याम पाटील २० मिनिटे बोलले. माझा त्यांनी सांगितलेल्या सत्यावर आणि नेटजन्य विविध पुराव्यांवर विश्वास ठेवायला जागा निश्चित आहे.
निकमसाहेब यांचे स्व. मुंडे व स्व. बाळासाहेबांविषयीचे ते वक्तव्य "कसाबने बिर्याणी कधीच मागितली नाही पण मीच तसे बोललो" याच पध्दतीच्या प्रसिध्दीच्या डावपेचाचा भाग आहे. निकमसाहेबांना चर्चेत राहायला आवडते. यानिमित्त चर्चा सुरूही झाली. त्यांचा हेतू साध्य झाला. आता त्यांनी वक्तव्य नाकारून स्वतःपेक्षा पत्रकाराची विश्वासार्हता आणि प्रतिमा बिघडवू नये. जे काय घडेल ते स्वीकारावे, हाच सल्लामित्र म्हणून द्यायची इच्छा होते.
स्व. बाळासाहेब संजूबाबाला सपोर्ट करीत होते त्याचा तपशील...
बातमीचा भाग खाली वाचा...
Home » News » India
Why Sanjay Dutt lost Sena support post Bal Thackeray era
| Tue, Mar 26, 2013, 11:56 [IST]
Earlier in 1993 when Sanjay was arrested in connection with the Bombay blasts case, Bal Thackeray had openly supported him. Sanjay's lawyer Satish Maneshinde recalled how the then Sena supremo had called Congress leader and the them prime minister Narasimha Rao to get support for the son of a Congress MP - Sunil Dutt.
It is believed that the Dutts and the Thackerays have been sharing good rapport with each other ever since the latter had supported the former. Sanjay's sister Priya Dutt, who is currently a Congress MP from Mumbai, also acknowledges Bal Thackeray's open support to her family members during the crisis.
याच आशयाची दुसरी बातमी वाचा...
m.ndtv.com/india-news/shiv-sena-reverses-stand-on-sanjay-dutt-517254
Shiv Sena reverses stand on Sanjay Dutt
Story first published: Mar 25, 2013 14:56 IST
No comments:
Post a Comment