Wednesday 10 June 2015

मुस्लिमांनी योगा करावा की नाही ? (सुधारित)

मुस्लिम योग शिक्षिका काय म्हणते?
मुस्लिमांचा सूर्यनमस्काराला विरोधाच्या संदर्भात काही अनुकूल तर काही प्रतिकूल बाजू
(यात रागिब बहादूर यांनी एकेश्वर वाद स्पष्ट करीत सूर्य नमस्कार का नको? ही बाजू मांडली आहे)

हिंदू आणि मुस्लिमांच्या प्रार्थना व धर्माचरणात सूर्य व चंद्राचे पूर्वापार महत्व आहे.

हिंदू कैलेंडर चंद्रावर आधारित आहे.
मुस्लिमांचे पवित्र सण रमजान ईद चंद्रदर्शनावर आधारित आहे.

दोन्ही धर्मात अनेकवेळा चंद्र दर्शनावरून विधी-व्यवहार केले जातात. ही पूर्वापार परंपरा आहे.
इराणमध्ये नियमित योगा करणाऱ्या  मुस्लिम महिला   http://content.time.com/time/world/article/0,8599,1862306,00.html 
मुस्लिमांचे मूलस्थान वाळवंटी प्रदेशात आहे. तेथे सूर्य दिवसा आग ओकतो. त्यामुळे तेथील जनतेचे सण उत्सव शांत शितल चंद्र व तारेंवर अवलंबून आहे. म्हणून रात्रीचा चंद्र पाहून दुसऱ्या ईदची दिवशी नमाज होते. वाळवंटात दिशादर्शन चंद्र व तारे करतात.

भारत समशितोष्ण कटीबंधात म्हणजे सूर्याच्या समान वर्तनावर (ऊन, वारा, पाऊस सारखाच) अवलंबून आहे. म्हणून येथील लोकजीवन सूर्यावर आधारित आहे. सूर्य नमस्कार त्याचाच परिणाम. हिंदूचे दिशादर्शन सूर्य पूर्वेला उगवतो यावर असते. सूर्याचे उत्तरायण, दक्षिणायन हिंदुंसाठी महत्वाचे मानले जाते.

ही पार्श्वभूमि पाहता सूर्य व चंद्र हे लोकजीवनाचे प्रतिक आहे. धर्म चिन्हे आहेत. धर्म नाही. मात्र धर्र्मम पताकांवर ही चिन्हे आहेत.

सूर्य नमस्कार हे अध्यात्म (हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन), व्यायाम, एकाग्रता आणि तंदुरुस्ती याची शरिर क्रिया आहे. जो सूर्य नमस्कार करीत नाही तो हिंदू नसतो असे कोणीही म्हणत नाही.

किंवा या पूर्वी सूर्यनमस्कारचा वापर हिंदुंनी धर्केमांतरासाठी किंवा घर वापसीसाठी केला हे ऐकिवात नाही. त्यामुळे सूर्यनमस्काराला कोणाचाही विरोध हा खुळचट मुद्दा आहे.

चंद्राला मानणाऱ्यांनी सूर्यनमस्कार न म्हणता "चंद्र नमस्कार" म्हणावे आणि नमस्काराच्या मुद्रे ऐवजी हाताचे तळवे पसरून दुआची मुद्रा करावी. बौध्दीक व शारिरीक व्यायामाचा प्रकार समजावे.
--

राहिब बहादूर यांनी मांडलेली बाजू
जे अल्लाहने निषिद्ध मानले ते का करायचे?

(मुस्लिमांनी ‘‘चंद्र नमस्कार’’ करावेत या पोस्ट संदर्भात रागिब बहादूर यांनी मला प्रत्यक्ष भेटून मांडलेली बाजू)

रागिब बहादूर म्हणाले, इस्लाम एकेश्‍वरवादी आहे. ‘या इलाहा इलल्लाहु’ (अल्लाहशिवाय अन्य कोणीही ईश्‍वर नाही) अशी स्पष्ट शिकवण इस्लामची आहे. इस्लाम म्हणतो, ‘माझा धर्म मी पाळतो. तू तुझा पाळ.’ दुसर्‍याच्या धर्माप्रती आदर दाखविण्यासाठी दुसर्‍या धर्मातील कोणतेही कृत्य करणे हे अल्लाहने निषिद्ध मानले आहे. किंवा इस्लामची तत्वे सोडून दुसर्‍या धर्माशी संबंधित कोणतेही आचरण करायला इस्लमाने निषिध्द मानले आहे. तसे करणारा मुस्लिम नाही. त्यामुळे मंत्रोच्चारात सूर्यनमस्कार करण्याची पद्धती मुस्लिम स्वीकारूच शकत नाहीत.

आमचा सूर्य, तुमचा चंद्र अशी धारणा सुद्धा पूर्णतः चुकीची आहे. म्हणूनच ‘सूर्यऐवजी’ मुस्लिमांनी ‘चंद्र नमस्कार’ करा असे सूचविणे हा विचारही चुकीचाच आहे. अनेक मुस्लिम आरोग्यासाठी योगा करतात पण सूर्यनमस्कार ही धार्मिककृती असल्यामुळे ती करणे निषिद्ध आहे. किंबहुना तसे करणे जर इस्लाममध्ये नाही तर तसे करायला लावणे, तसे करा हे सूचविणे सुद्धा योग्य नाही.

इस्लाममध्ये केवळ आणि केवळ अल्लाह एकमेव सर्वोच्च स्थान आहे. तेथे राजा, मुल्ला, फकिर किंवा तथाकथित मोठी मंडळी यांनाही स्थान नाही. म्हणून कोणी सूर्य नमस्कार करीत असतील तर ते दुसर्‍या मुस्लिमांसाठी मुळीच आदर्श ठरत नाही. कारण जे अल्लाहने करायला नाही सांगितले ते दुसरा कोणी करतो म्हणून अनुकरण करावे असे मानणेहे पूर्णतः चुकीचे आहे.
नमाज कसा पढावा? या विषयी सुद्धा वाद-विवाद आहेत. त्यातील छोट्या गोष्टींवर वाद होतात. अशावेळी सूर्य नमस्कारात बदल करून ते करायचे हा मुद्दाही योग्य नाही. जे करायचेच नाही सांगितले ते बदल करून कसे स्वीकारा हा मुद्दा गैरलागू आहे. खरा मुस्लिम तसे करणार नाही. या उप्परही जे करतात त्यांच्या विषयी आक्षेप नाही. हीच खर्‍या मुस्लिमांची भूमिका आहे.
--
आता योगा समर्थनाची मुस्लिम संघटनांची कृती

योगाला मुस्लिम समाजाच्या ‘दारूल उलूम’ या संस्थेपाठोपाठ, बोहरा समाजानेही पाठिंबा दिला आहे. योग दिन हा भाजप किंवा मोदींचा कार्यक्रम नाही. तो भारतासाठी आहे. तसेच ज्या व्यक्ती सोनिया नमस्कार करतात, त्यांनी सूर्य नमस्कारावरून वाद घालू नये, असा घणाघात बोहरी समाजाचे नेते अब्बास अली बोहरा यांनी केला.

अब्बास अली बोहरी यांनी योगा दिनाला पाठिंबा असल्याचे जाहीर केले. मात्र  योगाला कोणत्याही धर्माशी जोडू नये. योगामुळे आरोग्य चांगले राहते. त्यामुळे त्यावरून राजकारण करू नये, असे अब्बास अली बोहरा यांनी म्हटले आहे. माझी सर्व मुस्लिम बांधवांना विनंती आहे की, योगाबद्दल कोणताही वाद न वाढवाता यामध्ये सहभाग नोंदवा असे आवाहन अब्बास अली बोहरा यांनी केले आहे.

भारताने योग दिनाचे नेतृत्त्व करावे, यासाठी एकत्र या. असे आवाहनही बोहरा यांनी केले. योग हा सर्वांनी एकत्र येण्याचा एक मार्ग आहे. योगाच्या नावावर हिंदुस्तानी मुस्लिम आणि हिंदू असा भेदभाव नको. त्यामुळे एकत्र या, असे आवाहनी बोहरा यांनी केले.

‘दारुल उलूम’चा योगाला पाठिंबा
‘योग दिवस’वरून मोदी सरकारवर काही मुस्लिम संघटनांसह विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. एकीकडे एमआयएमसारख्या पक्षाने योगाला तीव्र विरोध केला असताना, मुस्लिम समाजात मोठी समजली जाणारी ‘दारुल उलूम’ या संस्थेने मात्र योगाचे समर्थन केले आहे.
योग एक व्यायाम आहे. योगाला कोणत्याही धर्माशी जोडू नये. त्याविरोधात कोणीही फतवा जारी करू नये, ‘दारुल उलूम’ने म्हटले आहे. योगाचे समर्थन केले असले, तरी ‘दारुल उलूम’ने सूर्य नमस्काराला ठाम विरोध असल्याचे म्हटले आहे.

याशिवाय योग हा व्यायामाचा प्रकार म्हणूनच करावा, त्याचे राजकारण करू नये, असेही ‘दारुल उलूम’ने म्हटले आहे. तसेच २१ जून रोजी होणार्‍या योग दिवसासाठी कोणावरही जबरदस्ती करू नये, असे त्यांनी सांगितले आहे.

दारूल उलूम काय आहे?

दारूल उलूम मुस्लिमांना धार्मिक शिक्षण देणारी संस्था आहे. दारूल उलूम इस्लामच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध आहे. यांचे मुख्यालय उत्तर प्रदेशातील सहारनपूर जिल्ह्यातील देवबंद येथे आहे.

‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’चाही विरोध नाही

दुसरीकडे ‘मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड’चे खालिद रशीद फिरंगीमहली यांनी योग दिनाला विरोध नसल्याचे स्पष्ट केले आहे. जर योग दिन हा धार्मिक कार्यक्रम म्हणून न राबवता, कोणत्याही मंत्रोच्चार न करता आणि सूर्य नमस्कार न करता केल्यास, त्याला विरोध नाही, असे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने म्हटले आहे.

--
या विषया संदर्भातील इतर लेखांमधील काही संदर्भ देत आहे. त्या खाली लिंकही आहे. शांतपणे वाचा. मुस्लिम महिलेचे अनुभव आणि ती कोणत्या भूमिकेत योगा करते हे समजून घ्या.

इतर मुस्लिम राष्ट्रात योगाचे महत्व काय आहे. समजून घ्या.

Should a Pious Muslim Practice Yoga?
By Azadeh Moaveni Sunday, Nov. 30, 2008

In Iran, where cheerless clerics have inveighed against everything from poodles to the pants-tucked-into-boots look, yoga is popular enough to warrant its own magazines and the government has made no fuss (but thanks for bringing it to their attention, muftis of Malaysia!). Across the country, including religious cities like Mashhad, there are thousands of yoga classes held each week, and there is a class for every yogi : for children, the elderly, the overweight, the spiritual.

content.time.com/time/world/article/0,8599,1862306,00.html
--
अध्यात्म आणि शारिरीकक्रिया म्हणून करा

In the book al-Yoga wa’l-Tanaffus (yoga and breathing) by Muhammad ‘Abd al-Fattaah Faheem (p. 19), it says:
“Yoga in the sacred Indian language means union and contact with God, i.e., union between the body, the mind and God which helps man attain knowledge and wisdom and develops his thought by developing his knowledge of life; it protects him from sectarianism, religious fanaticism, narrowmindedness and shortsightedness when searching; it makes him live a life of contentment both physically and spiritually.”

In al-Mu‘jam al-Falsafi by Jameel Sulayba (2/590) it says:
“Yoga is a Sanskrit word which means union; it is used to refer to a kind of spiritual exercise that is practised by the wise men of India for the purpose of union with the universal spirit. Yoga is not a school of philosophical thought; rather it is an artistic way of doing some exercises that release the soul from physical and mental gravity and take it step-by-step towards reality. The Yogi is the wise man who practices this way.” End quote.

islamqa.info/en/101591

Islam Question and Answer
General Supervisor: Shaykh Muhammad Saalih al-Munajjid
Thu 24 Shb 1436 - 11 June 2015
--
क्या योग करने से कोई हिंदू हो जाता है?
विलियम क्रीमर
बीबीसी वर्ल्ड सर्विस
21 नवंबर 2013

योग की कक्षाओं में ज़्यादातर लोगों को इस बात की चिंता रहती है कि क्या वो सही ढंग से सांस ले रहे हैं या क्या उनके पैर सही दिशा में हैं. लेकिन कुछ लोग इस कश्मकश में रहते हैं कि क्या उन्हें इन कक्षाओं में आना चाहिए या कहीं इससे उनका धर्म तो भ्रष्ट नहीं हो रहा है?

अमरीका में रहने वाली एक मुस्लिम महिला फ़रीदा हमज़ा ने योग शिक्षक बनने का फ़ैसला किया और वो पिछले दो या तीन साल से योग कर रही हैं.

उदाहरण के लिए सूर्य नमस्कार शारीरिक क्रियाओं से संबंधित एक यौगिक आसन है, लेकिन यह हिंदू देवता सूर्य की आराधना से भी जुड़ा हुआ है.

फ्रेंच बताती हैं, "ये थोड़ा धार्मिक है, लेकिन ये आपके नज़रिए पर निर्भर करता है. अगर मैं चाहूं तो घुटने टेकने का मतलब प्रार्थना करना भी है और मैं ये भी सोच सकती हूं कि मैं तो सिर्फ झुक रही हूं."

www.bbc.com/hindi/india/2013/11/131121_yoga_class_concern_ap
--
रविवार, 25 अक्तूबर 2009
Mohammed Umar Kairanvi at रविवार, अक्तूबर 25, 2009

चाँद तारा का निशान हिन्दुस्तान में कैसे आया?

हिन्दुस्तान में चाँदतारा
हिन्दुस्तान के मुसलमानों ने चाँद तारे की परम्परा को मक्का या मदीना से आए धर्म प्रचारकों से नही ली बल्कि इसका स्रोत तुर्की कबीले रहे हैं।
पूरी दुनिया में जब इस्लामी हुकुमतों का दौर चल रहा था, तो उस वक्त हुकुमत करने वाले और इस्लम का प्रचार के लिए जिहाद करने वाले लोगों में फर्क करना बडा ही मुश्किल काम है।
पूरी दुनिया में तुर्क अपने वहशीपन के लिए मशहूर रहे हैं । अगर गौर करें तो भारत में आने वाले तुर्क सरदारों का असल मकसद इस्लाम का प्रचार नही था बल्कि उनका असल मकसद हुकुमत हासिल करना था ।

hamarianjuman.blogspot.in/2009/10/blog-post_25.html?m=1

वरील सर्व विवेचन व संदर्भ लक्षात घेवून जळगाव जिल्ह्यातील मुस्लिम विद्यार्थी- युवकांनी योगा/ कवाय/ व्यायाम प्रकार म्हणून योगदिनात सहभाग घ्यावा. यासाठी मुस्लिम नेत्यांनी समजुतदार भूमिका घेवून आवाहन करावे. जळगाव येथे पगारिया आटोने बाबा रामदेव यांचा वर्ग घेतला होता तेव्हा आमचे अनेक मुस्लिम मित्र कुटुंबासह योगा करीत होते आता त्यांनी योगदिनाच्या बाजूने उभे राहायला हवे.

(शेवटी सूर्यनमस्कार करावा किंवा नाही हा मुद्दा आपण व्यक्तिसापेक्ष ठेवू या.)

1 comment: