Sunday 21 June 2015

काका नॉनस्टॉप ७५ !!!

म्ही बापाला बापू म्हणतो. गांधींना बापू म्हणायचे म्हणून नव्हे. तर गल्लीतले बरेच बाप मुलांचे बापू होते. त्या मुलांच्या सोबत आम्ही राहाय म्हणून आमचे पप्पा सुध्दा बापू झाले. अर्थात, हे नाव लहान भाऊ शैलेशने प्रचलित केले. आज नेमका "योगा डे" असल्यामुळे मला बापूंची योगाविषयी आठवण सांगायला हवी.

Saturday 20 June 2015

योगाची जगभरारी

पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती स्वीकारून संयुक्त राष्ट्रसंघाने दि. २१ जूनला ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा करण्याचे जाहीर केले आहे. जगभरातील जवळपास १७७ देशांमधील कोट्यवधी नागरिक आज सामुहिकपणे विविध प्रकारची योगासने करून प्राचिन भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग  असलेल्या अध्यात्मिक, कायिक आणि मानसिक जीवनक्रियेला स्वीकारतील. योगाची ही ‘जगभरारी’ नवा इतिहास लिहीण्यास प्रारंभ करीत आहे.सुमारे सहा हजार वर्षांपासून योगाचे अस्तित्त्व आणि महत्त्व अधोरेखित करणारे उल्लेख भारताच्या अतिप्राचिन इतिहासाचे दस्तावेज असलेल्या वेद आणि इतर ग्रंथांमध्ये आढळून येतात. योगा आणि योगासनांचा प्रारंभ भारतात झाला की नाही? याविषयी मतभेद-विचार प्रवाह असू शकतात. मात्र, एक संदर्भ कोणीही नाकारू शकत नाही तो हाच की, भारताच्या प्राचिन गुरूकूल परंपरेत ‘योगा आणि योगासने’ ही अध्ययन तथा जीवनशैलीचा अविभाज्य भाग होती.

Friday 19 June 2015

लिमजी मोठाच होता...

लिमजीचा आणि माझा फार संबंध नाही आला. जैन उद्योग
समुहाच्या जैन हिल्सवर काही निमित्ताने भेट असली की तेथील  पीआरच्या गोतावळ्यात लिमजी हसमूख चेहऱ्याने नेहमी भेटायचा. त्याच्या हास्यामागे कधीही कोणताही हेतू नसायचा. पीआरमधील मंडळी तशी सहेतूक हसत असते. लिमजी तसा कधीही नव्हता. त्याचा आणि माझा संबंध तसा थेट आलाच नाही. पण, त्याच्या जाण्याचा निरोप राजूभाऊ नन्नवरेंकडून आला आणि बहुधा नंतर मी तो इतरांना दिला. केवळ हसमूख चेहऱ्यामुळे स्मृतीत राहीलेल्या लिमजीची जाण्याची बातमी मला चुटपूट लावून गेली.

Saturday 13 June 2015

हरणार्‍या लढाईचे शिलेदार

ईश्वरलाल जैन आणि मनिष जैन
ळगावच्या राजकारणात काही महिन्यांपूर्वी खासदार पिता-आमदार पूत्र अशी ईश्‍वरलाल जैन-मनिष जैन यांची ओळख होती. मुंबई ते दिल्लीच्या राजकारणात ईश्‍वरलाल जैन यांचा दबदबा आहे. मनिष जैन यांना अजून ओळख मिळालेली नाही. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत आणि जिल्ह्याच्या राजकारणात आज या पिता-पूत्रांची अवस्था ‘हरणार्‍या लढाईचे शिलेदार’ म्हणूनच झाली आहे.


विधानसभेच्या कामकाजात सुधारणा

महाराष्ट् विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे
हाराष्ट्र विधानसभेतील चर्चांमध्ये आमदारांचा सक्रिय सहभाग वाढवून सभागृहातील कामकाज संख्यात्मक आणि गुणात्मक पातळीवर सुधारण्याचे प्रयत्न आहेत. यासाठी सत्ताधारी पक्षांसह मित्र आणि विरोधी पक्षांच्या नेत्यांशीही सौहार्दपूर्ण संबंध निर्माण केले आहेत. गेल्या दोन अधिवेशन काळात सभागृहात रोज सरासरी साडेआठ तास काम झाले आहे. टप्प्या-टप्प्याने यात निश्‍चित गुणात्मक सुधारणा होत जाईल, असे स्पष्ट मत विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी मांडले.
 खासगी कार्यक्रमानिमित्त बागडे शुक्रवारी जळगावात आले होते. तेव्हा त्यांनी ‘तरुण भारत’ कार्यालयास भेट दिली. तेथे त्यांच्याशी विधानसभेतील कामकाजाविषयी चर्चा केली. त्यांनी इतरही काही मुद्दे स्पष्ट केले.
Wednesday 10 June 2015

मुस्लिमांनी योगा करावा की नाही ? (सुधारित)

मुस्लिम योग शिक्षिका काय म्हणते?
मुस्लिमांचा सूर्यनमस्काराला विरोधाच्या संदर्भात काही अनुकूल तर काही प्रतिकूल बाजू
(यात रागिब बहादूर यांनी एकेश्वर वाद स्पष्ट करीत सूर्य नमस्कार का नको? ही बाजू मांडली आहे)

हिंदू आणि मुस्लिमांच्या प्रार्थना व धर्माचरणात सूर्य व चंद्राचे पूर्वापार महत्व आहे.

हिंदू कैलेंडर चंद्रावर आधारित आहे.
मुस्लिमांचे पवित्र सण रमजान ईद चंद्रदर्शनावर आधारित आहे.

दोन्ही धर्मात अनेकवेळा चंद्र दर्शनावरून विधी-व्यवहार केले जातात. ही पूर्वापार परंपरा आहे.

Saturday 6 June 2015

अॅड. निकमांच्या प्रभावळीला ग्रहण

संपूर्ण जगभरात भारतीय फौजदारी कायद्याचे अभ्यासू आणि निष्णांत विधीज्ञ म्हणून ओळख असलेले अॅड उज्ज्वल निकम हे कधीकधी उत्साहाच्या भरात केलेल्या वक्तव्यामुळे ‘शाब्दीक वादांच्या’ भोवर्‍यात सापडतात. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना आपणच केलेली वक्तव्ये नाकारावी लागतात. असे प्रकार वारंवार घडल्याचे वर्तमान आणि इतिहासातील नोंदी पाहून लक्षात येते. प्रचंड लौकिक आणि लोकप्रियता असतानाही प्रिंट, वेब आणि लाईव्ह माध्यमांच्या आशयात ‘निकम खोटे बोलले’ किंवा ‘निकमने झूठ बोला’ अथवा ‘लॉयर निकम लाईज्’ अशा ब्रेकिंग न्यूज अलिकडे आल्या आहेत. ‘उज्ज्वल वलयांकित’ व्यक्तिमत्व असलेल्या निकमांच्या ‘प्रभावळीला’ या ब्रेकिंग न्यूज म्हणजे काही काळांसाठी ‘दोषांचा ग्रहणकाळ’ ठरतो. यापुढ असेे होवू नये याची काळजी स्वतः अॅड. निकम यांनाच घ्यायची आहे.
(वैधानिक इशारा - या लेखातील कोणताही आशय उपलब्ध वृत्तांकनांवर आधारित आहे. त्यातून अॅड. उज्ज्वल निकम यांचा अवमान करण्याचा हेतू मुळीच नाही)

Wednesday 3 June 2015

अॅड. उज्ज्वल निकम जे बोलले; तेच लिहीले...

(पत्रकाराच्या प्रामाणिकपणावर शंका नको)

गेले ३ दिवस अॅड.. उज्ज्वल निकम यांनी स्व. गोपिनाथ मुंडे यांच्याविषयी आदरातून केलेले आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्याशी संबंधित वक्तव्य "गोपिनाथ मुंडे यांच्यामुळे तरलो" हे सोशल मीडियात गाजते आहे. स्व. मुंडेंविषयी आदर व्यक्त करताना निकम यांनी स्व. बाळासाहेब ठाकरेंविषयी आक्षेप घेता येईल असे विधान केले आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातून वादग्रस्त अभिनेता संजय दत्तला बाहेर काढण्यासाठी स्व. ठाकरेंनी थेट माझ्यावर दबाव आणला आणि मी तसे करायला नकार दिल्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशींनी मला खटल्यातून काढायचे आदेश दिले. मात्र तेव्हा युती सरकारमध्ये गृहखाते सांभाळणारे स्व. मुंडेंनी मला तारले, असे निकम यांचे एकूण म्हणणे पोस्टमध्ये तपशिलाने प्रसिध्द झाले आहे.