आपत्तीत बचावतंत्र हिच जीवनशैली ः बांधकामात अद्यावत पद्धतींचा वापर
भूकंपाच्या आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न सध्या नेपाळ करीत आहे. भारतात किल्लारी (महाराष्ट्र), भूज (गुजरात) येथे झालेल्या भूकंपाच्या आठवणी आजही संबंधितांच्या मनात भीतीचा थरार जागवतात. मात्र, ज्याच्या नशिबी पाचवीला ‘भूकंप पूजला आहे’ असा जपान आतापर्यंत एक हजारावर भूकंपाच्या आपत्ती सहन करूनही प्रगत राष्ट्रांच्या रांगेत पाय रोवून उभा आहे. आपला देश भूकंप आणि ज्वालामुखीप्रवण क्षेत्रात आहे आणि त्यातून सुटकेचा कोणताही मार्ग नाही याचे पूर्णतः ज्ञान झाल्यामुळे जपानच्या नागरिकांनी भूकंपाच्या आपत्तीशी जोडून घेणारी जीवनशैली विकसित केली आहे. भूकंप आणि त्यानंतर त्सुनामीची पूर्वसूचना मिळणे, जिवीतहानी टाळून कमीत-कमी मालमत्तेचे नुकसान होणे आणि आपत्तीनंतरच्या राखेतून स्वबळावर उभे राहणे अशी ही जीवनशैली इतरांना प्रेरणा देणारी आहे
भूकंपानंतर उद्भवणारी अनेक आव्हाने नेपाळमध्ये आता आणि भारतासमोर पूर्वी कायम आहेत. त्यावर उपायांची केवळ चर्चा होते. कार्यवाही शून्य असते. मात्र, जपानने भूकंपाच्या आपत्तीवर मात करण्यासाठी अद्ययावत, सुधारित आणि पूर्वसूचना देणारी प्रणाली विकसित केली आहे. जपान हा पॅसिफिक महासागरात आशियाच्या पूर्व भागात द्वीपसमूह (बेट) स्वरुपात असलेला देश आहे. जपानच्या पश्चिमेस ओखोत्स्कचा समुद्र व पूर्वेस चीनचा समुद्र आहे. त्यापलिकडे चीन, दक्षिण कोरिया व रशिया हे देश आहेत. जपान ज्या भूभागावर वसले आहे तो भाग सर्वाधिक अशांत अशा टिक्टेनिक प्लेटचा (जमिनीखालील प्रतलाचे नाव) आहे. जपानला लागून कोणताही देश नाही. चारही बाजूंनी समुद्र आहे. एका बाजूने आशियायी प्लेट, दुसर्याबाजूने फिलिप्पीन प्लेट आणि तिसर्या बाजूने पॅसिफिक प्लेट आहे. हे चारही प्रतल नेहमी एकमेकात घुसण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे जपानच्या टिक्टेनिक प्लेटमध्ये बदल होवून भूकंप होतात किंवा ज्वालामुखी बाहेर पडतो. याशिवाय समुद्रात उठणार्या महाविक्राळ त्सुनामी लाटांचीही भीती असते.
आपल्या परिसरात नेहमी भूकंप होणार म्हटल्यावर जपानच्या भूगर्भशास्त्रज्ञ आणि हवामानशास्त्रज्ञांनी भूकंप, ज्वालामुखी आणि त्सुनामीविषयी पूर्वसूचना देणारे शास्त्र व तंत्र विकसित केले आहे. ते इतर देशांच्या तुलनेत भरवशाचे आणि विश्वासार्ह आहे. तेथील हवामानशास्त्र विभागाने देशाची विभागणी सहा प्रकारात केली आहे. त्याठिकाणी हवामान, जमिनीतील हालचाली निरीक्षणातून सतत नोंदली जाते. संकटाची कोणताही चाहूल लागली की अवघ्या तीन मिनिटांत (हे अविश्वसनीय असले तरी सत्य आहे) धोक्याची सूचना संपूर्ण जपानभर पोहचते. याशिवाय भूकंप आला की, त्याचे केंद्र, रिक्टर स्केलनुसार तीव्रता याचीही माहिती देशवासियांनी दिली जाते. ही माहिती देण्यासाठी दूरचित्रवाणी, आकाशवाणी, सोशल मीडिया याचा अत्यंत प्रभावीपणे वापर केला जातो. भूकंपाचा धोका कुठे आहे, त्सुनामी कशी येवू शकते, परिसरातील बचावाचे शेल्टर कुठे आहे? याची माहिती सर्व माध्यमे देतात. ही माहिती जनतेपर्यंत पोहचण्याचा कालावधी सुद्धा अवघा ६० सेकंद आहे. कोणत्याही माध्यमातून जनतेपर्यंत संभाव्य आपत्तीची माहिती पोहचत असली तरी काही ठिकाणी सार्वत्रिक सावधानता म्हणून लाउडस्पीकर सुद्धा लावले आहेत.
अशा प्रकारच्या आपत्तीतून कसा बचाव करावा ? याचे प्रशिक्षण प्राथमिक शाळांमध्ये मुलांना बालवयातच दिले जाते. भूकंप आणि त्सुनामीपासून बचाव हा विषय प्रात्यक्षिक कामाचा विषय म्हणून शिकवला जातो. हा तेथील शैक्षणिक प्रक्रियेचा आवश्यक भाग आहे. याशिवाय, जनतेला सतत बचावाचे नवे पर्याय शिकविण्यासाठी सरकारी यंत्रणा काम करीत असतात. भूकंपानंतर जीव वाचवायला कुठे जावे, कुठे थांबावे ? यावर प्रशिक्षणाचा भर असतो. कधीही भूकंप होणार हे गृहीत धरून तेथील इमारतींची बांधकामे आणि त्यासाठी वापरले जाणारे साहित्य हे मानवाची जिवीतहानी करणार नाही तसेच वित्त-मालमत्ता हानी कमी करेल असेच वापरले जाते. दरमहिना मॉकड्रील घेवून नागरिकांनाही घरे, कार्यालय येथे कसा बचाव करावा? याविषयी प्रशिक्षण दिले जाते. तेथील लोकही प्रशिक्षणात पहिलांदा सहभागी झाल्यागत वारंवार सहभागी होतात. तो सराव व्हावा म्हणून आणि भूकंप सांगून होत नाही हे सत्य समजून घेत ते सहभागी होतात. ‘हे तर आम्हाला येते’ असे कोणीही शहाजोगपणे म्हणत नाही. जपानमध्ये दरवर्षी १ सप्टेंबरला आपत्ती प्रतिबंधदिन साजरा केला जातो. त्यानंतर ५ सप्टेंबरपर्यंत सप्ताह साजरा होतो. आपत्तीपासून स्वतःच्या बचावाबरोबरच इतरांना मदत करा, जखमींना साहाय्य करा याचेही प्रशिक्षण दिले जाते.
जपानमध्ये पक्क्या इमारतीचे बांधकाम करताना भूकंप विरोधी तंत्राचा वापर केला जातो. भूकंप होताना जमीन हालते किंवा हादरते हे लक्षात घेवून हे तंत्र विकसित केले आहे. त्यात शक्तीशाली स्प्रिंग आणि गादीसारख्या हवेच्या सिलिंडरांचा वापर केला जातो. तसे केल्यामुळे भूकंपाच्यावेळी जमिनीला बसणारे हादरे स्प्रिंग आणि गॅस सिलिंडर सहन करतात. प्रत्यक्ष इमारतीला धक्का बसत नाही. याशिवाय उर्जा शोषून घेणार्या प्लॅस्टिक प्लेटांचा वापरसुद्धा केला जातो. ही प्लास्टिक प्लेट ‘मालफोरमेशन’पासून तयार केली जाते. ती प्लेट तापमान, धक्का अशी ऊर्जा शोषून घेते. जपानमधील बांधकामात वीटा, सिमेंटचा वापर जवळपास नसतोच. जपानकडे त्सुनामी विषयी विशासार्ह माहिती देणारी अद्ययावत यंत्रणा आहे. त्यानुसार त्सुनामीचे उगमस्थान, उंची, वेग, क्षेत्र याचा वास्तव अंदाज जनतेपर्यंत पोहचतो. या यंत्रणेसोबतच जपानने बचावाचे सोपे मार्गही शोधले आहे. जपानमध्ये अनेक ठिकाणी समुद्राच्या शेजारी किनार्यावर त्सुनामी विरोधी शेल्टर तयार केले आहेत. त्या ठिकाणी परिसरातील लोक आश्रयाला जातात.

पंतप्रधानाच्या हातात सूत्रे
जपानमध्ये आपत्तीच्या काळात सर्व सूत्रे पंतप्रधानाच्या हातात असतात. त्यांना त्या अधिकारांचे आणि लोकांच्या जिवीत व वित्त हानीचे भान असते. त्यामुळे ते अनेक अनुभवांच्या कसोटीवर निर्णय घेतात. जपानी माणसाची एक खासियत आहे, तो आपत्ती किंवा दुःखाच्या प्रसंगात जागतिक माध्यमांच्यासमोर रडत नाही किंवा सरकारी यंत्रणेविषयी नकारात्मक सूर लावत नाहीत. उलटपक्षी स्वतः कसे सावरलो, वाचलो हे आवर्जून सांगतात. आपत्ती ही आपल्यावर आहे आणि सरकार हे मदतीला आहे असा पक्का समज तेथील नागरिकांचा आहे. अशा आपत्तीतही जपानी माणूस आरोग्य, शिक्षण, उत्पन्न, व्यक्तिगत आयुष्य आणि सामाजिक स्थिती या विषयी ७६ टक्के समाधान, आनंद सकारात्मकपणे व्यक्त करतो.
No comments:
Post a Comment