Monday, 25 May 2015

हमारे ‘बापू’ की कहानी

(हमारे पिताजी तथा बापू श्री. केशवलाल तिवारी इनका आज दि. २५ मे २०१५ का जन्मदिन. उम्रके ७८ साल पुरे कर बापू ७९ वे सालमें प्रवेश कर रहे है. उनकेप्रति मेरी भावनाएँ)
दरणिय पिताजी तथा बापू आपको जन्मदिनकी बहुतसारी शुभकामनाएँ. हमारी माँ सौ. मनोरमा इनका जैसे ‘माँसे आई होनेका सफर’ रहा है वैसेही आपका ‘पिताजीसे बडेभय्या और बडेभय्यासे बापू होनेका सफर है’ लेकिन इतसप चर्चा फिर कभी करूंगा.
आपको जन्मदिनकी बधाई देनेके पहले आज सुबहसे मै सोच रहा था, गुजरे हुए २०-२५ सालोंमें आपने मुझे कब-कब दाटा? इस प्रश्‍नको लेकर मैं व्यक्तिगत तौरपर अस्वस्थ था. मनुष्य स्वभावकी विशेषता है, हम अपनोंकेसाथ गुजारेहुए अच्छेपल, या अपनोंका अच्छा-ममत्वभरा बर्ताव अल्प समयकेलिए याद रखते है, लेकिन किसीका दूर्रव्यवहार या गैरबर्ताव हम हमेशाकेलिए याद रखते है. इसप्रकारकी वेदनादायी याँदे बडीही तकलिफ देय होती है. वो स्वभावका ‘नासूर’ भी बन जाती है.

Saturday, 23 May 2015

अष्टावधानी अत्रेबाबा !

माणसाचे कर्तृत्व आणि चरित्र हे त्याच्या व्यक्तिगत आणि विविध क्षेत्रांतील यश-अपयशावर मोजले जाते. किंबहुना, अशाच निकषांवर व्यक्तिंचा चरित्राभ्यास करून त्यांचे मोठेपण समाजासमोर मांडले जाते. व्यक्ती मूल्यांकनाची ही सोपी पद्धत आहे. मात्र, जळगावचे स्व. ऍड. अच्युतराव वामनराव अत्रे यांचे चरित्र आणि व्यक्तिमत्व अशा निकषांच्या सीमा मोडून ओलांडणारे होते. महाराष्ट्रभर ‘अत्रेबाबा’ म्हणून नावलौकिक असलेेल्या ‘अत्रेसाहेब’ यांचे व्यक्तिमत्व मला ‘अष्टावधानी’ वाटते. प्रत्येक स्थितीच्या वास्तवाचे भान जपून आवश्यक आणि योग्य ती कृती करीत ते जगले. त्यांच्या वेगवेगळ्या ‘आठ अवधानांची’ दखल...

Saturday, 16 May 2015

मनपातील ‘विक्रम आणि वेताळ’

ळगाव महानगर पालिकेतील प्रशासन आणि लोकप्रतिनिधींची अवस्था ‘विक्रम आणि वेताळ’ कहाणीतल्या पात्रांसारखी आहे. यात कधी प्रशासन विक्रम असतो तर कधी वेताळ. कधी लोकप्रतिनिधी विक्रम असतो तर कधी वेताळ. जळगावकर मात्र आशाळभूतपणे दोघांकडे पाहात विचार करीत आहेत की, ‘कर्जरुपी वेताळाचे भूत’ मनपाच्या मानगुटावरून कधीतरी उतरेल आणि शहरातील किमान प्राथमिक सुविधांच्या विकासाचे मार्ग खुले होतील. या कहाणीत जळगावकरांची अवस्था ‘चक्रम’ अशीच आहे. मतदान करून प्रतिनिधी बदलून दिले तरी ‘भोग’ काही सुटत नाही आणि कहाणी काही संपत नाही...

Sunday, 10 May 2015

"माँ" का "आई" होनेका सफर...

मातृदिन आत्ममंथन (दि. १० मई २०१५)
मनोरमा और केशवलाल
मारी माँ इंदोरसे है. माँका पिहर नंदानगरमेंहै. वहाँपर स्व. राममूर्ती वाजपेयीका परिवार था. आजभी मामांओंका है. शायद मैं ७/८ वी कक्षामे था जबतक हरवर्ष गर्मीयोंकी छुट्टीयोंमें माँके साथ इंदोर जाया करता था. मेरे ३ मामा अशोक, गिरीश तथा बब्बू, मुकेश और ३ मौसी बेबी, अनिता और रेखा है. नानीजीभी है. माँसे छोटीवाली बेबीमौसीसे हमे ममत्व था. मौसी कभी कभार कही सिटीमेंजाए तो मुझे साथ लेकर जाती थी. मौसीकी भरकुँआवाली एक सहेली का किस्सा आजभी हसहसकर सुनाया जाता है. उमरमे लगभग साथवाली अनिता और रेखा मौसी थे. हम बहूतही मस्ती करते थे. नानी चिल्लाती थी. माँको बोलतीथी "बडीमुन्नी तेरे छोरे बडे बंड है. तेरा भाग्य कुछ अच्छा नही"

Saturday, 9 May 2015

"मविप्र"त परिवर्तनाची मुहूर्तमेढ

ळगाव जिल्हा मराठा विद्या प्रसारक सहकारी समाज संस्थेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज (दि. १०) जिल्हाभरात मतदान होत आहे. सर्वांत जुन्या आणि मोठ्या शिक्षण संस्थेत २४ वर्षांनी खुल्या वातावरणात मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. न्यायालयांच्या विविधस्तरांवर १०० पेक्षा जास्त लढाया लढून आजचा हा ‘परिवर्तन मुहूर्तदिन’ उगवला आहे. संस्थेच्या इतिहासात दि. १० मे २०१५ ही दिनांक सुवर्णाक्षरांनी नोंदली जाईल. कारण, जे कोणी पदाधिकारी निवडून येतील ते संस्थेला ‘भयमुक्त प्रशासन आणि गुणवत्तापूर्ण शैक्षणिक विकासाच्या वाटेवर’ घेवून जाणारे असतील अशी खात्री आहे. जिल्ह्यातील मराठा समाजातल्या प्रत्येक मतदाराने आज घराबाहेर पडून मतदानाचा हक्क बजावणे आणि परिवर्तनाच्या मुहूर्तमेढसाठी सज्ज असणे आवश्यक आहे.

नाथाभाऊंचा चेकमेट!

ळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या सर्व पक्षीय ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी १८ जागा जिंकल्या. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून चर्चेचे गुर्‍हाळ तब्बल महिनाभर सुरू होते. शिवसेना नेत्यांनी खडसेंसोबत जाण्याचा ‘तह’ करून टाकला. कॉंग्रेस नेत्यांनी बदलाचे वारे ओळखून लढाईतून ‘माघार’ घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही २/३ जागा देण्याची खडसेंची तयारी होती. मात्र, हट्टी आणि दुराग्रही नेत्यांमुळे निवडणुकीचा ‘फड’ रंगला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्या नेत्याने पक्षश्रेष्ठींचे हवाले देत निवडणूक लादली नंतर ते नेते प्रचारातून बाहेर राहीले. तसा ‘घरचा आहेर’ पक्षाच्या महिला नेत्यांनी जाहीरपणे दिला. अखेर  बँकेच्या राजपटावर सर्व विरोधकांना ‘चेकमेट’ करीत खडसेंचे पॅनेल बहुमताने विजयी झाले. राजकीय बुध्दीबळात सोंगट्या कितीही रंगाच्या असल्या तरी सर्व बाजूंचे राजे एकटे ‘नाथाभाऊ’ असल्याचे या निकालाने सिध्द केले. जिल्ह्यातील सहकाराला नवीदिशा देणारा आणि सत्ता वाटणीचा ‘नवा पटर्न’ निर्माण करणारा हा निकाल आहे. भविष्यात जिल्ह्यातील सहकार मोडीत-विक्रीत निघतो की उर्जितावस्थेत येतो हे काही काळानंतर दिसेल...

जिल्हा बँक अध्यक्षपदी रोहिणी खेवलकरच!

ळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ऍड. रोहिणी खेवलकर यांचीच निवड होणार हे निश्‍चित आहे. या बँकेत एकूण २१ पैकी १८ संचालक हे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार’ पॅनलचे निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्ष कोण होणार ही उत्सूकता असली तरी खडसे यांच्या कन्या आणि सहकार-शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या रोहिणी खेवलकर यांचीच या पदावर निवड होणार हे निश्‍चित आहे.

Sunday, 3 May 2015

हजार भूकंपाच्या अनुभवातून जपान डौलाने उभा !

आपत्तीत बचावतंत्र हिच जीवनशैली ः बांधकामात अद्यावत पद्धतींचा वापर
भूकंपाच्या आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न सध्या नेपाळ करीत आहे. भारतात किल्लारी (महाराष्ट्र), भूज (गुजरात) येथे झालेल्या भूकंपाच्या आठवणी आजही संबंधितांच्या मनात भीतीचा थरार जागवतात. मात्र, ज्याच्या नशिबी पाचवीला ‘भूकंप पूजला आहे’ असा जपान आतापर्यंत एक हजारावर भूकंपाच्या आपत्ती सहन करूनही प्रगत राष्ट्रांच्या रांगेत पाय रोवून उभा आहे. आपला देश भूकंप आणि ज्वालामुखीप्रवण क्षेत्रात आहे आणि त्यातून सुटकेचा कोणताही मार्ग नाही याचे पूर्णतः ज्ञान झाल्यामुळे जपानच्या नागरिकांनी भूकंपाच्या आपत्तीशी जोडून घेणारी जीवनशैली विकसित केली आहे. भूकंप आणि त्यानंतर त्सुनामीची पूर्वसूचना मिळणे, जिवीतहानी टाळून कमीत-कमी मालमत्तेचे नुकसान होणे आणि आपत्तीनंतरच्या राखेतून स्वबळावर उभे राहणे अशी ही जीवनशैली इतरांना प्रेरणा देणारी आहे

आव्हान नेपाळच्या पुनर्रउभारणीचे !

नेपाळसह उत्तर भारत हादरवून टाकणारा प्रलयंकारी भूकंप संपूर्ण जगाने दि. २५ आणि २६ एप्रिल २०१५ ला अनुभवला. पर्यटन क्षेत्रात देवभूमि असा लौकिक असलेल्या नेपाळमधील ८० लाख लोकांच्या घरा-दारांसह देवादिकांची मंदिरे-प्रार्थनास्थळे, ऐतिहासिक स्थळे भुईसपाट झाली. स्थावर व जंगम मालमत्तेच्या प्रचंड नुकसानीसोबत तेथील सामान्य लोकांच्या रोजी-रोटीचे बहुतांश आधार हिरावले गेले आहेत. शेजारचे आणि हिंदू बहुल राष्ट्र म्हणून भारत सरकारच्या यंत्रणेला तेथे सर्व प्रकारच्या मदतीसाठी धावून जावे लागले आहे. आपत्तीच्या खुणा बाजूला सारणे, अनपेक्षित संकटामुळे खचलेल्या नागरिकांमध्ये जीवन जगण्याची नवी उमेद पुन्हा जागविणे आणि टप्प्याटप्प्याने नागरी सुविधांची-गरजांची उभारणी करणे अशा तीन पातळ्यांवर नेपाळच्या पुनर्रउभारणीचे आव्हान जागतिक समुहापुढे असणार आहे. यात भारताची भूमिका ही ‘मोठ्या भावाची’ जबाबदारी म्हणून महत्त्वपूर्ण ठरेल.