Saturday 25 April 2015

वृत्तलेखन कार्यशाळेला लाभले "चार चाँद"

हम निकले साथमें और कारवाँ बनता-बढता गया
दिलीप तिवारी
 ळगाव जिल्हा पत्रकार संघ आणि जळगाव तरुण भारततर्फे दि.२३/ २४/ २५ एप्रिल २०१५ अशी ३ दिवस पत्रकार, लेखक, जाहिरातदार आदींसाठी मोफत कार्यशाळा झाली. यात मुख्य मार्गदर्शक म्हणून तरुण भारतचे मुख्य संपादक दिलीप तिवारी यांनी भाषा, शुध्द लेखन, वृत्तलेखन व पद्धती आणि लेखन कार्याशी संबंधित साधने यावर मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी ४५, दुसऱ्या दिवशी ३९ आणि समारोपाच्या दिवशी ४६ जणांनी सहभाग घेतला.मान्यवर डाविकडून राजेश यावलकर, दिलीप तिवारी, विजयबापू पाटील, भालचंद्र पिंपळवाडकर, अशोक भाटीया, गिरीश कुळकर्णी, श्रीकृष्ण जळूकर, डा. गोपी सोरडे, पांडुरंग महाले, विशाल चढ्ढा

तिवारी यांनी पहिल्या दिवशी बातमी लेखनाच्या गरजेपुरते शुद्ध लेखन, व्याकरण लक्षात ठेवण्याच्या सोप्या पध्दती, दुसऱ्या दिवशी वृत्तलेखनातील महत्त्वपूर्ण बाबी आणि तिसऱ्या दिवशी लेखन साधने, कैमेरा, मोबाइल, संगणक, पूरक साधने पेनड्राईव्ह, नेट कनेक्टर, यूएसबी क्वाड आदी विषयी माहिती दिली.

मार्गदर्शन करताना विशाल चढ्ढा

या वर्गात दुसऱ्या दिवशी दैनिक भास्कर जळगावचे संपादकिय प्रमुख विशाल चढ्ढा यांनी बातमी मूल्य, महत्त्व आणि पाठपुरावा या विषयी माहिती दिली.

मार्गदर्शन करताना भालचंद्र पिंपळवाडकर

समारोपाच्या दिवशी चार चाँद लागले. दैनिक सकाळचे संपादक भालचंद्र पिंपळवाडकर, आशा फौंडेशनचे प्रमुख गिरीश कुळकर्णी, दैनिक लोकशाहीचे संपादक राजेश यावलकर, पत्रकार संघाचे विश्वस्त विजयबापू पाटील, श्रीकृष्ण जळूकर, अशोक भाटीया, दिलीप शिरोळे उपस्थित होते.
पिंपळवाडकर आणि कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले.

इतरांचाही पुढाकार सुरू
कुळकर्णी यांनी दि. ५/६/७ मे २०१५ ला मोफत व्यक्तिमत्व
विकास शाळा घेण्याचे जाहीर केले. पिंपळवाडकर यांनी
त्याच्या पुढे वर्ग घेण्याचे घोषित केले. चढ्ढा यांनी सूचना
केली की, दर रविवारी चर्चात्मक वर्ग घ्यावा. त्यास
विजयबापू आणि भाटीया यांनी मंजुरी दिली. शेवटी
सर्वांनी फिडबैक दिला. कार्यशाळेत सहभागी सर्वांना
पत्रकार संघ आणि शिरोळे यांच्याकडून स्मृतीचिन्ह देण्यात
आले.

या कार्यशाळा आयोजनात योगेश शुक्ल, धन्यकुमार जैन,
अशोक भाटीया आणि रितेश भाटीया यांनी रोज लक्ष
घातले. सहभागी झालेल्या सर्वांनी फिडबैक मोबाइलवरून
दिला. हे वेगळे वैशिष्ट्य राहिले. सहभागी झालेल्यांपैकी डा.
गोपी सोरडे यांनी मनोगत व्यक्त केले. शेवटी गृप फोटो घेवून
समारोप झाला.

कार्यशाळेत सहभागी मंडळी काय म्हणतात ??

विशाल चढ्ढा (संपादकिय प्रमुख, भास्कर)
आज सुबह प्रिय मित्र दिलीप तिवारी सर की वृत्तलेखन
कार्यशाला प्रारम्भ हुई। अत्यधिक सकारात्मक व उत्साहित
वातावरण में 45 से अधिक भावी लेखक, पत्रकार मौजूद थे।
तिवारी सर को इस प्रभावी कदम के लिए अशेष बधाई,
शुभकामना।
आज जो मित्र कार्यशाला में नहीं जा सके, उन्होंने अगले दो
दिन कार्यशाला का लाभ अवश्य उठाना चाहिए। इंसान
कितना भी शिक्षित हो जाए, उसे हमेशा सीखने की भूमिका
में रहना चाहिए। कार्यशाला का नाम भले ही वृत्तलेखन से
जुड़ा हो किन्तु अनुभव किताबों से नहीं आते। यही अनुभव आज
सुनकर आनंद उठाया। धन्यवाद तिवारी जी। इस तरह के उपक्रम अनुभवी मित्रों ने सबके साथ बांटने चाहिए।
---
शेखर पाटील (साईमत संपादक)
मित्रांनो...दिलीप तिवारी साहेबांनी वृत्तलेखन
कार्यशाळेच्या माध्यमातून एक सकारात्मक पाऊल उललले आहे. तिवारी साहेबांसह विशालजी चढ्ढा आणि या उपक्रमात
सहभागी झालेल्यांचेही अभिनंदन. यात सहभागी
होण्यासाठी इच्छूक असणारे पिंपळवाडकर साहेब, बी. एन.
चौधरी सर, गिरीशजी कुळकर्णी यांचेही मनापासून कौतुक
करावेसे वाटते. मीसुध्दा यात सहभागी आहेच. एक वार नक्की
माझा...
---
मनोहर पाटील (जनसंपर्क प्रमुख, आरसी बाफना ज्वेलर्स)
पत्रकार मित्रहो नमस्कार !
गेल्या दोन दिवसांपासून तरुण भारतचे संपादक मा. दिलीपजी
तिवारी यांनी तीन दिवसीय "वृत्तलेखन कार्यशाळेचे"आयोजन
केले आहे. आज या कार्यशाळेचा दुसरा दिवस होता, माझा
मात्र पहिला. तिवारी साहेब आपला विषय पोट तिडकिने
समजवित होते. त्यांच्या सव्वा तासाच्या मास्तरकी नंतर
(मास्तरकी हा शब्द चांगल्या भावनेने वापरत आहे,अन्यथा हा
शब्द समाजात फुकटच्या पाटीलकीसाठी वापरात आहे) पण
तिवारी सरांची मास्तरकी खरच अशा वेळी कामात
आली, जेव्हा व्याकरणात काही नडल्या आडल्या प्रसंगी
कुणाला विचारावे ? हा प्रश्न असतो. एका दिवसात खूप
काही डोक्यात प्रकाश पडला असे मी म्हणणार नाही किंवा
तिवारी साहेबांनी ही तसा दावा केला नाही. परंतु एक
नक्की की त्यांची तळमळ बघून भविष्यात व्याकरण किंवा
लिखाणातील काही शंका विचारायला एक जागा अथवा
हक्काचे ठिकाण मिळाले आहे. जी व्यक्ती तीन दिवस
विनामूल्य या कार्याकरिता खर्ची घालत असेल त्यांना
आमच्या भविष्यातील भाषाशैलीतील त्रुटी दूर करण्यासाठी
आम्ही आवाज देवू तेव्हा आमची मदत करणे आता बंधनकारक आहे असे निदान मैत्रीच्या नात्याने तरी अपेक्षित आहे.
आजच्या कार्यशाळेत मा. विशालजी चड्ढा साहेबांनी
आपल्या 20 मिनिटांच्या संवादात तीन महत्वपूर्ण विषयावर
प्रकाश टाकला.त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा की
"पत्रकार को न्यूज सुंघते आना चाहिए" या उदाहरणाला सादर
करतांना त्यांनी गेल्या 9/10 वर्षापूर्वी खड्डयात पडलेल्या
प्रिंसच्या बातमी संदर्भातील उदाहरण देवून रिपोर्टरच्या
जागरुकतेचे उदाहरण दिले. रोज अपघातात किंवा इतर घटनेत
कित्येक लोक मरतात. एखादा व्यक्ती खडड्यात पडणे इतकी
विशेष घटना नसतानाही झी न्यूजच्या संबंधित रिपोर्टरने
वरिष्ठांना अनेक वेळा फोन करून बातमीचे महत्त्व कसे ? आणि
किती मोठे ? हे अनेक वेळा सांगितले आणि नंतर त्याबातमीचे
देशच नाही तर जगभराच्या बातमीपत्रात कसे महत्त्व राहिले, हे
सारे जग जाणते. थोडक्यात आणि कमी शब्दात आपला विषय
उपस्थितांच्या डोक्यात उतरविण्याचे प्रयोग तिवारी सर आणि चड्ढा सरांनी अवलंबविला.
मा. दिलीपजी तिवारी साहेबांच्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून कार्यशाळेला पुढे मा. पिंपळवाडकर साहेब, श्री. बी. एन. चौधरी सर आणि श्री. गिरीशजी कुलकर्णी साहेब अजून पुढे नेणार आहेत ही आनंदाची गोष्ट आहे. यानिमित्ताने आमच्या डोक्यात व्याकरण किंव्हा भाषाशैली किंव्हा इतर काही लेखन कौशल्य शिकण्याकामी अजून काही प्रकाश नक्कीच पडेल यात शंका नाही. आपली तळमळ प्रशंसनीय आहे.
---
चेतन वाणी (मुख्य बातमीदार, तरुण भारत)
जळगाव जिल्हा पत्रकार संघ आणि तरुण भारतच्या माध्यमातून
गेल्या 2 दिवसांपासून वृत्तलेखन विषयी आमचे मुख्य संपादक
दिलीप तिवारी सर मार्गदर्शन करीत आहेत. तीन वर्षांपासून
पत्राकारिता करताना काही शब्द अशुद्ध लिहण्याची सवय
लागली होती. परंतु आज दिलीप तिवारी सरांसोबतच दैनिक
भास्करचे संपादक विशाल चड्ढा सर यांनी देखील अनमोल
मार्गदर्शन केले. मी दोघांचा शतश: ऋणी असून उद्या नक्कीच
नविन शिकायला मिळेल..
----
देवेंद्र पाटील (पत्रकार)
सर,
आपण घेतलेली कार्यशाळा आमच्या सारख्या नवख्या
पत्रकारांसाठी उपयुक्त ठरली असून मला या कार्यशाळेतून
माझ्यात असलेल्या उणिवा दिसून आल्या आणि त्यावर मी
काम करेल.
----
अॅड. जमिल देशपांडे
श्री तिवारी साहेब..
3 दिवसीय कार्यशाळेमुळे मी लिखाण करायला प्रवृत्त
झालो. पहिला लेख तरुण भारत करिता लिहीणार...
दर माहिन्याला असा कार्यक्रम व्हावा ही विनंती..
धन्यवाद.
---
निलेश दौलत कोळी
Sir, Ya Karyashademudu mala Wruttalekhan, Grammar, Social Mediacha vapara baddalchi Mahiti Chhan Milali..........Dhanywad.
---
गोपी सोरडे (देशदूत)
तुम्ही घेतलेली कार्यशाळा केवळ कार्यशाळा नव्हे तर
पाठशाळा होती.
---
मनोज बोरसे
Mala ya karayashalet technical sadanachi vishesh mahiti
milali
---
कपिल सुभाष ठाकूर
सन्माननिय दिलीप तिवारी सर आपण ३ दिवसीय कार्यशाळेत
जे मार्गदर्शन केले ते आमच्या भविष्यासाठी खुपच महत्त्वाचे
ठरले, यासाठी खूप खूप धन्यवाद.
---
नितीन रमेश महाजन
सर आपण घेतलेली कार्यशाळा अतिशय छान. मराठी
वृत्तलेखनासंबंधी असलेले व्याकरण, वृत्तलेखन कसे असावे ?
याविषयी नवीन शिकण्यासारखे खूप काही मिळाले.
भविष्यातही आपले मार्गदर्शन असेच मिळावे हीच अपेक्षा.
धन्यवाद सर.
---
जयेश शिरसाळे (देशोन्नती)
तिवारी सर..... सर्वप्रथम आपले मनःपूर्वक धन्यवाद.
आपण घेतलेल्या तीन दिवसीय वृत्तलेखन कार्यशाळेत दिलेली
माहिती अतिशय महत्त्वपूर्ण होती. या माहितीमुळे मला
काही गोष्टी समजल्या असून आपण केलेले मार्गदर्शन हे
मला भविष्यात व पत्रकारितेत वाटचाल करण्यासाठी उपयुक्त
ठरणार आहे. धन्यवाद...सरजी

No comments:

Post a Comment