जळगाव येथे आयोजित दहाव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे
उद्घाटन दीपप्रज्वलन करुन करताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले. डाविकडून आयोजक फारुक शेख, डॉ. एस. एन.
लाळीकर, स्वागताध्यक्ष गफार मलिक, जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अशोक जैन,
कॉ. विलास सोनवणे, मुस्लिम मराठी सहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ.
इक्बाल शेख मिन्ने, संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आजम आणि इतर.
मुस्लिम लेखकांचे मराठी साहित्य हा विषय आजही अभिजात मराठीच्या व्यासपिठापासून कोसो दूर आहे. संत, दलित, विद्रोही, मराठी, ब्राह्मण, पुरोगामी, अस्मितादर्श, अंकुर अशा विविध साहित्य संमेलनांच्या स्वतंत्र व्यासपिठाची दखल कुठेना कुठे घेतली जाते. अभिजात साहित्य संमेनाच्या आयोजनात या विषयांशी संबंधित चर्चा, परिसंवाद तरी झडतात. मात्र, मुस्लिम लेखकांच्या मराठी साहित्यासाठी आजही मराठी साहित्य दरबाराच्या दाराबाहेरचीच जागा आहे. हे वास्तव आहे. बहुधा यामागे समाजावरील मुस्लिम द्वेषाचे व दुर्लक्षाचेही संस्कार हेच प्रभावी कारण असावे का ?
जळगावमध्ये शुक्रवार (दि. 18) पासून 10 व्या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनास उत्साहात प्रारंभ झाला आहे. तीन दिवसांच्या या संमेलनात मुस्लिमांच्या शिक्षणासह साहित्य प्रवाहातील विविध विचारधारा उलगडणारे परिसंवाद होत आहेत. संमेलन आयोजकातील काही मित्र जवळच्या संपर्कातील असल्यामुळे आणि त्यांच्या आग्रहाखातर संमेलनाच्या उद्घाटनाला जावून बसलो. मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे विद्यमान अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले करणार असल्यामुळे या संमेलनाच्या उघाटन कार्याक्रमात ते काय बोलतात ? हेही ऐकण्याची इच्छा होती. चिपळूण येथे नुकत्यात झालेल्या मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ साहित्यिक श्री. लक्ष्मण माने यांनी श्री. कोतापल्ले यांच्यावर केलेली जाहिर टीका लक्षात घेता, श्री. कोतापल्ले काही उत्तर देतात का ? या विषयी जाणून घेण्याची उत्सुकता होती. संमेलनस्थळी बसलेलो असताना मुस्लिम मराठी साहित्याविषयी फारशी माहिती आणि आस्थाही नव्हतीच.
उद्घाटनाच्या सत्राला उपस्थिती कमीच होती. मान्यवर म्हणून आलेल्या 15 - 20 जणांच्या पलिकडे ओळखीचेही फारसे लोक नव्हतेच. स्वागताध्यक्ष श्री. गफार मलिक यांच्या भाषणात गर्दीचा उल्लेख झालाच. ते म्हणाले, मी गर्दी आणू शकलो असतो पण, ती साहित्याशी संबंधित नसती. आम्ही राजकारणी वेगळीच गर्दी गोळा करतो. वातावरण तसे थोडे नरमच होते. वक्ते काय बोलतात तेवढे ऐकूया अशा सैल विचारांनी खुर्चीत सुस्तावलो होतो. मोबाईलच्या नेटवर मित्रांशी चॅटींगही सुरू होते. स्वागत सोहळा लांबल्यामुळे आळसही होताच.
मुस्लिम मराठी साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शेख इक्बाल मिन्ने यांनी संमेलन आयोजनाची माहिती प्रास्ताविकात देणे सुरू केले. तेव्हा थोडे कान टवकारले. मुस्लिम लेखकांचे मराठी आणि त्याची गरज याचा उहापोह ते करु लागले. तेव्हा विषय समजावून घेण्यासाठी मी सावरलो. मुस्लिमांचा आणि मराठीचा काय संबंध ? हा माझ्याही मनात असलेल्याला प्रश्नाचे उत्तर ते देत होते.
महाराष्ट्रात आलेल्या मुस्लिमांची मातृभाषा दख्खनी. ते महाराष्ट्रात थांबले. संपर्काची स्थनिक भाषा त्यांनी स्वीकारली. नंतरच्या काळात अरबी व्यापार्यांसोबत सुफी संत भारतात आले. त्यांनी तत्कालिन हिंदू धर्मग्रंथ समजावून घेतले. वेद- उपनिषदांचा अभ्यास केला. त्यांची स्वतःची एकेश्वराची विचारधारा त्यांना रुजवायची होती. त्यासोबत मैत्री, सद्भाव, बंधुभाव याचा संदेश द्यायचा होता. सुफी संतांनी एकेश्वराची कल्पना मांडताना इतरही सामाजिक विचारधारांची उकल केली. वेद- उपनिषदांच्या विचाराधारेत आणि त्यात काही प्रमाणात साम्य होते. विचारांच्या या देवाण घेवाणमध्ये सुफी संतांनी मराठी स्वीकारली. ती सुद्धा अभिजात मराठी. तत्कालीन मराठी संत रामदास, तुकाराम, स्वामी रामानंद आदीच्या विचारधारांचेही साम्य सुफी संतांच्या रचनांमध्ये दिसते किंवा त्यांच्या विचारांचा प्रभाव मराठी संताच्या रचनांमध्ये दिसतो. मुस्लिम आणि मराठीचा हा संबंध डॉ. इक्बाल शेख मिन्ने यांनी अत्यंत ओघवत्याशैलीत मांडला. प्रत्येक शब्द समजत असल्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करुन चालणार नव्हते.
विषय वळला मुस्लिमांच्या मराठी साहित्य निर्मितीकडे. कै. कवी कुसुमाग्रजांच्या कुठलाशा परिषदेतील वक्तव्याचा संंदर्भ त्यांनी दिला. कै. कुसुमाग्रज म्हणाले होते, महाराष्ट्रातील गुजराथी, मारवाडी, सिंधी, ख्रिश्चन मराठी बोलतात मात्र मुस्लिम मराठी बोलत नाहीत. या वक्तव्याने डॉ. मिन्ने दुखावले. ते स्वतः आणि त्यांचे काही मित्र केवळ मराठी बोलतच नसत तर त्यात कविता, कथा, ललित आदी मराठी साहित्य निर्मिती करीत. त्यामुळे त्यांनी एकत्र येवून कै. कुसुमाग्रजांना पत्र लिहून आपल्या भावना कळविल्या. हे ऐकत असताना मी मोबाईलवरील खेळ बंद केले. आता कान देवून नीटपणे सर्व ऐकू लागले.
बोलण्याच्या ओघात डॉ. मिन्ने यांनी त्यांच्या मुस्लिम मराठी साहित्य लेखकांच्या चळवळीचा 24 वर्षांचा प्रवास अत्यंत थोडक्यात सांगितला. या कालप्रवासात किमान एक हजारावर असे मुस्लिम साहित्यिक या व्यासपिठाशी जोडले गेले.
डॉ. कोतापल्ले यांच्या हस्ते या संमेलनाचे उद्घाटन का करण्यात येत आहे ? या मागील हेतूही त्यांनी सांगितला. ते म्हणाले, मुस्लिम लेखकांची मराठी साहित्य निर्मिती सातत्याने सुरू आहे. ते साहित्य दर्जेदार आहे. त्यात विषयांचे वैविध्य आहे. साहित्याच्या इतर प्रवाहाप्रमाणेच ते सशक्त आहे. असे असले तरी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दाराबाहेरच हे साहित्य आहे. आज या मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन आपण केल्यामुळे किमान अभिजात मराठी साहित्याचा दरवाजा थोडाफार किलकिला होईल...
हे सारे ऐकताना माझ्यातला पत्रकार सजग झाला होता. साहित्याच्या नव्या प्रांताची अनोळखी बाजू समोर येत होती. समजली नव्हती. तशी मानसिक बैठक नव्हती. अर्थातच, परंपरेमुळे. पत्रकार म्हणून मुस्लिमांचा संबंध नेहमी कुराण आणि बुरखा याच्याशी. नेहमी गुन्हेगारी, वाद- विवादांशी किंवा दंगलीशीच असतो हाच समज. कधीकाळी मी सुद्धा सच्चर समितीच्या आयोगावर चर्चा घडवून आणली होती. पण मुस्लिम लेखकांचा मराठी साहित्य प्रांत... हा विषय अछूतच होता...
डॉ. मिन्ने यांच्यानंतर कॉ. विलास सोनवणे बोलले. त्यांच्या भाषणाचा विषय हाही मुस्लिमांचे मराठी साहित्य आणि मुस्लिमांची सद्यस्थिती हाच होता. उद्घाटनसत्र असल्यामुळे त्यांना बोलायला वेळ कमीच होता.
मात्र, अत्यंत मोजक्या शब्दात त्यांनी त्यांची भूमिका मांडली. त्यांचा प्रत्येक शब्द धारदार होता. अनुभवाच्या कसोटीवर तासलेला होता. प्रत्येक मुसलनामाला आरोपींच्या पिंजर्यातून बाहेर काढणारा होता. श्री. सोनवणे गेली अनेक वर्षे मुस्लिमांमधील ओबीसींच्या संघटनेची चळवळ बळकट करीत आहे. त्यामुळे त्यांना मुस्लिमांमधील जाती- पोटाजाती, भेदाभेद तोंडपाठ. विविध समित्यांचे संदर्भ देत त्यांनी आजचा सामान्य मुस्लिम कसा पिडीत, मागास आहे याचे वास्तव चित्र उभे केले.
मुस्लिमांना भारतावारील आक्रमणकर्ते म्हणून नेहमी संबोधले जाते. हाच आजच्या समाजाचा माईंडसेट आहे. त्यामुळे मराठीचा आणि मुस्लिमांचा काय संबंध हाच प्रश्न सारेजण विचारतात. तो बदलायला हवा हे स्पष्ट करताना श्री. सोनवणे म्हणाले, बाबरीच्या पतनानंतर देशात मुस्लिमांच्याविषयी संशयाचे वातावरण होते. हिंदुत्त्ववादी प्रभावामुळे हा समाज गप्प होता. विशिष्ट विचारांच्या प्रभावाचे चक्र मुस्लिमांचे चित्र भारतद्वेष्टे असल्याचे बिंबवत होते. या विचारांना त्यांच्याच भाषेत आणि तेवढ्याच संयमाने उत्तर देण्याची गरज होती. म्हणूनच मुस्लिम मराठी साहित्य निर्मितीची चळवळ बळकट होत गेली. गेल्या 24 वर्षांत ती निश्चित वाढली असून सशक्त विचारांनी उभी सुद्धा आहे. अशावेळी इतरांनी त्यामागील कारणमिमांसा समजून घ्यावी.
डॉ. कोतापल्ले यांच्याकडे पाहून श्री. सोनवणे म्हणाले, मराठी साहित्यात अनेक प्रवाह आले. त्या सार्यांना अभिजात मराठीने सामावून घेतले. आदरही केला. मात्र, मुस्लिमांच्या मराठी साहित्याची अवस्था कधीकाळी गावकुसाबाहेर असलेल्या साहित्यापेक्षा वाईट आहे. त्यांच्यासाठी साधा दरवाजाही उघडला जात नाही.
हा संदर्भ अधिक स्पष्ट करताना श्री. सोनवणे म्हणाले, मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार 50 लाख देण्याचे मान्य करते. इतर प्रांत, प्रवाहाच्या साहित्य संमेलनांसाठी भरघोस देणग्या दिल्या जातात. पण, मुस्लिम मराठी साहित्य संमेलनासाठी राज्य सरकार दमडी देत नाही किंवा आमदार- खासदार निधीतून एक रुपया देत नाहीत. असू देत, गेली 24 वर्षे आमची चळवळ सुरू आहे आणि दहावे संमेलन जळगावमध्ये यशस्विपणे होत आहे.
अर्थात, उद्घाटनपर भाषणात श्री. कोतापल्ले या संदर्भातील काही मुद्यांना स्पर्श करतील अशी अपेक्षा होती. ती चुकीची ठरली. त्यांच्या भाषणातही मुस्लिम मराठी साहित्याला अभिजात मराठी संमेलनाचा दरवाजा बंदच राहिला. श्री. कोतापल्ले यांनी इतिहासाच्या चुकीच्या लेखनाचाच मुद्दा मांडला. मुस्लिमांसोबत सार्याच समाज घटकांचे चित्र यापूर्वी इतिहास लेखकांनी आपापल्या अधू चष्म्यातून द्वेषमुलक व आपापल्या कुवती प्रमाणे रंगविले. त्यात सत्य कथन कमी आहे किंवा त्याचा दूराभास आहे, हाच त्यांच्या म्हणण्याचा अर्थ होता. श्री. कोतापल्ले यांनी यापूर्वीही या विचारांची मांडणी वारंवार केली आहे.
खरेतर, श्री. कोतापल्ले यांच्या पुढाकारातून अभिजात मराठी साहित्य निर्मितीच्या प्रवाहात मुस्लिम मराठी साहित्यिकांचाही प्रवाह कसा सामावून घेता येईल ? यावर त्यांनी स्वतः भाष्य करायला हवे होते. तो मुद्दा सुटलाच. त्यांच्या भाषणातही मुस्लिम मराठी साहित्य दाराबाहेर राहिले.
कॉ. सोनवणे यांच्या भाषणाने माझ्या कानांत कडकडीत तेल ओतले होते. मी 24 वर्षे पत्रकारितेत आहे. अनेक लेखकांचे लेख प्रसिद्ध केले. मुस्लिम नेत्यांच्या प्रतिक्रिया वारंवार छापतो. मात्र, मुस्लिम लेखकांच्या साहित्याकडे लक्षच गेले नाही, हा स्वतःमधील आधा अधुरा मुद्दा ठळकपणे लक्षात आला. दुसर्या दिवशी (शनिवारी) संमेलनस्थळी कॉ. सोनवणे यांची भेट घेतली. त्यांना मनातील विचार थेट बोलून दाखविले. मलाही मुस्लिम मित्र आहेत. त्यांच्यात मी वावरतो. पण, तुम्ही मांडता तसा विचार मी कधीच केला नाही, असे प्रांजळपणे म्हणालो. त्यावर ते हसले. म्हणाले, तरुण मित्रा आधी स्वतःपासून विचार कर, मी मुस्लिम द्वेष्टा का आहे ? वास्तव विचार करशील तर तुला तुझेच उत्तर मिळेल. माझे लहानपण गावातील मुस्लिम तरुणांना मामा म्हणण्यात गेले. आईला तेच जवळचे नातेवाईक होते. पण, आज पारंपरिक विचारांच्या प्रभावाने 80 व्या वर्षी आईचाही माईंडसेट मुस्लिम द्वेष्टा झाला आहे. मी काय करावे ? तू सुद्धा स्वतःपासून विचार कर... गप्पांच्या ओघात त्यांनी अनेक उदाहरणे सांगितली. मराठी साहित्यांत खलनायकी पात्र मुस्लिमच का असते ? या प्रश्नाची रुखरुख निर्माण करणारी ती उदाहरणे... मी काही प्रश्न मनांत घेवून उठलो...कुठे तरी स्वतःच्या काही विचारांना बदलण्याची उमेद घेवून..
जैन उद्योग समुहाचा आधार
जळगावमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी मुस्लिम संमेलनाला जैन उद्योग समुहाने एक हाती प्रायोजकत्व दिले आहे. आयोजकांच्या मर्यादा होत्या. लोकप्रतिनिधींकडून फारशी मदत मिळाली नाही. सरकारी निधी नाहीच. बहुधा मराठी साहित्याच्या सेवेचा हा अप्रत्यक्ष लाभच जैन उद्योग समुहाला मिळाला. या संमेलनाचे नेटके संयोजन स्थानिक कार्यकर्ते श्री. फारुक शेख यांच्या नेतृत्वात इतरांनी केले आहे.

No comments:
Post a Comment