Wednesday, 15 April 2015

माझे चौथे आयुष्य...( अर्थात इंटरनेटवरचे सातबारा)

 भारतीय जीवनशैलीत माणसाचे आयुष्य तीन प्रमुख स्थितीत असल्याचे मानले जाते. ढोबळ मानाने विचार केला तर तो जगतो ते आणि जे इतरांना दिसते ते असे भौतिक अथवा ऐहिक हे पहिले आयुष्य. यात आपण इतरांसाठी कोण आहोत ? हे ठरवूनच माणसाची वागणूक सुरू असते. दुसरे आयुष्य म्हणजे माणसाचे अंतर्गत अथवा स्वतःशी असलेले वर्तन. आपण कोण आहोत ? हे पूर्णतः जाणून माणूस स्वतःशी वर्तन करीत असतो. तिसरे आयुष्य म्हणजे माणसाच्या मन, वृत्ती, प्रवृत्ती, स्वार्थ, लालसा, अपेक्षा, ईच्छा, लोभ, मोह, मद, मत्सर, क्रोध, ताप-संताप, आनंद, सुख, समाधान यावर नियंत्रण करण्यासाठी असलेली शरिरांतर्गत रसायन प्रणाली. एका आर्थाने हे माणसाचे सुक्ष्म आयुष्य. या आयुष्याला संयम, दृढता, निश्चय याचे बंधन घालण्यासाठी पर्यायी जीवनशैली असते ती यौगिक आयुष्य, अध्यात्मवादी आयुष्य किंवा माणसाची व्यक्तीगत छंदाची दुनिया. माणूस आतापर्यंत हे तीन आयुष्य जगत होता. आता माणसाचे चौथे आयुष्य सुरू झाले आहे.


ते म्हणजे आंतर महाजालाच्या यांत्रिक पोकळीत विस्तारलेले आभासी आयुष्य. म्हणजेच, Virtual life between syber space of internet and computers, smart phones devices. या आयुष्याच्या जागेला अभासी जग म्हणतात. या अभासी जगाचा विस्तार म्हणजे इंटरनेट व संगणकाशी संबंधित प्रत्येक प्रणाली (Application). या प्रणालीशी संबंध असलेल्या संगणकात माणसाच्या नावाने तयार होणारी कोणतीही फाईल अथवा फोल्डर. या प्रणालीशी संबंध असलेल्या इंटरनेटवरील ई मेल, फेसबुक, यु ट्यूब, ब्लाग, ट्विटर, लिंकेडीन अशा विशेष सेवा प्रणालीत असलेले माणसाचे आयुष्य. इंटरनेटच्या माध्यमातून होणारे सर्व आर्थिक व्यवहार हा सुध्दा अभासी जगात माणूस अस्तित्वात असल्याची वास्तव जाणिव करून देणारा प्रकार.

---------------------

कृपया इंटरनेटवरील खालील स्थळांना भेट द्या
ब्लाग - http://www.diliptiwari.com/?m=0


यू ट्यूब चैनल - https://m.youtube.com/?#/channel/UCdKzXMOjfaFRS1G2C189voA

ट्विटर - https://mobile.twitter.com/DilipKTiwari?p=
--------------------

अगदी थोडक्यात सांगायचे म्हणजे, इंटरनेटशी संबंधित कोणत्याही प्रणालीत आपण आपलेखाते (Account) सुरू करतो तेव्हा प्रथपरिचय देतो. हा प्रकार म्हणजे खरेदी खत नोंदणी करताना होणारा परिचय (Index) तयार करण्याचा प्रकार. मालमत्ता खरेदी झाली की, आपण सातबारावर आपले नाव लावतो. म्हणजेच तो आपला पत्ता (Address) म्हणून निश्चित होतो. तीच आपल्या अभासी आयुष्याची (Virtual Life) सुरूवात असते. त्यानंतर त्या मालमत्तेवर आपली बाह्य वागणूक आपल्याला मित्र, शेजारी, कुटूंब (Net Family) मिळवून देतात. या कुटूंबाला एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी जात, पात, धर्म, लिंग, भाषा, वय, आर्थिक पत, देश, दिवस-रात्र याच्या मर्यादा असत नाहीत. आहोरात्र २४ तास संपर्क सुरू असतो. तो सुध्दा सर्व बाजूने म्हणजे, दोघांचा दोघांशी, एकाचा अनेकांशी, अनेकांचा इतर  समुहाशी, समुहाचा दुसऱ्या समुहाशी आणि समुहांचा जन समुहांशी. अव्याहतपणे हे सुरूच आहे.

अभासी जगातील भारतीय लोकसंख्या
(सन २०१२ च्या संदर्भानुसार)
जगभरात आज अमेरिका, चीनपाठोपाठ भारतात इंटरनेटने जोडलेल्या लोकांचे प्रमाण जास्त आहे. ‘क्लेनर पर्किन्स कॉफिल्ड अॅण्ड बायर्स’ च्या २०१२ च्या सर्वेक्षणानुसार भारतात एकूण लोकसंख्येच्या ११ टक्के म्हणजे १३ कोटी ७० लाख लोकांकडे इंटरनेटची सुविधा आहे. १९९८ मध्ये इंटरनेटधारकांचे प्रमाण फक्त ०.१ टक्का होते. यावरून हे अभासी जग किती वेगाने विस्तारते आहे, याचा अंदाज येतो.  केंद्र सरकारच्या माहितीनुसार, देशात ९० कोटी मोबाइलधारक आहेत. त्यांनाही इंटरनेटची सुविधा घेणे शक्य आहे. ‘स्टॅट काउंटर डॉट कॉम’ यांच्या सर्वेक्षणानुसार २०१२ च्या उत्तरार्धात ५८.७८ टक्के मोबाइलधारकांनी इंटरनेट सेवेचा लाभ घेतल्याचे स्पष्ट झाले होते. थोडक्यात सांगायचे तर शहरी भागातील श्रीमंत- सुशिक्षितांपुरती मर्यादित असणारी इंटरनेट सेवा आता ग्रामीण आणि दुर्गम भागातील लोकांपर्यंत पोहोचत आहे.

अभासी जगातील मालमत्ता हक्क
माणूस इंटरनेटच्या पोकळीत आपले आयुष्य निर्माण करतो. त्यातून विविध प्रणालीत संपत्ती, मालमत्ता निर्माण होते. ती दृश्य, फोटो, व्हिडीओ, चित्र, लेखन, आलेख, चिन्ह, संकेत स्वरूपित असते. या मालमत्ते बाबत आपण आजही जागृत नाही. माणसाच्या मृत्यूनंतर या अभासी जगातील संपत्तीचे वारस कोण हा प्रश्न राहतोच. माणसाला डिजिटल संपत्तीच्या भविष्याबाबत गांभीर्य किंवा चिंता फारशी नाही. आपल्या पश्चात आपण इंटरनेटवर जमवलेल्या माहितीचे, दस्तावेजचे काय होणार ? याचा माणूस करीत नाही. बहुतांश लोक याबाबत गंभीर नसल्याचेच दिसते आहे. परदेशात मात्र यावर गंभीरपणे विचार केला जात आहे. या मालमत्तेच्या भवितव्याचा निकाल लावला जात आहे. मृत्यूपत्रात ज्याप्रमाणे घर, शेतीवाडी, बंगले अथवा अन्य प्रकारच्या इस्टेटीचा उल्लेख करतो, त्याप्रमाणे पासवर्ड-यूजरनेम अथवा अन्य सामग्रीचाही उल्लेख मृत्यूपत्रात
होऊ लागला आहे. गेल्या वर्षी ब्रिटनच्या गोल्डस्मिथ युनिव्हर्सिटी ऑफ लंडनने याविषयीचा एक रोचक अहवाल प्रसिद्ध केला होता. या रिपोर्टनुसार १० पैकी एक ब्रिटिश नागरिक आपल्या मृत्यूपत्रात फेसबुक आणि फ्लिकरसारख्या अनेक वेबसाईटस्च्या पासवर्डचा उल्लेख करतो आहे. कारण त्यामुळे त्याच्या मृत्यूनंतर संबंधीच्या आप्तगण किंवा त्याचे खास मित्र संचित डिजिटल सामग्रीचा वापर करू शकतील आणि या
कंटेंटचा दुरुपयोगही होणार नाही. डिजिटल सामग्रीच्या मृत्यूनंतरच्या वापरासंबंधीची आवश्यकता अमेरिकेत आता कळू लागली आहे.

डिजिटल मालमत्ता कशा प्रकारात असते ?
संगणक किंवा इंटरनेटची मालमत्ता बाईट्स आथवा पिक्सल प्रकारात असते. संगणकिय भाषेत ती बायनरी भाषेत म्हणजे शून्य किंवा एक (zero 0 and one 1) या प्रकारात नोंदली जाते. परंतू ही मालमत्ता कागदावर पुनर्निमित करताना बाईट्स अथवा पिक्सल स्वरूपात होते. बाईट्स किंवा पिक्सल म्हणजे थेंब. अती सुक्ष्म थेंब. याच थेंबातून आशय निर्माण होतो. थेंबाची भाषा विशिष्ट परिमाणात असते.  एक मेगा पिक्सेल म्हणजे 10 लाख पिक्सेल्स. किंवा एक मेगा ईट म्हणजे एक हजार केबी. यावरच इंटरनेट वापराची मर्यादा, गती, जागा ठरते.

डिजिटल संपत्ती जतन करणे
संगणकातील डिजिटल संपत्ती जतन करणे हाही एक मालकी हक्काचा मुद्दा आहे. सध्या याचे पारंपरिक मार्ग सीडी, हार्ड डिस्क, पेन ड्राईव्ह आहेत. अती वेगात निर्माण होणाऱ्या माहितीला साठविणे, ती जतन करणे यासाठी ही जागा पुरेसी नाही. म्हणूनच डिजिटल प्रिझर्वेशन संकल्पनेवर सध्या प्रयोग सुरू आहेत. संगणकातील रेकॉर्ड तांत्रिक स्वरूपात चिरकाल
ठेवण्याची सुविधा, म्हणजे डिजिटल प्रिझर्वेशन. इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स किंवा जन्मजात डिजिटल डाटा दीर्घकाळ जतन करणे हे नवे आव्हान असून, ही माहिती दीर्घकाळ जतन करण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचे प्रयोग सीडॅक संस्था करीत आहे.

No comments:

Post a Comment