Saturday, 25 April 2015

‘पेपर रद्दी’च्या बदल्यात ‘नव्या वह्या’

आनंद पब्लिकेशन्सचा उपक्रम ः देशभरात युवकांची साखळी जोडणार



र्यावरण रक्षण आणि समाजसेवा या दुहेरी उद्देशातून जळगावच्या आनंद पब्लिकेशन्सच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘रद्दी द्या’ नव्या कोर्‍या ‘नेचर फ्रेंडली वह्या घ्या’, हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. सध्या हा उपक्रम पुण्यात सुरू असून तेथे प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ही माहिती आनंद पब्लिकेशन्सचे जितेंद्र कोठारी यांनी दिली.


या उपक्रमात रद्दीच्या बदल्यात दर्जेदार ‘आनंद नोटबुक्स’ विद्यार्थ्यांना दिल्या जात आहेत. या उपक्रमासाठी पुणे शहर निवडण्याचे कारण कोठारी यांनी सांगितले की, हे ऐतिहासिक शहर पराक्रमी छत्रपती शिवरायांचे आहे. पुणे जिल्ह्यातूनच महाराजांनी स्वराज्याचा एल्गार सुरू केला. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंनी शिक्षणाचा जागर तेथूनच सुरू केला. पुण्यात जे यशस्वी ठरते ते भारतात यशस्वी होते. म्हणून आम्ही पुण्यातून उपक्रम सुरू केला.  पुण्यात महाराष्ट्र सहकारी मुद्रणालयाच्या सहकार्याने हा उपक्रम राबविला जात आहे. पुणे महानगरपालिकेनेही सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी या उपक्रमात सहभागासाठी पत्र दिले आहे.
पुण्यात महापालिकांच्या शाळांमध्ये  दि. १३ एप्रिलपासून ३० एप्रिलपर्यंत रद्दी स्वीकारण्यात येणार आहे. रद्दीचे
विद्यार्थी, पालक, महिला, शिक्षक, प्राध्यापक, डॉक्टर, इंजिनिअर, सर्वसामान्य नागरिक, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संघटना, उद्योजक या सर्व घटकातून या अफलातून उपक्रमाचे कौतुक होत आहे. हा उपक्रम आमच्या शहरात सुरू करा, अशी मागणीही केली जात आहे. या प्रतिसादामुळे काही स्वयंसेवी संस्थांना (एनजीओ) सोबत घेण्याचा विचार आहे, असे कोठारी म्हणाले.
इलेक्ट्रॉनिक काट्यावर वजन करुन त्याचे कूपन विद्यार्थ्यांना किंवा पालकांना देण्यात येत आहे. शाळा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना वह्या देण्यात येतील. पहिल्या दोन दिवसांतच या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. दोन दिवसांत विद्यार्थ्यांनी तब्बल साडेसहा हजार किलो रद्दी जमा केली व वह्यांची कुपने घेतली. या उपक्रमात कोणताही आर्थिक व्यवहार होणार नसून रद्दीच्या मोबदल्यात दर्जेदार वह्या हीच देवाण-घेवाण असेल.

कुठेही संधी देणार

महाराष्ट्रातच नाही तर भारतात कुठेही जाण्याची तयारी असलेल्या युवकांसाठी हा उपक्रम सुवर्णसंधी आहे. यात सहभागी होऊ इच्छिणार्‍या स्वयंसेवी संस्था आणि तरुणांनी खालील पत्त्यावर आपली माहिती संपूर्ण तपशीलासह कळवावी. जळगाव शहरातही लवकरच हा उपक्रम सुरू होणार आहे. 
संपर्कासाठी पत्ता ः आनंद पब्लिकेशन्स, पत्ताः ३७६, जयकिसनवाडी, जळगाव.

No comments:

Post a Comment