Friday, 3 April 2015

इंटरनेट वापरणार्‍यांचे "123456'' वर प्रेम

'इंटरनेट'च्या मायाजालमध्ये प्रवेश व त्याच्या वापरासाठी पासवर्ड (सांकेतांक) हा महत्त्वाचा घटक. त्याच्याशिवाय संगणकीय किंवा नेट यंत्रणा हाताळता येत नाही. जेवढी माणसं त्यापेक्षा जास्त त्यांचे पासवर्ड. इंटरनेट वापरणारे कोट्यवधी ग्राहक आणि त्यांचे कोट्यवधी सांकेतांक. मात्र, यापैकी लाखो लोकांचे सांकेतांक हे सारखेच तयार होत असल्याचे लक्षात येत आहे. सोपा आणि लक्षात राहणारा "पासवर्ड' हवा या हेतूने तयार केले जाणारे अंक- अक्षर समुह नेहमीच्या वापरातील असल्याचे जगभर केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट होत आहे. जगभरात इंटरनेट वापरणारे सर्वाधिक ग्राहक "123456' या अंक समुहाचा पासवर्ड म्हणून वापर करतात असे लक्षात आले आहे. त्याची ही दखल...


इंटरनेटचा वापर व्यक्तीगत, संस्था किंवा समुह पातळीवर झपाट्याने वाढतो आहे. जगभराची लोकसंख्या सन 2008 अखेरीस 610 कोटी 29 हजार एवढी गृहीत धरल्यास त्यापैकी158 कोटी 15 लाख 71 हजार लोक इंटरनेटचा वापर करीत असल्याचे सर्वेक्षणानोंदले गेले आहे. इंटरनेट वर्ल्ड स्टॅट डॉट कॉमतर्फे हे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यातील 41.1 टक्के इंटरनेट ग्राहक हे आशिया खंडातील आणि उर्वरित 58.9 टक्के हे उर्वरित खंडातील आहेत. भारताचा समावेश आशिया खंडात असून त्यात इंटरनेटचा सार्वधिक वापर असणाऱ्या टॉपच्या दहा देशांमध्ये प्रथम क्रमांकावर चीन (लोकसंख्येच्या 22 टक्के वापर), द्वितीय क्रमांकावर जपान (73.8 टक्के वापर) आणि तृतिय क्रमांकावर भारत (अवघा 7.1 टक्के वापर) यांचा समावेश आहे. त्याखालोखाल इतर देश येतात. हॉंगकॉंग, साऊथ कोरिया, मलेशिया, सिंगापूर, तैवान, आदी ठिकाणचे इंटनेट वापराची टक्कवारी 69 ते 70 टक्के आहे. ही सगळी आकडेवारी लक्षात घेता इंटरनेट हे कशा प्रकारे वाढणारे मायाजाल आहे ? त्याची कल्पना येते.

इंटरनेट वापरासाठी मुलभूत गरज अत्याधुनिक प्रणालीचा संगणक आणि त्या सोबत ब्रॉडबॅंण्ड कनेक्‍शन ही असते. त्यानंतर इंटरनेटवरील मायाजालात प्रवेशासाठी कुठल्यातरी सर्च इंजिनचे (गुगल, याहू, रेडिफ या सारख्या) सभासद व्हावेलागते. इंटरनेट कायम हाताळणीसाठी (साईन इन करण्यासाठी) वापरणाऱ्याचे नाव (यूजर्सनेम)व सांकेतांकची (पासवर्ड) रचना करावी लागते. अशा प्रकारची नोंदणी करणे म्हणजेच इंटरनेटवरील मुसाफिरीस प्रारंभ करमे होय. इंटरनेट वापरणाऱ्यांची जगभरातील आकडेवारी जेव्हा आपण पाहतो तेव्हा वाटते की, संबंधितांचे सांकेतांक किता विभिन्न रचनेचे राहत असतील ? तसे असतेही. सांकेतांक तयार करण्यासाठी 1 ते 0 अंकांचा आणि ए टू झेड या अक्षरांचा तसेच की बोर्डवरील काही चिन्हांचाही वापर करता येतो. त्यामुळे सांकेतांक तयार करण्याच्या शक्‍यशक्‍यता वाढतात. परंतु, सांकेतांक सोपा असावा सहज लक्षात असणारा असावा या हेतूने केलेली अक्षरांची रचना सर्वसमान्य होवू पाहत आहे. त्यातूनच संगणकीय सेवा- सुविधेत गैरप्रकार करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तींची संख्या वाढते आहे.

"व्हाट्‌समायपास डॉट कॉम' या संस्थेने पासवर्ड रचनेच्या संदर्भात 34 हजार इंटरनेट ग्राहकांच्या केलेल्या सर्वेक्षणात अनेक धक्कादायक निष्कर्ष समोर आले आहे. त्यातील पहिला निष्कर्ष असा की, "123456' हा शब्द समुह सांकेतांक म्हणून वापरणाऱ्यांची जगभरात सर्वाधिक संख्या आहे. या संस्थेने जगभरातील सांकेतांक नोंदणीचा अभ्यास करुन 500 सांकेतांकांची यादी तयार केली आहे. जगभरात कोणत्याही नव्या 50 ग्राहकांचा गट जेव्हा इंटनेटचा वापर सुरू करतो, त्यापैकी 20 ग्राहक या 500 सांकेतांकमधील अक्षरांची रचना वापरतात, असा निष्कर्ष आहे. यात 123456 ही रचना प्रथम क्रमांकवर, पीएएसएसडब्लूओआरडी (पासवर्ड) दुसऱ्या क्रमांकवर, 12345678 ही रचना तिसऱ्या क्रमांकवर, 1234 ही रचना चौथ्या क्रमांकवर, पीयूएसएसवाय ही रचना पाचव्या क्रमांकवर आणि पुन्हा 12345 ही अक्षर समुह रचना सहाव्या क्रमांकवर आहे.

या शिवाय एनसीसी1701 (स्टारशिप जहाजाचा क्रमांक), टीएचएक्‍स 1138 (जॉर्ज लुकासचा पहिल्या चित्रपटाचे नाव), क्‍यूएझेडडब्लूएसएक्‍स (संगणकावरील की बोर्डची रचना), 666666 (सिक्‍स सिक्‍सेस), 7777777 (सेव्हन सेव्हन्स) या अक्षर समुहासह बॅटमन, बॉण्ड007, कोकाकोला, पासवर्ड1, एबीसी123, मायस्पेस1, ब्लींक182 या शब्द समुहांचाही वापर मोठ्या प्रमाणात सांकेतांक म्हणून होताना दिसतो.

हे सर्वेक्षण करताना अजून एक माहिती समोर आली ती म्हणजे, हौसे खातर इंटरनेटवर खाते सुरू करणारी अनेक मंडळीनंतर यूजर्सनेम आणि पासवर्डही विसरतात. सुमारे 28हजार ग्राहकांचे पासवर्ड विस्मृतीत गेल्याचे दिसून आले. यातील 16 टक्के लोकांनी त्याचे स्वतःचे नाव (फर्स्टनेम), 14 टक्के लोकांनी की बोर्डवरील अक्षरांचा समुह सांकेतांक म्हणून वापरला होता. याशिवाय लक्षात राहण्यासाठी सोपे म्हणून टीव्हीवर सादर होणाऱ्या लहानमुलांच्या कार्यक्रमांची नावेही काहींनी पासवर्ड म्हणून दिलेली होती. त्यात पोकमॉन, मॅट्रीक्‍स, आयर्नमॅन या शब्दांचा समुह होता.

इंटरनेटवर कोणत्याही सर्च इंजिनवर खाते सुरू करताना द्यावा लागणारा सांकेतांक किमान आठ अंक- अक्षर किंवा त्या सोबत चिन्हांचा समुह असावा लागतो. खरेतर हा सांकेतांक अर्थपूर्ण शब्द असावा किंवा विशिष्ट क्रमाची अंक लिपी असावी असे नाही. मात्र, बरेच ग्राहक सोपा आणि लक्षात राहणारा शब्दच सांकेतांक म्हणून वापरतात. उपरोक्त सर्वेक्षणाच्या दरम्यान बहुतांश ग्राहकांनी आठपेक्षाही कमी अंक- अक्षरांचा वापर केलला दिसला. केवळ एका ग्राहकाचा सांकेतांक 32 अंक- अक्षरांचा समुह होता. काही जणांनी "आय डोन्ट केअर', "व्हाटेव्हर', "यस' आणि "नो' चाही वापर केल्याचे आढळून आले.

पासवर्डला पर्यायी शब्द "वाचवर्ड' हाही आहे. अलिकडे कार्यालयाच्या अंतर्गत वापरल्या जाणाऱ्या संगणकीय प्रणालीत संगणक सुरू करण्यासाठी, संगणकाला लॅन- व्हॅन प्रणालीत जोडण्यासाठी, संगणकातील विशिष्ट प्रोग्राम (उदा. वेबकॅमेरा) सुरू करण्यासाठी, मोबाईल फोनसाठी, केबल टीव्हीच्या प्रसारणासाठी (डिकोडर्स), एटीएमसाठी सांकेतांक लागतात. अनेक ठिकाणी वेगवेगळे सांकेतांक तयार करण्यासाठी निरुत्साह दाखविणे हा मानवी स्वभाव आहे. त्यामुळे उपरोक्त सर्व प्रणालीत एकच सर्वमान्य (युनिक) सांकेतांक तयार करण्याचा प्रयत्न केला जातो.

पासवर्ड तयार कण्याची संकल्पनाच मुळात अनेकांच्या लक्षात येत नाही. केवळ अंक, अक्षर किंवा चिन्हांचा वापर म्हणजे सांकेतांक नाही. तो तयार करताना, एखाद्या म्हणीचा, वाक्‍प्रचाराचा, सुभाषिताचा, कवितेच्या ओळीचाही विचार करायला हवा. यातील शब्दांचे अद्याक्षर किंवा त्यातील विशिष्ट शब्दांचा वापर सांकेतांक म्हणून करता येतो. हे करीत असताना किबोर्डवरील कॅपिटल लेटर्स (इंग्रजी लिपीतील मोठे अक्षर) आणि स्मॉल लेटर्स (लहान अक्षर) यांचाही कल्पकतेने वापर करता येतो. अशा पद्धतीने केलेला सांकेतांक सहजासहजी इतर कोणाला समजू शकत नाही. दरमहा, तीन महिन्यांनी किंवा सहा महिन्यांनी सांकेतांक बदलावा असेही सांगितले जाते. मात्र, येथे एक लक्षवेधी बाब नमुद करावी लागेल ती हीच की, मायक्रोसॉफ्ट कंपनीच्या सर्वेसर्वा असलेल्या बिल गेट्‌स यांनी अद्याप एकदाही पासवर्ड बदललेला नाही.

पासवर्डची कल्पना आली कशी ?

रोमन साम्राज्यात सम्राटाच्या निवासाच्या तंबू किंवा प्रासादाच्या भोवती पायदळ आणि घोडदळातील शिपाई रोज गस्त घालायचे. या दोन्ही दलातील रोज नव्या शिपायांची साठी निवड व्हायची. एकाच्यानंतर दुसऱ्या कोणाची गस्तसाठी निवड झाली आहे, हे कळविण्यासाठी लाकडाच्या चिन्हांचा वापर केला जायचा. हे चिन्ह कमांडरच्या उपस्थितीत एकाकडून दुसऱ्याला दिले जायचे. ते दोघांनाच माहित असायचे. तो शब्द होता "वाचवर्ड' नंतर झाला "पासवर्ड'

सदराशी संबंध असलेली गोष्ट
कॉर्नेल विद्यापिठातील रॉबर्ट मॉरिस या विद्यार्थाने संगणकासाठी 2 नोव्हेंबर 1988 ला एक प्रोग्राम तयार केला. त्याचे नाव वर्म (किडा) असे होते. हा वर्म संगणकात स्वतःच्या प्रती तयार करुन त्याचा विस्तार करीत असे. त्याने हा प्रोग्राम इंटरनेटवर घुसवला. त्यानंतर वर्मने स्वतःच्या असंख्य प्रती तयार करुन अमेरिकेतील प्रत्येक संगणक क्रॅश केला. नंतर मॉरिस यांने या वर्मला नष्ट कसे करावे याचाही प्रोग्राम पाठविला. मात्र, त्याचा फारसा उपयोग झाल नाही. या गुन्ह्याबद्दल मॉरिसला नंतर चारवर्षे कैद आणि 10050 डॉलर दंड झाला

No comments:

Post a Comment