माझ्या एका मित्राने महाराष्ट्रातील आघाडीच्या एका दैनिकातील नोकरीचा राजीनामा दिला. मित्र आणि त्या दैनिकाचे समिकरण असे घट्ट होते की मित्राचा दिनप्रारंभ "शुभसकाळ" म्हणून व्हायचा. योगायोग असा की, मी सुध्दा याच दैनिकात होतो आणि मलाही बाहेर पडण्यासाठी ६ वर्षांपूर्वी असेच वातावरण निर्माण केले गेले होते. मित्र कोणत्या मानसिकतेत असेल याची कल्पना होती म्हणून मी दोन-तीन दिवस त्याला फोन करणे टाळले.
जळगावच्या वृत्तपत्र क्षेत्रात माझी आणि या मित्राची जोडी चांगल्या अर्थाने परिचित होती. ती आजही पक्के मित्र म्हणून आहेच. मित्राने राजीनामा का दिला ? हे मी अजूनही जाणून घेतले नाही. कारण, माझा त्याच्यावर विश्वास आहे. अशी काही तरी स्थिती निर्माण केली गेली की, माणूस स्वतःच म्हणतो, मी बाहेर पडतो. मित्राचे हेच झाले असावे, हे मी स्वानुभवातून म्हणतो.
असे म्हणतात, रेसच्या मैदानात घोडा जोपर्यंत धावतो तोपर्यंत मालक त्याच्या दाण्या-पाण्याचा खर्च करतो. कधीतरी धावणारा घोडा लंगडू लागला की मालकाला तो नकोसा होतो. त्या घोड्याला रेसमधून बाजूला काढणे निश्चित होते. हा रेसच्या घोडेमालकांचा नियम निर्दयपणे कार्पोरेटमध्ये वापरला जातो. कार्पोरेटमध्ये माणसांना लायकी प्रदान करणारी मनुष्यबळ विकास नावाची एक सिस्टीम असते. तीलाच एच आर म्हणतात. याच कार्पोरेटमध्ये माणसांना नालायक ठरविणारी व्हिजिलन्स कमिटी ही दुसरी सिस्टीम असते. तीला चौकशी समिती असेही म्हणतात. माणसाला लायक ठरविण्यासाठी अनेक चाळण्या असतात. पण, नालायक ठरविण्यासाठी एक निनावी कागद पुरेसा असतो.
मित्राच्या बाबतीत हेच घडले असावे. मी याच छळ छावणीतून गेलो आहे. मित्राने राजीनामा दिलेल्या संस्थेतून साधारणपणे ६ वर्षांपूर्वी मलाही नालायक घोडा ठरवून बाहेर जाण्याची स्थिती निर्माण केली गेली होती. मी सुध्दा अवघ्या एका मिनिटात "होय मीच देतो राजीनामा" असे म्हणून बाहेर पडलो होतो. मला नालायक ठरविण्याच्या प्रक्रियेत तेव्हाचे मुख्य संपादक खूप उत्साही होते. हे मुख्य संपादक नंतर आपल्या पदाचे वलय वापरुन साहित्य संमेलनाचे अध्यक्ष झाले. मुख्य संपादक स्वतःचे वलय वाढवायला संस्थेला वापरत होते आणि संस्था माणसांना नालायक ठरविण्यासाठी या मुख्य संपादकाला वापरत होती. रेसचा हा घोडाही काही दिवसांनी मालकाने नालायक ठरवलाच. आज त्याच संस्थेत हे मुख्य संपादक आश्रीत म्हणून संपादक संचालक या पदावर काम करतात. मालकाने नाकारलेले काही घोडे गोठ्यात (हा शब्द मी जाणून बुजून वापरतोय. घोड्यांचा पागा असतो. पण नाकारलेल्या घोड्यांना ठेवायच्या जागेला गोठाच म्हणू या) ठेवले जातात. तसेच हे आहे.
रेसमध्ये हरण्याचा किंवा मागे पडण्याचा दोष घोड्याला देणारी मंडळी स्वतःला कधीही दोष लावून घेत नाही. त्यात मालकच उताविळ असेल तर दोष कोणाला देणार ? आपल्या संस्थेचा चेहरा विशिष्ट जातीच्या लोकांचा आहे हा समज करून घेतल्यानंतर, त्याच जातीची माणसे नालायक ठरवा असे सूत्र ठरले की, यंत्रणा काम तसेच करणार. आता संस्थेचा चेहरा अमुकच एका जातीचा करायचे ठरविले की, यंत्रणा तशीच वागणार. कामासाठी बहुजनवादी चेहरे घेतले तरी तुमची मालक म्हणून धोरणे धरसोड, अपरिपक्व गृहितकावर असतील तर निष्कर्ष चुकण्याचा दोष घोड्यांना द्यायचा की, मालकासह एकांगी एच आर-चौकशीवाल्यांना द्यायचा ??
कोणत्याही संस्थेत माणसांच्या प्रवेशाची आणि जाण्याची खरी कारणे बाहेर येत नाहीत. ऐकीव, सांगिवांगी, ग्रह दुषित अशी कारणे चर्चेत येतात. याचाही लाभ घेणारी मंडळी मनघडत कहाण्या तयार करतात. माणसे मेहनत, परिश्रम करून व निष्ठा, संयम ठेवून मोठी झाली आहेत, याचा विचार न करता परिस्थितीचा विपर्यास करतात. ही प्रवृत्तीही वाईट आहे. खरे तर आपणही कुठून तरी बाहेर पडलो किंवा काढले गेलो याचे वास्तव भान न ठेवता इतरांविषयी कुभांड रचणारी मंडळी काही काळ निराश करते.
टीप - माझा माझ्या मित्रावर विश्वास आहे. राजीनाम्याची त्याची कारणे निश्चित आगापिछा नसलेली असतील. अर्थात, काळही याचे उत्तर देईल...
वरील माहितीसह खालील लेखही वाचा...
https://empxtrack.com/top-ten-bad-hr-practices
(Posted on FB - २४ जानेवारी २०१५ )

No comments:
Post a Comment