Monday, 9 February 2015

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गणपती पाण्यात

हाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. निवडणुकीच्या संभाव्य निकालाचा कल काय असू शकतो? याची पहिली चाचणी एबीपी माझा चॅनेल आणि नील्सन या संस्थानी संयुक्तपणे केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्याचा अर्थ या सर्वेक्षणातून निघतो. जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या 11 पैकी किमान 10 मतदार संघात भाजपसह युतीला अनुकूल वातावरण राहील असे दिसते. याच वातावरणात सत्ताधारी आघाडीतील प्रमुख राजकिय पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जळगाव जिल्ह्यातील अस्तित्व धो्नयात येण्याची श्नयता आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 5 आमदार व 1 सहयोगी आमदार असून आगामी निवडणुकीत ही संख्या 1 किंवा 2 वर येण्याची श्नयता आहे. म्हणूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गणपती पाण्यात दिसतो. कॉंग्रेसची अवस्था नेहमीप्रमाणे उत्सवापूर्वीच गणेशाचे विसर्जन अशी आहे.

मावळत्या विधानसभेत जळगाव जिल्ह्यातील आमदारांचे एकूण 11 च्या तुलनेत पक्षीय बलाबल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 5, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहयोगी 1, कॉंग्रेसचे सहयोगी 1, भाजपचे 2 आणि शिवसेनेचे 2 असे आहे. लोकसभेच्या एप्रिल 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत दोन्ही मतदार संघात भाजपचे उमेदवार प्रत्येकी 3 लाखांवर मताध्निय घेवून विजयी झालेले आहेत. त्या निवडणुकीवर नरेंद्र मोदी लाटेचा प्रभाव होता असे मानले तरी, आज लाट ओसरली पण प्रभाव कायम आहे असे ठामपणे म्हणता येईल, अशी स्थिती आहे.
एबीपी माझा आणि निल्सनच्या सर्व्हेक्षणात भाजप सोबत शिवसेनेला अनुकूल असलेल्या मतदार संघात उत्तर महाराष्ट्रातील जवळपास सर्वच मतदारसंघ दाखविले आहेत. जळगाव जिल्ह्यातील मतदार संघांचा विचार केला तर जागा वाटपाच्या कोट्यातील सातही मतदार संघात राष्ट्रवादी कॉंग्रेससाठी धो्नयाची घंटा आज वाजते आहे. हा धोका जेवढा राज्यातील आघाडी सरकारच्या नाकर्तेपणाविषयी आहे तेवढाच तो जिल्ह्यातील नेत्यांच्या आपापसातील हेव्या- दाव्यांमुळेही आहे. पक्षश्रेष्ठींच्या नावावर कधीकाळी मोठी झालेली मंडळी मतदार संघातील जनाधार हरवून बसलेली आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा जिल्हा नेतृत्वाचा सुकाणू सध्या कोणाच्या हातात आहे? याचे उत्तर पक्षाचे जिल्हाध्यक्ष गफार मलिक, पालकमंत्री संजय सावकारे, खासदार ईश्वरलाल जैन, विधानसभेचे माजी अध्यक्ष अरूण गुजराथी, माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील, महिला आघाडीच्या नेत्या व खा. सुप्रिया सुळे यांच्या निकटवर्ती प्रा. डॉ. अस्मिता पाटील, माजी जिल्हाध्यक्ष अॅड. रवींद्र पाटील हे देवू शकतील का? असा प्रश्न आहे. घरकूल घोटा़ळ्यात आरोपी असल्यामुळे माजी पालकमंत्री गुलाबराव देवकर हे कारागृहात आहेत. जिल्हानेता म्हणून यांच्यापैकी कोणाच्या सांगण्यावर उमेदवारी वाटप केले जाईल याची हमी कोणीही देवू शकत नाही.
या नेत्यांपैकी किती जणांची त्यांच्या मतदारसंघात काय अवस्था आहे? हे प्रथम जाणून घेवू.
सावकारेंची कोंडी
पालकमंत्री संजय सावकारे यांचा विचार करु. सावकारे गेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील तेव्हाचे पावरफूल नेते संतोष चौधरी यांच्या एकतर्फी सक्रिय पाठिंब्यामुळे निवडून आले होते. भुसावळ मतदारसंघ राखीव झाल्यानंतर चौधरी यांनी त्यांचे स्वीय सहायक असलेल्या सावकारे यांना आमदारकीसाठी पुढे केले आणि निवडूनही आणले. गेल्या पाचवर्षांच्या कालप्रवाहात चौधरी आणि त्यांचे बंधू अनिल यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. या कालप्रवाहाने त्यांना कधी कारागृहात, कधी जिल्ह्याबाहेर नेले. चौधरी बंधू संपले असेही चित्र निर्माण झाले होते.
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी दबाव वापरून मदत करावी असे चौधरी बंधूंना वाटत होते. तसे झाले नाही. घर फिरले की वासेही फिरतात, या म्हणीचा प्रत्यय चौधरी बंधूंना आला. कारागृहात असतानाही चौधरींच्या नावावर भुसावळ पालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसला बहुमत मिळाले. पक्षातील इतर नेत्यांच्या दबावामुळे सावकारे चौधरींपासून लांब गेले. देवकर कारागृहात गेल्यामुळे पुढे परिस्थिती अशी निर्माण झाली की, सावकारेंच्या अंगावर मंत्रीपदाची झूल चढली. कोणताही जनाधार नसताना सावकारे पालकमंत्री झाले. सावकारेंचे राजकिय वलय परावलंबी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या इतर बड्या व अनुभवी मंडळीत ते आजही उपरेच ठरतात, हे सत्य बदलणार कसे? चौधरी बंधू भुसावळात परतले आहेत. दोघेही पुन्हा राजकारणात सक्रिय आहे. संतोष हे तूर्त राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये थांबले तर अनिल  हे विरोध स्वीकारून भाजपवासी झाले. राखीव मतदारसंघात दोघांना उमेदवारीची संधी नाही मात्र, निवडून आणणे किंवा पराभूत करणे हे दोघांना श्नय आहे. सावकारे यांचे सॅण्डविच येथेच होईल.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये भुसावळच्या उमेदवारीबाबत संतोष चौधरींचा शब्द टाळला जाणार नाही. ते सावकारे यांच्यासाठी शब्द टाकणार नाहीत. पक्षश्रेष्ठी सध्यातरी वादात आणि गटबाजीत अडकलेल्यांना उमेदवारी देणार नाहीत, असे दिसते. या पार्श्वभूमिवर सावकारे यांना उमेदवारी जरा अवघडच दिसते. ही वस्तुस्थिती लक्षात घेता उमेदवारी मिळाली तरी स्वकियांचा निष्क्रियपणा किंवा तीव्र विरोध आणि नाही मिळाली तर भुसावळमध्ये पुढील राजकारण कसे आणि काय करायचे? असा प्रश्न सावकारेंच्या समोर आहे.
संतोष चौधरी यांनी सध्यातरी रवींद्र सपकाळे यांचे नाव लावून धरले आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मागासवर्गीय आघाडीचे ते पदाधिकारी आहेत. गेल्या निवडणुकीत सावकारे यांच्या विरोधात अपक्ष लढताना सपकाळे दुसऱ्या क्रमांकावर होते, ही त्यांची जमेची बाजू. या शिवाय जि. प. सदस्य मंदाबाई अवसरमल, विजय अवसरमल, ज्योती सपकाळे व जितेंद्र बागरे यांचेही नाव चर्चेत आहे. भुसावळसाठी सावकारे यांचा अध्याय आटोपलेला वाटतो.
पारोळ्याचे नेते बिनभरवशाचे
आता चर्चा करू ती डॉ. सतीश पाटील यांच्या नावाची. ते सुद्धा माजी मंत्री आहेत पक्षाने त्यांना उमेदवारी का द्यावी? असा प्रश्न विचारायला हवा. लोकसभा निवडणुकीत डॉ. सतीश पाटील हे 3 लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभूत झालेले आहेत. त्यामुळे त्यांचा विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारीवरील अधिकार संपतो. यासोबत इतरही कारणे आहेत. विधानपरिषदेच्या जळगाव मतदार संघाच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत कमी वयाच्या उमेदवाराला रिंगणात उतरवून त्याचा उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकाऱ्यांनी रद्द केल्याची नामुष्की राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षावर ओढवली होती. हा उमेदवार डॉ. पाटील यांचा पुतण्या आहे. पुतण्याला उमेदवारी दिली गेली हे मला माहितच नव्हते, असा बालीश खुलासा डॉ्नटर महाशयांनी केला होता. या मतदार संघात डॉ्नटरांना टाळले की, अॅड. वसंतराव मोरे हेही उमेदवारीचे बाशिंग बांधायला तयार आहेत. मोरेही यापूर्वी लोकसभेच्या निवडणुकीत दीड लाखांपेक्षा जास्त मतांनी पराभूत झालेले आहेत.
पारोळा तालु्नयातील नेत्यांची आपापसात एक गंमत आहे. डॉ. सतीश पाटील, अॅड. मोरे, शिवसेनेचे विद्यमान आमदार चिमणराव पाटील व भाजपचे खासदार ए. टी. पाटील हे एकमेकांचे नातेवाईक आहेत. ही मंडळी आपल्यातील कोणाचा राजकिय हिशोब चुकता करण्यासाठी कोणाला कशी मदत करतील व कोणाला छुपा विरोध करतील? हे परमेश्र्वरही सांगू शकत नाही. डॉ. पाटील,  अॅड. मोरे यांचा परस्परावर विश्वास आहे का? हेही एकदा तपासावे. तद्वतच भाजपचे खा. पाटील व शिवसेनेचे आ. पाटील यांचाही एकमेकांवर विश्वास आहे का? हेही तपासावे लागेल. पारोळ्याच्या नेत्यांनी जिल्हा सहकारी दूध संघ, महाफेड, जिल्हा सहकारी बँक, वसंत सहकारी साखर कारखाना या संस्थामध्ये गाजवलेले कार्यकर्तृत्व सर्व समान्य मतदारांना माहित आहे. याचे कारण म्हणजे एकमेकांच्या उखळ्या पाखळ्या त्यांनीच काढल्या आहेत.
पारोळा मतदार संघात सध्यातरी अॅड. पाटील व अॅड. मोरे हे पक्षासाठी दारूण पराभवाचा चेहरा ठरले आहेत. त्यामुळे पक्षाने तेच चेहरे पुन्हा रिंगणात आणू नये, हीच कार्यकर्त्यांचीही ईच्छा आहे. मग येथे नवा उमेदवार कोण द्यावा? हा प्रश्न आहे.
पारोळा मतदार संघ हा पारोळा तालुका, एरंडोल तालुका आणि भडगाव तालु्नयाचा आमदडे जि. प. गट मिळून तयार झाला आहे. म्हणजेच, या मतदार संघावर आता पारोळ्याचे वर्चस्व असण्याचे व मानण्याचे कारण नाही. मतदार संख्या एरंडोलची जास्त आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे एरंडोल तालुकाध्यक्ष अमीत पाटील हेही उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. त्यांचे वडील स्व. डिगंबर शंकर पाटील हे एरंडोल तालु्नयाचे 15 वर्षे आमदार होते. अमीत पाटील यांचा शैक्षणिक संस्थेचा व्याप मोठा आहे. त्यांचे पारोळा तालुका व आमडदे गटात नातेसंबंध आहेत. राष्ट्रवादीच्या पक्षश्रेष्ठींनी त्यांच्या नावाचा विचार करायला हवा.

देवकरांच्या नशिबी संघर्षच
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दुसरे माजीमंत्री गुलाबराव देवकर आहेत. गेल्या निवडणुकीत ते जळगाव (ग्रामीण) मतदार संघातून काठावर निवडून आले होते. आता ते कारागृहातून निवडणूक लढविण्याची तयारी करीत आहेत. जळगाव महानगर पालिकेतील घरकुल घोटाळ्यात ते सुद्धा मुख्य आरोपी असल्यामुळे तेही कारागृहात आहेत. देवकर हे मंत्रीपदी असताना त्यांचे पक्षश्रेष्ठी तथा अजित पवार यांच्याशी सलोख्याचे संबंध होते. पक्षाच्या कार्यकर्त्यांचा राज्य मेळावा तसेच महिला आघाडीचा विभागीय मेळावा घेण्यासाठी त्यांनी बऱ्यापैकी पैसा खर्च केला होता. देवकर यांच्यामुळेच पक्षनेते शरद पवार आणि खा. ईश्वरलाल जैन यांच्यात संबंध ताणले गेले, असे सांगितले जाते.
जळगाव (ग्रामीण) मधून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे संजय मुरलीधर पवार यांनी उमेदवारीचा दावा केला आहे. संजय पवार हे जि. प. चे माजी पदाधिकारी, जिल्हा बँकेचे संचालक आहेत. त्यांचे पिताश्री स्व. मु. ग. पवार हे कधीकाळी राष्ट्रवादीच्या  श्रेष्ठींचे जवळचे मित्र होते. ते स्थान संजय पवार मिळवू शकलेले नाहीत. त्यांची भूमिका पक्षपातळीवर नेहमी धरसोड करणारी राहीली आहे. देवकर यांच्यावरील आरोपामुळे राष्ट्रवादीची ही जागा धो्नयात आहे, तसेच गेल्या निवडणुकीत देवकरांचे मताध्निय केवळ पाच हजार होते, ही बाब पक्षाच्या नेत्यांसमोर मांडून पवार उमेदवारी मिळण्याच्या आशा बाळगून आहेत. देवकर आणि पवार यांच्यासाठी उमेदवारी करणे हे कडवट आव्हानच ठरू शकते. या मतदार संघात सध्या शिवसेनेचा प्रबळ दावा असून माजी आमदार गुलाबराव पाटील यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. येथील लढतीला मराठा, गुजर आणि माळी- महाजन असा समाजिक संदर्भ असतो.

पाचोऱ्यात गोंधळात गोंधळ
आता विचार करू पाचोरा- भडगाव मतदार संघाचा. या मतदार संघातून विद्यमान आमदार दिलीप वाघ पुन्हा इच्छूक आहेत. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेश पदाधिकारी प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी उमेदवारी निश्चित मानून मतदार संघात प्रचार सुरू केलेला आहे. पक्षाच्या ज्येष्ठनेत्या खा. सुप्रिया सुळे यांच्या मार्फत उमेदवारी मिळेलच असा त्यांचा अंदाज आहे. सध्या वाघ आणि प्रा. पाटील यांच्यातून विस्तव जात नाही. मध्यंतरी प्रा. पाटील यांनी पाचोऱ्यात महिलांना साडीवाटप कार्यक्रम घेतला. तेथे गोंधळ झाला. हा गोंधळ वाघ यांच्या माणसांनी घातला असा थेट आरोप प्रा. पाटील यांनी केला होता.  नंतर काही ठिकाणच्या निर्धार मेळाव्यात एकत्र येण्याचा देखावा वाघ- प्रा. पाटील यांनी केला. वाघ यांच्यावर गेल्या तीनवर्षांपूर्वी बलात्काराचा आरोप झाला होता. त्यातून ते निर्दोष सुटले आहेत. मात्र, अपप्रचारात माणसाची पत एकदा गेली की ती पुन्हा मिळविण्यासाठी खूप परिश्रम करावे लागतात. पक्षाने वाघ यांना काही काळ प्रतिक्षा करायला सांगावी.
या मतदार संघात भडगाव तालु्नयाचा काही भाग आहे. त्यामुळे त्या तालु्नयातील पंचायत समितीचे माजी सभापती राजेंद्र महादू पाटील, शिक्षण संस्थांचा व्याप असलेले प्रताप हरि पाटील व विकास पंडीतराव पाटील हेही इच्छूक आहेत. वाघ आणि इतर तीन पाटील असे चौघे मिळून आमच्यापैकी कोणालाही उमेदवारी द्या असे म्हणतात मात्र, प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांना उमेदवारी देण्यास चौघांचा विरोध आहे. पक्षश्रेष्ठींच्या नेतृत्वात महिला धोरणाच्या अंमलबजावणीचा जाहिरातींमधून दावा करणाऱ्या राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये महिला नेतृत्वाची कशी कोंडी आहे?  हे यातून लक्षात येते.

चोपड्यात अनिश्चितता
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे विद्यमान आमदार जगदीश वळवी हे चोपडा  मतदार संघातून निवडून आले आहेत. गेल्यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसने एकतर्फी प्रभाव दाखवित हा मतदार संघ शिवसेनेकडून हिसकावला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी मंत्री, विधानसभाध्यक्ष अरूण गुजराथी यांना या मतदार संघात शिवसेने पराभूत केले होते, त्याच मतदार संघात शिवसेनेला राष्ट्रवादीने वळवींच्या रुपात पराभवाचे तोंड दाखविले. वळवी हे तेव्हा नंदुरबारमधून चोपड्यात आले होते. वळवी हे नंदुरबारमध्ये कॉंग्रेसतर्फे उपनगराध्यक्ष होते. तेथे त्यांचे आणि मेहुणे डॉ. विजय गावित यांचे सख्य काहीकाळ होते. गावित यांच्याशी दुरावा निर्माण झाल्यानंतर वळवी चोपड्यात येवून स्थिरावले. गॅस एजन्सीच्या माध्यमातून असलेला संपर्क आणि पिताश्री माजी आमदार रमेश पान्या वळवी यांची पुण्याई याच्या बळावर वळवी आमदार झाले.
गेल्या काही महिन्यात वळवी आणि गावित यांचे संबंध सुधारले आहेत. लोकसभा निवडणुकीच्यापूर्वी गावितही राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून बाहेर पडले. वळवींची भाची डॉ. हिना गावित नंदुरबारमधून ऐतिहासिक नोंद करीत भाजपतर्फे खासदार झाल्या. वळवी हे भाचीच्या प्रचाराची जबाबदारी स्वीकारून शिरपूर (जि. धुळे) येथे मुक्कामी होते. डॉ. गावित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस सोडली मात्र, अलिकडे त्यांचे बंधू व नवापूरमधून समाजवादी पक्षातर्फे आमदार असलेले शरद गावित यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. डॉ. गावित यांचे भाजप की अपक्ष असे तळ्यात मळ्यात सुरू आहे. डॉ. गावित हे स्वतःसाठी नंदुरबार, शालक जगदीश यांच्यासाठी शिरपूर आणि लहान बंधू राजेंद्रसाठी शहाद्यातून भाजपकडे उमेदवारी मागत आहेत. गावित, वळवी कुटुंबाचे हे राजकारण संधीसाधू प्रकारात मोडते. वळवींनी चोपड्यासाठी नकार दिला तर राष्ट्रवादी कॉंग्रेसला नवा उमेदवार शोधावा लागेल. सध्या डी. पी. साळुंखेसर, माधुरी किशोर पाटील, डॉ. चंद्रकांत बारेला, आनंदराव शंकरराव रायसिंग यांचीही नावे चर्चेत आहेत. यापैकी साळुंखेसर हे पंचायत समितीचे माजी सभापती आहेत. डॉ. बारेला यांचा वैद्यकिय सेवेमुळे मतदार संघात चांगला परिचय आहे. चोपडा मतदार संघाची जबाबदारी पुन्हा गुजराथी व इतरांना सांभाळावी लागेल.

मुक्ताईनगरात पराभवचा धनी कोण?
मुक्ताईनगर मतदार संघात भाजपचे ज्येष्ठनेते व राज्यातील विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथराव खडसे यांच्या समोर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे उमेदवार नाही. यापूर्वी तीनवेळी पराभूत झालेले अॅड. रवींद्र पाटील यांना ऐनवेळी पक्षश्रेष्ठींचा उमेदवार म्हणून पुढे केले जाते, हा आजवरचा अनुभव व इतिहास आहे. खडसेंच्या पराभवासाठी अॅड. पाटील यांचे मराठा समाजकार्ड आणि प्रचारासाठी श्री. शरद पवार यांच्यासोबत श्री. अजित पवार यांच्याही लागोपाठ सभा घेण्याचा प्रयोग यापूर्वी मतदार संघात झाला आहे. तरीही खडसे पराभूत झालेले नाहीत. त्यांच्या विजयाचे गणित एकदाच फक्त हजार, दीड हजाराच्या नाममात्र मताध्नियापर्यंत घसरले होते. आगामी निवडणुकीत खडसेंच्या पराभवाची सुतराम श्नयता नाही. उलटपक्षी जिल्ह्यातून भाजपचे जास्त आमदार विजयी झाले तर खडसे हे मुख्यमंत्रीपदाचेही दावेदार असू शकतात. अॅड. पाटील यांच्या व्यतिरिक्त जि. प. पदाधिकारी असलेले विनोद तराळ आणि माजी आमदार अरूण पांडुरंग पाटील हेही उमेदवारीसाठी उच्छूक आहेत. यापैकी तराळ हे खडसेंच्यासमोर अगदीच कमकुवत ठरू शकतात. अरुण पाटील यांचा पहिल्यासारखा जनसंपर्क राहीलेला नाही. त्यामुळे या मतदार संघात राष्ट्रवादीची उमेदवारी दखल घेण्यासारखी नाहीच. पराभूत होण्यास कोण तयाक आहे?  हेच पाहावे लागेल.

अमळनेरचा अपक्ष गुंता
अमळनेर मतदार संघातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सहयोगी आमदारपद स्वीकारणारे व नेहमी एकच वादा... अजितदादा! असे म्हणणारे साहेबराव धोंडू पाटील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातर्फे पुन्हा रिंगणात उतरण्याची श्नयता आहे. अर्थात, हा मतदार संघ कॉंग्रेसकडे आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसला तो मागावा लागेल. गेल्यावेळी पाटील हे भाजप व कॉंग्रेसच्या उमेदवाराला पराभूत करुन अपक्ष निवडून आले होते. साहेबराव पाटील हे पारोळा तालु्नयातील राजवडचे. बोरवाले पाटील म्हणून त्यांची पहिली ओळख होती. केवळ शब्दाखातर मजूर फेडरेशन आणि जिल्हा बँकेचे संचालकपद सोडणारा तरुण नेता अशी दुसरी ओळख होती. पारोळा तालु्नयात आबा, काका, डॉ्नटर यांचे सत्तेचे दिवस असताना साहेबराव पाटील आमदार होवू शकतात, हे सांगूनही कोणाला पटले नसते. मात्र, अमळनेर मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढवून विजयी होत साहेबराव पाटील यांनी इतिहास लिहीला. आता ते अमळनेरवासी झाले आहेत. तेथे त्यांचे राजभवन आहे. त्यांनी अमळनेर शहर आणि तालु्नयातील विकास कामांकडे लक्ष दिले. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकांना हा माणूस तयारी करून येतो. अजित पवार यांच्याशी थेट संबंध निर्माण करून अनेक योजनांसाठी त्यांनी वाढीव निधी पदरात पाडून घेतला. आधी केले मग सांगितले, ही साहेबराव पाटील यांची पंचलाईन फेमस आहे. त्यांच्या बाबतीत एक आक्षेप अनेक जण नोंदवतात. बोलण्याच्या ओघात ते अनेक ग्राम्य शिव्या देतात. जवळ बसलेल्याशी ते गोड बोलतात मात्र तो उठून गेला की त्याच्या विषयी वाईट बोलतात. हा अनुभव स्वपक्षीय व विरोधकांनाही आहे. आमदारांच्या या गुणा (?) पायीच अमळनेरमध्ये बाहेरची मंडळी स्थिरावू शकली असे काही जण म्हणतात.
अमळनेरमध्ये सध्यातरी साहेबराव पाटीलच प्रबळ दावेदार आहेत. मध्यंतरी साहेबराव पाटील मतदारसंघ बदलून पुन्हा पारोळ्यात परतणार अशी चर्चा होती. परंतु, तसे होईल असे दिसत नाही. त्यांना आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसमधील स्वाभीमानी गटाचे संजय पुनाजी पाटील हेही उमेदवारीसाठी इच्छूक आहेत. साहेबराव पाटील यांना उमेदवारी मिळेल मात्र, युतीच्या उमेदवाराकडून यावेळी कडवा प्रतिकार होण्याची श्नयता आहे.

चाळीसगाव सध्या सुरक्षित
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व पाच व एक सहयोगी विद्यमान आमदारांच्या मतदार संघांच्या तुलनेत केवळ चाळीसगाव मतदार संघातील जागा आज पक्षासाठी सुरक्षित वाटते. तेथे राजीव देशमुख आमदार आहेत.  आगामी निवडणुकीसाठी पुन्हा तेच प्रबळ दावेदार आहेत. देशमुख कुटुंबियांचे चाळीसगाव शहरावर एकतर्फी वर्चस्व आहे. तालु्नयात विरोधाचे प्रमाण जवळपास निम्मे आहे. शहरातील वर्चस्व हे मराठा समाज म्हणून आणि स्व. अनिलदादा देशमुख यांची पुण्याई म्हणून आहे. गेल्या निवडणुकीपासून हा मतदार संघ खुला झाला. त्यामुळे राजीव देशमुख विधानसभेत पोहचले. यावेळीही राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये देशमुख यांची उमेदवारी कोणीही बदलू शकत नाही.
विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सर्व प्रकारच्या बेरजेची शक्तीस्थळे आणि वजाबाकीची घातस्थळे लक्षात घेतली तर राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आगामी निवडणूक व उत्सव काळातला गणपती पाण्यातच दिसतो. हे विधान धाडसाने करण्यामागे एबीपी माझा- नील्सनचे सर्व्हेक्षण, लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना मिळालेले विक्रमी मताध्निय आणि राज्यातील आघाडी सरकारची प्रभावहीन- नियोजनशून्य कारकिर्द होय. याशिवाय, वरिष्ठ पदाधिकारी निवडणूक काळात निष्क्रिय राहतात, हेही पडद्यामागचे कारण आहेच.

बैठकीत उमटला असंतोषाचा स्वर
वरील विवेचनाचा प्रत्यय दि. 14 ऑगस्टला जळगाव येथे झालेल्या पक्षाच्या जिल्हा बैठकीत आला. इकडे वास्तव लिहीत असताना तिकडे बैठकीत हेच मुद्दे नेते व कार्यकर्त्यांच्या मुखातून निघत होते.
जिल्हा बैठकीला नेहमी प्रमाणे पालकमंत्री सावकारे गैरहजर होते. लोकसभा निवडणूक काळातही सावकारे यांची अशा काही बैठकांना गैरहजेरी नोंदली आहे. खा. ईश्वरलाल जैन व रावेर मतदार संघातून लोकसभेची निवडणूक लढलेले त्यांचे पूत्र माजी आमदार मनिष जैन यांची उपस्थिती नव्हती.
ही जिल्हा बैठक निरीक्षक किरण शिंदे यांच्या उपस्थितीत झाली. कोण आपल्या सोबत आणि कोण विरोधात हेच समजत नाही, हाच मुद्दा माजी पालकमंत्री डॉ. सतीश पाटील यांनी मांडला. पारोळ्यात स्वकियांची भीती त्यांच्या तोंडून निघाली. नंतर पाचोऱ्यातून प्रा. डॉ. अस्मिता पाटील यांनी उमेदवारीचा उल्लेख करताच एक युवक कार्यकर्ता म्हणाला, तेथे उमेदवार वाघ हवेत. दुसरा उमेदवार असेल तर पराभव निश्चित. केवढा हा पक्षांतर्गत विश्वास!
जिल्हाध्यक्ष गफार मलिक यांनी पूर्वीच्याच सात जागांवर उमेदवारांना विजयी करा असा उल्लेख केला. त्यावर पक्षाचे सहयोगी आमदार म्हणाले, अमळनेरवर का अन्याय करता? अरे ती आठवी जागा आपलीच आहे. कॉंग्रेसकडून मागा. लोकसभा निवडणुकीत अमळनेरमधील काही मतदान केंद्रावर राष्ट्रवादीच्या उमेदवारांना जास्त मते होती, हा उल्लेखही आ. पाटील यांनी केला. ते पुढे असेही म्हणाले की, गेल्या ग्रांप, पंस, जिप, पालिका, मनपा, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ज्या नेत्यांच्या गावात राष्ट्रवादी कॉंग्रेसला मताध्निय नव्हते, ती मंडळी विधान सभेसाठी उमेदवारी कशी मागू शकते? हे पक्षाने तपासावे.

लिहायचे राहून गेलेले

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या भवितव्याचा पंचनामा करीत असताना कॉंग्रेसची स्थिती गणपती कायम पाण्यात विसर्जित अशी आहे, असे खेदाने म्हणावे लागेल. एखादी कौटुंबिक आपत्ती टाळावी म्हणून देवघरातला गणपती पाण्यात बुडवून ठेवला जातो. आमच्या वरील आपत्तीचे हरण कर मगच तुला पाण्याबाहेर काढू असा निग्रह भक्ताचा असतो. नाका तोंडात पाणी गेल्यावर गणपती आपत्तीचे हरण करतो असा समज आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसची स्थिती सध्या अशीच भगवान भरोसे आहे. पण, कॉंग्रेसने त्यांचा गणपती काही वर्षांपूर्वीच पाण्यात विसर्जित करून टाकला आहे.  कॉंग्रेस भवन म्हणजे विजयाची देवता नसलेला भग्न गाभारा. गेल्या काही वर्षांत सार्वत्रिक निवडणुकीत कॉंग्रेसच्या विजयाची एकही बातमी ऐकिवात नाही. कधीकाळी राज्याच्या मंत्रिमंडळात या जिल्ह्याचे साडेतीन मंत्री होते म्हणे. आता नेते भरपूर पण कार्यकर्ते नाहीत. हा अनुभव असल्यामुळेच जिल्हा भवनातील वरच्या सभागृहातील स्टेज काढून साऱ्यांना जमिनीवर आणण्याचा निर्णय जिल्हाध्यक्षांना घ्यावा लागला आहे. भग्नावस्थेतील या गाभाऱ्यावर यावेळीही गुलाल काही उडणार नाही. एखाद्या अपक्षाने काही चमत्कार केला तर ती काळी जादू ठरेल.  बैठकीतील हे विचार मंथन वरील लेखातील मुद्यांचे समर्थनच करते. या विषयी कोणाला शंका असेल तर समोरासमोर बसून चर्चा करायची तयारी आहे....

(प्रसिद्धी -  दि. 17 ऑगस्ट 2014  तरुण भारत)


No comments:

Post a Comment