Monday, 9 February 2015

स्वयंभू नाथ !


गडाच्या देवाचा चेहरा कारागिराला हवा तसा असतो. एखाद्या पाषाणाने मूर्ता निर्मितीसाठी स्वतःवर पैलू पाडले तर तो स्वनिर्मितीचा चमत्कार होईल. कठोर मेहनत आणि सततच्या परिश्रमातून एखाद्या माणसाने स्वतःला घडविले तर तो ठरतो...स्वयंभू! ती व्यक्ती अगदी जवळची, असेल तर त्यांना म्हणावे लागेल एकनाथराव खडसे... स्वयंभू नाथ. नाथांचा हा अनेकांना माहित नसलेला प्रवास.


महाराष्ट्राच्या राजपटावर विरोधकांचा अभ्यासू आणि आक्रमक चेहरा म्हणून आज एकाच व्यक्तीची ओळख आहे. विधी मंडळात कोणत्याही विषयाच्या चर्चेत सत्ताधारी मंत्र्यांवर प्रश्न आणि उपप्रश्नांची सरबत्ती करीत स्वतःचे अनुभव सांगत विषयाची व्याप्ती स्पष्ट करीत आणि भविष्यातील धो्नयांची जाणिव करून देत वर्तमानातील बदलांची निकड स्पष्ट करीत सांगोपांग मांडणी घणाघाती वकृत्वातून करण्याचे कौशल्य एकाच व्यक्तीच्या अंगी आहे. ती व्यक्ती म्हणजे एकनाथराव खडसे. राज्याचे माजीमंत्री, विधान सभेतील विरोधीपक्ष नेते, भारतीय जनता पक्षाचे अर्ध दशकापासूनचे अभ्यासू आणि खंबीर नेते आणि मुक्ताईनगर तालु्नयाच्या गल्लीबोळात ओळखले जाणारे आपले नाथाभाऊ.

या माणसाचा गावपातळीवरील सरपंचापासून ते विधी मंडळापर्यंतचा राजकीय प्रवास तसा नेहमी संघर्षाचा राहिला आहे. कधी गावातल्या मंडळींपासून. कधी पक्षाच्या कार्यकर्त्यांपासून. कधीकधी पक्षाच्या राज्य, देशपातळीवरील पदाधिकाऱ्यांपासून तर अगदी मित्रगोत्री जिल्हापदाधिकाऱ्यांपर्यंत. नाथाभाऊ जेव्हा जिल्ह्यातून विरोधकांचे एकमेव आमदार म्हणून निवडून येत तेव्हाही एकाकी संघर्ष होताच. राज्यात युतीला सरकार स्थापनेची संधी मिळाली तेव्हा पक्षावर अढळ निष्ठा असूनही मंत्रीपदाने हुलकावणी दिलेले नाथाभाऊ काही महिने एकाकीच होते. तीन वर्षांपूर्वी मुलगा स्व. निखील याला विधान परिषदेवर निवडून आणण्याचा प्रयत्न नाथाभाऊंनी केला तेव्हाही काही स्वकीयांनी छुपा विरोध करीत नाथाभाऊंना एकाकी पाडले. नंतर निखिलच्या अवेळी मृत्यू प्रसंगी नाथाभाऊ कोलमडणार असे वाटत असताना ते पुन्हा कार्यकर्त्यांसाठी, जनतेसाठी उठून उभे राहीले. एकाकी होण्याचे मोजके प्रसंग आले मात्र हा माणूस गावकऱ्यांच्या, कार्यकर्त्यांचा गोतावळ्यापासून कधीही एकटा राहीला नाही. साधारणपणे दोन- अडीच महिन्यांपूर्वी लोकसभेची निवडणूक असताना सूनबाई श्रीमती रक्षा खडसे यांना पक्षाची उमेदवारी मिळत असताना नाथाभाऊंना काही स्वकियांनी विरोध केलाच होता. परंतु, मोदींची लाट आणि नाथाभाऊंवर प्रेम करणाऱ्या मंडळींनी घेतलेल्या अथक परिश्रमातून श्रीमती खडसे या तीन लाखांपेक्षा जास्त मताध्निय घेवून विजयी झाल्या. आज वयाचा 62 वा उंबरा ओलांडतानाही नाथाभाऊंच्या जवळ समर्थकांचा परिवार कायम आहे. गावाचे सरपंच, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य, गावपताळीवरील विविध संस्थांचे पदाधिकारी, जिल्ह्यातून निवडून येणारे एकमेव भाजप आमदार, जिल्ह्यात युतीचे दहा आमदार निवडून आणण्यासाठी एकहाती नेतृत्त्व करणारे जिल्हानेता, उशिरानेही का होईना शिक्षण, अर्थ आणि नंतर पाटबंधारे विभागाचे मंत्रीपद सांभाळणारे नाथाभाऊ आणि सध्या पक्षांतर्गत गुणवत्तेवर विरोधीपक्षनेतेपद सर्वांत प्रभावीपणे सांभाळणारे नाथाभाऊ. असा हा राजपटावरचा प्रवास अत्यंत लक्षवेधी आहे. 

नाथाभाऊंचा राजकारणातील वावर हा 5 दशकांचा आहे. त्यांच्या विविधांगी गुणांमुळे जवळपास सर्वच महाराष्ट्राला ते परिचित आहेत. त्यांची कार्यशैली, त्यांचे विचार आणि त्यांचे वक्तृत्व संपूर्ण राज्याने अनुभवले आहे. शेती, पाणी, सिंचन हे त्यांच्या खास अभ्यासाचे विषय. अर्थमंत्री म्हणून काम करताना मंत्रालयातील इतर विभागांसाठी तरतुदी देताना आणि काही वेळा नाकारताना त्या विषयांचा अभ्यास तेवढाच परिपूर्ण असल्याचे दाखविणारा त्यांचा निग्रही स्वभाव अनेक राजकारणी खासगीत मान्य करतात. या पैलूंचा मागोवा घेत नाथाभाऊंचे राजकिय, सामाजिक व्यक्तिमत्त्व एकसंधपणे उभे राहते. कार्यकर्तृत्वाच्या या उंचीला गवसणी घालता येत नाही. नाथाभाऊंचे हे व्यक्तीमत्व अनेकांना भावते. त्यांची मैत्री असणे हा प्रत्येकाच्या मनातील अभिमानाचा आनंदी कप्पा. नाथाभाऊ केवळ आपलेच मित्र हा त्या कप्प्यातील गोड समज. म्हणूनच त्यांचा प्रत्येक मित्र राजकारणाच्या पलिकडच्या नाथाभाऊंना शोधायचा प्रयत्न करतो. हे तसे अवघड काम. नाथाभाऊंशी बोलायचे तर त्यांना वेळ हवा. ते सतत कार्यकर्त्यांच्या गोतावळ्यात. कधीकधी अधिकाऱ्यांसोबत एकापाठोपाठ दुसऱ्या बैठकीत गुंतलेले. कधी जळगावात, कधी कोथळीत, कधी मुंबईत आणि अनेकवेळा राज्यभराच्या दौऱ्यावर अशा सतत फिरस्तीवर असलेल्या नाथाभाऊंशी गप्पा करायला वेळ मिळविणे तसे अडथळ्यांचेच. अशातही कधीतरी गप्पा करीत मिळविलेली नाथाभाऊंची कहाणी सांगायची ईच्छा होतेच.

पूर्वीच्या एदलाबाद आणि आताच्या मुक्ताईनगर तालु्नयातील कोथळी येथे जुन्या मुक्ताई मंदिराजवळच्या घरात वारकरी दाम्पत्याच्या पोटी 1952 ला पूत्र जन्म झाला. त्यादिवशी अनंतचतुर्दशी होती. अधिकमास होता. पाऊस नसल्यामुळे परिसर दुष्काळी होता. तेव्हापासून दुष्काळ हा पाचवीला पुजलेला. संतसंप्रदायाचा प्रभाव असलेल्या कुटुंबाने मुलाचे नाव आपसूक एकनाथ ठेवले. लहाणपणीचा नाथ मंदिर, जवळचे शेत, जंगल, टेकड्या आणि शाळेत वावरू लागला. पहिली ते सातवीचे शिक्षण गावातल्या शाळेतच झाले. लहानग्या नाथाला खूप मित्र होते. त्यांचे खेळ सुरपारंब्या आणि परिसरातील नद्या, ओहळ, डोहात पोहणे. सुरपारंब्या हा खेळ भल्याभल्यांना जमायचा नाही. नाथाचा हात मात्र त्यात कोणी धरू शकत नसे. किंबहुना झरझर झाडावर चढून शेंडा गाठणारा लहानगा नाथ कोणाच्याही हाती येत नसे. वेगवेगळ्या झाडांच्या फांदीवर चढणे, त्याला लोंबकळणे आणि वेळ पाहून एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवर झेपावण्याच्या धाडसाचा अंगभूत गुण येथेच मिळाला.
लहानग्या नाथाला मित्रांचे खूप वेड होते. सतत मुलांच्या घोळ्नयात. त्यामुळे संघटन करण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गुणांची जोपासना बालवयातच झाली. नाथ कधीही एकट्याने राहत नव्हते. मित्रांसोबत दिवस- रात्र अभ्यास आणि खेळ चालायचे.
तो काळ केवळ वाचनाचा होता. स्वतःचे ज्ञान वाढविण्यासाठी गावात होतील तीच उपलब्ध पुस्तके वाचावी लागायची. पालक वारकरी असल्यामुळे अध्यात्मिक, धार्मिक विषय सतत कानावर पडायचे. त्यातही नाथाला रामायण, महाभारत विविध पुराणे वाचण्याची गोडी लागली. मुक्ताई मंदिर परिसरातच घर असल्यामुळे तेथे चालणारे किर्तन, प्रवचन यातून या विषयांमधील रस वाढत गेला. शालेय अभ्यासात त्रोटक माहिती असलेल्या विषयांची जास्तीची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला जायचा. काहीवेळा विषय संस्कृतात असत. मग तो समजावून घेण्यासाठी प्राकृत भाषेतील संदर्भ शोधावे लागत. विषय पूर्ण समजावून घेण्याची सवय लागली. संदर्भ मिळविण्यासाठी पायपीट व्हायची. संयम राखावा लागायचा.
गावात कथा- पोथी वाचनाचे अनेक कार्यक्रम होत. एखाद्यादिवशी कथावाचक आला नाहीतर नाथालाच बोलावले जायचे. एखाद्या कुटुंबात मृत्यू झाला तर पुढील नऊ दिवस तेथे गरुड पुराण वाचायला हमखास नाथालाच विनवणी केली जायची. कथा संपल्यावर व्यासाचे रुप म्हणून कथावाचकाचे म्हातारे- कोतारे पाया पडत, याचे अपप्रुप वाटत असल्यामुळे नाथही आवडीने हे काम करायचे. नाथाभाऊंचा तालु्नयात प्रत्येक घरात संपर्क झाला आहे तो याच माध्यमातून. राज्याच्या विरोधी पक्षाचे प्रमुख या नात्याने आज मुक्ताईनगर पंचक्रोशीत वावरताना नाथाभाऊंच्या पाया पडणारा सर्वच वयोगटातील वर्ग दिसतो. ही माणसे स्वचःचे वय विसरून नाथाभाऊंच्या समोर झुकतात ती त्यांच्या उत्तुंग व्यक्तीमत्त्वाच्या आदरामुळे. कोणत्याही आपमतलबीपणाची किंवा लाचारीची झलक त्यांच्या डोऴ्यांत दिसत नाही.

1959 मध्ये संपूर्ण राज्यभरात महापुराचे वातावरण होते. तेव्हा ते न भूतो न भविष्यती असे संकट होते. महापुरामुळे कोथळीच्या पुनर्वसनाचा विषय सरकार दरबारी निघाला. गाव विभाजनाची ठिणगी येथे पडली. नव्या गावठाणमध्ये स्थलांतराला नाथाभाऊंचा आणि त्याच्या सहकाऱ्यांचा पाठींबा होता. मात्र गावातील कॉंग्रेसबहुल समर्थकांचा त्याला विरोध होता. अकोला येथे शिक्षण सुरू असतानाच गावाच्या ग्राम पंचायतीची निडणूक लढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला. 1974 च्या सुमारास जिल्ह्यात कॉंग्रेसचे वर्चस्व होते. मा. प्रतिभाताई पाटील मुक्ताईनगरच्या आमदार होत्या. गावाबाहेर राहून गावचे राजकारण करण्याचा हा पहिला प्रयत्न फसला. नाथाभाऊ एका मताने आणि त्यांचे इतर नऊ सहकारी कमी अधिक फऱकाने पराभूत झाले. बहुधा नाथाभाऊंनी स्वतःचा हा पहिला आणि अखेरचा पराभव पाहिलेला असावा. त्यानंतर गेल्या अर्ध दशकातील विविध निवडणुकांमध्ये नाथाभाऊ कधीही पराभूत झालेले नाहीत. त्यानंतर कॉलेजचे शिक्षण आटोपून नाथाभाऊ गावातच आले. 

सरकारच्या रेट्यामुळे 1977 मध्ये कोथळीचे पुनर्वसन झाले. पुनर्वसनाला विरोध आणि सहकार्य अशा दोन विचारांच्या प्रभावातच नाथाभाऊंच्या राजकिय प्रवेशाचा श्रीगणेशा झाला. पुनर्वसनाला विरोधाची भूमिका कॉंग्रेसवाल्यांची होती. नाथाभाऊ पुनर्वसनाला अनुकूल होते. आपोअप ते सत्तेच्या विरोधात राहिले. सोबतचे इतर विरोधक जनता पक्षात गेले म्हणून नाथाभाऊही त्यांच्यासोबत जनता पक्षात गेले. पुनर्वसनस्थळी  गाव सोडून जाणाऱ्यांना तुम्ही पापी आहात...मुक्ताईचे गाव सोडून जाता...असे हिणवण्यापर्यंत प्रकल्प विरोधकांनी मजल मारली होती. 1978 मध्ये तेव्हाचे राज्याचे मंत्री (कै) उत्तमराव (नाना) पाटील यांचा कोथळीत सत्कार झाला. बाळासाहेब फडणवीस, अशोक फडके, कमलकिशोर गोयंका, दगडू राठोड आदी जनता पक्षाचे काम करीत. त्यांच्यासोबत नाथाभाऊंची ऊठबस वाढली.
1982 ची ग्रामपंचायची निवडणूक नाथाभाऊ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी जिंकून इतिहास रचला. गावातील जुनी कॉंग्रेस मोडकळीस आली. ती आजपर्यंत सावरेलली नाही. एकहाती निवडणूक जिंकणारे नाथाभाऊ पहिल्यांदा गावचे सरपंच झाले. तेव्हाच्या मुक्ताईनगर तालु्नयात तेव्हा जनसंघाचा प्रभाव असलेल्या दोन- तीन ग्रामपंचायती होत्या. त्यात नाथाभाऊंचे नाव सतत अग्रभागी असे.

सरपंचपद मिळाल्यानंतर व संघटनेच्या माध्यमातून इतरही गावांशी व नेत्यांशी संपर्क वाढला. तेव्हा अशोक फडके हे लोकांच्या कामासाठी तालु्नयाला जात- येत. त्यांच्या सोबत नाथाभाऊ जात. फडके अधिकाऱ्यांशी कडक भाषेत बोलत. आपले म्हणणे स्पष्टपणे मांडत. तहसीलदार, फौजदार, हवालदार, तलाठी, वीज मंडळ अधिकारी आदींशी फडके कसे बोलतात, कसे वागतात हे नाथाभाऊ जवळून पाहत. त्यांची शैली नाथाभाऊंनीही स्वीकारली. फडकेंमुळे अधिकाऱ्यांशी मैत्रीचा पहिला धडा नाथाभाऊ शिकले. अधिकारी हा कोणत्याही कामात बरोबरीचा सहकारी असतो. त्याच्यात हातून काम करून घेता येते. त्याच्याशी चांगले वागले तर तो मार्ग काढतो अन्य़था तोच काम अडवून ठवतो या विचाराचे बाळकडू नाथाभाऊंना येथेच मिळाले. जिल्ह्यातील काही राजकारणी मंडळी रांगडे राजकारण करताना अधिकाऱ्यांना नोकर असल्याचे म्हणतात, त्याचवेळी नाथाभाऊ मात्र अधिकाऱ्यांना कामातील सहकारी असे संबोधतात. विचारांचा हा विधायक फरक सहज लक्षात येतो.

सरपंच असलेले नाथाभाऊ गावामधील विविध कामे करुन घेण्यासाठी तालु्नयाच्या अधिकाऱ्यांना गावात बोलवत. मिरचीची भाजी- भाकरी हा खास बेत असे. गावात आलेला अधिकारी मित्र व्हायचा. कामाच्या सोयीचे मार्ग सांगायचा. ग्रामस्थांची कामे मार्गी लागत. नाथाभाऊंच्या शब्दांला सरकारमध्ये मान मिळतो, हे चित्र तेव्हापासून तयार झाले. आजही नाथाभाऊ भाजपचे विरोधी पक्षनेता असताना त्यांचे मैत्रिपूर्ण संबंध कॉंग्रेस आघाडीतील अनेक मातब्बर पुढाऱ्यांशी आहेत. विरोधात असूनही सरकार नाथाभाऊंचे कसे ऐकते ? हा प्रश्न सत्ताधाऱ्यांसह भाजपतील स्वकियांनाही पडतो.
सरपंच असताना 1980 मध्ये नाथाभाऊंनी तालु्नयाच्या खरेदी विक्री संघाची निवडणूक लढविली आणि तेथेही परिवर्तन घडवून कॉंग्रेसला संस्थेबाहेर काढले. ते आजपर्यंत. खरेदी विक्री संघाचे चेअरमन झाल्यानंतर नाथाभाऊ तालुका पंचायत समितीचे पदसिद्ध सदस्य झाले. तालु्नयाच्या राजकारणात घुसण्याची ही पहिली संधी त्यांना मिळाली. त्यांच्या नेतृत्व विकासाला आणि विस्ताराला इतरही मार्ग मोकळे झाले. 

तालु्नयातील प्रश्न घेवून नाथाभाऊ जळगावच्या जिल्हा परिषदेत जायला लागले. कोथळीचा सरपंच म्हणून केवळ गावचेच पाहणार अशा संकुचित विचारात नाथाभाऊ अडकले नाहीत. तालुकास्तरावर काम करताना तालु्नयाचे प्रश्न मांडायचे. नंतर जिल्हा, नंतर विभाग, त्यानंतर राज्य आणि आता देशाच्या पातळीवर विषयांचा विस्तार होत गेला. अनुभवांची शिदोरी व्यक्तीमत्व संपन्न करीत गेली. जिल्हा परिषदेत तेव्हा (कै) के. डी. आबा पाटील अध्यक्ष होते. त्यांच्याशी नाथाभाऊंचे जुळले. नाथाभाऊंनी आणलेली कामे आबा अर्ध्यातासात करीत. हातोहात आदेश मिळत. आबांची प्रशासनावर पकड होती. त्यांच्याकडून प्रशासन हाताळणी नाथाभाऊ शिकले. ते स्वतः ही बाब अभिमानाने सांगतात.

खऱेदी विक्री संघाचे अध्यक्ष असताना नाथाभाऊंना सहकार क्षेत्र विस्ताराचा सल्ला तेव्हाचे सहायक उपनिबंधक पी. डब्लू. पाटील यांनी दिला. राज्य सरकारने अवघ्या 10 रुपये सभासद वर्गणीत खरेदी विक्री संघाचे सभासद वाढविण्याच्या सूचना दिल्या होत्या. प्रत्येक सभासदाचा सातबारा उतारा हवा अशी अट होती. नाथाभाऊंचे तलाठ्यांशी चांगले संबंध होतेच. त्यांनी पंचक्रोशीतील तलाठी एका ठिकाणी बसवून एक हजार सभासदांचे सातबारा उतारे तयार केले. सभासद वर्गणी स्वतःच भरून टाकली. जेव्हा ही बाब कॉंग्रेसच्या पुढाऱ्यांच्या लक्षात आली तेव्हा वेळ निघून गेली होती आणि सभासद वर्गणीचा आकडा प्रत्येकी 100 रुपये झाला होता. कॉंग्रेसच्या कोणत्याही पुढाऱ्याला एवढी रक्कम एकहाती भरणे श्नय नव्हते. तेव्हा पेट्रोल 40 रुपये लिटर होते. त्या तुलनेत 100 रुपये हा आकडा हा खूप खर्चिक होता. तालु्नयातील कॉंग्रेसचा कोणताही नेता तेव्हा सभासदांची एकरकमी सभासद वर्गणी भरण्यास तयार नव्हता. त्यामुळे खरेदी विक्री संघात तेव्हापासून नाथाभाऊंचे जे वर्चस्व निर्माण झाले ते आजपर्यंत.

तेव्हाच्या सहायक निबंधकांनी दिलेला सहकार क्षेत्राच्या वाढीचा सल्ला नाथाभाऊंनी एक नवा मार्ग म्हणून स्वीकारला. तेलबिया उत्पादक संस्था, नागरी पतसंस्था, औद्योगिक सहकारी संस्था, गृहनिर्माण संस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था, दूध उत्पादकांची संस्था स्थापन केल्या. एवढेच नव्हेतर त्यांचा कारभार पारदर्शी व यशस्वीपणे सुरू ठेवला. या संस्थांमध्ये काही काळ अध्यक्ष किंवा सभापतीपद नाथाभाऊंनी सांभाळले. त्यामुळे पतसंस्थाचे काम तळागाळातील सभासदांपर्यंत कसे चालते? याचा अनुभव त्यांना येत गेला. संस्थेच्या कारभारात निर्माण होणारे अडथळे, इरसाल सभासदांकडून होणारी दिशाभूल याचे चालते- बोलते अनुभव नाथाभाऊंनी घेतले. याच अनुभवांच्या शिदोरीवर नाथाभाऊंचे आमदार म्हणून असो की मंत्री म्हणून असो किंवा आता प्रभावी, अभ्यासू विरोधापक्षनेता म्हणून होणारे भाषण वास्तवदर्शी असते. त्यात शासनाच्या अपुऱ्या माहितीवर उपहास असतो, त्रृटींवर प्रहार असतो, मंत्री वर्गाची विनोदाने घेतलेली फिरकी असते आणि बऱ्याचवेळा वास्तव मांडून सभागृहाला स्तंभित करणारी माहिती असते.
नाथाभाऊंची शेती, सिंचन आणि पाण्यावरील भाषणे हा त्या त्या काळातील वास्तवांचा संदर्भ ग्रंथच म्हणावा लागेल. राज्यातील कोणत्याही प्रश्नाची माहिती घेण्यासाठी सरकारी यंत्रणेच्या अगोदर विरोधी पक्षनेता म्हणून नाथाभाऊ पोहचतात. तेथील कार्यकर्त्यांच्या मदतीने प्रश्नाच्या मूळापर्यंत पोहचतात. हस्तेपरहस्ते मिळालेल्या माहितीवर ते अवलंबून राहत नाहीत. स्वतः पिडीतांशी, समस्याग्रस्तांशी संपर्क साधतात. थेट बोलतात. मिळालेल्या माहितीवरून संबंधित प्रशासनाला सुनावतात. सूचना करतात. प्रसंगी पत्रकारांशी बोलून आपले मतही परखडपणे मांडतात. नाथाभाऊंच्या या कार्यशैलीचा श्रीगणेशा कोथळीमधील विठ्ठल- रुखमाईच्या मंदिर परिसरात आजही लागणाऱ्या जनता दरबारात आहे. तेथील प्रांगणात खूर्ची टाकून नाथाभाऊ बसतात. परिसरातील झाड अन् झाड न्याहाळतात. पाण्यापासून फांदी, फुल आणि पानगळपर्यंत बोलतात. या दरम्यान भेटणारे, गाऱ्हाणी मांडणारे जमत असतात. थेट बोलतात, निवेदने देतात.

शेताच्या मातीत आणि गावातील संस्थामध्ये काम केल्याचा फायदा काय होतो, हे स्पष्ट करताना नाथाभाऊ विधीमंडळीत अलिकडचा किस्सा रंगवून सांगतात. नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी कृषिमंत्र्यांनी अत्यंत घाईने सुधारीत महाराष्ट्र किड नियंत्रण कायदा सभागृहात मंजुरीसाठी ठेवला. महाराष्ट्रातील बियाणे, भेसळ आणि विविध प्रकारे वाढणारे तण या विषयी जुजबी निवेदन करून सभागृहाने घाईत का असेना हा कायदा मंजुरीची अपेक्षा व्यक्त केली. अर्थात, नवा कायदा अभ्यासू द्या नंतर त्यावर चर्चा करून पुढील अधिवेशनात मंजुरी देवू असे नाथाभाऊंचे म्हणणे होते. मात्र मंत्र्यांचा आग्रह होता, चर्चा आजच आणि मंजुरी आजच. नाथाभाऊंनीही ओके म्हटले आणि चर्चेला सुरवात स्वतःच केली. विषय शेतातील तणापासून सुरू झाला. प्राचिन भारतीय शेती आणि त्यानंतर इतर देशातून आलेले धान्य (लाल ज्वारी) वगैरे याचे संदर्भ देत पहिले महायुद्ध, दुसरे महायुद्ध फिरवत विषय तण म्हणून वाढणाऱ्या कॉंग्रेस गवत की गाजर गवत या पर्यंत आला. त्यानंतर बेशरमीची वाढ, पाण्यात वाढणाऱ्या त्रासदायक वेली असा विषय फिरत असताना सुमारे 45 मिनिटे झाली. सभागृहात एखाद्या विषयावर विरोधी पक्षनेता सविस्तरपणे विचाक मांडत असतील तर त्यांना विधानसभाध्यक्षही रोखू शकत नाहीत. त्यामुळे इतरांसह अधिर झालेल्या कृषिमंत्र्यांनी विचारले, भाऊ किती वेळ लागणार ? भाऊ मिश्किलपणेे म्हणाले, यापूर्वी मी सभागृहात नॉनस्टॉप 8 तास 32 मिनिटे बोललो आहे. शेतातील किड आणि तण नियंत्रण हा लहानपणापासून माझा आवडता विषय आहे. त्यामुळे आज किमान 4 तास तरी मी बोलणार... नाथाभाऊंचे हे ऐकून कृषिमंत्र्यांनी जाहीर केले, मी कायद्याचा मसूदा मागे घेत आहे. पुढच्या अधिवेशनात तो मांडला जाईल आणि चर्चेची सुरवात पुन्हा नाथाभाऊच करतील. सरकारला जो संदेश द्यायचा होता तो नाथाभाऊंनी कृतीतून दिला. असे अनेक विषय सभागृहात वारंवार घडतात आणि नाथाभाऊंच्या भडीमारावर मंत्र्यांची नेहमी भंबेरी उडते.
लहानपणापासूनच्या अनुभवांचा ठेवा नाथाभाऊंनी मनात केवळ जपलेला नाही. त्या आठवणी ते वारंवार काढतात. गप्पांच्या ओघात कार्यकर्त्यांना, मित्रांंना सांगतात. स्वतःचे संदर्भ तपासून घेतात. आपले अनुभव सांगण्यामागे त्यांची एक भावना असते, ती म्हणजे मी गावात राहीलो. मित्रांमध्ये राहिलो. समुह संघटन तेव्हा शिकलो. अधिकारी- कर्मचारी वर्गाच्या सहकार्यानेच मी अनेक गोष्टीमार्गी लावल्या. जिल्ह्याच्या विकासाबाबत कोणीही एखादा ग्रंथ लिहीला तर त्यात केवळ एखादा टिंब म्हणून मी केलेल्या कामाची काहीतरी नोंद असेल. आताच्या तरूणांनी राजकारण करताना या पद्धतीनेही विचार करायला हवा. केवळ व्यवस्थापन शास्त्राचे धडे गिरवून सर्वच काही शिकता येते असे नाही.
नाथाभाऊंचे वास्तव्य आता जळगाव, मुंबई, कोथळी असा ठिकाणी असते. स्व. निखील यांचे चिरंजीव गुरूनाथच्या बाललिलांमध्ये ते मुलाला शोधतात. नातवाचाही आयोबांवर जीव. घरातल्या लट्नया भानगडी घेवून तो आजोबांकडे येतो. मूत्रपिंड रोपणाची शस्त्रक्रिया झालेली असल्यामुळे नाथाभाऊंना व्हायरल इन्फे्नशनची काळजी घ्यावी लागते. ते सतत तोंडाला रुमाल लावून असतात. गुरूनाथच्या सहवासामुळे नाथाभाऊंचा कामाच उत्साह वाढतो.

आगामी विधानसभेच्या निवडणुकीचा कौल युतीअंतर्गत भाजपच्या बाजूने गेला तर नाथाभाऊ मुख्यमंत्रीपदावर दावा करणारे पहिले नेते ठरू शकतात. जळगाव जिल्ह्यात तरी आज अबकी बार... नाथाभाऊ सरकार...असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. कोथळीच्या आजुबाजूचा परिसर संतांच्या सहवासाचा आहे. त्यांच्या पुण्याईमुळे नाथाभाऊंची अव्यक्त ईच्छा पूर्ण व्हावी हीच यानिमित्त प्रार्थना आहे.

वृक्षप्रेमी नाथाभाऊ

कोथळीसा जुन्या मुक्ताई मंदिराचा परिसर आहे. तेथे आता विठ्ठल रखूमाईचे मंदिर आहे. हा परिसर कधीकाळी पूर रेषेत होता. गेल्या दहा वर्षांत तेथे हजारो ट्रॅ्नटर माती भराव टाकून जमिन उंच करण्यात आली आहे. धरणाच्या बॅक वॉटरची मर्यादा 213 मीटर आहे. तर या परिसराची उंची 214 मीटर आहे. या परिसरात हजारो वृक्षांची लागवड करण्यात आली असून ती यशस्वीपणे जगवली आहेत. आज तेथील वृक्षराजींमध्ये पक्षांचे थवेच्या थवे विहार करताना दिसतात. नाथाभाऊ स्वतः वृक्षांचे चांगले जाणकार आहेत. वाहनातून जाताना किंवा पायी फिरताना ते अनेक झाडांची ओळख सहकाऱ्यांना करून देतात. कोथळीत रुद्राक्षाचे झाड आहे. नागफणा वाढविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. कळलावी हा वेल त्यांनी एका शेतात पाहिला. त्याच्या फूलाला हात लावण्यापासून एका शेतकऱ्याने रोखले. या वेलीला कळलावी का म्हणतात याबाबत नंतर नाथाभाऊंनी माहिती मिळवली. महिलांना प्रसुती काळात वेदना होत नसतील तर या वेलीचा रस देवून तशा कळा निर्माण केल्या जातात आणि महिलांची प्रसुती सुलभ होते, अशी माहिती त्यांना मिळाली. न्हाईच्या शेंगाबाबतही अशीच माहिती भाऊ देतात. या शेंगा शेतात होत्या. त्या आम्ही खायचो. एकदा मुंबईतील काही संशोधक मित्रांना या शेगा हव्या होत्या. मी त्यांना कोथळीला आणले. शेंगा दाखविल्या. त्यांनी त्या सोबत नेल्या. त्यांच्यापैकी एक जण कॅन्सरच्या उपचारावर संशोधन करीत होता. त्याने सांगितले की, या शेंगांमध्ये कॅन्सर प्रतिबंधाचे गुण आहेत. 


(प्रसिद्धी दि. सप्टेंबर २०१४ तरुण भारत)

No comments:

Post a Comment