Wednesday 4 February 2015

कट्टर धर्मांध आणि ठार आंधळे

जचे पान १ लावताना २ बातम्या जवळ जवळ लावल्या आहेत. पॅरीसमध्ये एका मासिकाच्या कार्यालयात घुसून मुस्लिम दहशतवाद्यांनी संपादकसोबत २ कार्टूनिस्ट आणि १२ लोकांना गोळ्या घालून ठार केले. या मागचे कारण काय आहे तर, मोहम्मद पैगंबरचे कार्टून या मासिकातून प्रसिध्द केल्याचा राग कडव्या मुस्लिम धर्मांधांना होता. त्यांनी जाहीरपणे धमकावून व दहशतवाद्यांना पाठवून हे कृत्य घडवून आणले. दुसरी बातमी आहे भारतातील दिल्ली उच्च न्यायालयाने पीके संदर्भातील देवादिकांच्या विटंबनेचा मुद्दा मांडणारी जनहित याचिका फेटाळली.

न्यायाधिशांना चित्रपटात गैर काहीही दिसले नाही. प्रेक्षक म्हणून बसलेल्या लोकांच्या पायांशी लपणा-या शंकराचे पात्र म्हणजे विटंबना नसावीच, बहुधा न्यायालयास तसे वाटते. या दोन्ही बातम्यांचा काही संबंध आहे का ? लखनऊ उच्च न्यायालयात अशीच एक याचिका प्रलंबित आहे. मुंबई, पुण्यात पीकेच्या टीमवर गुन्हे दाखल आहेत. दिल्ली उच्च न्यालयाचा निकाल इतर ठिकाणी आडवा येईल. आता प्रश्न पडतो तो हाच की, पैगंबरसाठी हाती बंदूक घेणारे श्रेष्ठ की न्यायालय, पोलीस, सरकारकडे न्याय मागणारे हिंदुत्ववादी दुबळे ? अगदीच षंढ म्हटले तरी चालेल. आमच्या समाजातील अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा हा स्वैर वापर आणि आंधळी सहिष्णूता आम्हाला कोणत्या दिशेने नेत आहे समजत नाही. हिंदुंच्या धर्म व अस्तित्वासाठी कोणाकडे पाहावे प्रश्न आहे. सरकारचा सेन्साॅर बोर्ड आंधळा आहे. प्रशासन दुबळे आहे. पोलीस हताश आहेत. माध्यमांपैकी काही अपरिपक्व व बरीचशी एकांगी आहेत. न्यायालयेही आगतिक वाटत आहेत. पीके चित्रपटाने केवळ धार्मिकतेचाच नव्हे तर भविष्यात आमच्या अस्तित्वाचाही प्रश्न निर्माण केला आहे. पॅरिसमधील धर्मांधांचे कृत्य पाहता भारतात होणारी पत्रकार हल्ला प्रतिबंक कायद्याची मागणी योग्य वाटायला लागते. दुर्दैवाने आपल्याकडे अशा विषयांवर विचारवंत मंडळी प्रचलित कायदे पुरेसे आहेत असे म्हणून विषयांतर करतात. शिवाय, अभिव्यक्ति स्वातंत्र्याला स्वैराचार मानणारी मंडळी विरोध करते. म्हणूनच अहिंसावादी भगवान महावीरांचे "अहिंसा परमो धर्मः, हिंसा धर्म तथैव चः" (अर्थ - अहिंसा हा सर्वोच्च धर्म आहेच पण धर्मासाठी हिंसाही गरजेची आहे) हे धर्म वचन आता नव्या पिढीला समजून सांगावेच लागेल. प्रसंगी त्यांच्या हाती शस्र द्यावे लागेल. गितेतही कृष्णाने अर्जुनाला धर्माच्या रक्षणासाठी हाती शस्र धरण्याचा उपदेश केलाच आहे..
 (सोबत जोडलेल्या छायाचित्रात अहिंसा परमो धर्म... बाबत गितेचा उल्लेख चुकला आहे. येथे त्याचा केवळ अर्थ लक्षात घ्या)

(Posted on FB - ७ जाने्वारी २०१५ )

No comments:

Post a Comment