Tuesday, 3 February 2015

पीकेचा पंचनामा

पीकेच्या पोस्टरवर आमीर खानला पूर्ण नग्न दाखवून पीके चित्रपटाविषयी सनसनाटी निर्माण करण्यात दिग्दर्शक-निर्माताद्वयी राजकुमार हिराणी, विधू विनोद चोप्रा आणि अभिनेता आमीर खान हे त्रिकूट यशस्वी झाले होते. या चित्रपटात करमणुकीची पातळी ही कमरेखालच्या दर्जाची असेल याचा अंदाज त्याचवेळी आला होता. कमरेखालचे कापड काढून टाकण्यासोबतच हिंदू देवादिकांची टवाळी करणे, लैंगिक विषयांतून हीन दर्जाची विनोद निर्मिती करणे आणिहिंदू युवतींना मुस्लिम युवकांच्या प्रेम जाळ्यात पडण्याचा संदेश...

पीकेचा पंचनामा पीकेच्या पोस्टरवर आमीर खानला पूर्ण नग्न दाखवून पीके चित्रपटाविषयी सनसनाटी निर्माण करण्यात दिग्दर्शक-निर्माताद्वयी राजकुमार हिराणी, विधू विनोद चोप्रा आणि अभिनेता आमीर खान हे त्रिकूट यशस्वी झाले होते. या चित्रपटात करमणुकीची पातळी ही कमरेखालच्या दर्जाची असेल याचा अंदाज त्याचवेळी आला होता. कमरेखालचे कापड काढून टाकण्यासोबतच हिंदू देवादिकांची टवाळी करणे, लैंगिक विषयांतून हीन दर्जाची विनोद निर्मिती करणे आणिहिंदू युवतींना मुस्लिम युवकांच्या प्रेम जाळ्यात पडण्याचा संदेश देणे असे समाजघाताचे बेमालूम कार्यही हिराणी-चोप्रा-खान त्रिकुटाने चोखपणे केले असल्याचे चित्रपट पाहाताना जाणिवपूर्वक समजून घेतले. अभिव्यक्ती स्वातंत्र्य रक्षणाच्या आडून हिंदू संस्कृतीवर होणारा हा हल्ला वेळीच रोखण्याची गरजही लक्षात आली. म्हणूनच पीकेचा पंचनामा वेगळ्या नजरेतून करणे आवश्यक वाटते...

साधारणपणे महिनाभरापूर्वी पीके चित्रपटाचे एक पोस्टर प्रसिद्ध झाले होते. सुप्रसिद्ध अभिनेता व स्वतःला फरफे्नटनिस्ट म्हणवून घेणारा आमीर खान हा नग्नावस्थेत लिंगासमोर टेपरेकॉर्डर पकडून उभा असल्याची छबी त्यावर होती. अपेक्षेनुसार या पोस्टरवर वादविवाद होवून विषय न्यायालयात गेला. नेहमीप्रमाणे अभिव्यक्ती स्वातंत्र्य या शब्दाच्या लवचिकतेचा वापर होवून हे पोस्टर न्यायालयाच्या कज्जातून सुटले. पोस्टरमुळे चित्रपटाविषयी प्रदर्शनापूर्वीची सनसनाटी निर्माण करण्याचा त्रिकुटाचा हेतू साध्य झाला. मात्र, प्रश्न हाच होता की, पीके चित्रपटाचा इतर आशय हाही कमरेखालचाच असेल का? अलिकडे गाजलेल्या प्रत्येक चित्रपटात पुरूषांच्या मुुतारीतील दृश्ये दाखवली गेली आहेत. त्याशिवाय चित्रपटांची कथा पूर्ण होत नाही. पीकेचे निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता त्यापुढची कोणती पायरी दाखवणार आहेत? ही उत्सुकता होती. चित्रपट सिनेमागृहात झळकला तेव्हा दोन-तीन शोनंतर लक्षात आले की, चित्रपटात कमरेखालचे विनोद आणि हिंदू देवदेवतांची टवाळी या सोबत प्रेमाचा झिणझिण्या आणणारा मसाला सुद्धा आहे. हिंदुंच्या वयात येणाऱ्या पोरी जीवनाचा साथीदार निवडण्याबाबत पूर्णतः बावळट असल्याचेही चित्रपटात दर्शविण्यात आले आहे. म्हणूनच हिंदुत्ववादी विविध संस्था-संघटना या आशयावर आक्षेप घेवून चित्रपटाच्या विरोधात उभ्या राहिल्या. पीके चित्रपटात हिंदुंच्या देवादिकांसोबत मुस्लिमांचा अल्लाह, ख्रिश्चनांचा गॉड यांच्यासंदर्भात काही प्रसंगांचे चित्रण आहे. एकूण 2 तास 56 मिनिटांच्या चित्रपटात जास्तीत जास्त चित्रण हे हिंदूच्या देवादिकांची, मंदिरातील भाविकांची, बाबा-बुवांची, दैववादी पालकांची टिंगल-टवाळी करणारे आहे. हे पाहाता हा चित्रपट धर्मवाद आणि त्याच्याशी संबंधित अवडंबर यावर टीका करणारा असला तरी तटस्थ व प्रामाणिक वाटत नाही.

चित्रपटातून मिळणाऱ्या सर्वसाधारण संदेशाचा विचार केला तर हिंदुंच्या प्रथा-परंपरांना वाईट ठरविणारा एकांगी कूसंदेश हा चित्रपट देतोे. मी स्वतः अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. म्हणूनच एवढ्या तटस्थपणे हे लिहू शकतोय. मघाशी उल्लेख केल्यानुसार पीकेतही पुरूषांच्या मुतारीचे दृश्य आहेच. शंकराच्या वेशातील पात्र मूत्र विसर्जनासाठी तेथे जातो. तेथे आमीर खान त्याला शंकर समजून कसा जेरीस आणतो? याचे चित्रण या दृश्यात आहे. याच विषयाचा दृश्य विस्तार पुढेही आहे. आमीरला टाळण्यासाठी शंकराच्या वेशातील पात्र लपण्यासाठी प्रेक्षकांच्या पायाशी लोटांगण घालतो, असे दाखविले गेले आहे. हिंदुत्ववादी संघटनांचा तीव्र आक्षेप आहे तो अशा दृश्यांना. ही दृश्ये म्हणजे देवादिकांच्या प्रतिकांची विटंबनाच. शांतपणे विचार केला तर दिग्दर्शकाला अशा प्रकारची दृश्यमालिका दाखविणे आवश्यक होते का? हा प्रश्न पडतो. शंकराच्या पात्रासोबतचे आमीरचे दृश्य मुतारीत का सुरू झाले? तेथून पळालेला शंकररुपी पात्र लपायला प्रेक्षकांच्या पायाशीच का गेला? याची उत्तरे त्रिकूट देवू शकणार नाही. या दृश्यातील आशयासाठी वेगळ्या दृश्य चौकटी वापरता आल्या असत्या, हे कोणताही समीक्षक मान्य करेल.

पीके चित्रपटाचा आशय अभिरूचीची खालची पातळी केवळ या एक-दोन प्रसंगातच गाठत नाही. तश्या दृश्य मालिकांचे अनेक प्रसंग चित्रपटात आहेत. अगदी वेगळ्या भाषेत बोलायचे तर हिराणी-चोप्रा-खान या त्रिकूटाने नव्या पिढीला सेक्स एज्रुकेशन ईन न्यू पॅकेज देण्याचा चलाखीपूर्ण आणि कपटी प्रयत्न केला आहे. या चित्रपटातून लैंगिक मुक्त शिक्षणाचे धडे त्रिकुटाने पालक, मुले, नोकरदार, भाविक अशा सर्वांना दिले आहेत. आमीर खानला या चित्रपटात नग्न दाखविले आहे. चला त्याला तसा पाहू असे उघडपणे म्हणून कोणत्या घरातील महिला, मुली चित्रपटासाठी जाण्याची ईच्छा प्रकट करतील? लैंगिक कार्यासाठी वापरले जाणारे निरोध नोकरदारांनी खिशात घालून फिरावे आणि मुलांनी हे काय आहे? असे उघडपणे विचारावे असाही संदेश हा चित्रपट देतो. बहुधा हा प्रसंग म्हणजे खुल्या-मुक्त लैंगिक व लोकशिक्षणाचा प्रयत्न असावा. देशाची राजधानी दिल्लीची प्रतिमा बिघडवणाराही संदेश चित्रपटाने दिला आहे. दिल्लीतील सधन-उच्चभ्रू कुटुंबातील माणसे-बाया लैंगिक संबंध चार भिंतीच्या आड नव्हे, तर महागड्या गाड्या रस्त्यावर उभ्या करुन काचा खुल्या ठेवून गाडीतच करतात. कधी-कधी अशा गाड्या रांगेत पार्क करुन तेथे सर्वांचे शरीरकर्म सुरू असते, असाही संदेश या चित्रपटातून दिला जातो. चित्रपटातील विविध दृश्य मालिकांमधून देवदेवता आणि बाबा-बुवांच्रा संदर्भात टवाळखोर चित्रण केलेले आहे. ती दृश्ये करमणूक प्रधान मानली तरी त्यातून हिंदू समाज आणि हिंदू युवतींच्या प्रतिमा-विचारधारा बिघडवण्राचे व भरकटविण्राचे कार्य चतुराईने केल्याचे सहजपणे लक्षात येते. हे काम कसे केले गेले आहे? ते काही प्रसंगातून समजून घेवू. चित्रपटाचा हिरो आमीर खान हा परग्रहावरचा प्राणी आहे. पृथ्वीवर नग्न राहण्याचा अधिकार केवळ प्राण्यांनाच आहे म्हणून! तो भल्यामोठ्या अवकाशयानातून पृथ्वीवर धुरातून अवतरतो. मात्र, त्याच्या अतीप्रगत ग्रहावर अजून कपड्यांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे गळ्यात लॉकेटप्रमाणे अवकाशयानाचा रिमोट लटकावणारा आमीर पूर्णतः नग्न असतो. आमीर सोबत वावरणारी अभिनेत्री अनुष्का ही हिंदूची पोरगी आहे. तीचा बाप टीळा लावतो व गळ्यात माळा घालतो. म्हणजेच त्याचे घराणे कट्टर धार्मिक. परदेशात शिकणाऱ्या मुलीवर या बापाचे संस्कार नाहीत. कारण, ती तेथे मांड्या दिसतील अशी आखूड चड्डी घालते. सार्वजनिक ठिकाणी ती त्याच अवस्थेत वावरते. घरात येणाऱ्या मित्रासोबतही ती याच चड्डीत वावरते. आनंद झाला की ती शॅम्पेन पीते. अनुष्काचा चॅनेलवाला बॉसही कार्रालरात कोटाच्या खाली पारजामा घालतो. हिराणी-चोप्रा-खान रांना असा पारजामा घालून ऍन्करिंग करणारा टीव्ही संचालक कुठे दिसला? हा प्रश्न पडतो. हा बॉस कार्रालरात काम करणाऱ्या पत्रकार मुलीला दोन-तीनदा सर्वांसमोर पार्श्र्वभाग दाखविण्याचे धैर्य करतो. ही पात्र योजना विषयाला मुक्त लैंगिक स्वैराचाराकडे नेणारी आहे असे सुज्ञ प्रेक्षकाला वाटत नाही?

गेल्या 24 वर्षांच्या पत्रकारितेत मुंबई, पुणे, नागपूर रेथील विविध मीडिरा हाऊसमध्रे फिरण्याची संधी मला मिळाली. विविध कार्यालयांमध्ये हाफ चड्डी घालणारी हिंदूची एकही पत्रकार पोरगी मला अजून आढळलेली किंवा भेटली नाही. तहलकाफेम तरुण तेजपालचे उदाहरण सोडले तर सहकारी महिलांशी सर्वांच्या समोर किमान सभ्य वागणारेच वरिष्ठ मी पाहिले आहेत. चित्रपटाची कहाणी पुढे सरकताना अनुष्काला पाकिस्तानचा मुस्लिम रुवक भेटतो. पाच मिनिटांच्या गाण्यात तिची मैत्री या युवकाशी होते. ती त्याचा जाहीरपणे मूका घेते. तो सुद्धा ओठात ओठ घालून. मुका घेण्याची ही पद्धत वापरताना मुला-मुलींना आता पालकाची परवानगी घेण्याची गरज नाही. कारण, पीके हा चित्रपट सहकुटूंब पाहाताना आपणच त्यातील आशयाला सहमती दर्शवित आहे, याचे भान पालकांना असत नाही. या पद्धतीचे सारे चित्रण तथाकथित समाजवादी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यवाले यांना वास्तववादी वाटते.

पीके चित्रपटातील मुक्त लैंगिक शिक्षण, मुस्लिम तरुणासाठी प्रेमाळलेली हिंदू मुलगी, देवादिकांच्या अवडंबराच्या आडून प्रेमाचे क्रॉस कने्नशन या गोष्टी लव्ह जिहाद या स्फोटक विषयाला पूरक ठरणाऱ्या आहेत, असे कोणालाही वाटत नाही का? हा प्रश्न विचार न करता उडवून लावण्याचा नाही. आपल्या समाजात काय बदल होत आहेत, कोणत्या विचारधारा वाढत आहेत, यात आपण आपले अस्तित्व काय म्हणून टीकवून ठेवू शकू याचा गंभीरतापूर्वक विचार करणे आवश्यक आणि गरजेचे झाले आहे. गुलजार यांच्यासारखे विचारवंत म्हणतात, धर्माची ए्नसपायरी झाली आहे. याचा सोपा अर्थ, धर्म हा विषय सोडून द्या. त्यांच्या अगोदर ज्येष्ठ साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे यांनी हिंदू म्हणजे अडगळ असेही म्हटले आहे. पीकेच्या निमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलनवाल्यांना देवदेवतांच्या विरोधात बोलायची संधी चालून आली आहे. यापूर्वी कधीतरी डॉ. श्रीराम लागू यांनी अंनिसच्या व्यासपिठावरून परमेश्र्वराला रिटायर करा असे म्हटले होते. वरील संदर्भातून दोन निष्कर्ष निघतात. ते म्हणजे, धर्म सोडा आणि देवादिकांच्या मानसिकतेतून बाहेर पडा. आता असे केले की आपली धार्मिक ओळख पूर्णतः संपली. आता थोडे सरकार आणि न्यायालयांचे निर्णय समजावून घेवू. आणि न्यायालयाने अलिकडे महिला-पुरूषांचे लग्नाशिवाय एकत्र राहणे म्हणजे, लिव्ह ईन रिलेशनशिप मान्य केली आहे. काही दिवसांपूर्वी एका विशेष न्यायालयाने विवाहपूर्व लैंगिक संबंधाला दोघांची सहमती मानले आहे. त्यामुळे महिलेकडे असलेला फसवणुकीतून बलात्काराचा आरोप करण्याचा अधिकार काढला गेला आहे. म्हणजेच लैंगिक संबंधांचा छुपा हेतू ठेवून एखादा पुरूष सुशिक्षीत युवतीला काही काळासाठी सोबत ठेवू शकतो. तिच्याशी लैंगिक संबंध ठेवू शकतो आणि नंतर तिला सोडूही शकतो. अशा घटनांमध्ये आता केवळ फसवणुकीचा अदखपात्र गुन्हाच पोलिसात नोंदला जाईल. या विवेचनातून मुक्त समाजरचनेचे चित्र कसे दिसते? हे आता पाहू.

आमचा समाज धर्ममुक्त आहे. आम्ही देवादिके मानत नाहीत. आम्ही अंधश्रद्धा मुक्त आहोत. आता आमच्या मुला-बाळांचे रोटी-बेटी व्यवहार कोणाशीही होवू शकतात. एवढेच नव्हे तर आमच्या उपवर मुली या लिव्ह ईन रिलेशनमध्ये कोणा सोबतही राहू शकतात. सोबतचा युवक हा धर्ममुक्त समाजाचा घटक असल्यामुळे तो कोणीही आणि कोणत्याही देशाचा, वंशाचा असू शकतो. त्या युवकाचे हिंदू मुलीसोबतचा छुपा हेतू साध्य झाल्यानंतर तीला तो सोडू शकतो. अशावेळी कायदा आणि न्यायालय सुद्धा मुलीच्या बाजूने नाही. हे चित्र पीके चित्रपटाच्या निमित्ताने एवढ्यासाठीच मांडले आहे की, अशा चित्रपटांचा सामाजिक परिणाम कोणावर, कोणत्या वयोगटावर, कोणत्या लिंग घटकावर काय होईल? हे कोणीही सांगू शकत नाही. मी याच शंकेतून येथे विचार करतो तो फक्त तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या हिंदू युवतींचा. हिराणी-चोप्रा-संजय दत्त या त्रिकूटाचा लगे रहो मुन्नाभाई हा चित्रपट झळकल्यानंतर समाजाला आंदोलन करण्याची नवीदिशा मिळाली होती. गेट वेल सून म्हणत फुले-बुके देणाऱ्या आंदोलकांची संख्या वाढली होती. असाच एखादा संदेश पीकेतून तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मुलींनी घेतला तर पालक काय करणार? तारुण्याच्या उंबरठ्यावरील मुली पीकेतून काय संदेश घेवू शकतात, हेही समजावून घेवू. अनुष्का ही हिंदूची मुलगी पाकिस्तानी मुस्लिम तरुणाच्या प्रेमात पडते. तरुणाच्या कुटुंबाची तिला काहीही माहिती नाही. पालकांचा विरोध असताना ती त्या मुस्लिम मुलाशी लग्नाचा निर्णय घेते. चित्रपटातील या दृश्यमालिकेने हिंदुंच्या मुली प्रभावित होणारच नाही, असे कोणी म्हणून शकते का? येथे हिंदू मुली प्रभावित होवू शकतात, हीच श्नयता गृहीत धरून सावधगिरीने काही मुद्दे मांडायचे आहेत. हिंदू आणि मुस्लिम मुला-मुलीतील प्रेमाला विरोध नाही. अशा प्रकारच्या प्रेमातून आयुष्यभर विवाह निभावल्याची उदाहरणे फार थोडी आहेत. पीके चित्रपटातील अभिनेता आमीर खान यांनेही पहिल्या हिंदू बायकोशी तलाक घेतला आहे. लव्ह जिहादच्या नावाने मुस्लिम तरुणांनी हिंदू मुलींना फसविल्याचीच उदाहरणे अधिक असून सध्या त्यांची चर्चा जोरात आहे. अशा वातावरणात लिव्ह ईन रिलेशन शिप, सहमतीने होणारे लैंगिक शोषण याची जाणिव पालकांनी मुलींना करून देणे आवश्यक वाटते. पीके चित्रपट मुलींना लव्ह जिहादच्या प्रवृत्तीकडे आकर्षून घेणारा वाटतो तो याच भीतीने. पीके चित्रपटातील हिंदुंच्या देवादिकांचे चित्रणही वास्तव किंवा तटस्थ नाही. आमीर खान मंदिर, मशीद, चर्च, गुरूद्वारात जातो. त्राला देव, अल्लाह, गॉड भेटत नाही. पण चित्रपटभर हिंदू देव लापताचे पोस्टर व पत्रक तो वाटतो. तो परग्रहावरचा आहे, मग त्राचा रोष केवळ हिंदू देवतांवर का? तुला साऱ्या देवांनी फसवले ना? मग तुझ्रा हातात अल्लाह, गॉड लापताचे पोस्टर, पत्रक का नाही ? रेथे निर्माता- दिग्दर्शक सर्व धर्माविषरी तटस्थ वाटत नाहीत.

पीके चित्रपटातली सर्वांत भंपक दृश्यमालिका आहे ती अनुष्काच्रा पाकिस्तानातील प्रेमीला फोन लावण्राची. अवघ्रा काही सेकंदात सारे घडते. भारतातून एका चॅनेलच्रा फोनवर पाकिस्तानी दुतावासातील सभ्रबाई त्या तरुणाला फोन जोडून देते. हे सारे पाहाताना करमणूक होते. कारण, पाकिस्तानचे दुतावास भारतीयांशी कसे वागते? याची जिवंत उदाहणे वाचून माहित आहेत. भारताचे मच्छीमार चुकून पाकिस्तानच्या हदद्दीत जातात. त्यांना पकडून कैदेत टाकले जाते. ते जिवंत आहेत की मारले गेले? राचे उत्तर पाकिास्तानकडून हिंदूस्तान सरकारला 5/6 वर्षे मिळत नाही. एवढेच नव्हे तर कराचीत लपलेल्रा दाऊदचा तेथील पत्ता, रेशनकार्ड दिले तरी पाकिस्तान सरकार त्राला शोधत नाही. पण, हिराणी-चोप्रा-खानच्रा चित्रपटात अख्खे पाक दुतावास उभे राहून अनुष्काचा फोन तिच्या प्रेमीला जोडून देते. ही कृत्रिमता दाखवून काय साध्य झाले आहे? याचे उत्तर त्रिकूट देवू शकणार नाही. पीके हा चित्रपट पाहाताना निधर्मवादी आणि समाजवाद्यांची फसगत होत जाते ती खालीलप्रमाणे. पीके चित्रपट चांगला म्हटला की, त्रातील सर्व संदेश चांगले असे मानावे लागतील. मग ते देवादिकांविषयी असो, लैंगिक विषयांशी संबंधित असो की हिंदू-मुस्लिम मुला-मुलीतील प्रेमसंबंधाचे असो.

 हिंदू देवदेवतांच्या अवडंबावर आणि अंधश्रद्धांवर यापूर्वी महात्मा फुले, संत गाडगेबाबा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सर्व संत, कै. डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी अनेक प्रहार केले आहेत. ते सर्व रोग्र व समाज परिवर्तनाला पूरक होते. म्हणून त्यांच्या सुधारणावादी विचारांचा स्वीकार समाजाने वेळोवेळी केला. पण, पीकेत तसे होत नाही. हिंदू देवदेवतांची टवाळी करताना हिंदुंच्रा मुलीला मुस्लिमाच्रा प्रेमात पडण्याचा बेमालून सल्ला दिला जातो. असे दाखविले जाणे भरंकर आहे. पीके संदर्भात वरील विवेचनात उपस्थित केलेले वादाचे हे मुद्दे अगदीच तकलादू किंवा दुर्लक्ष करण्यासारखे नाहीत. त्रिकूटाने धार्मिकतेच्या अवडंबर संदर्भातील तटस्थता जपलेली नाही. उलटपक्षी आशयाची दृश्यमालिकांची मांडणी ही सहेतूक केल्याचे दिसते. दिल्लीच्या राजकारणातील ज्येष्ठनेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पीकेच्या वित्त पुरवठ्यासंदर्भात एक आरोप केला आहे. ते म्हणतात की, या चित्रपटासाठी दुबईतून आयएसआयच्या माध्यमातून पैसा मिळाला आहे. त्यामुळे त्रिकुटाने चित्रपटाची कथा मुद्दाम हिंदू मुलगी आणि पाकिस्तानी मुलगा यांच्या भोवती रचली आहे. अर्थात, यामागे संबंधितांचे पडद्यामागील पाक कने्नशन लक्षात घ्यावे लागेल.

 निर्माता विधू विनोद चोप्रा यांचा जन्म काबूलमध्ये झाला आहे. मात्र ते वाढले श्रीनगरमध्रे. दिग्दर्शक व निर्माता राजकुमार हिरानींचा जन्म सिंध प्रांतातला (पाकिस्तान) आहे. मात्र ते वाढले नागपूरमध्रे. चित्रपटाची तारिफ करणारे भाजपनेते लालकृष्ण आडवाणी यांचा जन्मही सिंध प्रांतातला (पाकिस्तान) आहे. शिवाय त्यांच्या भाचीने मुस्लिमाशी विवाह केला आहे. आमीर खान याची पहिली पत्नी हिंदूच होती. तीला त्याने तलाक दिला. आताही दुसरी पत्नी हिंदूच आहे. असे हे सारे विरोधातील योगायोग पीके संदर्भात असतील तर तो चित्रपट पाहणाऱ्या पालकांनी अधिकच सावध राहाणे आवश्यक आहे. हेच आम्ही वारंवार सांगतोय... पीके चित्रपटातून हिंदू मुलींवर कोणते संस्कार होतात? घरात व ऑफिसमध्रे मांड्या दाखविणारी हाफ पॅन्ट घाला. सार्वजनिक ठिकाणी सुद्धा मांड्यांचे प्रदर्शन करा. तुमच्या सोबतच्या कोणत्याही तरुणाच्या प्रेमात पडा. त्याची जात, धर्म, कुटूंब याची चौकशी करू नका. मुस्लिम तरुण आणि पाकिस्तानी तरुण धोका देत नाहीत. एकांतात करायचे मुका घेण्याचे प्रकार रस्त्यावर करा. विवाह विषयक निर्णय घेताना पालकांचे ऐकू नका. पालकांनी विरोध केला तर थेट चर्चमध्ये जावून लग्न करा. (येथे हिराणी-चोप्रा-खान यांनी तीन धर्म एकत्र केले आहेत. ते कसे, बघा. मुलगी हिंदू आणि मुलगा पाकिस्तानी मुस्लिम. पण लग्न करायला चर्चमध्ये जातात. कोर्ट मॅरेजचा पर्याय नको.) एखाद्याला स्मृती परत आणारची असेल तर वेश्रेकडे जा. नोकरीच्या ठिकाणी कार्रालरात रेताना खिशात निरोध आणत जा. आपले म्हणणे मांडण्यासाठी महिला सहकाऱ्यांना ढुंगण दाखवा. सार्वजनिक ठिकाणी खुलेपणाने मुलींसमोर भिंतींवर मूता. रस्त्राच्रा कडेला लावलेल्रा महागड्या गाड्यामध्ये लोक शरीरकर्म करतात. हिंदू मुली कितीही मित्रांना किस करते. (मुस्लिम मित्र आणि परग्रहवासी) चित्रपटातील वादग्रस्त जोड्या हिंदी चित्रपटात प्रेमाचा मसाला असल्याशिवाय तरुणवर्ग त्याचा प्रेक्षक होत नाही. पण, या जोड्या वादगस्त केल्या की, चित्रपट चर्चेत राहतो आणि जोरात धंदा करतो. यापूर्वी बॉम्बे चित्रपटात हिंदू मुलगा आणि मुस्लिम मुुलीची कहाणी होती. तेव्हा मुस्लिमांच्या संघटनांनी विरोध केला होता. त्यानंतर आलेल्या गदर चित्रपटात शिख मुलगा आणि मुस्लिम मुलीची कहाणी होती. तेव्हाही मुस्लिम संघटनांनी विरोध केला होता. एवढेच नव्हे तर पोलीस बंदोबस्तात चित्रपट पाहिल्याचे आठवते. आज चित्रपटांच्या प्रेमाचा फॉर्म्यूला उलटा झाला आहे.

(Posted on- ४ जानेवारी २०१५)


No comments:

Post a Comment