Wednesday 4 February 2015

माणसाची ओळख...

पूनर्जन्मावर माझा विश्वास नाही. पण, द्वारकापीठाचे शंकराचार्य विद्यानंद सरस्वती यांनी सांगितलेली एक तर्काधारित गोष्ट सांगतो. आज खास पत्रकारदिनी...शंकराचार्यांचे निरूपण सुरू होते. महाभारतातील शिखंडीच्या पूनर्जन्माचा विषय होता. ती मागच्या जन्मी महिला होती आणि केवळ भिष्म वधासाठी तिचा पूनर्जन्म झाला होता. तिला विधी लिखीत तशी संधी मिळाली आणि तिच्या आडून का असेना अर्जूनाने भिष्माला बाणांच्या घाताने जर्जर केले... शंकराचार्य रसाळवाणीने सांगत होते.



माणसाची ओळख... पूनर्जन्मावर माझा विश्वास नाही. पण, द्वारकापीठाचे शंकराचार्य विद्यानंद सरस्वती यांनी सांगितलेली एक तर्काधारित गोष्ट सांगतो. आज खास पत्रकारदिनी... शंकराचार्यांचे निरूपण सुरू होते. महाभारतातील शिखंडीच्या पूनर्जन्माचा विषय होता. ती मागच्या जन्मी महिला होती आणि केवळ भिष्म वधासाठी तिचा पूनर्जन्म झाला होता. तिला विधी लिखीत तशी संधी मिळाली आणि तिच्या आडून का असेना अर्जूनाने भिष्माला बाणांच्या घाताने जर्जर केले... शंकराचार्य रसाळवाणीने सांगत होते. निरूपण करताना शंकराचार्य थांबले आणि म्हणाले, लोक मला विचारतात, माणूस ८४ लाख योनीतून जन्म घेतो. त्याचा माणूस म्हणून जन्म एकदाच होतो. इतर जन्म प्राणी रूपात आहेत. प्राण्यांचाही पूनर्जन्म होतो असे तुम्ही म्हणता. तसे मानले तर पृथ्वीवर प्राण्यांचीच संख्या वाढायला हवी. पण, पृथ्वीवर माणसेच जास्त आहेत. मेलेल्या प्राण्यांचा पूनर्जन्म होतो हे मानायचे कसे ??? हा प्रश्न अगदी बिनतोड आहे असे सांगून शंकराचार्य पुढे म्हणाले, खरे आहे, पृथ्वीवर माणसे जास्त आणि प्राणी कमी आहेत. पण माणसे माणसांसारखी आहेत का ? बहुतांश माणसांची ओळख त्यांच्या कर्मामुळे प्राण्यांसारखी असते. आपण कोणाला कुत्रा म्हणतो, कोणाला साप म्हणतो, कोणाला लांडगा म्हणतो, कोणी माकडचेष्टा करते, कोणी बैल आहे, कोणी मांजर आहे, कोणी मुंगळा आहे. आपण माणसाला खरे खुरे ओळखताना प्राण्यांच्या गुणांनी ओळखतो. जन्म माणसाचा मिळाला तरी काही प्राण्यांचे गुण जात नाही, जसे "सुंभ जळाला तरी पीळ जात" नाही...ही प्राण्यांच्या गुणांची माणसे म्हणजे पूनर्जन्मीचे प्राणीच. त्यांच्यामुळे माणसांच्या रूपात प्राणीच जास्त आहेत. माणूस भेटला असे आपण खुप कमी लोकांच्या बाबतीत बोलतो... शंकराचार्य बोलत होते.. मला आज प्राण्यांच्या प्रवृत्तीची माणसे अनुभवाला आली की पूनर्जन्मावर विश्वास बसायला लागतो... मित्रांनो मी एक काळजी घेतो, किमान आपली ओळख आपल्या पाठिमागे कोणीही प्राण्याच्या नावाने नाही तर माणसाच्याच नावाने करून द्यावी... पत्रकारांची अशी वेगळी ओळख असू नये.. मी अजूनही पूनर्जन्म मानत नाही..

(Posted on FB - ७ जाने्वारी २०१५ )

No comments:

Post a Comment