संपूर्ण जलगाव जिल्ह्यात काल २ सप्टेंबर २०१४ ला ना. एकनाथराव खडसे ऊर्फ सर्वांचे आवडते नाथाभाऊ यांचा ६२ वा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. हा वाढदिवस इतर सर्व जिल्हा नेत्यांच्या तुलनेत सर्वाधिक महागडा ठरला आहे. सर्व आघाडीच्या दैनिकांसह इतर लहान- मोठ्या दैनिकांनी किमान सव्वा कोटी रूपयांवर जाहिराती छापल्या. हा मापदंड नाथाभाऊंची लोकप्रियता सिद्ध करतो. अशी लोकप्रियता इतरांच्या वाट्याला कधीही आलेली नाही.
नाथाभाऊंच्या वाढदिवसाचे निमित्त साधून राजकिय समेटाचा प्रयत्न तुरूंगात असलेल्या आ. सुरेशदादांचे बंधू रमेश जैन यांनी केला. रमेश जैन हे सपत्निक नाथाभाऊंच्या घरी गेले. नाथाभाऊंनी कोरडेपणाने शुभेच्छा स्वीकारून निर्विकारपणे रमेश जैन यांना आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला. तेथे जे घडले त्यातून काहीही अर्थ निघत नाही. मात्र, काही मंडलींनी यातून "समेटाचे नवे पर्व सुरू" अशी हूल उठवून नाथाभाऊ व जैनांच्या मैत्रिपर्वाचा आपणच अध्याय लिहत आहोत असा फसवा पवित्रा घेतला आहे.
अशा लोकांची ३ प्रकारे गल्लत होत आहे. ती अशी -
१) या मंडलींचा जिल्ह्याचा राजकिय अभ्यास कच्चा आहे. त्याना जुने आणि कलीचे संदर्भ माहित नाहीत.
२) सुरेशदादा पक्ष, नेता, शब्द बदलू शकतात. किंबहुना हिच त्यांची ओलख आहे. नाथाभाऊंनी तसे आजपर्यंत केलेले नाही. म्हणून जैनांच्या भल्यासाठी कोणी समेट घडावा अशी सुपारी घेत असेल तर ती मुठभर मंडलींची चलाखी आहे. राजकिय समेट वृत्तपत्राच्या बातम्यांमधून होत नाही. त्यासाठी लाभ, स्वार्थ, पद याला तिलांजली द्यावी लागते. (रमेश जैन सहा महिन्यात काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना व आता भाजपच्या दारात गेले आहेत)
३) हा मुद्दा सर्वांत महत्वाचा, नाथाभाऊंनी भूतकालातील आपल्या भेटींचा अवमान का विसरावा?
नाथाभाऊंच्या वाढदिवसाला रमेश जैन यांनी त्यांच्या घरी जावून जुन्या गोष्टी विसरा अशी विनंती करण्याची कल्पनाच तकलादू मानसिकतेची होती. माफी मागायला क्षमापना पर्वाचा मुहूर्त का लागावा? ती कधीही मागितली पाहिजे. तसेच माफी मागायला मध्यस्थ का हवा? ज्याने अपराध केला त्याने थेट म्हणावे, मला माफ करा! मध्यस्थ हवा असे म्हणणे म्हणजे राजकिय तह करणे होय. तो नाथाभाऊंना करण्याची गरज काय? जेता किंवा सामर्थ्यवान राजा तह करीत नाही. पराभुतांनी किंवा दुर्बलांनी तह करावेत. (येथे गनिमी काव्याने केले जाणारे तह हा संदर्भ अपेक्षित नाही) वारंवार चुका केल्यानंतर क्षमापनाचा मुहूर्त वर्षभर सुरू ठेवावा लागेल. हाच मुद्दा नाथाभाऊंनीही व्यक्त केला.
आता, नाथाभाऊंच्या सुरेशदादांच्या सोबत झालेल्या दोन महत्वाच्या भेटींचा संदर्भ घेवू. त्यातली पहिली जलगावच्या एका टेकडीवरील पांढ-या बंगल्यात झालेली. काल आणि वेल होती, लोकसभेच्या पोटनिवडणुकीची. अण्णा हजारेंच्या आरोपामुले शरद पवारांनी सुरेशदादांचे मंत्रीपद काढून घेतले होते. हजारे यांच्या विरोधात आंदोलन करूनही पुन्हा मंत्रीपद न दिल्यामुले राष्ट्रवादी काँग्रेसला सडविण्याची भाषा करणारे सुरेशदादा राष्ट्रवादीचे तेव्हाचे उमेदवार अड. वसंत मोरेंच्या विरोधात लढतो म्हणून अडून बसले होते. "सुरेशला गप्प बसवा", असा थिंकटँकला निरोप होता. अशावेली नाथाभाऊंना टेकडीवर बोलावण्यात आले. तेव्हा सुरेशदादांची भाजपकडूनही लढायची तयारी होती. परंतु नाथाभाऊंनी राजकिय व्यवहाराची उदाहरणे देत सुरेशदादांना समजावले.
खरेतर, त्याचवेली पवारांशी घेतलेला पंगा भोवणार हे विधी लिखीत होते. सुरेशदादांनी निवडणूक लढविली नाही पण नंतर जी एस मैदानावर झालेल्या राजनाथसिंह यांच्या सभेत पवार यांचा उल्लेख तेलगीसोबत करीत आवेशात म्हटले "ये ऐसै नेता है की, देश को बेचकर खा जाएगे" हा उल्लेख कायम स्वरूपी पवारांच्या हृदयाला छेद देणारा आहे. ते तो कदापि विसरणार नाहीत. एवढेच नाही तर याच भाषणात सुरेशदादांनी ईश्वरलाल जैन यांना चक्क वेडा म्हटले. या भाषणाची सीडी पवारांपर्यंत सराफातून गेली होती आणि भाषणाची आडियो क्लिप मोबाईलवर फिरत होती. हा संदर्भ लक्षात घेता आज जैनांच्या समोरील अडचणी त्यांनी "स्वमुखातून" निर्माण केलेल्या दिसतात. या चुकांसाठी दरवर्षी येणारे क्षमापना पर्व उतारा होवू शकेल???
नाथाभाऊंची दुसरी भेट सुरेशदादांच्या बंगल्यावर झाली. विधान परिषदेच्या जलगाव मतदार संघातून भाजपने स्व. निखील खडसेंना उमेदवारी दिली. भाजपतील काही स्वकिय विरोध करीत होते. मात्र, खडसेंची ईच्छा होती निखील आमदार व्हावेत. ते शक्य होते. भाजप- शिवसेना मिलून बहुमताचे संख्याबल होते. परंतु, कालप्रवाह - सामाजिक गरज - पवारांशी दुरावा यामुले सुरेशदादा व ईश्वरलाल जैन जवल आले होते. विधान परिषदेला ईश्वरलाल यांचे पूत्र मनीष जैन यांना अपक्ष उमेदवार करण्याचा घाट दोघा जैनांनी घातला. नाथाभाऊ शिवसेनेची मदत मागायला जैनांकडे गेले. तेथे सुरेशदादांनी नाथाभाऊंना अव्हेरले. एवढेच नव्हे तर धनशक्तीच्या बलावर मनीष यांना निवडून आणले. नाथाभाऊंच्या मुलाचा पराभव करून मोठी मर्दूमकी गाजवल्याचा अविर्भाव जैन मंडलींचा होता. नाथाभाऊंनी अवमानाचे ते घोट गिलून टाकले. आज मैत्रिसाठी बोरू झिजवणा-यांनी तेव्हा जैनांच्या विश्वासघातावर लिहील्याचे संदर्भ इतिहासाच्या पानांत दिसत नाही?
नाथाभाऊ आणि सुरेशदादांच्या मैत्रिचा खान्देश विकास मंचही होता. तो सुरेशदादांनी मोडला. भुसावलमध्ये नगराध्यक्ष निवडीत नाथाभाऊ विरोधात भूमिका घेतली. जलगाव मनपा निवडणुकीत वेगली चूल मांडली. अशी लहान मोठी अनेक उदाहरणे आहेत.
घरी आलेल्याचा अवमान करून संकट ओढवून घेण्याचा प्रकार सुरेशदादा नेहमी करीत आले आहेत. स्व. दीपक जोग एसपी असताना तेही त्यांच्या घरी गेले होते. दादा मी फैशन कटपिस टपरी काढतो, तुम्ही चित्रा चौकात येवू नका, अशी विनंती जोगांनी केली होती. जोगांचे ऐकले नाही. चित्रा चौकात गेले. तेथे कलेक्टर अजयभुषण पांडेंना भ्रष्ट म्हणाले आणि नंतर टपरी प्रकरण घडले.
दादा, वसंत सहकारी कारखान्यावर जावू नका असे कारखान्याचे अध्यक्ष अड एन. बी. पाटील यांनी सुरेशदादांना घरी जावून सांगितले होते. मात्र सुरेशदादा दुस-या दिवशी तेथे गेले. त्यांना कामगारांनी धक्क्बुक्की केली. मदन बाफना विरोधात अड शरद वाणींना उभे करू नका, अशी विनंती अरूण गुजराथींनी पवारांच्या निरोपासह घरी जावून सुरेशदादांना केली होती. त्यावर सुरेशदादा म्हणाले होते, मी बाफनांना पाडून टाकेन.... अशी किती उदाहरणे देवू?
बरे गंमत अशी की, सुरेशदादा भावनेच्या भरात बोलतात असे मानले तर त्यांचे बंधू रमेश जैन भावनातिरेकाने बोलतात. मध्यंतरी त्यांना जलगावचा प्रेस हभप म्हणत असे. जलगाव मनपा निवडणूक प्रचाराच्यानिमित्त रोटरी क्लबने नाथाभाऊ व रमेश जैन यांना एकत्र बोलावले होते. नाथाभाऊ संयम ठेवून बोलले मात्र रमेश जैनांचा संयम गेलाच. त्यांना आयोजकांनी गप्प बसवले. हा प्रकार राजेश जैन यांच्या समोर घडला होता. रमेश जैन यांनी मनपा सभेत अधिका-याचा माकड म्हणून केलेल्या उल्लेखामुलेच घरकुलची चौकशी हनुमानाच्या शेपटाप्रमाणे वाढली, हे फार थोड्यांना माहित असेल.
म्हणूनच मुद्दा हाच आहे की, जैनांच्या माफी मागण्यावर नाथाभाऊंनी विश्वास का ठेवायचा? यापूर्वीच्या भेटीत झालेला अवमान आणि शब्द फिरवण्याची अवहेलना नाथाभाऊ विसरू शकतील? हाच प्रश्न मनाला अस्वस्थ करतो. यावर माझे अनुभवाचे उत्तर नकाराचेच आहे. नाथाभाऊ सहसा अवमान विसरत नाहीत.... हे लोहार बंधूही खासगीत सांगतील....
Posted on FB - दि. ३ सप्टेंबर २०१४

No comments:
Post a Comment