Tuesday 3 February 2015

फैन्सी नंबरप्लेटची विकृती...

वाहनांवर ‘नंबरप्लेट’वर आकडे अक्षरांसारखे रेखाटण्याची क्रेझ पुढा-यांमध्ये वाढत आहे. आकड्यांमधून दादा, मामा, नाना, आप्पा, काका नावाची रचना केली जात आहे. अशा नंबर प्लेट नियमबाह्य असूनही प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) किंवा वाहतूक पोलीस कारवाई करीत नाही.

अशीच एक फैन्सी नंबरप्लेट पारोला- एरंडोल मतदार संघाचे ज्येष्ठ आ. चिमणराव पाटील यांनी तयार केली आहे. माहितीसाठी लिंक पाहा.....
दुचाकीबरोबरच चारचाकी वाहनांवरही फॅन्सी नंबप्लेट दिसत आहेत. काही वाहनांच्या नंबरप्लेटवर आकड्यांच्या माध्यमातून दादा, मामा, भाऊ, तात्या, आबा, बाबा अशी किंवा पाटील, पवार अशी आडनावे तयार केली जातात. हे काम नंबर प्लेट तयार करणारे रेडियम व्यावसायिक करतात. अशा नंबरप्लेटसाठी ते मनमानी दर सुद्धा आकारतात.

वाहनांची नंबरप्लेट कशी तयार करावी याचे काही नियम आहेत. रिक्षा, प्रवासी वाहतूक व मालवाहतुकीच्या वाहनांची नंबरप्लेट पिवळ्या रंगाची असते. त्यावर काळ्या रंगात क्रमांक लिहीलेला असतो. दुचाकी वाहनांची नंबरप्लेट पांढ-या रंगाची असते. त्यावर काळ्या रंगात क्रमांक लिहीलेला असतो. वाहनाच्या समोरची व मागची नंबरप्लेट कशी हवी, त्याची उंची, आकार, रंग, अक्षरांची जाडी ही केंद्रीय मोटार वाहन कायद्यानुसार निश्चित आहे.

दुचाकी वाहनांसाठी १५ एम. एम. व चारचाकी वाहनांसाठी २५ एम. एम. आकाराची नंबरप्लेट सक्तीची आहे. त्यावरील अंक, त्याची उंची, रूंदी व दोन आकड्यांमधील अंतरसुद्धा ठरवून देण्यात आले आहे; पण फॅन्सी नंबरप्लेट बनविणारे वाहनमालक व रेडियमचे काम करणारे हे सर्वच नियम धाब्यावर बसवतात.

फैन्सी नंबरप्लेट असलेल्या वाहनचालक व गाडीमालक यांच्यावर चौकाचौकात उभ्या असलेल्या वाहतूक पोलिसांनी मोटार व्हेईकल अॅक्टच्या कलम ५० (१) (१७७) नुसार दंडात्मक कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र ती होत नाही.

काही वाहनमालक अंकाची अक्षराप्रमाणे रचना करण्यासाठी वाहन नोंदणी क्रमांक अपेक्षेनुसार मिलावा म्हणून आरटीओ कार्यालयाकडे आगाऊ रक्कम जमा करतात. मनपसंद क्रमांक देण्यासाठी आरटीओकडे लाखोचा फंड जमा होतो. असा व्यवहार होत असल्यामुले तेरी भी चूप मेरी भी चूप मामला आहे.

कशी असावी नंबर प्लेट???

अधिक माहितीसाठी मुंबई वाहतूक
पोलिसांची वेबसाईट पाहा....

https://trafficpolicemumbai.maharashtra.gov.in/…/numberplat…

Posted on FB - २९ ऑगस्ट २०१४
No comments:

Post a Comment