Tuesday 3 February 2015

दहिहंडी ते कार्पोरेट स्ट्रैटीजी- जगातल्या सर्वांत सोप्या भाषेत...

उंचावरील दहिहंडी फोडण्यासाठी गोविंदा आणि त्याचे पथक ज्या पध्दतीने व्यूहरचना करते तीच पध्दत वापरून कोणत्याही कार्पोरेट कल्चरमध्ये यश मिलविण्याठी प्रयत्न केले जातात. अख्या बोर्ड रूम या पुस्तकातील कार्पोरेट संकल्पना दहिहंडीच्या नियोजन, सराव, प्रत्यक्ष दहिहंडीच्या ठिकाणची चढाई आणि अखेरीस सुखरूप उतरणे यात सामावलेल्या आहेत. ते कसे हे समजून घेवूया सोप्या भाषेत?


बोर्ड रूम पुस्तकातील नियोजन

मंडलाची स्थापना... कंपनी फार्मेशन
पदाधिकारी निवड... डायरेक्टर बोर्ड निवड
मंडलाचा सराव खर्च... प्रायोजक गुंतवणूक
मंडलाच्या बैठका... पालिसी फार्मेशन
मंडलाचे नाव, कपडे... कार्पोरेट आयडंटी
मंडलाचा सराव... मोहिमपूर्व माक सेशन
दहिहंडीचा चौक... मोहिमेचे प्रत्क्ष क्षेत्र
चौकाची माहिती.... बाजारपेठेची माहिती
गर्दीची माहिती....ग्राहकाची माहिती
दहिहंडी व उंचीची माहिती...लक्ष्य व आव्हानांची माहिती
गोविंदा टीम सज्ज... विपणनासाठी टीम सज्ज
लोक अंगावर पाणी टाकणार....बाह्य ठराविक अडथले
आरडा ओरड गोंगाट...बाह्य अनपेक्षित अडथले
गोविंदाची गाणी....व्यवस्थापनाचे प्रोत्साहन
थर लावण्यास प्रारंभ...विपणन मोहिम प्रारंभ
दुसरा थर लावणे...विपणन दुसरा टप्पा सुरू
थर कोसलणे....अचानक अडथले
दुखापती गोविंदा बाजूला....धोरणात गरजेनुसार बदल
कमकुवत गोविंदाला बाहेरून सपोर्ट...आपत्ती व्यवस्थापन
नव्याने थर लावणे....पुन्हा सुधारित विपणन मोहिम
सर्व थर सुरक्षित लावणे....मोहिम सुरक्षा
सर्व थर सुरक्षित उभे... अपेक्षेनुसार बाजारावर कब्जा
गोविंदाने वर चढणे... अंतिम लक्ष्याकडे जाणे
गोविंदाने वर पोहचणे...अंतिम लक्ष्य हातात
गोविंदाने हंडी फोडणे... लक्ष्य साध्य करणे
प्रायोजकासोबत फोटो... स्पानसरर रिटर्न

पुस्तकात नसलेले नियोजन

हंडिसोबत बक्षीस रक्कम काढणे... वाढीव नफा
रक्कम खिशात घेवून खाली उतरणे...मोहिम फत्तेचा संयम
एक एक थर खाली उतरणे...मोहिमेचा यशस्वी परतावा
सर्वजण सुरक्षित खाली येणे...मोहिम लक्ष्य साध्य
लोकांच्या टाल्या....ग्राहक समाधान प्रतिसाद
दहिहंडी कामेंट्री... मोहिम प्रचार प्रसार
यशस्वी गोविंदांनी बक्षीस आपापसात वाटणे...लाभांश वाटप
पुरस्कार स्वीकृती...टीमवर्कचा गौरव
दुस-या चौकात रवाना... नव्या मोहिमेची तयारी
माध्यमात बातमी....टीमचा ब्रैन्ड म्हणून गौरव
दुस-या चौकात बोलावणे...ब्रैन्ड प्रतिष्ठा आणि विस्तार
दुस-या गावात बोलावणे...बाजारपेठ विस्तार
दरवर्षी वारंवार दहिहंडी फोडणे....ब्रेन्ड मोनोपोलि

गोविंदा मंडल आणि कार्पोरेट कल्चरमध्ये दोन मुलभूत फरक आहे. ते असे-

१) गोविंदा मंडलांची रचना खेलाच्या कौशल्यातून इतरांना मोफत आनंद देण्यासाठी असते.

कार्पोरेट ची रचना अनेक कौशल्यांच्या एकत्रित खेलातून इतरांचा पैसा घेवून पेड (विकतचा) आनंद देण्यासाठी असते.

२) गोविंदाचे थर रचताना एकमेकांचे पाय घट्ट धरतात खेचत नाहीत.

कार्पोरेटमध्ये रचना करताना दुस-यांचे पाय केवल खेचायचे नसतात तर ते पायदली तुडवायचे असतात.

मोहिम यशस्वी करण्यासाठी सर्वांमध्ये गुण कोणते हवेत-

१) धोके, जोखिम, रिस्क ओलखणे व उपाय करणे
२) आकृती, रचना, मांडणी, डिझाईन माहिती व आकलन
३) समन्वय, सहकार्य, कोआपरेशन देणे व घेणे
४) योजकता, वापर, उपयोग, उपयुक्तता यूज करणे व करून घेणे
५) एकरुपता, एकात्मता, इंटीग्री, सिनर्जी प्रत्येकाने सांभालणे
६) यश, साध्य, सिद्धी, टार्गेट अचिव्हमेंटची माहिती सर्वाना असणे व त्यासाठी प्रयत्न करणे
७) आत्मविश्वास, सेल्फ कान्फिडन्स प्रत्येकात हवा किंवा निर्म्ण करणे

( यापेक्षा सोप्या भाषेत कोणी समजावले आहे का?)

नसेल तर नुसते लाईक करू नका मत नोंदवून दाद द्या.

कापी करीत असाल तर श्रेय द्या....

(Posted on FB - दि. १८ ऑगस्ट २०१४)


No comments:

Post a Comment