Thursday 12 February 2015

जळगाव सुंदर होवू शकते


मृत्यू पश्चात आयुष्यावर ज्यांचा विश्वास आहे अशा श्रद्धाळूंना नरक म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही. पण, नरक असतो यावर ज्यांचा विश्वास नाही त्यांना नरकयातना म्हणजे काय? हे अनुभवायचे असेल तर त्यांनी जळगावमध्ये निवास करावा. नरकाची चित्रमय कल्पना ओमशांती परिवाराच्या प्रचार पुस्तकांतून दिली आहे. त्या पुस्तकातील चित्रे आणि जळगावकर सध्या ज्या वातावरणात निवास करीत आहेत ती स्थिती, यात फारसा फरक नाही. असे असले, तरी एक जळगावकर म्हणून मला वाटते की, हो जळगाव महानगर आजही सुंदर, स्वच्छ आणि चांगल्या माणसांचे गाव होवू शकते. ते कसे आणि त्यासाठी पर्याय काय असू शकतात? हेच सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच...

विषयाला प्रारंभ नरकापासून झाला आहे. त्यामुळे जास्त त्याच्यावर बोलू या. मध्यंतरी व्हाट्स अॅपवर एक विनोद खूपवेळा फॉर्वर्ड होत होता. तो असा ः जळगावचा एक सामान्य नागरिक मेला. यमाच्या ्नलार्कने त्याला चित्रगुप्त समोर उभे केले. चित्रगुप्तने डायरीतील पाप- पुण्यचा हिशेब पाहिला. त्या माणसाकडे पाहात चित्रगुप्त म्हणाला, अरे तू टीपिकल जळगावकर आहेस. 50 टक्के पाप केले आहेस आणि 50 टक्के पुण्यही तुझ्या नावावर आहे. त्यामुळे तुला काही काळ स्वर्गात आणि काही काळ नरकात विश्राम करायला मिळेल. तू ठरव आधी तुला कुठे थांबायचे? स्वर्गात की नरकात? चित्रगुप्ताच्या प्रश्नावर जराही विचलित न होता तो जळगावकर म्हणाला, महाराज धन्यवाद! माझी एक विनंती आहे, ती करू का? जळगावकराची ही नम्रता पाहून चित्रगुप्त संभ्रमात पडला. ्नलार्कने हा माणूस जळगावहून आणला की चोपड्याहून असा प्रश्न त्याला पडला. स्वतःला सांभाळून चित्रगुप्त म्हणाला, विचार बाबा विचार. तुला कोणता प्रश्न विचारायचा आहे? जळगावकर नम्रतेने म्हणाला, मी जळगावला प्लॉटच्या धंद्यात होतो. त्यामुळे एकच प्लॉट न पाहता अनेक प्लॉट पाहायचो. मगच निर्णय घ्यायचो. आताही मला स्वर्ग आणि नरक आधी पाहू द्या. नंतर मी निर्णय घेईन की, आधी स्वर्गात जायचे की नरकात. चित्रगुप्त हसून म्हणाला, एवढेच ना! त्याने टाळी वाजून दुसऱ्या ्नलार्कला बोलावले आणि सांगितले, जारे याला स्वर्ग आणि नरक दाखवून आणा. 


जळगावकर आणि ्नलार्क निघाले. पहिल्यांदा ते नरकाच्या दालनात गेले. स्वर्ग आणि नरकाची भिंत एकच होती. सुख मात्र अलिकडे की पलिकडे मानण्यात होते. तेथे पृथ्वीवरील विविध देशांचे नागरिक एकत्र होते. नरकातील ्नलार्क मंडळी ज्याला-त्याला सुनावलेली शिक्षा भोगायला लावत होते. कोणाला फटके मिळत होते, कोणाला गरम तेलात तळले जात होते. कोणाचा कडेलोट होत होता. मात्र, या वातावरणात सुद्धा काही मंडळी मजेत होती. जळगावकरने ्नलार्कला विचारले, अरे, बाकीचे सर्वजण शिक्षा भोगत आहेत. पण, हे दोन-चार जण मजेत कसे? ्नलार्कने तिर्नया नजरेने इकडे तिकडे पाहिले आणि हळूच म्हणाला, ते सर्वजण जळगावचे आहेत. कुठेही गेले तरी जुगाड करुन घेतात. त्यांना सुद्धा शिक्षा होते मात्र, ही मंडळी ले दे के करुन घेतात. इथल्या कागदपत्रात शिक्षा पूर्ण झाल्याचे दिसले की यमराजही काही विचारत नाही. आणि हो, कागदपत्रे पाहणारी बरीच मंडळी जळगाव महानगर  पालिकेत अधिकारी, ्नलार्क होती. समजले का तुला? ्नलार्कचे बोलणे ऐकून जळगावकर खूश झाला. म्हणाला, येथे मी मजेत राहू शकेन. चल आता मला स्वर्ग दाखव.

दोघे स्वर्गाच्या दालनात आले. तेथे वातावरण अगदीच धूंद-मद-मस्त होते. प्रत्येकजण सुखात लोळत होता. कशाचीही पर्वा न करता. त्यातही बरेचजण जळगावकरच्या ओळखीचे होते. रंभा-उर्वशीचे नृत्य, सोबत स्वर्गीय चवीची मदीरा. खाण्यासाठी 56 भोग. डनलपपेक्षा भारी आसने, गाद्या. बस्स अगदी रंगारंग. तेवढ्यात जळगावकरचे लक्ष कोपऱ्यातील महाराजा डबलबेडकडे गेले. तेथील दृश्य पाहून तो अचंबित झाला. संपूर्ण जगाला अहिंसेचा संदेश देणारे महात्मा गांधी डोळे बंद करु झोपले होते. अधुनमधून डोळ्यांची उघडझाप सुरू होती. दोन ललना अंगभर वस्त्र लपेटून नम्रतेने त्यांचे हडकूळे पाय चेपत होत्या. एकीकडे पामेला बोर्डस (कधीकाळी अमेरिकेच्या उच्चभ्रू वर्तुळात गणिका म्हणून गाजलेली भारतीय ललना) आणि दुसरीकडे सिल्क स्मिता (दाक्षिणात्य चित्रपटात बिनधास्त म्हणून गाजलेली अभिनेत्री) होती. जळगावकरने दोघांना ओळखले आणि तो ्नलार्कला म्हणाला, या स्वर्गात आलेला प्रत्येकजण सर्वप्रकारचे सुख उपभोगतो आहे मग, गांधीजींना ही झोपायची शिक्षा कशाला? त्यांना का झोपवले आहे? सोबतच्या ्नलार्कने शू शू करीत जळगावकरला गप्प केले आणि म्हणाला, जोरात नको बोलूस. तुम्हाला जळगावकरांना ती सवयच आहे. गांधीजींना हे स्वर्गीय सुखच आहे. त्यांचे पाय नेहमी दोन मुली चेपायच्या. जुने काळे-पांढरे फोटो आठवून पाहा. जळगावकरने डोळे बारीक करुन काही तरी आठवण्याचा प्रयत्न केला आणि म्हणाला, हो हो आठवले गड्या, गांधीजींच्या सोबत नेहमी दोन मुली असायच्या. मज्जा आहे बुवा गांधीजींची आणि पामेला, सिल्क स्मिताची. त्यावर ्नलार्क म्हणाला, जे दिसते त्यावर तुम्ही जळगावकर लगेच विश्वास ठेवतात. तू म्हणतो तो अर्धसत्य आहे. गांधीजींचे ठिक आहे पण शिक्षा ही त्या दोघी बायांना आहे. त्यांना येथे कायम गांधीजींचे पायच चेपायचे आहे. त्यांच्यासाठी हा स्वर्ग म्हणजे नरक आहे. हे ऐकून जळगावकर भानावर आला. म्हणाला, खरे आहे बाबा. आम्हाला जळगावकरांना माणसच ओळखता येत नाहीत. जे दिसते त्यातून वास्तव अर्थही काढता येत नाही. चल मला चित्रगुप्तकडे घेवून चल. तेथे सांगतो काय करायचे ते. सोबतचा ्नलार्क हसला. म्हणाला, स्वर्ग आणि नरक आपल्या मानण्यावर आहे. दोघात केवळ भिंत आहे. तू जळगावमध्ये राहून आलास ना! आता येथे सहज राहू शकतो. हो तुला एक सांगायचे राहीले, मी सुद्धा जळगावकर आहे बरे. पृथ्वीवर असताना दिल्लीत काही काळ राष्ट्रपतीभवनात गार्ड होतो. तेव्हाचे दिवस माझ्यासाठी स्वर्गाचे होते. हे ऐकून जळगावकरची बोलती बंद झाली.
मित्राहो, गोष्ट थोडी मोठीच आहे. पण जळगाव शहर आणि प्रत्येक जळगावकरची अवस्था यातून चपखलपणे व्यक्त होते. आता दोन मिनिटे डोळे बंद करा. गोष्टीतील प्रत्येक पात्र आणि जळगावशी संबंधित राजकिय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती आणि नागरिक म्हणून ओळखीचे पात्र डोळ्यांसमोर आणा. त्यांची सहज तुलना करा. बघा प्रत्येक पात्र आपल्या भोवती असल्याची अनुभूती येईल. 

आता थोडे वास्तवाकडे येवू. आपले जळगाव किमान 5 लाख लोकवस्तीचे आहे. वस्तीचे क्षेत्र 70 चौरस किलोमीटर विस्तारले आहे. लोकांच्या सेवेसाठी 75 नगरसेवक आहेत. म्हणजेच एक चौरस किलोमीटरची जबाबदारी एका नगरसेवकावर. लोकसंख्येच्या तुलनेत 7 ते 8 हजार लोकांची जबाबदारी सुद्धा एका नगरसेवकावर.
जळगावमधील नागरिकांना पाणी, रस्ते, पथदीप, गटारी आणि स्वच्छता या चार केवळ मुलभूत सुविधा हे नगरसेवक देवू शकतात का? हे पाहाण्याचे काम महानगर पालिका करते. तेथील प्रशासनाचे घटक म्हणजे महापौर, आयुक्त, सभापती, प्रभागाधिकारी आणि खालपर्यंतचे कर्मचारी होत. आज जळगावची स्थिती काय आहे?  शहरात पाणी पुरवठा पुरेसा आहे. मात्र, गळतीचे प्रकार अनेक ठिकाणी होत आहेत. दुरूस्ती वेळेवर नाही. शहरात रस्ते आहेत असे कोणीही म्हणणार नाही. खड्डे सोडून काही ठिकाणी रस्ते होते असे दर्शविणारे अवशेष आहेत, असे म्हणता येईल. शहराचा निम्मा परिसर अंधारात आहे. पथदीप पुरेसे नाहीत. आता राहिला प्रश्न सफाईचा. जळगावचे चौक, व्यापारी संकुले, रस्ते, ओपनस्पेस आणि सर्व सार्वजनिक जागांचे स्वरुप सध्या कचरा कुंड्या किंवा उकिरडे म्हणून झाले आहे. रोज शेकडो टन कचरा शहरात निर्माण होतो. तो गेल्या तीन महिन्यांत उचललेला नाही. राज्यभर डेंग्यूची चर्चा सध्या आहे. जळगावातही शेकडो रूग्ण आहेत पण, त्याची दखल घ्यायला आरोग्य प्रशासन नाही. शहराला पूर्णवेळ आयुक्तही नाही. जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त पदभार आहे. श्नय होईल तेव्हा त्या लक्ष घालू शकतात. अन्यथा भगवान भरोसे.

लोकप्रतिनिधींचा विचार केला तर 75 पैकी 32 नगरसेवक तथाकथीत सत्ताधारी खाविआचे आहेत. 14 भाजपचे आहेत, 12 मनसेचे असून त्यांचे तळ्यात-मळ्यात सुरू आहे. 11 राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत पण, पक्ष सोडून प्रत्येकाचे स्वतंत्र वर्तन आहे. 1 महानगर विकास आघाडीचा असून तो नेहमी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात असतो. 2 जनक्रांती नावाच्या संघटनेचे आहेत मात्र, त्यांचे नेते परागंदा आहेत. 1 अपक्ष असून 2 जागा रिक्त आहेत. या सोबतच महापौर असलेल्या सौ. राखीताई सोनवणे यांना त्यांच्या नेत्यांनी तडजोडीनुसार राजीनामा द्यायला सांगितला आहे. पण, त्या पद सोडायला तयार नाहीत.राजकिय नेत्यांचा विचार केला तर सत्ताधारी गटाचे नेते माजी आमदार सुरेशदादा जैन तुरूंगात आहेत. सत्ताधारी अल्पमतातील खाविआचे प्रमुख रमेश जैन, नितीन लढ्ढा वगैरे मंडळींच्या हातात काहीही नाही. ही मंडळी खाविआच्या नावाने निवडून आली आहे,  त्यामुळे शिवसेनेसोबत की सोयीने शिवसेनेसोबत हा प्रश्न स्वतः उद्धव ठाकरे यांनाच पडतो. विरोधात भाजप आहे. त्यांच्याकडे संख्याबळ नाही. भाजपचे नेते आणि सध्याचे संभाव्य पालकमंत्री तथा महसूलमंत्री यांच्या गुडबुकमध्ये जळगाव मनपा नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेतृत्व कोणाकडे हा प्रश्न आहे. मनसेचे नेते ललित कोल्हे आहेत. तेही काय भूमिका घेतात, हे नक्की नाही. उरलेल्यांची संख्या दखल घेण्याजोगी नाही.

या मनपाचा आर्थिक गाडा कर्जाच्या गाळात रुतला आहे असे म्हटले जाते. गेल्या वर्षभरात एकही विकास काम झालेले नाही. आयुक्त संजय कापडणीस यांनी मनपाची आहे ती जमापूंजी परस्पर हुडकोच्या कर्जफेडीसाठी वळती केली असे सांगण्यात येते. त्यामुळे दैनंदिन सफाई, वाहतूक, वीज-पाणी पुरवठा आणि कर्मचारी वेतन ठप्प झाले असा आरोप केला जातो. यासाठी उदाहरण दिले जाते ते दैनंदिन सफाईचे. तीन महिन्यांपूर्वी शहर सफाई मनपाचे कायम 500 कर्मचारी आणि ठे्नयावरील 1000 कर्मचारी करीत होते. तेव्हा नागरिकांच्या तक्रारी नव्हत्या. एका वॉर्डात 10-15 कर्मचारी रोज सफाई करायचे. आता केवळ 5-6 आहेत. त्यामुळे कामे होत नाहीत. आयुक्तांनी विनाकारण ठेके रद्द केले. कापडणीस यांनी इतरांच्या सांगण्यावर मनपाला अडचणित आणले,  त्यांच्यामुळेच मनपाचे बँकखाते सिल झाले, असे सत्ताधारी म्हणतात. ते काही अंशी प्रथमदर्शनी पटते. मात्र, आयुक्तांची बाजू ऐकली की पदाधिकाऱ्यांच्या स्वार्थी व मतलबी कार्यशैलीचा कालाचिठ्ठा समोर येतो.

कापडणीस म्हणतात, या मनपात कोणतेही रेकॉर्ड सापडत नाही. माझ्या मुलाचा जन्म दाखला शोधायला मलाच तीन महिने लागले. रोजच्या सफाईच्या नावाखाली ठे्नयावरील 1000 ते 1200 कर्मचाऱ्यांचे वेतन निघायचे. मी म्हटले, हे लोक काम करतात ना? मग मला दाखवा. रोजचे रेकॉर्ड तपासले तर 200-300 वर आकडा जात नाही. जे कामावर नाही म्हणून त्यांना मेमो काढले तर ते कोणीही नेत नाही पण, वेतन बरोबर अदा होते. हे सारे विशिष्ट साखळीत सुरू होते. ते मी थांबवले. यात सफाई बंद झाली हे म्हणणे जसे बरोबर आहे, तसेच मनपाचा आणि पर्यायाने जळगावकरांचा पैसा मी वाचवला. कोणीतरी अदृश्य व्यक्ती ठे्नयाच्या नावाने आपला स्वार्थ साधून घेत होते. हे ऐकले की, आयुक्त बरोबर वाटतात. पुन्हा गोष्टीकडे येवू. स्वर्ग 50 टक्के आणि नरक 50 टक्के हा भोग जळगावकरांच्या नशिबी कायम. सत्ताधारी म्हणतात ते खरे आणि आयुक्त म्हणतात तेही खरेच. खरे मानायचे कोणाचे? हाही संभ्रम कायम. जळगावचा विकास गेल्या 15 वर्षांत झाला नाही हे खरे. पण, त्यापूर्वी 10 वर्षे जळगाव शहर विकासाच्या बाबतीत इतरांपेक्षा पुढे होते, हेही मान्य केले पाहिजे. मग विकास रोखण्याची किंवा थांबण्याची पनोती कधी सुरू झाली?  हे थोडे तपासू या.

2001 च्या सुमारास जळगावमध्ये पहिल्यांदा लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भाजपचे डॉ. के. डी. पाटील विजयी झाले होते. तेव्हा सत्ताधारीगटाचे प्रदीप रायसोनी यांचा त्यांच्याच आघाडीतील काही लोकांनी ठरवून पराभव केला होता. हा पराभव पालिकेतील सत्ताधारी गटाचे नेते सुरेशदादा जैन यांना जिव्हारी लागला होता. तेव्हा वृत्तपत्रांसाठी प्रतिक्रिया देताना सुरेशदादा म्हणाले होते, माझा माणूस नाकारणाऱ्या जळगावकरांचे भविष्यात खूप हाल होतील. आज 13 वर्षे गेली आहेत. सुरेशदादांची भविष्यवाणी शब्दनशब्द खरी झाली आहे. जळगावकर 2014 मध्ये नरक यातना भोगत आहेतच. पण, सुरेशदादाही कारागृहात आहेत. येथे एक मुद्दा आपण लक्षात घेवू. तो हाच की, सुरेशदादांचा जेथे जेथे पराभव झाला तेथे तेथे नंतर अनेक अडचणी निर्माण झाल्या किंवा त्या केल्या गेल्या. याचा थेट संबंध सुरेशदादांशी नसेलही.
नीट आठवून पाहा, सुरेशदादा पूर्वी जळगाव लोकसभा मतदार संघात एकदा निवडणूक हरले होते. मतांची संख्या पाहिल्यावर सुरेशदादा तिसऱ्या स्थानावर होते. ती निवडणूक लेवा पाटील समाजामुळे आपण हरलो अशी धारणा सुरेशदादांची झाली. तेव्हा पासून त्यांनी कधीही लेवा पाटलांच्या संस्थांना मदत केली नाही. भुसावळ रस्ता परिसरात सुविधाही दिल्या गेल्या नाहीत. जिल्हा बँक अध्यक्षपदावर असताना सुरेशदादांनी मधुकर साखर कारखान्याची सतत अडवणूकच केली. इतिहासात तशी अनेक उदाहरणे आहेत.

सुरेशदादा एकदा जळगाव पालिकेच्या निवडणुकीत जिल्हा दूध संघाजवळच्या वॉर्डात पराभूत झाले होते. आताचे चोपडा मतदार संघातील शिवसेनेचे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे यांनी त्यांचा पराभव केला होता. त्यानंतर या वॉर्डात विकास कामे व्हायला सतत अडचणी आल्या. अखेर प्रा. सोनवणे सुरेशदादांच्या सोबत गेले. आज त्यांच्या वहिनी महानगराच्या महापौर आहेत. घरकूल घोटाळा प्रकरणात सुरेशदादांना कारागृहात जावे लागले. अशाही परिस्थितीत जळगावकरांनी सुरेशदादांचे बंधू रमेश जैन यांच्यावर विश्वास ठेवून 33 नगरसेवकांचे बहुमत दिले. तडजोड म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसने आणि गरज म्हणून मनसेने जैनांच्या अल्पमतातील आघाडीला पाठिंबा दिला. आजही ही सर्व मंडळी सत्तेत आहेत. मग, जळगावकरांना नरकयातना भोगायला लावणारी मंडळी हिच का? असा प्रश्न पडतो. जळगावच्या नरकपुरी होण्याच्या प्रवासावर आपण खूप बोलू शकतो. पण त्या चिकित्सेमध्ये फारसा रस नाही. इतिहास काळा असेल तर तो उगाळू नये. त्यातून शिकून नवा लिहावा, हे आपले तत्व.

जळगाव आजही सुंदर होवू शकते, यावर अनेकांचा विश्वास आहे. ते कसे? याचे अनेक पर्याय समोर दिसतात. त्यातील काही रम्य कल्पना वाटतील असे आहेत. काही राजकिय नेत्यांना अंतर्मूख करणारे आहेत. काही नवे धाडस करायला लावणारे आहेत. आता पाहू पहिला पर्याय ः जळगाव मनपातील सत्ताधारी व विरोधकांनी आर्थिकस्थिती विषयी श्वेत पत्रिका काढावी. (लोकांना कळू दे काय झाले आहे ते)

पर्याय दोन ः सत्ताधारी पक्षाने एक जनसभा घेवून लोकांच्या समोर खरी, वास्तव बाजू मांडावी. (वेळप्रसंगी यस वुई आर गिल्टी म्हणावे)
पर्याय तीन ः महानगरातील सर्व क्षेत्रातील बुजूर्ग मंडळीस एकत्र आणून राजकिय समेट घडवावा. (कोणाचीही सुपारी न घेता पारदर्शी मनोमिलन घडवावे. वेळप्रसंगी माफी-क्षमापनाच्या जाहीराती प्रसिद्ध कराव्यात)
पर्याय चार ः जळगावच्या नागरिकांचे एक शिष्टमंडळ सरकार दरबारी नेवून गाऱ्हाणे मांडावे. मदत मागावी. (यासाठी सत्तेतील लोकांचे सहकार्य घ्यावे)
पर्याय पाच ः जळगाव शहराच्या पुढील 50 वर्षांच्या विकासाचे व्हिजन ठेवून सल्लागार नागरी मंडळ स्थापन करावे. मनपाच्या सर्वसाधारण सभेप्रमाणे या मंडळाला अधिकार द्यावेत.(हे मंडळ म्हणजे सोयीच्या किंवा आवडीच्या लोकांची जागा नाही तर विकासाची दृष्टी, क्षमता असलेल्या लोकांचे एकत्र येणे हवे)
पर्याय सहा ः आहेत त्या सर्व नगरसेवकांनी एकत्र येवून केवळ शहर विकास हा अजेंडा घ्यावा. प्रसंगी खाविआने सत्ता सोडावी. उरलेली 4 वर्षे नेतृत्वासाठी वाटून घ्यावी. (भाजप, खाविआ, राष्ट्रवादी आणि मनसेने कालावधी ठरवावा. यातून बरखास्ती टळू शकेल.)
पर्याय सात ः पश्चातबुद्धी किंवा पश्चातापाची बुद्धी म्हणून राजीनामे द्यावेत. (हा रणछोडदासपणा शेवटचा पर्याय आहे)
याशिवाय, अजून एक पर्याय सध्या चर्चेत आहे. तो म्हणजे, गैरप्रकाराची कारणे दाखवून मनपा बरखास्त होवू शकते हा. परंतु कायदेशीर बाबी लक्षात घेता तसे लगेच होवू शकेल अशी श्नयता नाही. कारण, सध्या आहे त्या पदाधिकाऱ्यांवर वर्षभरातील गैरप्रकाराचे कोणतेही गंभीर आरोप नाहीत. तसे पाहिले तर गेल्या वर्षभरात तीन निवडणुकांची (लोकसभा, विधान परिषद आणि विधानसभा) आचारसंहिता, पावसाळा यामुळे विकास कामेच झाली नाहीत. बराच काळ हा मनपा सिलबंद खाते सुरू करण्यातच गेला. आता दहावा वित्त आयोग, आमदार-खासदारांचा काही निधी हातात असल्यामुळे रस्त्यांची कामे सुरू झाली आहे. इतरही कामे मार्गी लागतील. सफाईसाठी वाहने खरेदीचा विषय मार्गी लागला आहे. ही बाब लक्षात घेता मनपा बरखास्ती हा पर्याय संयुक्तीक वाचत नाही.

वर सांगितलेले सात पर्याय वगळून इतरही पर्याय सांगता येतील. फक्त फरक एवढाच आहे की, होय मला जळगाव सुंदर करायचे आहे आणि मी त्या प्रक्रियेचा एक जबाबदार घटक आहे, हे समजून घेणे होय. मनपातील सत्ताधारी गट सध्या स्वतःच तयार केलेल्या चक्रव्यूहात अडकला आहे. प्रशासन आणि शासन यांच्या सहकार्याशिवाय त्यांना काही जमणार नाही. मग समझदारी यातच आहे की, तडजोडीचे वास्तव पर्याय स्वीकारणे. तसे करणे म्हणजे, केवळ माफी मागणे असे नाही. समझदारी वाचा आणि कृतीतूनही असावी लागते. तेच यावेळी करणे अपेक्षित आहे. गेल्या वर्ष-दोनवर्षांच्या वाटचालीत प्रत्येक ज्येष्ठ नेत्याने काही ना काही गमावले आहे. त्याचा हिशेब न मांडता आता सोबत विकास करण्याचे पाऊल उचलायला हवे.

राष्ट्रीयस्तरावर  शरद पवार यांच्यासारखा जाणता राजा हाफचड्डीवाल्या भाजपच्या सरकारला पाठिंबा देण्याचे जाहीर करतो आणि मोदींची स्तुती करतो. बिहारमध्ये मोदींच्या विरोधात मुलायम, लालू, नितीशकुमार व देवेगौडा आपापसातील मतभेद विसरून एकत्र येवू शकतात. जागतिकस्तरावर मोदींना एकेकाळी व्हिसा नाकारणारे बराक ओबामा मोदींच्या स्वागताला पायघड्या घालतात. कसे काय त्यांनी स्वतःला आणि आपल्या धोरणाला बदलले असेल? अशा सर्व उदाहरणांमधून राजकारण शिकायचे नाही तर कोणत्या उदाहरणांमधून शिकायचे?

हे सर्व सूत्र धरूनच, होय जळगाव सुंदर होवू शकते या सकारात्मक विचारांचा पाठपुरावा केला जावू शकतो.
आता शेवटचा मुद्दा पुन्हा गोष्टीचा. नरक आणि स्वर्गाची सफर केवळ भिंतीच्या आतील आणि भिंतीच्या बाहेरील घटक असे पाहण्यात आहे. भिंतीच्या वरही तिसरा एक घटक असतो. तो कधीही बदलाच्या प्रक्रियेचा भाग नसतो. पण, तोच प्रश्न निर्माण करतो आणि वाढवतो सुद्धा. आपल्याला ही मंडळी नको. एक तर भिंतीच्या आत खेळणारी किंवा भिंतीच्या पलिकडे नेणारी मंडळी हवी. तरच, होय जळगाव हे सुंदर होवू शकते, हे वास्तवात घडू शकेल.


(प्रसिद्धी
- दि. ९ नोव्हेंबर २०१४  तरुण भारत )


No comments:

Post a Comment