Thursday, 12 February 2015

शहर सुंदर करणारी माणसं...


रिवर्तन हे नाव घेवून नाट्य क्षेत्रात काम करणारे आमचे मित्र व नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते शंभूअण्णा पाटील यांच्याशी एकदा जळगाव सुंदर आहे का? याविषयांवर वादपूर्ण चर्चा रंगली. जळगाव मनपा आणि त्यातील नाकर्त्या पुढाऱ्यांवर माझा प्रचंड राग असल्यामुळे भौतिक सुविधांच्या तक्रारी करीत जळगाव सुंदर नाहीच, असे मी आग्रहाने मांडत होतो. त्यावर शंभूअण्णा म्हणाले, बौद्धीक संपदा, निःस्वार्थी जनसेवा आणि चांगल्या प्रवृत्तीची माणसं लक्षात घेवून मी आपले जळगाव सुंदर असल्याचे म्हणत आहे. जळगावची माणसं इतरांच्यापेक्षा निश्चित सुंदर आहेत. अर्थात, हा युक्तीवाद मान्य करण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतो. 

शोध मी कोण?चा


गेले काही दिवस माझा वैचारिक गोंधळ उडाला आहे. मी कोण? या प्रश्नाचे उत्तर मला वेगवेळ्या मानसिकतेतून मिळत आहे. मला पडलेला प्रश्न हा माझ्या राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व याच्याशी संबंधित आहे. मी हिंदुस्थानी आहे, की मी भारतीय आहे, की मी इंडियन आहे, यापैकी जी ओळख मी माझी मानतो, त्यानुसार माझी विचारधारा बदलते. बहुधा याच मनःस्थितीत इतरही अनेकजण असावेत. ही ओळख एकदा प्रत्येकाने निश्चित केलीच पाहिजे...

गिरीशभाऊ भगीरथ व्हाच !


राज्याच्या जलसंपदा मंत्रालयाची सूत्रे जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्याकडे आहेत. जळगाव जिल्ह्यातील नेत्याला तिसऱ्यांदा या मंत्रालयाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. प्रकल्पांची पूर्तता आणि सिंचन लाभक्षेत्र बाबतीत संपूर्ण खान्देशच उपेक्षित आहे. अनेक लघु-मध्यम, मोठ्या पाटबंधारे व धरण प्रकल्पांचा हजारो कोटींचा अनुशेष शिल्लक असताना नव्या योजनांचा प्रारंभ करण्याची आज वेळ नाही. रखडलेले-प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गिरीशभाऊ पुरेसा निधी आणू शकले तरी त्यांचे नाव खान्देशच्या इतिहासात भगीरथमंत्री म्हणून लिहीले जाईल...

फेरयुती झाली; फेरजुळणीचे काय ?


भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र येवून फेरयुती जमवून आणली. राज्याच्या सत्तेत आता दोन्ही पक्षांची हिस्सेदारी निश्चित झाली आहे. राज्यस्तरावर बड्या नेत्यांचे मनोमिलन झाले, पण जिल्हा आणि गाव पातळीवर कार्यकर्त्यांच्या मनभेदाचा सांधा जुळणार कसा? हा प्रश्न आहे. फेरयुतीनंतर जळगाव जिल्ह्यातही कार्यकर्त्यांच्या फेरजुळणीचा नवा अध्याय लिहीण्यासाठी नेत्यांना प्रयत्न करावे लागतील. तरच जिल्ह्यासाठी सत्तेचा निश्चित लाभ दोन्ही पक्षांना मिळू शकतो... 

जळगाव सुंदर होवू शकते


मृत्यू पश्चात आयुष्यावर ज्यांचा विश्वास आहे अशा श्रद्धाळूंना नरक म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही. पण, नरक असतो यावर ज्यांचा विश्वास नाही त्यांना नरकयातना म्हणजे काय? हे अनुभवायचे असेल तर त्यांनी जळगावमध्ये निवास करावा. नरकाची चित्रमय कल्पना ओमशांती परिवाराच्या प्रचार पुस्तकांतून दिली आहे. त्या पुस्तकातील चित्रे आणि जळगावकर सध्या ज्या वातावरणात निवास करीत आहेत ती स्थिती, यात फारसा फरक नाही. असे असले, तरी एक जळगावकर म्हणून मला वाटते की, हो जळगाव महानगर आजही सुंदर, स्वच्छ आणि चांगल्या माणसांचे गाव होवू शकते. ते कसे आणि त्यासाठी पर्याय काय असू शकतात? हेच सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच...

नाथाभाऊ : द वॉल


भारतीय क्रिकेट संघाचे कप्तान म्हणून नेतृत्व गांगुलीकडे असो की धोनीकडे, बेसावध प्रसंगी ढेपाळणाऱ्या फलंदाजीला सावरणारा विश्वासू फलंदाज म्हणून नेहमी राहूल द्रविडकडे पाहिले जायचे. द्रविड खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहायचा. राजकारणाच्या निसरड्या पटावरही पाय रोवून उभा राहणारा नेता असावा लागतो. राज्यातील भारतीय जनता पक्षात असा एकमेव नेता सध्या आहे, तो म्हणजे एकनाथराव खडसे. खान्देशचे नाथाभाऊ. भाजप नेतृत्वातील नव्या सरकारसाठी नाथाभाऊ म्हणजे द वॉल. संरक्षण देणारी भिंत...

विसर्जन रस्ता दुरूस्तीसाठी जैन उद्योग समुहाचा पुढाकार


नपाचे बँक खाते सील झालेले. कोणताही ठेकेदार उधारीत काम करायला तयार नाही. पालकमंत्र्यांनीही निधी द्यायला असमर्थता व्यक्त केलेली. अशा अडचणीत गणेश विसर्जन मार्गाची तातडीने दुरूस्ती कशी करावी? हा प्रश्न मनपा प्रशासनासमोर होता. अखेर मदतीला उभा राहीला जैन उद्योग समुह. समुहाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांनी सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून विसर्जन मिरवणूक मार्ग दुरूस्तीच्या सूचना दिल्या आणि काम मार्गी लागले...

स्थितःप्रज्ञ नाथाभाऊंची आव्हानांवर मात !


राजकारण, समाजकारण आणि कौटुंबिक व्यासपीठावर गेल्या पाव शतकात ना. एकनाथराव खडसे यांची अनेक रुपे पाहता आणि अनुभवता आली. पत्रकार म्हणून त्यांच्या काही राजकिय निर्णयांचे समर्थन केले. अपवादात्मक स्थितीत खंडन  करणारे लिखाणही केले. तटस्थपणे लिहीताना निर्णय टोकाचे वाटले मात्र, त्यांच्याशी चर्चा करून लिहीताना निर्णयांशी सहमती झाली. नाथाभाऊंच्या स्वभावाचा हा महत्त्वाचा पैलू आहे. त्यांनी एखाद्याविषयावर बाजू मांडली की, आव्हानात्मक वाटणारी स्थितीही त्यांच्या ताब्यात येते. ही सिद्धी त्यांना वैचारिक आणि आध्यात्मिक बैठकीच्या नैतिक अधिष्ठानातून प्राप्त झाली आहे. म्हणूनच नाथाभाऊ स्थितःप्रज्ञ माणसाप्रमाणे साऱ्या आव्हानांना सामोरे जातात नव्हे तर त्यावर यशस्वीपणे मातही करतात.

बदलाचा उंबरठा ओलांडताना...


खान्देशच्या मातीत रुजलेले दैनिक ‘जळगाव तरुण भारत’ आज 18 वर्षांची वाटचाल पूर्ण करून 19 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. प्रखर हिंदूत्ववादी आणि उज्ज्वल राष्ट्राभिमान, राष्ट्रीय एकात्मतेचा विचार अंगिकारून नागपूर येथे वृत्तपत्राचा चेहरा लाभलेल्या ‘तरुण भारत’च्या मूळ स्थापनेपासूनच्या वाटचालीचा इतिहास 88 वर्षांचा आहे. स्थापनेपासूनच्या कालावधीचा विचार केला तर ‘जळगाव तरुण भारत’च्या प्रवासाला दीर्घ काळाची वाटचाल असे म्हणणे योग्य होणार नाही. परंतू, ‘जळगाव तरुण भारत’ अनेक स्थित्यंतराच्या काळातही आपले अस्तित्व आणि ओळख कायम ठेवू शकला, ही या द्विदशकाच्या प्रवासातील निश्चित समाधानाची बाब आहे. 

जळगावकरांना पुराचा इशारा


ळगाव शहर व परिसरात दि. 8 आणि 9 सप्टेंबर दरम्यान सुमारे 36 तास झालेल्या जोरदार पावसामुळे उपनगरांमधून वाहणाऱ्या नाल्यांना नैसर्गिक उतार व प्रवाहाच्या दिशेने पूर आले. या पुरामुळे नाल्यांच्या काठावरील आणि लगतची पाच हजारावर कुटुंबे पूर्णतः किंवा काही प्रमाणात उध्वस्त झाली. निसर्ग आणि पर्यावरणाशी मनमानी खेळ करणाऱ्या सरकारी व खासगी प्रवृत्तींना या पुराने इशारा दिला. तो का, कसा, कुठे आणि कधीपर्यंत? हे प्रत्येक जळगावकराने समजून घेणे आवश्यक आहे...

Monday, 9 February 2015

डोंगर झालेली स्मिताताई


ळगाव जिल्ह्याची महिला देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचल्याचा इतिहास श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या नावावर सुवर्णाक्षरांनी लिहीला गेला आहे. आदरणिय प्रतिभाताईंचे हे मोठेपण हिमालयाच्या उंची एवढे आहे. जिल्ह्यातील महिलांना राजकारण आणि सत्तेतील सर्वोच्चपदे अभावानेच मिळाली. ज्यांना मिळाली त्यांनी निश्चितपणे कार्याचा ठसा उमटवला. आता तशी संधी अमळनेर येथील सौ. स्मिताताई उदय वाघ यांना विधान परिषद आमदारकीच्या माध्यमातून मिळाली आहे. मनमिळावू, सतत कार्यरत राहणाऱ्या आणि पक्ष-कामांशी निष्ठावंत असलेल्या ताईंचा हा प्रवास हिमालयाच्या तुलनेत सध्यातरी डोंगर होण्याएवढाच आहे. मात्र कामाच्या आदर्शातून स्मिताताई भविष्यात शिखर झालेल्या असतील असा आज विश्वास आहे...

अकार्यक्षम उमवि प्रशासनाचे ‘नैतिक मूल्यांकन’ काय?पाच महिन्यांपासून विद्यार्थिनींचे लैंगिक छळ प्रकरण प्रलंबित : कुलगुरू आणि टीम दोषींना शोधू शकत नाही
प्रशासन प्रमुख असतो जबाबदार कोणत्याही मोठ्या संस्थेच्या व्यवस्थापनाचा प्रमुख हा संस्थेतील अंतर्गत आणि बाह्य व्यवस्थेला जबाबदार असतो, हा साधा नियम आहे. वयाची 25 वर्षे गाठणाऱ्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशासनाचे प्रमुख म्हणून खान्देशात कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर मेश्राम यांच्याकडे पाहिले जाते. किंबहुना तेच या सर्वोच्च शैक्षणिक संस्थेचे प्रमुख आहेत. या संस्थेत घडलेल्या एखाद्या अपराधाची अंतर्गत चौकशी करताना त्यातील दोषी किंवा अपराधी शोधून काढण्याचे काम सर्व प्रथम कुलगुरू, कुलसचिव आणि उपकुलसचिवांच्या गोतावळ्यासह सर्व अधिकारी वर्गाने केले पाहिजे. दोन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकाराकडे ही सारी मंडळी दुर्लक्ष करीत असल्याचेच आतापर्यंत दिसत आहे. 

विमा क्षेत्रात आर्थिक लढाई


युर्विमा (लाईफ इन्शूरन्स) सेवा ही भारतील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 30 टक्केपर्यंत पोहचली आहे. याशिवाय, आरोग्य, वाहन, अपघात, घर, उद्योग, व्यापार किंवा मानवी क्षेत्रांशी संबंधित इतर विमाविषयक सेवांचाही झपाट्याने प्रचार-प्रसार होत आहे. विमा संरक्षण देणाऱ्या सर्व सेवांसाठी देशांतर्गत 120 कोटी लोकसंख्या म्हणजे खुली व अवाढव्य विस्तारलेली बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ विमा सेवा देणाऱ्या देशांतर्गत सर्व घटकांसाठी पूर्वीच खुली झाली आहे. आता विदेशी घटकांनाही भारतीय बाजारात 49 टक्के भांडवली गुंतवणुकीचा हक्क घेवून आक्रमपणे उभे राहता येणार आहे. तसे झाल्यानंतर निर्माण होणारे प्रश्न किंवा संधी यावर सध्या अनुकूल-प्रतिकूल मंथन सुरू आहे.

खान्देश विकासाकरीता हवे विशेष पॅकेज


मुक्ताईनगर येथील संत मुक्ताई सहकारी साखर कारखान्याच्या गाळप हंगाम प्रारंभ निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या (दि.30) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. मंत्रिमंडळातील सर्वाधिक अनुभवी, अभ्यासू, प्रभावी नेते तथा महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी आयोजित केलेला उद्याचा कार्यक्रम आहे. केवळ जळगाव जिल्हा नव्हे तर धुळे, नंदुरबारसह संपूर्ण खान्देशचे एकहाती नेतृत्व खडसे करतात. म्हणूनच, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कार्यक्रमात खानदेशच्या विकासाकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न ‘तरूण भारत‘च्या माध्यमातून आम्ही करीत आहोत.

दशावतारी साहेबहाराष्ट्रासह देशातील सत्तेच्या सारीपाटावर साहेब या नावाला वेगवेगळे वलय आहे. साहेब शब्दाला जाणताराजा हाही पर्याय आहे. राजकारणाचा उंबरठा नव्याने ओलांडणारा कोणताही नवखा किंवा उमदा गडी साहेबांचे नाव घेताना दोन्ही हाताने कानांच्या पाळ्या पकडतो, जीभ सुद्धा चावतो. यातून व्यक्तिमत्वाविषयी असलेल्या आदराची आणि उत्तुंगपणाची जाणीव व्हावी. साहेबांचे गुगली, घुमजाव, यू टर्न आणि वक्तव्याचा विपर्यास याच गुणवैशिष्टांची संकलीत माहितीतून ओळख करुन घेण्याचा हा प्रयत्न आहे.

देव आणि देवत्वाचा शोध


शिर्डीच्या साईबाबांना देवाचा दर्जा देणे किंवा त्यांचे देवत्व नाकारून मंदिरातील त्यांच्या मूर्ती काढून टाकण्याचा खळबळजनक आदेश कर्वदा (छत्तीसगड) येथे नुकत्याच पार पडलेल्या हिंदू साधू- संतांच्या धर्मसंसदेतून देण्यात आला आहे. साईबाबांचे महत्त्व किंवा देवत्वही सांगायचे नाही आणि धर्मसंसदेच्या आदेशालाही विरोध करायचा मुद्दा नाही. विचार मांडायचा आहे तो, केवळ देव मानणाऱ्या श्रद्धेचा आणि देवत्वाचे अस्तित्व अनुभवणाऱ्या प्रचितीचा. दगड, प्रतिमा किंवा कोणत्याही प्रतिकात देव शोधण्यापेक्षा माणसांमधील देवत्वाचा शोध आपण कधी घेणार? आणि त्याला कोणाची संमती अथवा मंजुरी घ्यावी लागणार? हे दोनच प्रश्न सर्वसामान्य माणूस अथवा भाविकांसाठी महत्वाचे आहेत. आम्ही सांगू तो देव किंवा आम्ही पेटंट घेवून ठरवला तोच देवाचा चेहरा ही वृत्ती- प्रवृत्ती श्रद्धेचा प्रवास अंधश्रद्धेकडे नेणारी आहे. ती सर्वार्थाने समाजासाठी घातक आहे.
 

संपत्तीच्या वाटणीत लेकी, सुना उपऱ्याच !


सूनचे सासरच्या संपत्तीत आणि लेकीचे माहेरच्या मालमत्तेत असलेले अधिकार हिरावणारा एक आणि अधिकार देणारा दुसरा असे दोन निकाल विविध उच्च न्यायालयाच्या खंडपिठांनी दिले आहेत. या निकालांनी संपत्तीच्या वाटणीत आजही लेकी माहेरी तर सुना सासरी उपऱ्याच असल्याचे अधोरेखित केले आहे. न्यायालयाचे निकाल हे विशिष्ट खटले आणि न्यायपिठासमोर मांडली गेलेली परिस्थिती यावर दिले जातात. त्यामुळे अपवादात्मक स्थितीत दिलेले निकाल हे आगळे वेगळे असले तरी त्या निकालांमधील साम्यस्थळे शोधून खालच्या न्यायालयात न्याय मागितला जातो किंवा दिला जातो. महिलांच्या संपत्तीवरील हक्काबाबती न्यायालयीन प्रकरणे ही अशाच परस्पर विरोधी निवाड्यांमधील साम्यस्थळांच्या घोळात वेळकाढू ठरत आहेत. माहिलांचा संपत्तीवरील अधिकार हा जोपर्यंत पुरूषांची मानसिकता अंतःकरणापासून स्वीकारत नाही तोपर्यंत कोणताही कायदा महिलांना त्यांची कुटुंबात आणि समाजात पत, प्रतिष्ठा आणि सन्मान बहाल करू शकत नाही.

स्वयंभू नाथ !


गडाच्या देवाचा चेहरा कारागिराला हवा तसा असतो. एखाद्या पाषाणाने मूर्ता निर्मितीसाठी स्वतःवर पैलू पाडले तर तो स्वनिर्मितीचा चमत्कार होईल. कठोर मेहनत आणि सततच्या परिश्रमातून एखाद्या माणसाने स्वतःला घडविले तर तो ठरतो...स्वयंभू! ती व्यक्ती अगदी जवळची, असेल तर त्यांना म्हणावे लागेल एकनाथराव खडसे... स्वयंभू नाथ. नाथांचा हा अनेकांना माहित नसलेला प्रवास.

जिल्ह्याच्या राजकारणात व्यक्तिविरोधाचा व्हायरस विधानसभा निवडणुकीसाठी युती किंवा आघाडी झाली वा नाही झाली तरी जळगाव जिल्ह्यातील 11 मतदारसंघातील रणधुमाळीत सर्वच पक्षांत असलेला व्यक्तिविरोधाचा व्हायरस हा प्रत्येक उमेदवारासाठी डोकेदुखीचा ठरणार आहे. मनोमिलनाची तात्पुरती मलमपट्टी करुन हा व्हायरस किल करता येत नाही आणि त्याच्याकडे दुर्लक्षही करता येत नाही, अशी साऱ्यांचीच अवस्था आहे.

सार्वत्रिक असंतोषाची कृतीदर्शके: आंदोलन, चळवळ, संघटन, अभियान, सेवाधिक-जादा-जास्तीचे मिळविण्याचा हक्क किंवा अधिकार हा प्रत्येक वर्ग, गट किंवा घटकातील समाजाला हवा आहे. या अधिकारासाठी किंवा मागणीसाठी सामाजिक असंतोष अथवा अस्वस्थता दर्शविणारे विविध मार्ग समाजात अवलंबिले जातात. त्याचे स्वरुप हे आंदोलन, चळवळ, अभियान, संघटन अथवा सेवा यांच्या माध्यमातून असते.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गणपती पाण्यात

हाराष्ट्रात गणेशोत्सवानंतर विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होईल. निवडणुकीच्या संभाव्य निकालाचा कल काय असू शकतो? याची पहिली चाचणी एबीपी माझा चॅनेल आणि नील्सन या संस्थानी संयुक्तपणे केलेल्या सर्व्हेक्षणातून समोर आली आहे. राज्यात भाजपसाठी अनुकूल वातावरण असल्याचा अर्थ या सर्वेक्षणातून निघतो. जळगाव जिल्ह्यात विधानसभेच्या 11 पैकी किमान 10 मतदार संघात भाजपसह युतीला अनुकूल वातावरण राहील असे दिसते. याच वातावरणात सत्ताधारी आघाडीतील प्रमुख राजकिय पक्ष म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जळगाव जिल्ह्यातील अस्तित्व धो्नयात येण्याची श्नयता आहे. सध्या राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 5 आमदार व 1 सहयोगी आमदार असून आगामी निवडणुकीत ही संख्या 1 किंवा 2 वर येण्याची श्नयता आहे. म्हणूनच राष्ट्रवादी कॉंग्रेसचा गणपती पाण्यात दिसतो. कॉंग्रेसची अवस्था नेहमीप्रमाणे उत्सवापूर्वीच गणेशाचे विसर्जन अशी आहे.

Thursday, 5 February 2015

व्हिडीओ- उंदिरखेडा येथील नागेश्‍वर मंदिर

पारोळा तालुक्यातील उंदिरखेडा येथे पेशवेकालीन नागेश्‍वर मंदिर हे परिसरातील भाविकांचे श्रध्दास्थान असून येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते.

Wednesday, 4 February 2015

रेसचा घोडा आणि कार्पोरेटचा अधिकारी...

माझ्या एका मित्राने महाराष्ट्रातील आघाडीच्या एका दैनिकातील नोकरीचा राजीनामा दिला. मित्र आणि त्या दैनिकाचे समिकरण असे घट्ट होते की मित्राचा दिनप्रारंभ "शुभसकाळ" म्हणून व्हायचा. योगायोग असा की, मी सुध्दा याच दैनिकात होतो आणि मलाही बाहेर पडण्यासाठी ६ वर्षांपूर्वी असेच वातावरण निर्माण केले गेले होते. मित्र कोणत्या मानसिकतेत असेल याची कल्पना होती म्हणून मी दोन-तीन दिवस त्याला फोन करणे टाळले.

फॅमिलीचा "मोबाइल" संवाद...

काही दिवसांपूर्वीचा किस्सा. मी एका मान्यवर आणि ज्येष्ठ मित्रासोबत त्यांच्या सुप्रसिद्ध सुपर शाॅपमध्ये गप्पा करीत होतो. विषय मोबाइलवरून सुरू होवून कुटूंबाकडे वळला. पालकांचा मुलांशी संवाद होत नाही असा मी स्वानुभव सांगत होतो. एकच मुलगा, पण तो आम्हा उभयतांशी दिवसभरात एकदाही बोलत नाही असे माझे गार्‍हाणे होते. आम्ही चर्चेत चौघे होतो आणि मुलांशी संवाद होत नाही यावर सहमत होतो.

कट्टर धर्मांध आणि ठार आंधळे

जचे पान १ लावताना २ बातम्या जवळ जवळ लावल्या आहेत. पॅरीसमध्ये एका मासिकाच्या कार्यालयात घुसून मुस्लिम दहशतवाद्यांनी संपादकसोबत २ कार्टूनिस्ट आणि १२ लोकांना गोळ्या घालून ठार केले. या मागचे कारण काय आहे तर, मोहम्मद पैगंबरचे कार्टून या मासिकातून प्रसिध्द केल्याचा राग कडव्या मुस्लिम धर्मांधांना होता. त्यांनी जाहीरपणे धमकावून व दहशतवाद्यांना पाठवून हे कृत्य घडवून आणले. दुसरी बातमी आहे भारतातील दिल्ली उच्च न्यायालयाने पीके संदर्भातील देवादिकांच्या विटंबनेचा मुद्दा मांडणारी जनहित याचिका फेटाळली.

माणसाची ओळख...

पूनर्जन्मावर माझा विश्वास नाही. पण, द्वारकापीठाचे शंकराचार्य विद्यानंद सरस्वती यांनी सांगितलेली एक तर्काधारित गोष्ट सांगतो. आज खास पत्रकारदिनी...शंकराचार्यांचे निरूपण सुरू होते. महाभारतातील शिखंडीच्या पूनर्जन्माचा विषय होता. ती मागच्या जन्मी महिला होती आणि केवळ भिष्म वधासाठी तिचा पूनर्जन्म झाला होता. तिला विधी लिखीत तशी संधी मिळाली आणि तिच्या आडून का असेना अर्जूनाने भिष्माला बाणांच्या घाताने जर्जर केले... शंकराचार्य रसाळवाणीने सांगत होते.

Tuesday, 3 February 2015

पीकेचा पंचनामा

पीकेच्या पोस्टरवर आमीर खानला पूर्ण नग्न दाखवून पीके चित्रपटाविषयी सनसनाटी निर्माण करण्यात दिग्दर्शक-निर्माताद्वयी राजकुमार हिराणी, विधू विनोद चोप्रा आणि अभिनेता आमीर खान हे त्रिकूट यशस्वी झाले होते. या चित्रपटात करमणुकीची पातळी ही कमरेखालच्या दर्जाची असेल याचा अंदाज त्याचवेळी आला होता. कमरेखालचे कापड काढून टाकण्यासोबतच हिंदू देवादिकांची टवाळी करणे, लैंगिक विषयांतून हीन दर्जाची विनोद निर्मिती करणे आणिहिंदू युवतींना मुस्लिम युवकांच्या प्रेम जाळ्यात पडण्याचा संदेश...

एका व्हाट्सअॅप गृपचे बंद होणे...

मित्रांनो काल दि. ३१ डिसेंबरला वर्ष सरत असताना आम्ही व्हाट्सअॅपवरील आमचा "कान्हदेश मंच" गृपला निरोप दिला. साधारणतः वर्षभरापूर्वी या एपचा फारसा प्रचार नसताना त्याचा माणसांची जोडणी आणि सहज व्यक्त होण्याचे माध्यम ही गुणवैशिष्ट्ये लक्षात घेवून आम्ही हा गृप सुरू केला होता. जळगाव शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांना रितसर विनंती करून या गृपमध्ये सहभागी केले होते.

पत्रकछाप पुढारी आहेत कुठे ???

ळगाव शहरातील प्रसिद्धी माध्यमांना पत्र, निवेदन, तक्रार अर्ज नावानिशी आणि बिगर नावानिशी देणारी मंडळी भरपूर आहेत. कोणतेही कारण, प्रसंग, घात- अपघात, आपत्ती घडली की विषयांच्या प्रतिक्षेत असलेली ही मंडळी पत्रकांचा अक्षरश: पाऊस पाडते. या पावसाला कोणताही मौसम नसतो. क्रिडा क्षेत्रात तर काहींनी एवढी मक्तेदारी केली आहे की, दैनिकांनी रोज बातम्या प्रसिद्ध कराव्यात म्हणून विषयांचे अफलातून नियोजन ही मंडळी करतात, करू शकतात. प्रसिद्धीची सतत अभिलाषा बाळगणारी मंडळी अधिकारी आला की स्वागत, गेला की निरोप, काही काम केले की अभिनंदन आणि काही नाही केले की निषेध करणारी पत्रके पाठवतात.

कोणते मुल्ला, मौलवी उत्तर देतील ?

दरशांमधून कडव्या धार्मिक संस्काराचे शिक्षण घेवून आलेल्या आणि नंतर लष्करी शाळेत शिक्षण घेणा-या मुलांनी अल्लाहला प्रश्न विचारला की, आपण कोणाला जन्नत देणार ? लष्करी शिक्षण घेणा-या मुलांचा कत्ले आम करणा-या इस्लामच्या तथाकथित कैवारी जिहादींना की, भविष्यातील शांततेसाठी (ही मुले सिमेवर निरपराध काश्मीरींना मारतील हे माहित असूनही) लष्करी शिक्षण घेणा-या आम्हा मुलांना ??? या प्रश्नावर अल्लाह निरूत्तर झाले.

"नक्कलखोरांचे अच्छेदिन"

मित्रहो, गेली २७ वर्षे वृत्तपत्रात काम करतोय. स्वत:च्या कल्पना लढवून अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. सकाळ उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचा सहयोगी संपादक असताना पुण्यात होणा-या प्रशिक्षणातून अनेक कल्पना मिळत...सूचत. मालक आ. अभिजीत पवार यांनी प्रशिक्षणाचे सत्रच त्यावेळी सुरू केले होते. मीडिया कान्व्हर्जन्स शिकताना पेपर, मोबाईल, नेट आणि वाचक यांना जोडून काय करता येईल याच्यावर आमचे ब्रेन स्टार्मिंग सेशन झाले. एका माध्यमाची तंगडी दुस-यात टाकून काही तरी उपक्रम राबवा अशी कल्पना घेवून जळगावला आलो.

नाथाभाऊ अवमानाची ती भेट विसरतील ?

संपूर्ण जलगाव जिल्ह्यात काल २ सप्टेंबर २०१४ ला ना. एकनाथराव खडसे ऊर्फ सर्वांचे आवडते नाथाभाऊ यांचा ६२ वा वाढदिवस जल्लोषात साजरा झाला. हा वाढदिवस इतर सर्व जिल्हा नेत्यांच्या तुलनेत सर्वाधिक महागडा ठरला आहे. सर्व आघाडीच्या दैनिकांसह इतर लहान- मोठ्या दैनिकांनी किमान सव्वा कोटी रूपयांवर जाहिराती छापल्या. हा मापदंड नाथाभाऊंची लोकप्रियता सिद्ध करतो. अशी लोकप्रियता इतरांच्या वाट्याला कधीही आलेली नाही.

पीएम प्रोटोकाल मोडतातच...

मोदींचे भारतात आणि भारताबाहेर वागणे हे सार्वत्रिक वर्तन व शिष्टाईला नवा चेहरा देत आहे. मोदींच्या पाठीवर उद्योजकाचा हात असणे यात गैर ते काय? यापूर्वी काँग्रेसचा हात उद्योजकांच्या पाठीवर होता, त्यात गैर अर्थ निघत नव्हता. आताही तो मोदी व अंबानी संदर्भात असू नये.

दहिहंडी ते कार्पोरेट स्ट्रैटीजी- जगातल्या सर्वांत सोप्या भाषेत...

उंचावरील दहिहंडी फोडण्यासाठी गोविंदा आणि त्याचे पथक ज्या पध्दतीने व्यूहरचना करते तीच पध्दत वापरून कोणत्याही कार्पोरेट कल्चरमध्ये यश मिलविण्याठी प्रयत्न केले जातात. अख्या बोर्ड रूम या पुस्तकातील कार्पोरेट संकल्पना दहिहंडीच्या नियोजन, सराव, प्रत्यक्ष दहिहंडीच्या ठिकाणची चढाई आणि अखेरीस सुखरूप उतरणे यात सामावलेल्या आहेत. ते कसे हे समजून घेवूया सोप्या भाषेत?

सामुहिक जेवण हा घट्ट मैत्रीचा मार्ग....

माणसे जवळ येण्याची क्रिया दोनच पद्धतीने होते. पहिली म्हणजे, एकमेकांचे विचार जुळणे आणि दुसरी म्हणजे, एकमेकांच्या सोबत आनंद घेत जेवणे.
मला आठवते, मी नाशिक सकाळला फोटोग्राफर म्हणून सन 1989 मध्ये लागलो तेव्हा माझे वेतन होते 650 रुपये. त्यावेळी माझे मित्र सुधीर देशपांडे, प्रकाश जोशी, बाबर, संजय पागे ही मंडळी माझ्याकडून पार्टी घ्यायची. तीचा खर्च असायचा 1000 रुपयेवर. मी वडीलांकडून पैसे मागवून वर खर्च भागवायचो.

फैन्सी नंबरप्लेटची विकृती...

वाहनांवर ‘नंबरप्लेट’वर आकडे अक्षरांसारखे रेखाटण्याची क्रेझ पुढा-यांमध्ये वाढत आहे. आकड्यांमधून दादा, मामा, नाना, आप्पा, काका नावाची रचना केली जात आहे. अशा नंबर प्लेट नियमबाह्य असूनही प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) किंवा वाहतूक पोलीस कारवाई करीत नाही.

देशदूतचा निरोप घेताना..!

गेले 15 दिवस घरीच आहे. अजून 4 दिवसांनी "देशदूत"मधील काम थांबणार. नव्या जबाबदारीचे वेध लागले आहेत. सध्या फावला वेळ खुप असल्यामुळे गेल्या 25 वर्षांच्या वाटचालीचे अवलोकन केले.

एक बाब प्रकर्षाने जाणवली

- "मैत्रिच्या बुरख्यात शत्रू अनेक भेटले पण मित्राच्या रुपात जिवाभावाचे सखा दोन, तीनच जोडता आले"