![]() |
एकनाथराव खडसे .....गुलाबराव पाटील |
Saturday, 26 December 2015
‘स’कार पर्वाचा प्रारंभ हवा!
Saturday, 19 December 2015
मॅरेथॉनचा ‘सेलेब्रिटी शिलेदार’
गोव्यातील वैशिष्ट्यपूर्ण आणि अवघड मॅरेथॉनचे २१ किलोमीटरचे अंतर पहिल्याच प्रयत्नात पूर्ण करण्याचे यश जळगावचे युवा आयकॉन तथा उद्योगपती किरण बच्छाव यांनी निश्चयाने साधले आहे. धावण्याच्या जगात जळगावचा पहिला ‘सेलेब्रिटी शिलेदार’ म्हणून त्यांची नोंद झाली आहे. यापुढे शक्य त्या मॅरेथॉनमध्ये धावायचे असे त्यांनी ठरविले आहे. साहसी खेळाच्या प्रकारात समावेश असलेल्या मॅरेथॉनच्या नव्या क्षेत्राकडे किरण बच्छाव यांनी इतरांचेही लक्ष वेधले आहे...
Saturday, 12 December 2015
गुलाबराव पाटीलको गुस्सा क्यों आता है ?
जळगाव जिल्ह्यात शिवसेनेच्या बहराचा काळ असताना गुलाबराव पाटील यांचे नतृत्व पुढे आले. रस्त्यावरचा आणि सतत लढाऊबाण्याने काम करणारा कार्यकर्ता अशी त्यांची बराचकाळ ओळख होती. लागोपाठ दोनवेळा आमदारकी मिळाली. मुंबईवार्या करणार्या गुलाबरावांनी मतदार संघातील विकास कामांसाठी मंत्रालयात कधी पाठपुरावा केला असे आढळले नाही. नंतर व्हायच्या त्या परिणामातून आमदारकी गेली. पाचवर्षे गुलाबराव राजकिय वनवासात होते. आता पुन्हा नशिबाने साथ दिली म्हणून गुलाबराव आमदार आहेत. राज्यातील सत्तेच्या सारीपाटात मंत्रिपदाची खूर्ची मिळण्याची संधी त्यांना दिसते आहे. पण, टोकाचा विरोध करून आणि हलके मुद्दे घेवून गुलाबरावांना साध्य काय करायचे आहे? हा खरा प्रश्न आहे. वारंवार बोलघेवडेपणा करून आपल्याच व्यक्तिमत्वाला खुजे ठरविणार्या गुलाबरावांना प्रश्न विचारावासा वाटतो, ‘गुलाबरावको गुस्सा क्यों आता है?’
Saturday, 28 November 2015
सोंगाड्या आमिर खान!
बालिवूडमध्ये गेल्या तीन दशकांपासून खानावळींचे वर्चस्व आहे. अभिनयाच्या गुणवत्तेवर आणि ‘अंडरवर्ल्ड’ शी असलेल्या आर्थिक संबंधातून खानांची किती आणि कुठे चलती आहे, हा चौकशीचा तसाच शोधाचा मुद्दा आहे. चित्रपटनिर्मिती प्रक्रियेत कोणत्या खानाचे कोणाशी कसे लागेबांधे असतील हे सांगता येत नाही. त्यामुळे खानावळ मंडळी पाकिस्तानच्या कलावंतानाही बॉलिवूडमध्ये सहज घुसवून टाकतात. खानावळीच्या गोतावळ्यात ‘परफेक्टनिस्ट’ म्हणून लौकिक मिळवणारा आमिर खान सध्या तमाशातील सोंगाड्यासारखे काम करीत आहे. फरक एवढाच की, तमाशातला सोंगाड्या प्रामाणिकपणे रसिकांना हसवायचे काम करतो तर, आमिरने वठविलेला सोंगाड्या जगभरात भारताच्या साहिष्णू प्रतिमेला धक्का पोहचवून देशवासियांना ‘लाजवायचे’ काम करीत आहे.
Tuesday, 24 November 2015
आपला तो बाळासाहेब, दुसऱ्याचा तो कार्टा...
आपला तो बाळासाहेब, दुसर्याचा तो कार्टा
![]() |
बीमा भारती |
यावर मत मांडताना पहिला मुद्दा पाहू. महाराष्ट्राच्या प्रभावशाली मुख्यमंत्र्यांच्या कारकिर्दीत यशवंतराव चव्हाण यांच्यानंतर वसंतदादा पाटील यांचे नाव घेतले जाते. मात्र, वसंतदादा अल्पशिक्षित होते. त्यांनी आपले सामाजिक भान आणि अनुभव याच्या जोरावर मुख्यमंत्री म्हणून अत्यंत प्रभावी काम केले. याशिवाय, इतरही अनेक लोकप्रतिनिधींचे शिक्षण कमी असतानाही त्यांनी केलेल्या उत्तुंग कामगिरीची नोंद इतिहासात झालेली आहे. त्यात सविस्तर जाण्याचे कारण नाही.
Thursday, 22 October 2015
सोने लुटण्याचा अन्वयार्थ
दस-याच्या दिवशी सोने लुटणे ऐवजी सोने वाटायला जावू, असा विचार आमचे सुधारणावादी मित्र मांडतात. मात्र ही विद्वान मंडळी लुटणे या शब्दांचा केवळ भाषा शास्त्रीय आणि कृतीशील अर्थ लक्षात घेतात. जसे लूट म्हणजे चोरी, हिसकावणे, जबरीने नेणे वगैरे. हा भाषीक व कृतीदर्शक अर्थ आहे.
लुटणे किंवा लुटविणे याला आनंद देणे, समर्पण करणे, दुसऱ्यावर ओवाळणे, आनंदात किंवा सुखात डुंबविणे असाही भावार्थ आहे. आजच्या जमान्यात 'जो मेरा है वो तेरा है और जो तेरा है वो मेरा है' ही भावना लूट आणि लुटविणे याविषयी अधिक प्रभावीपणे भावार्थ स्पष्ट करते.
लुटणे किंवा लुटविणे याला आनंद देणे, समर्पण करणे, दुसऱ्यावर ओवाळणे, आनंदात किंवा सुखात डुंबविणे असाही भावार्थ आहे. आजच्या जमान्यात 'जो मेरा है वो तेरा है और जो तेरा है वो मेरा है' ही भावना लूट आणि लुटविणे याविषयी अधिक प्रभावीपणे भावार्थ स्पष्ट करते.
असुरोंके इतिहासका पुनर्लेखन जरुरी है ?
आज विजयादशमीका पावन पर्व है l असत्यपर सत्यकी जीत या बुराईपर भलाईकी मात या अधर्मपर धर्मकी जीत के आनंद स्वरूप आज रावण दहन किया जाएगा l रावण असूर और मर्यादा उल्लंघित विद्वान पंडित का प्रतिक है l राम सूर और मर्यादा पुरूषोत्तम का प्रतिक है l देशभरमें बहुतांश जगहपर आज रावणके प्रतिमाका दहन किया जाएगा l लेकिन, मध्यप्रदेश, छत्तीसगड, उत्तरप्रदेश, बिहार, हिमाचलप्रदेश आदी कई प्रांतमे रावण, महिषासूर या होलिका दहन नही किया जाता, यहभी एक वास्तव दृष्टीकोन है l ऐसा क्यूं है, यह सत्य जाननेकी कोशिश करनेपर संबंधित गाव या प्रांतके स्थानिय लोक असुरोंका गुणगान करते हुए दिखाई देते है l याफिर, वे स्वयंमकोही असूरोंका वंशज मानते l
Saturday, 3 October 2015
मातीचे आख्यान

Saturday, 26 September 2015
टगेगिरीला ‘टॅग’
राष्ट्रवादी काँग्रेसमधील तिसर्या क्रमांकाचे पॉवरफूल्ल नेते अजित पवार सध्या अडचणीत आहेत. त्यांच्या नेतृत्वात विविध सरकारी-सहकारी संस्थांमध्ये काम करणार्या आजी-माजी पदाधिकार्यांनी केलेले आर्थिक अनियमीततेचे काही प्रकार समोर आले आहेत. ‘महानंद’ प्रकरणी दुग्ध विकासमंत्री एकनाथराव खडसे, सिंचन प्रकरणी जलसंपदामंत्री गिरीश महाजन आणि राज्य शिखर बँक प्रकरणी सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी चौकशीचे सत्र सुरू केले आहे. या चौकशांमध्ये अजित पवार यांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभाग नंतर दिसून येईल. तूर्त आरोपांच्या जंत्रीला म्हणजे, राजकारणातील ‘टगेगिरी’ला कायद्यांचा ‘टॅग’ लावण्याचा प्रकार सरकारने सुरू केला आहे.
Saturday, 19 September 2015
कृषि, सहकारातील अनेक बदलांचे संकेत
पीक वीमा योजनेत अनेक अडचणी होत्या. त्या विषयी सरकारकडेही अनेक तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे सरकार लवकरच ‘सर्वंकश पीक वीमा’ योजना आणणार आहे. त्यात पिकाचा १२ महिन्यांचा विचार केला जाईल, अशी माहिती राज्याचे महसूल-कृषि, दुग्ध आणि मत्स्योत्पादन विकासमंत्री एकनाथराव खडसे यांना आज जळगाव येथे दिली. जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या ९९ व्या वार्षिक सभेत खडसे हे बँकेचे संचालक म्हणून सहभागी झाले. या सभेत विविध प्रश्नांची उत्तरे देताना आणि समारोपाचे भाषण करताना त्यांनी मोकळेपणाने अनेक विषय मांडले. त्यात सरकारच्या काही नव्या धोरणांचे सूतोवाच त्यांनी केले. काहीत बदल घडविण्याचाही उल्लेख केला.
काँग्रेसमुक्त जिल्हा !
![]() |
चर्चा करताना दिलीप तिवारी (डाविकडे) भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ (उजविकडे) |
Saturday, 22 August 2015
मूल्यनिर्धारण हाच कळीचा मुद्दा
Sunday, 2 August 2015
स्फोटापेक्षा महाभयंकर !
मुंबईत साखळी बॉम्बस्फोट घडविण्याच्या खटल्यात दोषी असल्याचे सिद्ध झाल्यानंतरही याकूब मेमनच्या बचाव आणि समर्थनासाठी उभ्या राहिलेल्या ‘मूठभर’ मंडळींनी हिंदूस्थानातील एकसंघ समाजाची वैचारिक आणि धर्माच्या नावावर विभागणी करून टाकली. याकूब आणि त्याच्या टोळीतील गुन्हेगारांच्या कृत्यामुळे २५७ जणांची हत्या झाली. तो प्रकार क्रूर होता. पण, याकूबला झालेल्या शिक्षेच्या अंमलबजावणीनंतर समाज थेट दुभंगला. हा परिणाम त्या स्फोटांपेक्षा महाभयंकर आहे.
Saturday, 25 July 2015
बिनविरोधचे वारे...
जळगाव जिल्ह्यात सध्या विविध स्वराज्य संस्थांसह सहकारी संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. गावपातळीवरचे वातावरण तापलेले आहे. राजकिय पक्षांची वाढती संख्या, नेतृत्त्व करण्याची सुप्त ईच्छा आणि गाव-संस्थेचे पुढारपण करण्याची संधी या हेतूने प्रत्येक निवडणुकीत उमेदवारी करणार्या हौश्यागौश्यांची संख्या वाढतच आहे. अशा वातावरणात कोणतीही निवडणूक बिनविरोध होणे जवळपास अशक्य असाच आतापर्यंतचा समज होता. पण, जळगाव जिल्ह्यात जिल्हा सहकारी बँक पाठोपाठ बिनविरोधचा नवा पॅटर्न आता चोपडा सूतगिरणी, जिल्हा दूध संघासह काही ग्राम पंचायतींमध्येही यशस्वी होताना दिसत आहे. ‘बिनविरोधचे वारे’ केवळ सत्तावाटणीचे सूत्र न ठरता विकासाचे ‘बारमाही वारे’ ठरावेत हीच मतदारांची अपेक्षा आहे.
Saturday, 18 July 2015
‘बाहुबली’चे अभासी-वास्तव तंत्र

केशवस्मृती प्रतिष्ठान ‘कलेक्टीव्ह विस्डम’च्या दिशेने

‘सब समाजको साथलिए आगे है बढते जाना’ हा विचार घेवून ‘जळगाव जनता सहकारी बँक’ सुरू झाली. त्यानंतर आर्थिक विकासातून समाज विकास हे तेव्हाचे सूत्र घेवून ‘केशवस्मृती प्रतिष्ठान’ स्थापन झाले. समाजाच्या विविध गरजांची शक्य तशी पूर्तता करण्याची जबाबदारी प्रतिष्ठानने सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून स्वीकारली. प्रतिष्ठानच्या नियंत्रणात आज जवळपास १६ सेवा प्रकल्प सुरू आहेत. भविष्यात इतरही नव्या सेवा प्रकल्पांचा विस्तार आणि जुन्या प्रकल्पांचे सक्षमीकरण करण्याच्या योजना आहेत. हे करताना, प्रतिष्ठानच्या कामात काळानुरुप अमूलाग्र बदलाची भूमिका स्वीकारण्यात आली आहे. समूह नेतृत्त्व आणि व्यवहाराचे शहाणपण असलेल्यांचा एकत्रित समूह ही ‘विचारशैली’ आणि समुहाच्या गरजांपर्यंत पोहचण्याची ‘कार्यशैली’ घेवून केशवस्मृती प्रतिष्ठान वाटचाल करीत आहे. केशवस्मृती प्रतिष्ठानचे प्रकल्प प्रमुख म्हणून श्री. भरतदादा अमळकर सेवा प्रकल्पांचा भावी प्रवास (डायरेक्शन), संकल्प (एम्स), आव्हाने (हर्डल्स) आणि पर्यायी मार्ग (सोल्यूशन) या विषयी ‘कलेक्टीव्ह विस्डम’ (बहुगुणींचा समुह) ही संकल्पना मांडतात...
Saturday, 11 July 2015
गॅस सिलिंडर अनुदान नाकारावे की घ्यावे?

Saturday, 4 July 2015
लोकशाहीच्या दुसर्या स्तंभाला चौथ्या स्तंभाचे अनावृत्त पत्र
जळगाव महानगर पालिका, जिल्हा पोलीस प्रशासन आणि जिल्हा महसूल प्रशासन यांच्या कार्यपद्धतीवर काही प्रश्न निर्माण करणारी स्थिती सध्या आहे. पदावर व्यक्ती कोण आहेत? हा विषय महत्त्वाचा नाही. ‘लोकशाही चेहरा’ असलेल्या या तीनही प्रशासनातील ‘अवयव’ व्यवस्थित काम करीत नसल्याचे अनुभवाला येत आहे. म्हणूनच लोकशाहीच्या ‘दुसर्या प्रशासन’ या स्तंभाला ‘चौथ्या माध्यम’ या स्तंभाने हेे अनावृत्त पत्र लिहीले आहे...
Sunday, 21 June 2015
Saturday, 20 June 2015
योगाची जगभरारी
पंतप्रधान नरेंद्र मोदींची विनंती स्वीकारून संयुक्त राष्ट्रसंघाने दि. २१ जूनला ‘आंतरराष्ट्रीय योगदिन’ साजरा करण्याचे जाहीर केले आहे. जगभरातील जवळपास १७७ देशांमधील कोट्यवधी नागरिक आज सामुहिकपणे विविध प्रकारची योगासने करून प्राचिन भारतीय संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेल्या अध्यात्मिक, कायिक आणि मानसिक जीवनक्रियेला स्वीकारतील. योगाची ही ‘जगभरारी’ नवा इतिहास लिहीण्यास प्रारंभ करीत आहे.सुमारे सहा हजार वर्षांपासून योगाचे अस्तित्त्व आणि महत्त्व अधोरेखित करणारे उल्लेख भारताच्या अतिप्राचिन इतिहासाचे दस्तावेज असलेल्या वेद आणि इतर ग्रंथांमध्ये आढळून येतात. योगा आणि योगासनांचा प्रारंभ भारतात झाला की नाही? याविषयी मतभेद-विचार प्रवाह असू शकतात. मात्र, एक संदर्भ कोणीही नाकारू शकत नाही तो हाच की, भारताच्या प्राचिन गुरूकूल परंपरेत ‘योगा आणि योगासने’ ही अध्ययन तथा जीवनशैलीचा अविभाज्य भाग होती.
Friday, 19 June 2015
लिमजी मोठाच होता...
लिमजीचा आणि माझा फार संबंध नाही आला. जैन उद्योग
समुहाच्या जैन हिल्सवर काही निमित्ताने भेट असली की तेथील पीआरच्या गोतावळ्यात लिमजी हसमूख चेहऱ्याने नेहमी भेटायचा. त्याच्या हास्यामागे कधीही कोणताही हेतू नसायचा. पीआरमधील मंडळी तशी सहेतूक हसत असते. लिमजी तसा कधीही नव्हता. त्याचा आणि माझा संबंध तसा थेट आलाच नाही. पण, त्याच्या जाण्याचा निरोप राजूभाऊ नन्नवरेंकडून आला आणि बहुधा नंतर मी तो इतरांना दिला. केवळ हसमूख चेहऱ्यामुळे स्मृतीत राहीलेल्या लिमजीची जाण्याची बातमी मला चुटपूट लावून गेली.
समुहाच्या जैन हिल्सवर काही निमित्ताने भेट असली की तेथील पीआरच्या गोतावळ्यात लिमजी हसमूख चेहऱ्याने नेहमी भेटायचा. त्याच्या हास्यामागे कधीही कोणताही हेतू नसायचा. पीआरमधील मंडळी तशी सहेतूक हसत असते. लिमजी तसा कधीही नव्हता. त्याचा आणि माझा संबंध तसा थेट आलाच नाही. पण, त्याच्या जाण्याचा निरोप राजूभाऊ नन्नवरेंकडून आला आणि बहुधा नंतर मी तो इतरांना दिला. केवळ हसमूख चेहऱ्यामुळे स्मृतीत राहीलेल्या लिमजीची जाण्याची बातमी मला चुटपूट लावून गेली.
Saturday, 13 June 2015
हरणार्या लढाईचे शिलेदार
![]() |
ईश्वरलाल जैन आणि मनिष जैन |
विधानसभेच्या कामकाजात सुधारणा
![]() |
महाराष्ट् विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे |
खासगी कार्यक्रमानिमित्त बागडे शुक्रवारी जळगावात आले होते. तेव्हा त्यांनी ‘तरुण भारत’ कार्यालयास भेट दिली. तेथे त्यांच्याशी विधानसभेतील कामकाजाविषयी चर्चा केली. त्यांनी इतरही काही मुद्दे स्पष्ट केले.
Wednesday, 10 June 2015
मुस्लिमांनी योगा करावा की नाही ? (सुधारित)
![]() |
मुस्लिम योग शिक्षिका काय म्हणते? |
(यात रागिब बहादूर यांनी एकेश्वर वाद स्पष्ट करीत सूर्य नमस्कार का नको? ही बाजू मांडली आहे)
हिंदू आणि मुस्लिमांच्या प्रार्थना व धर्माचरणात सूर्य व चंद्राचे पूर्वापार महत्व आहे.
हिंदू कैलेंडर चंद्रावर आधारित आहे.
मुस्लिमांचे पवित्र सण रमजान ईद चंद्रदर्शनावर आधारित आहे.
दोन्ही धर्मात अनेकवेळा चंद्र दर्शनावरून विधी-व्यवहार केले जातात. ही पूर्वापार परंपरा आहे.
Saturday, 6 June 2015
अॅड. निकमांच्या प्रभावळीला ग्रहण
संपूर्ण जगभरात भारतीय फौजदारी कायद्याचे अभ्यासू आणि निष्णांत विधीज्ञ म्हणून ओळख असलेले अॅड उज्ज्वल निकम हे कधीकधी उत्साहाच्या भरात केलेल्या वक्तव्यामुळे ‘शाब्दीक वादांच्या’ भोवर्यात सापडतात. यातून बाहेर पडण्यासाठी त्यांना आपणच केलेली वक्तव्ये नाकारावी लागतात. असे प्रकार वारंवार घडल्याचे वर्तमान आणि इतिहासातील नोंदी पाहून लक्षात येते. प्रचंड लौकिक आणि लोकप्रियता असतानाही प्रिंट, वेब आणि लाईव्ह माध्यमांच्या आशयात ‘निकम खोटे बोलले’ किंवा ‘निकमने झूठ बोला’ अथवा ‘लॉयर निकम लाईज्’ अशा ब्रेकिंग न्यूज अलिकडे आल्या आहेत. ‘उज्ज्वल वलयांकित’ व्यक्तिमत्व असलेल्या निकमांच्या ‘प्रभावळीला’ या ब्रेकिंग न्यूज म्हणजे काही काळांसाठी ‘दोषांचा ग्रहणकाळ’ ठरतो. यापुढ असेे होवू नये याची काळजी स्वतः अॅड. निकम यांनाच घ्यायची आहे.
(वैधानिक इशारा - या लेखातील कोणताही आशय उपलब्ध वृत्तांकनांवर आधारित आहे. त्यातून अॅड. उज्ज्वल निकम यांचा अवमान करण्याचा हेतू मुळीच नाही)
(वैधानिक इशारा - या लेखातील कोणताही आशय उपलब्ध वृत्तांकनांवर आधारित आहे. त्यातून अॅड. उज्ज्वल निकम यांचा अवमान करण्याचा हेतू मुळीच नाही)
Wednesday, 3 June 2015
अॅड. उज्ज्वल निकम जे बोलले; तेच लिहीले...
(पत्रकाराच्या प्रामाणिकपणावर शंका नको)
गेले ३ दिवस अॅड.. उज्ज्वल निकम यांनी स्व. गोपिनाथ मुंडे यांच्याविषयी आदरातून केलेले आणि मुंबई बॉम्बस्फोट खटल्याशी संबंधित वक्तव्य "गोपिनाथ मुंडे यांच्यामुळे तरलो" हे सोशल मीडियात गाजते आहे. स्व. मुंडेंविषयी आदर व्यक्त करताना निकम यांनी स्व. बाळासाहेब ठाकरेंविषयी आक्षेप घेता येईल असे विधान केले आहे. मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातून वादग्रस्त अभिनेता संजय दत्तला बाहेर काढण्यासाठी स्व. ठाकरेंनी थेट माझ्यावर दबाव आणला आणि मी तसे करायला नकार दिल्यानंतर तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशींनी मला खटल्यातून काढायचे आदेश दिले. मात्र तेव्हा युती सरकारमध्ये गृहखाते सांभाळणारे स्व. मुंडेंनी मला तारले, असे निकम यांचे एकूण म्हणणे पोस्टमध्ये तपशिलाने प्रसिध्द झाले आहे.
Monday, 25 May 2015
हमारे ‘बापू’ की कहानी
(हमारे पिताजी तथा बापू श्री. केशवलाल तिवारी इनका आज दि. २५ मे २०१५ का जन्मदिन. उम्रके ७८ साल पुरे कर बापू ७९ वे सालमें प्रवेश कर रहे है. उनकेप्रति मेरी भावनाएँ)
आदरणिय पिताजी तथा बापू आपको जन्मदिनकी बहुतसारी शुभकामनाएँ. हमारी माँ सौ. मनोरमा इनका जैसे ‘माँसे आई होनेका सफर’ रहा है वैसेही आपका ‘पिताजीसे बडेभय्या और बडेभय्यासे बापू होनेका सफर है’ लेकिन इतसप चर्चा फिर कभी करूंगा.
आपको जन्मदिनकी बधाई देनेके पहले आज सुबहसे मै सोच रहा था, गुजरे हुए २०-२५ सालोंमें आपने मुझे कब-कब दाटा? इस प्रश्नको लेकर मैं व्यक्तिगत तौरपर अस्वस्थ था. मनुष्य स्वभावकी विशेषता है, हम अपनोंकेसाथ गुजारेहुए अच्छेपल, या अपनोंका अच्छा-ममत्वभरा बर्ताव अल्प समयकेलिए याद रखते है, लेकिन किसीका दूर्रव्यवहार या गैरबर्ताव हम हमेशाकेलिए याद रखते है. इसप्रकारकी वेदनादायी याँदे बडीही तकलिफ देय होती है. वो स्वभावका ‘नासूर’ भी बन जाती है.
आदरणिय पिताजी तथा बापू आपको जन्मदिनकी बहुतसारी शुभकामनाएँ. हमारी माँ सौ. मनोरमा इनका जैसे ‘माँसे आई होनेका सफर’ रहा है वैसेही आपका ‘पिताजीसे बडेभय्या और बडेभय्यासे बापू होनेका सफर है’ लेकिन इतसप चर्चा फिर कभी करूंगा.
आपको जन्मदिनकी बधाई देनेके पहले आज सुबहसे मै सोच रहा था, गुजरे हुए २०-२५ सालोंमें आपने मुझे कब-कब दाटा? इस प्रश्नको लेकर मैं व्यक्तिगत तौरपर अस्वस्थ था. मनुष्य स्वभावकी विशेषता है, हम अपनोंकेसाथ गुजारेहुए अच्छेपल, या अपनोंका अच्छा-ममत्वभरा बर्ताव अल्प समयकेलिए याद रखते है, लेकिन किसीका दूर्रव्यवहार या गैरबर्ताव हम हमेशाकेलिए याद रखते है. इसप्रकारकी वेदनादायी याँदे बडीही तकलिफ देय होती है. वो स्वभावका ‘नासूर’ भी बन जाती है.
Saturday, 23 May 2015
अष्टावधानी अत्रेबाबा !
Saturday, 16 May 2015
मनपातील ‘विक्रम आणि वेताळ’

Sunday, 10 May 2015
"माँ" का "आई" होनेका सफर...
मातृदिन आत्ममंथन (दि. १० मई २०१५)
हमारी माँ इंदोरसे है. माँका पिहर नंदानगरमेंहै. वहाँपर स्व. राममूर्ती वाजपेयीका परिवार था. आजभी मामांओंका है. शायद मैं ७/८ वी कक्षामे था जबतक हरवर्ष गर्मीयोंकी छुट्टीयोंमें माँके साथ इंदोर जाया करता था. मेरे ३ मामा अशोक, गिरीश तथा बब्बू, मुकेश और ३ मौसी बेबी, अनिता और रेखा है. नानीजीभी है. माँसे छोटीवाली बेबीमौसीसे हमे ममत्व था. मौसी कभी कभार कही सिटीमेंजाए तो मुझे साथ लेकर जाती थी. मौसीकी भरकुँआवाली एक सहेली का किस्सा आजभी हसहसकर सुनाया जाता है. उमरमे लगभग साथवाली अनिता और रेखा मौसी थे. हम बहूतही मस्ती करते थे. नानी चिल्लाती थी. माँको बोलतीथी "बडीमुन्नी तेरे छोरे बडे बंड है. तेरा भाग्य कुछ अच्छा नही"
![]() |
मनोरमा और केशवलाल |
Saturday, 9 May 2015
"मविप्र"त परिवर्तनाची मुहूर्तमेढ

नाथाभाऊंचा चेकमेट!
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथराव खडसे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेल्या सर्व पक्षीय ‘सहकार पॅनेल’ने २१ पैकी १८ जागा जिंकल्या. ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून चर्चेचे गुर्हाळ तब्बल महिनाभर सुरू होते. शिवसेना नेत्यांनी खडसेंसोबत जाण्याचा ‘तह’ करून टाकला. कॉंग्रेस नेत्यांनी बदलाचे वारे ओळखून लढाईतून ‘माघार’ घेतली. राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही २/३ जागा देण्याची खडसेंची तयारी होती. मात्र, हट्टी आणि दुराग्रही नेत्यांमुळे निवडणुकीचा ‘फड’ रंगला. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्या नेत्याने पक्षश्रेष्ठींचे हवाले देत निवडणूक लादली नंतर ते नेते प्रचारातून बाहेर राहीले. तसा ‘घरचा आहेर’ पक्षाच्या महिला नेत्यांनी जाहीरपणे दिला. अखेर बँकेच्या राजपटावर सर्व विरोधकांना ‘चेकमेट’ करीत खडसेंचे पॅनेल बहुमताने विजयी झाले. राजकीय बुध्दीबळात सोंगट्या कितीही रंगाच्या असल्या तरी सर्व बाजूंचे राजे एकटे ‘नाथाभाऊ’ असल्याचे या निकालाने सिध्द केले. जिल्ह्यातील सहकाराला नवीदिशा देणारा आणि सत्ता वाटणीचा ‘नवा पटर्न’ निर्माण करणारा हा निकाल आहे. भविष्यात जिल्ह्यातील सहकार मोडीत-विक्रीत निघतो की उर्जितावस्थेत येतो हे काही काळानंतर दिसेल...
जिल्हा बँक अध्यक्षपदी रोहिणी खेवलकरच!
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी ऍड. रोहिणी खेवलकर यांचीच निवड होणार हे निश्चित आहे. या बँकेत एकूण २१ पैकी १८ संचालक हे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहकार’ पॅनलचे निवडून आले आहेत. त्यामुळे अध्यक्ष कोण होणार ही उत्सूकता असली तरी खडसे यांच्या कन्या आणि सहकार-शिक्षण क्षेत्रात काम करणार्या रोहिणी खेवलकर यांचीच या पदावर निवड होणार हे निश्चित आहे.
Sunday, 3 May 2015
हजार भूकंपाच्या अनुभवातून जपान डौलाने उभा !
आपत्तीत बचावतंत्र हिच जीवनशैली ः बांधकामात अद्यावत पद्धतींचा वापर
भूकंपाच्या आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न सध्या नेपाळ करीत आहे. भारतात किल्लारी (महाराष्ट्र), भूज (गुजरात) येथे झालेल्या भूकंपाच्या आठवणी आजही संबंधितांच्या मनात भीतीचा थरार जागवतात. मात्र, ज्याच्या नशिबी पाचवीला ‘भूकंप पूजला आहे’ असा जपान आतापर्यंत एक हजारावर भूकंपाच्या आपत्ती सहन करूनही प्रगत राष्ट्रांच्या रांगेत पाय रोवून उभा आहे. आपला देश भूकंप आणि ज्वालामुखीप्रवण क्षेत्रात आहे आणि त्यातून सुटकेचा कोणताही मार्ग नाही याचे पूर्णतः ज्ञान झाल्यामुळे जपानच्या नागरिकांनी भूकंपाच्या आपत्तीशी जोडून घेणारी जीवनशैली विकसित केली आहे. भूकंप आणि त्यानंतर त्सुनामीची पूर्वसूचना मिळणे, जिवीतहानी टाळून कमीत-कमी मालमत्तेचे नुकसान होणे आणि आपत्तीनंतरच्या राखेतून स्वबळावर उभे राहणे अशी ही जीवनशैली इतरांना प्रेरणा देणारी आहे
भूकंपाच्या आपत्तीतून सावरण्याचा प्रयत्न सध्या नेपाळ करीत आहे. भारतात किल्लारी (महाराष्ट्र), भूज (गुजरात) येथे झालेल्या भूकंपाच्या आठवणी आजही संबंधितांच्या मनात भीतीचा थरार जागवतात. मात्र, ज्याच्या नशिबी पाचवीला ‘भूकंप पूजला आहे’ असा जपान आतापर्यंत एक हजारावर भूकंपाच्या आपत्ती सहन करूनही प्रगत राष्ट्रांच्या रांगेत पाय रोवून उभा आहे. आपला देश भूकंप आणि ज्वालामुखीप्रवण क्षेत्रात आहे आणि त्यातून सुटकेचा कोणताही मार्ग नाही याचे पूर्णतः ज्ञान झाल्यामुळे जपानच्या नागरिकांनी भूकंपाच्या आपत्तीशी जोडून घेणारी जीवनशैली विकसित केली आहे. भूकंप आणि त्यानंतर त्सुनामीची पूर्वसूचना मिळणे, जिवीतहानी टाळून कमीत-कमी मालमत्तेचे नुकसान होणे आणि आपत्तीनंतरच्या राखेतून स्वबळावर उभे राहणे अशी ही जीवनशैली इतरांना प्रेरणा देणारी आहे
आव्हान नेपाळच्या पुनर्रउभारणीचे !
नेपाळसह उत्तर भारत हादरवून टाकणारा प्रलयंकारी भूकंप संपूर्ण जगाने दि. २५ आणि २६ एप्रिल २०१५ ला अनुभवला. पर्यटन क्षेत्रात देवभूमि असा लौकिक असलेल्या नेपाळमधील ८० लाख लोकांच्या घरा-दारांसह देवादिकांची मंदिरे-प्रार्थनास्थळे, ऐतिहासिक स्थळे भुईसपाट झाली. स्थावर व जंगम मालमत्तेच्या प्रचंड नुकसानीसोबत तेथील सामान्य लोकांच्या रोजी-रोटीचे बहुतांश आधार हिरावले गेले आहेत. शेजारचे आणि हिंदू बहुल राष्ट्र म्हणून भारत सरकारच्या यंत्रणेला तेथे सर्व प्रकारच्या मदतीसाठी धावून जावे लागले आहे. आपत्तीच्या खुणा बाजूला सारणे, अनपेक्षित संकटामुळे खचलेल्या नागरिकांमध्ये जीवन जगण्याची नवी उमेद पुन्हा जागविणे आणि टप्प्याटप्प्याने नागरी सुविधांची-गरजांची उभारणी करणे अशा तीन पातळ्यांवर नेपाळच्या पुनर्रउभारणीचे आव्हान जागतिक समुहापुढे असणार आहे. यात भारताची भूमिका ही ‘मोठ्या भावाची’ जबाबदारी म्हणून महत्त्वपूर्ण ठरेल.
Monday, 27 April 2015
'मधुकर’चा कलाटणी देणारा कौल
Saturday, 25 April 2015
वृत्तलेखन कार्यशाळेला लाभले "चार चाँद"
हम निकले साथमें और कारवाँ बनता-बढता गया
जळगाव जिल्हा पत्रकार संघ आणि जळगाव तरुण भारततर्फे दि.२३/ २४/ २५ एप्रिल २०१५ अशी ३ दिवस पत्रकार, लेखक, जाहिरातदार आदींसाठी मोफत कार्यशाळा झाली. यात मुख्य मार्गदर्शक म्हणून तरुण भारतचे मुख्य संपादक दिलीप तिवारी यांनी भाषा, शुध्द लेखन, वृत्तलेखन व पद्धती आणि लेखन कार्याशी संबंधित साधने यावर मार्गदर्शन केले. पहिल्या दिवशी ४५, दुसऱ्या दिवशी ३९ आणि समारोपाच्या दिवशी ४६ जणांनी सहभाग घेतला.
![]() |
दिलीप तिवारी |
‘पेपर रद्दी’च्या बदल्यात ‘नव्या वह्या’
आनंद पब्लिकेशन्सचा उपक्रम ः देशभरात युवकांची साखळी जोडणार
पर्यावरण रक्षण आणि समाजसेवा या दुहेरी उद्देशातून जळगावच्या आनंद पब्लिकेशन्सच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘रद्दी द्या’ नव्या कोर्या ‘नेचर फ्रेंडली वह्या घ्या’, हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. सध्या हा उपक्रम पुण्यात सुरू असून तेथे प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ही माहिती आनंद पब्लिकेशन्सचे जितेंद्र कोठारी यांनी दिली.
पर्यावरण रक्षण आणि समाजसेवा या दुहेरी उद्देशातून जळगावच्या आनंद पब्लिकेशन्सच्या वतीने येत्या शैक्षणिक वर्षापासून ‘रद्दी द्या’ नव्या कोर्या ‘नेचर फ्रेंडली वह्या घ्या’, हा अभिनव उपक्रम सुरू करण्यात येणार आहे. सध्या हा उपक्रम पुण्यात सुरू असून तेथे प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ही माहिती आनंद पब्लिकेशन्सचे जितेंद्र कोठारी यांनी दिली.
Sunday, 19 April 2015
पालकांशी समन्वयासाठी ‘अॅप’
नंदुरबारचे किशोरभाई वाणी यांचा प्रयत्न ः नंदुरबारच्या ‘केआरपीएस’चा उपक्रम
शाळेमध्ये विद्यार्थ्याच्या प्रगती, गुणवत्ता आणि वर्तणुकीची माहिती पालकांना देण्यासाठी ‘ऍण्ड्राईड ऍप’ चा वापर करण्याची अभिनव संकल्पना नंदुरबारच्या कन्हय्यालाल रावजी पब्लिक स्कूलने (केआरपीएस) अत्यंत प्रभावीपणे राबविली आहे. बदलत्या काळानुसार नव्या तंत्राचा अधिकाधिक वापर करून विद्यार्थ्यांना संभाव्य स्पर्धेत कसे उतरवता येईल, याचाच ध्यास घेतलेले नंदुरबारचे उद्योगपती तथा सर्वांत मोठे आडत व्यापारी किशोरभाई वाणी यांच्या नेतृत्वात ही शाळा वेगवेगळे शैक्षणिक प्रयोग राबवित आहे.
गारपिटचे संकट अटळच !

Wednesday, 15 April 2015
माझे चौथे आयुष्य...( अर्थात इंटरनेटवरचे सातबारा)
Monday, 13 April 2015
‘जिल्हा बँकमां काय भेटस रे भौ?’
जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत एकूण २१ पैकी १८ जागांसाठी सुमारे २६६ उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. जवळपास १०० वर उमेदवारी अर्ज अवैध ठरले आहेत. यातील काही संभाव्य उमेदवार सहकार विभाग किंवा न्यायालयाकडे जावून अर्ज वैध ठरवावेत म्हणून प्रयत्न करण्याची शक्यता आहे. प्रसंगी निवडणूक प्रक्रिया पुढेही ढकलली जाईल असे दिसते (तशी शक्यता नाहीच). ही निवडणूक बिनविरोध व्हावी म्हणून सर्व पक्षीय नेेते गेल्या दोन महिन्यांपासून प्रयत्न करीत होते. मात्र, उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उडालेली झुंबड पाहाता सर्व सामान्य माणूस पुढार्यांना प्रश्न विचारतोय की, ‘जिल्हा बँकमां काय भेटसरे भौ?’
Sunday, 5 April 2015
पीकेचा पडद्यामागील पंचनामा!
![]() |
Amir in Makkah |
विकास नियोजनातील वास्तव
शासनाच्या निधीतून विकासाच्या मोठ्या योजना राबविण्याचे दिवस संपले आहेत. कर स्वरुपातून होणारी महसुली जमा आणि नागरीकांच्या किमान गरजा कार्यक्रमावरील खर्चाचा ताळमेळ घालू न शकणारी शासन व्यवस्था नागरी सुविधा आणि सेवांशी सबंधित विकास कामे खासगीकरणाच्या माध्यमातून करण्याला प्राधान्य देत आहे. अशा प्रकारच्या व्यवस्थेतून उभारल्या जाणार्या प्रत्येक विकाससेवेसाठी नागरीकांना यूज ऍण्ड पे पद्धतीने खर्च करावा लागत आहे. विकासाचे हे मॉडेल अडचणीचे आणि असंख्य तक्रारींचे ठरत आहे. विकास नियोजनातील हेच वास्तव लक्षात घेवून पुन्हा एकदा लोकसहभाग आणि लोकवर्गणीतून विकासाचे नवे सामाजिक मॉडेल निर्माण करावे लागणार आहे.
निसटामार्गाचे सेवेकरी
राजपटावर सत्तेच्या जवळ जाण्यासाठी किंवा सत्ता मिळविण्यासाठी दोन प्रकारच्या मार्गांचा अवलंब केला जातो. पहिला म्हणजे, एकाच विचारधारेशी कायम प्रामाणिक राहून सत्ता प्राप्तीची प्रतीक्षा करणे. हा मार्ग खूप वेळ घेणाराही असू शकतो. दुसरा मार्ग म्हणजे, सत्तेत असलेल्या कोणत्याही विचारधारेशी तडजोड करणे. शक्य होईल तेव्हा आपली विचारधारा बदलणे. हा मार्ग संधीनुसार बदलता येतो. वरील दोन्ही क्रियांसाठी दोन चांगले पर्यायी शब्द समोर आहेत. पहिल्या विचारधारेसोबत कायम राहणार्यांना आपण ‘निष्ठामार्गावरुन’ जाणारे वारकरी म्हणू शकतो. मात्र, बदलत्या विचारधारेशी गरजेनुसार संधी साधणार्यांना आपण ‘निसटामार्गाचे सेवेकरी’ म्हणू शकतो. याचे कारण, ही मंडळी एकाजागेहून दुसर्या जागेसाठी कधीही निसटू शकतात. त्याचे उद्दिष्ट हे सेवा देण्याचे किंवा घेण्याचे असते, म्हणून ते सेवेकरी....
७/१२ अॅट व्हाट्स अॅप टू फेसबुक
सध्या समुह चाळ्यांचे व्यक्तिगत माध्यम असलेल्या व्हाट्स ऍपवर कोण कशाची चर्चा करेल सांगता येत नाही? परवा आमच्या कान्हदेश गृपवर ‘सातबारा’ या विषयावर अशीच चर्चा रंगली. एकाने सातबारा नाव कसे तयार झाले? याची पोस्ट शेअर केली. त्यानंतर सदस्यांची चर्चा रंगली ती शेतीच्या आठवणींवर. गृपमधील काही सदस्यांचा शेतीशी संबंध आहे. कोणी कधीतरी शेतीत काम केले आहे. त्या आठवून रात्री उशिरापर्यंत विषय चर्चेत होता. शेती परवडत नाही पासून कोरवाडू शेतकर्यांचे आजचे प्रश्नही मांडले गेले. एका सदस्याने हा विषय व्यापक समूह चाळ्यांच्या फेसबुकवर नेला आणि विषय गंभीरही झाला...
Saturday, 4 April 2015
निवडणुकीपुरता सुरेशदादा आपला माणूस!
जैन समर्थकांची अवस्था सध्यातरी कोणता झेंडा घेवू हाती
जळगाव मनपाच्या घरकुल प्रकरणात जळगावचे आमदार व नेते सुरेशदादा जैन हे गेल्या दोन वर्षांपासून तुरूंगात असल्याची आठवण काल पासून तीव्रतेने होत आहे. शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे हे विधानसभा निवडणूकपूर्व मेळावा घेण्यासाठी काल जळगावात आले होते. त्यांनी कार्याकर्त्यांच्या मेळाव्यात जाहीरपणे सांगितले की, सुरेशदादा आपला माणूस आहे, त्याला राज्यातल्या कॉंग्रेस आघाडी सरकारने तुरूंगात डांबले आहे...त्यानंतर ठाकरे हे जैन कुटुंबियांच्या भेटीसाठी त्यांच्या घरीही गेले...तेथे त्यांची खातरदारी झाल्याचेही फोटो आणि वर्णन छापून आले आहे...
कारभारी दमानं !
जामनेर तालुक्यातील जनतेचे आमदार गिरीश महाजन सध्या राज्याचे जलसंपदामंत्री आहेत. महाजन यांना ‘भाऊ’ सुद्धा म्हणतात. जामनेरकरांमध्ये ‘टपरीवरचा आमदार’ किंवा ‘बुलेटवाला आमदार’ अशीही महाजन यांची ओळख आहे. ती वर्षानुवर्षे आहे आणि राहील सुद्धा. महाजन यांना मंत्रिपदाची शपथ देवविताना राज्यपालांनी महाजन यांच्या मुखातून ‘माझे शुद्ध आणि सद्विवेकी आचरण’ राहिल असे जाहीरपणे वदवून घेतले आहे. याशिवाय, ‘कायद्याद्वारे स्थापित राज्याचा मी घटक असेन, त्याचे पालन करीन,’ असेही महाजन यांनी शपथेवर म्हटले आहे. त्यामुळे मंत्री म्हणून आपले सार्वत्रिक ‘वर्तन’ आणि व्यक्तिगत ‘वागणूक’ याच्याशी संबंधित आचरणाविषयी ‘मंत्री महाजन’ यांना गंभीर व्हावेच लागणार आहे. राज्याच्या या कारभार्याला ‘कारभारी दमानं’ असे सांगण्याची ही वेळ आहे...
खेळ नियतीचा !
(माझ्या गुन्हेगारीला गोल्डमेडलच्या टाळ्या)
मित्राहो, मी अंध विश्वासू नाही पण, आयुष्यातील काही घटना अशा घडतात की, कुठेतरी-कोणीतरी-काहीतरी नियंत्रित करते आहे, असे वाटायला लागते. आज (दि. १६ मार्च २०१५) ला मला याची पुन्हा प्रचिती आली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २३ व्या पदवीदान समारंभात ‘एमए मासकॉम’ या अभ्यासक्रमात विद्यापीठात पहिला आल्याबद्दलचे ‘गोल्डमेडल’ मी स्वीकारले. हे ‘गोल्डमेडल’ मला डून विद्यापीठाचे (देहराडून, झारखंड) कुलगुरू प्रा. व्ही. के जैन यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी व्यासपिठावर एकाबाजूला उमविचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर मेश्राम आणि कुलसचिव प्रा. डॉ. अशोक महाजन टाळ्या वाजवत होते.
मित्राहो, मी अंध विश्वासू नाही पण, आयुष्यातील काही घटना अशा घडतात की, कुठेतरी-कोणीतरी-काहीतरी नियंत्रित करते आहे, असे वाटायला लागते. आज (दि. १६ मार्च २०१५) ला मला याची पुन्हा प्रचिती आली. उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या २३ व्या पदवीदान समारंभात ‘एमए मासकॉम’ या अभ्यासक्रमात विद्यापीठात पहिला आल्याबद्दलचे ‘गोल्डमेडल’ मी स्वीकारले. हे ‘गोल्डमेडल’ मला डून विद्यापीठाचे (देहराडून, झारखंड) कुलगुरू प्रा. व्ही. के जैन यांच्याहस्ते देण्यात आले. यावेळी व्यासपिठावर एकाबाजूला उमविचे कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर मेश्राम आणि कुलसचिव प्रा. डॉ. अशोक महाजन टाळ्या वाजवत होते.
Friday, 3 April 2015
मंगळागौरीचे व्रत
श्रावण महिन्याला शुद्ध आणि सात्विकतेचे आवरण आहे. म्हणूनच या महिन्यात
अनेक सण समारंभ साजरे केले जातात. अगदी घरगुती सणांचाही हा महिना आहे. लग्न
झालेल्या मुलींची मंगळागौर ही याच महिन्यातील मंगळवारी साजरी केली जाते.
पूर्वजांनी अतिशय कल्पकतेने धार्मिकतेशी याचा संबंध जोडून महिलांच्या
कला-गुणांना आणि मुख्य म्हणजे रिलॅक्स व्हायला या सणाची योजना केली आहे.
रोजच्या कामाच्या धबडग्यात हरवलेल्या महिला मंगळागौरीच्या निमित्ताने धमाल
करून तोपर्यंतचे कष्ट, श्रम विसरतात आणि ताज्यातवान्या होतात.
त्र्यंबकेश्वरची ब्रह्मगिरी प्रदक्षिणा
त्र्यंबकेश्वरला श्रावणातील तिसर्या सोमवारच्या ब्रह्मतगरी प्रदक्षिणेला
पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व आहे. दरवर्षी एकलाखावर भाविक या खडतर
प्रदक्षिणेत सहभागी होतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी त्र्यंबकेश्वर
येथे ब्रह्मगिरी प्रदक्षिणा घालण्यासाठी बाविक गर्दी करतात. पुण्यदायी,
मोक्षाकडे सन्मार्गाकडे नेणारी प्रदक्षिणा म्हणून बाविकांचा समज आहे.
‘भोलेहरऽऽऽ’च्या जयघोषाने त्र्यंबक परिसर दुमदुमला जातो. दरवर्षी सुमारे
लाखावर भाविक ही प्रदक्षिणा पूर्ण करतात. ही प्रदक्षिणा करण्याची परंपरा
अतिप्राचीन आहे.
गोदावरी प्रदूषणाचे गुन्हेगार कोण?
दर एक तपानंतर गोदावरी काठावर होणार्या सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे देव
तथा संतभूमी त्र्यंबकेश्वर आणि मंदिरांची पवित्र भूमी नाशिक हे जगप्रसिद्ध
झाले आहेत. या दोन्ही ठिकाणी अतिक्रमण आणि प्रदूषणामुळे गोदावरीचे
अस्तित्त्व आकुंचित होत असून, विविध कारणांमुळे प्रदूषित होणारे पाणी हे
वापराच्या लायकसुद्धा नाही. माशांचा मृत्यू आणि पात्रात फोफावणार्या
पाणवेलींच्या समस्येमुळे गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा चर्चेच्या ऐरणीवर आहे.
गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यासाठीचा देखावा त्र्यंबकेश्वर नगरपालिका, नाशिक
महानगरपालिका, प्रदूषण नियंत्रण मंडळ करीत असतात. थातूर- मातूर कारवाई आणि
चिल्लर स्वरुपातील स्वच्छता मोहीम अशा पत्रकबाजीत गोदावरी प्रदूषणाचे खरे
गुन्हेगार मात्र बाजूला पडत आहेत....
जळगावच्या गुन्हेपटावर दुसर्या पिढीचा रक्तसंघर्ष
गेल्या 20- 25 वर्षांत जळगाव शहरातील गुन्हेगारी टोळ्यांची सशस्त्र दहशत
पोलीसांच्या कणखर कारवाईमुळे संपुष्टात आली आहे. टोळ्यांच्या
म्होरक्यांनीही स्थानिक स्वराज्य, सहकारी, शिक्षण आणि काही क्रीडा
संघटनांमध्ये कारभारीपदे मिळविल्यामुळे त्यांचे लोकदर्शन सभ्यतेचा मुखवटा
घालून होत आहे. असे पांढरपोषाखी पुढारी पोलीसांच्या प्रतिबंधात्मक कारवाईला
घाबरतांना दिसतात. हा धाक निश्चितच कायद्याचाच आहे. मात्र, एप्रिल 2012
मध्ये एकमेकांवर सशस्त्र हल्ल्याच्या घडलेल्या काही घटना पाहता
गुन्हेगारीपटावर दुसर्या पिढीचा रक्तसंघर्ष सुरू झाला की काय? अशी शंका
येते. नव्या गुंडाराजचा हा बाका प्रसंग ओळखून पोलीसांनीही दंडाराज
अस्तित्वात आहे, हे दाखवून द्यायलाच हवे...
परिवर्तनाच्या उंबरठ्यावर लेवा पंचायत
लेवा पाटील समाजाच्या जात पंचायतीला पाऊणशे वर्षांचा इतिहास आहे. समाजातील
वाद आणि कौटुंबिक कलह मिटविण्याचे न्यायालयबाह्य व्यासपीठ म्हणून बहुतांश
कुटुंबांनी पंचायतीत झालेले निर्णय मान्य केले आहेत. दोषारोपाचे एक बोट
दाखवून ही व्यवस्था बदनाम होईल मात्र उध्वस्त होणार नाही. पंचायतीला
सांभाळणारे अनेक हात असून त्यांच्या सहकार्याने नव्या जोमाने, चेहर्यानेे
पंचायत कार्यरत राहील. तसे करताना आरोपांच्या मागील काही कारणांचे वास्तवही
समाजातील मान्यवर, प्रज्ञावंतांनी जाणून घ्यावे. तरच परिवर्तनाचा उंबरठा
ओलांडल्याचे चित्र साकारले जाईल...
दरवाजाबाहेरचे मुस्लिम मराठी साहित्य
जळगाव येथे आयोजित दहाव्या अखिल भारतीय मुस्लिम मराठी साहित्य संमेलनाचे
उद्घाटन दीपप्रज्वलन करुन करताना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे
अध्यक्ष डॉ. नागनाथ कोतापल्ले. डाविकडून आयोजक फारुक शेख, डॉ. एस. एन.
लाळीकर, स्वागताध्यक्ष गफार मलिक, जैन उद्योग समुहाचे उपाध्यक्ष अशोक जैन,
कॉ. विलास सोनवणे, मुस्लिम मराठी सहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष डॉ.
इक्बाल शेख मिन्ने, संमेलनाचे अध्यक्ष प्रा. डॉ. आजम आणि इतर.
आनंदयात्री ! - अशोकभाऊ जैन
अजातशत्रू असलेल्या श्री. अशोकभाऊ जैन हे आज वयाची 50 वर्षे पूर्ण करीत
आहेत. त्यांच्याकडे येणारा कंपनीतला व बाहेरचा माणूस अडचणी घेऊन येतो.
त्यावर शक्यतो मार्ग काढून अडचणी सोडविण्याचे काम श्री. अशोकभाऊ करतात,
म्हणून ते ठरतात ‘आनंदयात्री’
शरददादांची भावकी !
नेत्यांनाही अडचणीत आले. त्यापैकी "दखल' घ्यावी लागेल ती मंत्री डॉ.
विजय गावित यांचे बंधु शरद गावित यांनी "बहुजन समाजवादी पक्षा'तर्फे
केलेल्या उमेदवारीची. श्री. शरद गावित एवढे फोकसमध्ये नव्हतेच. मात्र,
मंत्र्यांचे भाऊ आणि कॉंग्रेस विरोधातील उमेदवारी यामुळे ते चर्चेत आले
आहेत...
इंटरनेट वापरणार्यांचे "123456'' वर प्रेम
'इंटरनेट'च्या मायाजालमध्ये प्रवेश व त्याच्या वापरासाठी पासवर्ड
(सांकेतांक) हा महत्त्वाचा घटक. त्याच्याशिवाय संगणकीय किंवा नेट यंत्रणा
हाताळता येत नाही. जेवढी माणसं त्यापेक्षा जास्त त्यांचे पासवर्ड. इंटरनेट
वापरणारे कोट्यवधी ग्राहक आणि त्यांचे कोट्यवधी सांकेतांक. मात्र, यापैकी
लाखो लोकांचे सांकेतांक हे सारखेच तयार होत असल्याचे लक्षात येत आहे. सोपा
आणि लक्षात राहणारा "पासवर्ड' हवा या हेतूने तयार केले जाणारे अंक- अक्षर
समुह नेहमीच्या वापरातील असल्याचे जगभर केलेल्या सर्वेक्षणातून स्पष्ट होत
आहे. जगभरात इंटरनेट वापरणारे सर्वाधिक ग्राहक "123456' या अंक समुहाचा
पासवर्ड म्हणून वापर करतात असे लक्षात आले आहे. त्याची ही दखल...
होम चिकित्सा केंद्र - तपोवन
पारोळा- अमळनेर रस्त्यावर पारोळ्यापासून अवघ्या पाच किलोमीटरवर तपोवन हे होम चिकित्सा केंद्र आहे. तेथे जैविक ऊर्जा, वैद्यकशास्त्र, कृषिशास्त्र आणि हवामानशास्त्र याचा वैदीक पद्धतीने अभ्यास व प्रचार- प्रसार केला जातो. अग्निहोत्राच्या माध्यमातून या शास्त्रांचा सुरेख संगम घालून निसर्गदायी झालेली मानवी जीवनशैली येथे अनुभवता येते. त्याच्या अनोखा प्रवास...
Wednesday, 1 April 2015
फळे, भाज्यांना कृत्रिम आकार
निसर्गासोबत राहणे आणि त्याचा आनंद घेणे हा मानवाचा मुलभूत हक्क आहे. मात्र, निसर्गाला कोणत्याही प्रकारची हानी पोहचवून मानवी गरजा-सुविधांचा विकास करण्याच्या धोरणांना संपूर्ण जगभरातून विरोध आहे. परंतू काहीवेळा मानवी कल्पकतेतून निसर्गातील वृक्ष, वेली, पाने, फुले, फळे, वनस्पती यांच्या रचनेतही बदल केले जातात. हे बदल कृषी क्षेत्राच्या विकासासाठी आवश्यक व सहाय्यक ठरतात. सध्या काही कृत्रिम बदल फळे, भाज्यांच्या आकारात केले जात आहेत. या बदलांच्या मनोरंजक आढावा...
Thursday, 12 February 2015
शहर सुंदर करणारी माणसं...
परिवर्तन हे नाव घेवून नाट्य क्षेत्रात काम करणारे आमचे मित्र व नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्ते शंभूअण्णा पाटील यांच्याशी एकदा जळगाव सुंदर आहे का? याविषयांवर वादपूर्ण चर्चा रंगली. जळगाव मनपा आणि त्यातील नाकर्त्या पुढाऱ्यांवर माझा प्रचंड राग असल्यामुळे भौतिक सुविधांच्या तक्रारी करीत जळगाव सुंदर नाहीच, असे मी आग्रहाने मांडत होतो. त्यावर शंभूअण्णा म्हणाले, बौद्धीक संपदा, निःस्वार्थी जनसेवा आणि चांगल्या प्रवृत्तीची माणसं लक्षात घेवून मी आपले जळगाव सुंदर असल्याचे म्हणत आहे. जळगावची माणसं इतरांच्यापेक्षा निश्चित सुंदर आहेत. अर्थात, हा युक्तीवाद मान्य करण्याच्या मनःस्थितीत मी नव्हतो.
शोध मी कोण?चा
गेले काही दिवस माझा वैचारिक गोंधळ उडाला आहे. मी कोण? या प्रश्नाचे उत्तर मला वेगवेळ्या मानसिकतेतून मिळत आहे. मला पडलेला प्रश्न हा माझ्या राष्ट्रीयत्व आणि नागरिकत्व याच्याशी संबंधित आहे. मी हिंदुस्थानी आहे, की मी भारतीय आहे, की मी इंडियन आहे, यापैकी जी ओळख मी माझी मानतो, त्यानुसार माझी विचारधारा बदलते. बहुधा याच मनःस्थितीत इतरही अनेकजण असावेत. ही ओळख एकदा प्रत्येकाने निश्चित केलीच पाहिजे...
गिरीशभाऊ भगीरथ व्हाच !
राज्याच्या जलसंपदा मंत्रालयाची सूत्रे जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्याकडे आहेत. जळगाव जिल्ह्यातील नेत्याला तिसऱ्यांदा या मंत्रालयाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. प्रकल्पांची पूर्तता आणि सिंचन लाभक्षेत्र बाबतीत संपूर्ण खान्देशच उपेक्षित आहे. अनेक लघु-मध्यम, मोठ्या पाटबंधारे व धरण प्रकल्पांचा हजारो कोटींचा अनुशेष शिल्लक असताना नव्या योजनांचा प्रारंभ करण्याची आज वेळ नाही. रखडलेले-प्रलंबित प्रकल्प पूर्ण करण्यासाठी गिरीशभाऊ पुरेसा निधी आणू शकले तरी त्यांचे नाव खान्देशच्या इतिहासात भगीरथमंत्री म्हणून लिहीले जाईल...
फेरयुती झाली; फेरजुळणीचे काय ?
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या नेत्यांनी एकत्र येवून फेरयुती जमवून आणली. राज्याच्या सत्तेत आता दोन्ही पक्षांची हिस्सेदारी निश्चित झाली आहे. राज्यस्तरावर बड्या नेत्यांचे मनोमिलन झाले, पण जिल्हा आणि गाव पातळीवर कार्यकर्त्यांच्या मनभेदाचा सांधा जुळणार कसा? हा प्रश्न आहे. फेरयुतीनंतर जळगाव जिल्ह्यातही कार्यकर्त्यांच्या फेरजुळणीचा नवा अध्याय लिहीण्यासाठी नेत्यांना प्रयत्न करावे लागतील. तरच जिल्ह्यासाठी सत्तेचा निश्चित लाभ दोन्ही पक्षांना मिळू शकतो...
जळगाव सुंदर होवू शकते
मृत्यू पश्चात आयुष्यावर ज्यांचा विश्वास आहे अशा श्रद्धाळूंना नरक म्हणजे काय हे सांगण्याची गरज नाही. पण, नरक असतो यावर ज्यांचा विश्वास नाही त्यांना नरकयातना म्हणजे काय? हे अनुभवायचे असेल तर त्यांनी जळगावमध्ये निवास करावा. नरकाची चित्रमय कल्पना ओमशांती परिवाराच्या प्रचार पुस्तकांतून दिली आहे. त्या पुस्तकातील चित्रे आणि जळगावकर सध्या ज्या वातावरणात निवास करीत आहेत ती स्थिती, यात फारसा फरक नाही. असे असले, तरी एक जळगावकर म्हणून मला वाटते की, हो जळगाव महानगर आजही सुंदर, स्वच्छ आणि चांगल्या माणसांचे गाव होवू शकते. ते कसे आणि त्यासाठी पर्याय काय असू शकतात? हेच सांगण्यासाठी हा लेखन प्रपंच...
नाथाभाऊ : द वॉल
भारतीय क्रिकेट संघाचे कप्तान म्हणून नेतृत्व गांगुलीकडे असो की धोनीकडे, बेसावध प्रसंगी ढेपाळणाऱ्या फलंदाजीला सावरणारा विश्वासू फलंदाज म्हणून नेहमी राहूल द्रविडकडे पाहिले जायचे. द्रविड खेळपट्टीवर पाय रोवून उभा राहायचा. राजकारणाच्या निसरड्या पटावरही पाय रोवून उभा राहणारा नेता असावा लागतो. राज्यातील भारतीय जनता पक्षात असा एकमेव नेता सध्या आहे, तो म्हणजे एकनाथराव खडसे. खान्देशचे नाथाभाऊ. भाजप नेतृत्वातील नव्या सरकारसाठी नाथाभाऊ म्हणजे द वॉल. संरक्षण देणारी भिंत...
विसर्जन रस्ता दुरूस्तीसाठी जैन उद्योग समुहाचा पुढाकार
मनपाचे बँक खाते सील झालेले. कोणताही ठेकेदार उधारीत काम करायला तयार नाही. पालकमंत्र्यांनीही निधी द्यायला असमर्थता व्यक्त केलेली. अशा अडचणीत गणेश विसर्जन मार्गाची तातडीने दुरूस्ती कशी करावी? हा प्रश्न मनपा प्रशासनासमोर होता. अखेर मदतीला उभा राहीला जैन उद्योग समुह. समुहाचे संस्थापक अध्यक्ष पद्मश्री डॉ. भवरलालजी जैन यांनी सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून विसर्जन मिरवणूक मार्ग दुरूस्तीच्या सूचना दिल्या आणि काम मार्गी लागले...
स्थितःप्रज्ञ नाथाभाऊंची आव्हानांवर मात !
राजकारण, समाजकारण आणि कौटुंबिक व्यासपीठावर गेल्या पाव शतकात ना. एकनाथराव खडसे यांची अनेक रुपे पाहता आणि अनुभवता आली. पत्रकार म्हणून त्यांच्या काही राजकिय निर्णयांचे समर्थन केले. अपवादात्मक स्थितीत खंडन करणारे लिखाणही केले. तटस्थपणे लिहीताना निर्णय टोकाचे वाटले मात्र, त्यांच्याशी चर्चा करून लिहीताना निर्णयांशी सहमती झाली. नाथाभाऊंच्या स्वभावाचा हा महत्त्वाचा पैलू आहे. त्यांनी एखाद्याविषयावर बाजू मांडली की, आव्हानात्मक वाटणारी स्थितीही त्यांच्या ताब्यात येते. ही सिद्धी त्यांना वैचारिक आणि आध्यात्मिक बैठकीच्या नैतिक अधिष्ठानातून प्राप्त झाली आहे. म्हणूनच नाथाभाऊ स्थितःप्रज्ञ माणसाप्रमाणे साऱ्या आव्हानांना सामोरे जातात नव्हे तर त्यावर यशस्वीपणे मातही करतात.
बदलाचा उंबरठा ओलांडताना...
खान्देशच्या मातीत रुजलेले दैनिक ‘जळगाव तरुण भारत’ आज 18 वर्षांची वाटचाल पूर्ण करून 19 व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. प्रखर हिंदूत्ववादी आणि उज्ज्वल राष्ट्राभिमान, राष्ट्रीय एकात्मतेचा विचार अंगिकारून नागपूर येथे वृत्तपत्राचा चेहरा लाभलेल्या ‘तरुण भारत’च्या मूळ स्थापनेपासूनच्या वाटचालीचा इतिहास 88 वर्षांचा आहे. स्थापनेपासूनच्या कालावधीचा विचार केला तर ‘जळगाव तरुण भारत’च्या प्रवासाला दीर्घ काळाची वाटचाल असे म्हणणे योग्य होणार नाही. परंतू, ‘जळगाव तरुण भारत’ अनेक स्थित्यंतराच्या काळातही आपले अस्तित्व आणि ओळख कायम ठेवू शकला, ही या द्विदशकाच्या प्रवासातील निश्चित समाधानाची बाब आहे.
जळगावकरांना पुराचा इशारा
जळगाव शहर व परिसरात दि. 8 आणि 9 सप्टेंबर दरम्यान सुमारे 36 तास झालेल्या जोरदार पावसामुळे उपनगरांमधून वाहणाऱ्या नाल्यांना नैसर्गिक उतार व प्रवाहाच्या दिशेने पूर आले. या पुरामुळे नाल्यांच्या काठावरील आणि लगतची पाच हजारावर कुटुंबे पूर्णतः किंवा काही प्रमाणात उध्वस्त झाली. निसर्ग आणि पर्यावरणाशी मनमानी खेळ करणाऱ्या सरकारी व खासगी प्रवृत्तींना या पुराने इशारा दिला. तो का, कसा, कुठे आणि कधीपर्यंत? हे प्रत्येक जळगावकराने समजून घेणे आवश्यक आहे...
Monday, 9 February 2015
डोंगर झालेली स्मिताताई
जळगाव जिल्ह्याची महिला देशाच्या सर्वोच्च राष्ट्रपतीपदापर्यंत पोहचल्याचा इतिहास श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या नावावर सुवर्णाक्षरांनी लिहीला गेला आहे. आदरणिय प्रतिभाताईंचे हे मोठेपण हिमालयाच्या उंची एवढे आहे. जिल्ह्यातील महिलांना राजकारण आणि सत्तेतील सर्वोच्चपदे अभावानेच मिळाली. ज्यांना मिळाली त्यांनी निश्चितपणे कार्याचा ठसा उमटवला. आता तशी संधी अमळनेर येथील सौ. स्मिताताई उदय वाघ यांना विधान परिषद आमदारकीच्या माध्यमातून मिळाली आहे. मनमिळावू, सतत कार्यरत राहणाऱ्या आणि पक्ष-कामांशी निष्ठावंत असलेल्या ताईंचा हा प्रवास हिमालयाच्या तुलनेत सध्यातरी डोंगर होण्याएवढाच आहे. मात्र कामाच्या आदर्शातून स्मिताताई भविष्यात शिखर झालेल्या असतील असा आज विश्वास आहे...
अकार्यक्षम उमवि प्रशासनाचे ‘नैतिक मूल्यांकन’ काय?
पाच महिन्यांपासून विद्यार्थिनींचे
लैंगिक छळ प्रकरण प्रलंबित : कुलगुरू आणि टीम दोषींना शोधू शकत नाही
प्रशासन प्रमुख असतो जबाबदार कोणत्याही मोठ्या संस्थेच्या
व्यवस्थापनाचा प्रमुख हा संस्थेतील अंतर्गत आणि बाह्य व्यवस्थेला जबाबदार असतो, हा
साधा नियम आहे. वयाची 25 वर्षे गाठणाऱ्या उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या प्रशासनाचे
प्रमुख म्हणून खान्देशात कुलगुरू प्रा. डॉ. सुधीर मेश्राम यांच्याकडे पाहिले जाते.
किंबहुना तेच या सर्वोच्च शैक्षणिक संस्थेचे प्रमुख आहेत. या संस्थेत घडलेल्या एखाद्या
अपराधाची अंतर्गत चौकशी करताना त्यातील दोषी किंवा अपराधी शोधून काढण्याचे काम सर्व
प्रथम कुलगुरू, कुलसचिव आणि उपकुलसचिवांच्या गोतावळ्यासह सर्व अधिकारी वर्गाने केले
पाहिजे. दोन मुलींच्या लैंगिक शोषणाच्या प्रकाराकडे ही सारी मंडळी दुर्लक्ष करीत असल्याचेच
आतापर्यंत दिसत आहे.
विमा क्षेत्रात आर्थिक लढाई
आयुर्विमा (लाईफ इन्शूरन्स) सेवा ही भारतील एकूण लोकसंख्येच्या तुलनेत 30 टक्केपर्यंत पोहचली आहे. याशिवाय, आरोग्य, वाहन, अपघात, घर, उद्योग, व्यापार किंवा मानवी क्षेत्रांशी संबंधित इतर विमाविषयक सेवांचाही झपाट्याने प्रचार-प्रसार होत आहे. विमा संरक्षण देणाऱ्या सर्व सेवांसाठी देशांतर्गत 120 कोटी लोकसंख्या म्हणजे खुली व अवाढव्य विस्तारलेली बाजारपेठ आहे. ही बाजारपेठ विमा सेवा देणाऱ्या देशांतर्गत सर्व घटकांसाठी पूर्वीच खुली झाली आहे. आता विदेशी घटकांनाही भारतीय बाजारात 49 टक्के भांडवली गुंतवणुकीचा हक्क घेवून आक्रमपणे उभे राहता येणार आहे. तसे झाल्यानंतर निर्माण होणारे प्रश्न किंवा संधी यावर सध्या अनुकूल-प्रतिकूल मंथन सुरू आहे.
Subscribe to:
Posts (Atom)